वाडा ( हिरालाल लोखंडे ) राज्य आणी केंद्र सरकार व्दारा महिला सबलीकरण करणांचे गोडवे गात असताना, वाडा तालुका जिल्हा पालघर मधील चिंचघर ग्रामपंचायतीत महिला सदस्या श्रीमती साक्षी पाटील यांना ग्रामपंचायत,ग्रामसेवक ,वरिष्ठ अधिकारी यांच्या कडून सहकार्य मिळत नाही, चिंचघर वाडा तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असून, एकुण ९ सदस्य सत्ताधारी ६ व विरोधी पक्षाचे ३ विरोधी पक्षाचे एक पुरूष व दोन महिला प्रतिनिधी असताना, विरोधी पक्षातील महिला सदस्यांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता अपमानास्पद वागणूक दिली जाते. मासिक सभेचा अजेंडा, सभेचे इतिवृत्त, जमाखर्च तपशील पुरविला ( दिला ) जात नाही.या बद्दल महिला सदस्य श्रीमती साक्षी पाटील यांनी वेळोवेळी ग्रामसेवक, पंचायत समिती विस्तार अधिकार, गट विकास अधिकारी यांच्या कडे पाठपुरावा करून सुध्दा ,अधिकारी वर्ग दखल घेत नसल्याने अखेर त्यांनी मा तहसिलदार साहेब वाडा, मा पोलिस निरीक्षक साहेब वाडा, गटविकास अधिकारी वाडा यानी त्याचे म्हणणे ऐकून त्यांच्या मागण्याची पूर्तता व्हावी या साठी मा तहसिलदार, पोलिस निरीक्षक, गटविकास अधिकारी ( सर्व अधिकारी तालुका वाडा जिल्हा पालघर ) यांना लेखी अर्ज दिला असून पंधरा दिवसांच्या आत त्याच्या मागण्या मान्य न झालाय ८मार्च २०२१ रोजी जागतिक महिला दिनी वाडा पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा ईशारा वजा लेखी पत्र दिनांक २३ फेब्रुवारी २०२१ रोजी मा, जिल्हा अधिकारी पालघर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद पालघर,उपविभागीय अधिकारी वाडा तसेच विभागाशी सबंधित अधिकारी यांना दिलेले आहे. यावर अधिकारी वर्ग काय निर्णय घेणार या कडे वाडा तालुक्यातील नागरिकांनाचे लक्ष लागुन आहे.
Saturday, February 27, 2021
श्री राम मंदिर निर्माणासाठी ७६ वर्षीय आजीने दिले ५०००/-₹ !
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) श्री राम मंदिर निर्माण करण्यासाठी पालघर तालुका संयोजक श्री शरद घरत व त्यांचे सहकारी १५ जानेवारी २०२१ ते १५ फेब्रुवारी २०२१ या एक महिन्याच्या काळात सफाळे परिसरातील जंगल पट्टी, बंदर पट्टी, विभागातील प्रत्येक गांव, पाडा, वस्त्या मधील बांधवांना भेटून त्यांच्याशी संवाद साधता आला. व बोलण्याची संधी मिळाली या बद्दल आयोजकांना समाधान मिळत आहे.
समुद्रात सेतु बांधताना श्रीरामांनी खारूताई सारख्या छोट्या जिवाची दखल घेतल्याचा उल्लेख रामायणात आहे. राम भक्त दारोदारी जाऊन राममंदिर निर्माण निधी संकलन करताना दहा रूपये पासून चार अंकी - पाच अंकी निधी मनोभावे देणारे दाते पहावयास मिळत आहे. सफाळे विभागातील ६५ गांव,पाडे, वस्त्या मिळून रामभक्ताचा मिळणारा लाखो रूपयांचा निधी हिशोब जुळवून, बँकेत जमा करण्यात येत आहे. आपण सर्वांच्या सहभागाने, श्रीरामांच्या कृपेने काम करीत आलो, या पुढेही करीत राहणार आहोत. वडराई ता,जि पालघर येथील श्रीमती विशाला गावड वय वर्षे ७६ यांनी आपल्या पेन्शन मधून ५०००/- अक्षरी पांच हजार रूपये राममंदिर निधी दिला असता स्विकारताना श्री शरद घरत, अनिरुद्ध नामजोशी, निमिश म्हात्रे, ऋषिकेश कुडू
Friday, February 26, 2021
पालघर नगरपरिषद आयोजित महिला बालकल्याण समितीच्या माध्यमातून, कोरोना चा वाढता प्रधुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा परिषद शाळां मध्ये मास्क वाटप चा कार्यक्रम
पालघर नगरपरिषद आयोजित जिल्हा परिषद शाळा मध्ये मास्क वाटप कार्यक्रम संपन्न
पालघर नगरपरिषद आयोजित महिला बालकल्याण समितीच्या माध्यमातून, कोरोना चा वाढता प्रधुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा परिषद शाळां मध्ये मास्क वाटप चा कार्यक्रम
घेण्यात आला. कार्यक्रमात पालघर च्या नगराध्यक्षा मॅडम
डॉ. सौ. उज्वला केदार काळे, महिला बालकल्याण समिती च्या विद्यमान सभापती नगरसेविका. राधा जितेंद्र पामाळे- मानकामे,
महिला बालकल्याण समिती माजी सभापती नगरसेविका
श्रीमती. अनुजा तरे, महिला बालकल्याण सदस्य नगरसेविका
सौ. रोहिणी अशोक अंबुरे
सौ. गीता संखे- पिंपळे
कु. प्रियंका म्हात्रे
कु. हिंदवी पाटील
कु. चेतना गायकवाड
व त्या त्या प्रभागातील नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते.
जनजागृती महाअभियानाचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या हस्ते उद्घाटन
दि 26 : प्रादेशिक लोक सम्पर्क ब्यूरो, महाराष्ट्र व गोवा विभाग, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने आयोजित जनजागृती महा अभियानाचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मल्टीमीडिया व्हैन द्वारे व्हिडीओ आणि कलापथकाच्या माध्यमातून कोविड लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत अभियानाविषयी सम्पूर्ण जिल्ह्यात ही जनजागृती करण्यात येईल. या वेळी. जिल्हा माहिती अधिकारी राहुल भालेराव, जिल्हा आरोग्य अधिकारी दयानंद सूर्यवंशी, क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांदळे, जिल्हा लसीकरण अधिकारी मिलिंद चव्हाण, किशोर चव्हाण, आकाश खाडे व इतर अधिकारी उपस्थित होते.
या वेळी श्री गुरसळ म्हणाले की कोविडचा धोका अजून सम्पलेला नाहीये म्हणून लोकांना खबरदारी घेण्यास प्रेरित करण्यासाठी या अभियानाची खूप मदत होइल. जिल्ह्यातील कोविडच्या दृष्टीने संवेदनशील भागांमध्ये या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येईल.
Thursday, February 25, 2021
1 मार्च रोजी जात वैधता प्रमाणपत्रा संदर्भात वेबिनारचे आयोजन
*1 मार्च रोजी जात वैधता प्रमाणपत्रा संदर्भात वेबिनारचे आयोजन*
पालघर (प्रतिनिधी)दि. 25 :- जात प्रमाणपत्रांची पडताळणी करुन जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करणेची प्रकिया दिनांक 01/08/2020 पासून पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आलेली आहे. सदर प्रक्रियेमध्ये अर्जदारांनी ऑनलाईन अर्जामध्ये परिपूर्ण माहिती भरणे, आवश्यक दस्तऐवज स्कॅन करुन अपलोड करणे तद्नंतर अर्ज ऑनलाईन सबमिट करणे आवश्यक आहे. सदर पूर्तता केल्यावर अर्जाची प्रिंट काढून विहित मार्गाने पूर्वीप्रमाणेच सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत या समितीस अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.
महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांचे निर्देशानुसार सदर प्रक्रियेची सर्वसामान्य नागरिक, अर्जदार यांना माहिती व्हावी या दृष्टीकोनातून दिनांक 01/03/2021 रोजी दुपारी 3.30 वा. वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर वेबिनारची लिंक पुढीलप्रमाणे आहे.
विषय:-जात प्रमाणपत्र पडताळणी
वेळ:- दिनांक ०१/०३/२०२१, दुपारी ३.३० वा.
ZOOM Meeting
Meeting ID- ८२४६९९९५८८४.
Password- १२३४५६७८९
सदर वेबिनारमध्ये सहभाग घेण्यास इच्छुक असलेल्या सर्व नागरिकांनी ZOOM App डाऊनलोड करुन त्याद्वारे सदर वेबिनारमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती चे सदस्य विशाल नाईक यांनी केले आहे.
000000000000
एडवण येथे हत्तीरोगावरील ‘विकृती व्यवस्थापन किट’ वाटप
एडवण येथे हत्तीरोगावरील ‘विकृती व्यवस्थापन किट’ वाटप
पालघर (प्रतिनिधी)आज दिनांक २५/२/२०२१ रोजी आरोग्य समिती सभेचे औचित्य साधुन हत्तीरोगासाठी उपयोगाचे असणारे "विकृती व्यवस्थापन किट" जि.प. समिती अध्यक्ष तथा माननीय सभापती, आरोग्य समिती निलेश सांबरे यांच्या हस्ते प्रा आ केंद्र एडवण येथे उपस्थित हत्तिरुग्नाना देऊन पालघर जिल्ह्यातील रुग्णांना वाटप करण्यास सुरवात करण्यात आली.
पालघर जिल्ह्यात एकूण ७२७ हत्तीरोग ग्रस्त रुग्ण असून त्यांना पायाची सूज नियंत्रणात ठेवून त्याची स्वच्छ्ता राखण्यासाठी हे किट महत्वाचे असणार आहे. रुग्णांचे पायाची काळजी कशी घ्यावी, साधे सोपे व्यायाम करून सूज नियंत्रणात कशी ठेवावी, किट चा वापर कसा करावा याचे प्रशिक्षणही यावेळी घेण्यात आले.
आरोग्य यंत्रणेमार्फत हे प्रशिक्षण नियमित स्वरूपात वेळोवेळी घेण्यासाठी सभापती यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना सूचना केल्या.सर्व आरोग्य समितीचे सदस्य, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सुर्यवंशी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सागर पाटील, हत्तीरोग अधिकारी कांबळे, इतर जिल्हास्तरीय अधिकारी व सर्व तालुका आरोग्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.
Wednesday, February 24, 2021
सामुदायिक विवाह सोहळे, ५० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेले कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई आदेश
सामुदायिक विवाह सोहळे, ५० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेले कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई आदेश पालघर(प्रतिनिधी) दि २४ : कोरोना विषाणूचा (कोकिड-१९) चा प्रार्दुभाव व संसर्ग रोखण्याकरीता सामुदायिक विवाह सोहळे , ५० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेले कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व उपोद्घातातील अ.क्र.३ मधील शासन अधिसुचनेतील निर्देशानुसार पालघर जिल्हयाच्या कार्यक्षेत्रात कोव्हिड १९ बर नियंत्रण आणण्यासाठी तसेच प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्लयामध्ये (वसई विरार महानगर पालिका क्षेत्र वगळून) सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करण्यास पुढील आदेश होईपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.
सार्वजनिक कार्यक्रम, हळदी कार्यक्रम ,विवाह कार्यक्रम या सारख्या कार्यक्रमांकरिता मंगल कार्यालय, रिसॉर्ट भाडयाने दिली जातात. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शासनाच्या उपोद्घातातील अ.क्र.४ आदेशानुसार ५० लोकांच्या मर्यादेत कार्यक्रमास संबंधित तहसीलदार यांच्याकडून परवानगी दिली जाते. परतू अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी अचानक भेटी दिल्या असता, परवानगी न घेतलेल्या किंवा ५० लोकांपेक्षा जास्त लोक उपस्थित असलेल्या मंगल कार्यालय , रिसॉर्ट मालकांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.. सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन
अधिनियम २००५ मधील ५१ (b), भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ व भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ नुसार दंडनिय कायदेशीर कारवाईस पात्र असणार आहे.
Tuesday, February 23, 2021
पालघर जिल्हा परिषदेमार्फत संत गाडगे महाराज जयंती साजरी
पालघर जिल्हा परिषदेमार्फत संत गाडगे महाराज जयंती साजरी
पालघर (प्रतिनिधी)पालघर जिल्हा परिषदे मार्फत आज संत गाडगे महाराज जयंती साजरी करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
संत गाडगे महाराज यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ झाला असून २० डिसेंबर १९५६ रोजी मृत्यू झाला. डेबुजी झिंगरजी जानोरकर असे मूळ नाव असलेले हे संत गाडगे बाबा म्हणून महाराष्ट्रभर ओळखले जाऊ लागले. गाडगे बाबा महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्या काळात स्वच्छतेचे महत्व त्यांनी जनतेला पटवून दिले. “देव हा माणसात असतो” हा मोलाचा संदेश त्यांनी दिला. विविध गावांना फिरून सामाजिक न्याय देणारे गाडगे महाराज एक सामाजिक शिक्षक होते. पायात फाटकी चप्पल आणि हातात मातीची कटोरी चालत फिरणारे बाबा हीच त्यांची मुख्य ओळख होती. अशा थोर महापुरुषाची आज जयंती साजरी करण्यात आली. या वेळी अति. मुख्य कार्यकारी चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक माणिक दिवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), टी.ओ.चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) संघरत्ना खिल्लारे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Monday, February 22, 2021
बेकरी मजूर याला सफाळे पोलिस स्टेशन व्दारा सन्मानीत
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या कामासाठी धावत पळत असतो, अश्यावेळी त्याची एखादी वस्तु पडते / हरवते हे त्यास त्याचवेळी समजते जेव्हा त्या वस्तुची आठवण येते व तो शोधाशोध करतो परंतु हरवलेली वस्तू / पैसा दुसर्या व्यक्तीला मीळालेला असतो. सापडलेली वस्तू / पैसा परत देणारा हजोरोत एखादा मिळतो
सफाळे पोलीस स्टेशन परिसरात न्यू भारत बेकरी सफाळे पूर्व मधे काम करणारा मजूर श्री हनिफ शेख हजारातील एक असून, त्यांना सफाळे येथील रिक्षाचालक मोहन ठक्या पाटील रा. नंदाडे यांचे रोख रक्कम ४५००/- रुपये महत्वाची कागदपत्रे असलेले पाकीट मिळून आले असताना निस्वर्थी पणे ट्रॅफिक पोलिस श्री नांगरे साहेब यांच्याकडे नेऊन दिले. पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी श्री संदीप कहाळे यांनी मोहन पाटील यांना त्यांचे पाकीट परत केले, परंतु स्वार्थी आणी मतलबी लोकांनी भरलेल्या जनतेमध्ये निःस्वार्थ पणे पैसे मिळाले असता पोलिस स्टेशन पर्यत पोहचविणारा श्री हनीफ शेख यांचा पोलिस स्टेशन मधे बोलवून शाल श्रीफळ देऊन स्वहस्ते, आपल्या कर्मचारी वर्गास सत्कार केला. त्यांच्या कार्याचे त्रिवार अभिनंदन
पंचम कोळंबी प्रकल्पात रात्रीच्या वेळी चोरट्यांचा शिरकाव
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) दिनांक १८ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्रीच्या वेळी अंदाजे १० वाजे नंतर कोळंबी प्रकल्प वेढी, पोस्ट टेंभिखोडावे, ता,जि पालघर. या ठिकाणी अंधाराचा फायदा घेत स्वतःच्या फायद्यासाठी कोळंबी प्रकल्पातील पाॅन्ड नंबर ६ मधील कोळंबी जातीचे मासे ,पाग ( जाळी ) मारून तलावातून काढले असताना ,तेथील कर्मचारी ( वॉचमन ) यांने अडविण्याचा प्रयत्न केला असताना, सदर चोरट्यांनी त्यास कोयत्याचा धाक दाखवत, गच्ची ( माने जवळील पुढील भाग ) पकडून जिवे ठार मारण्याची धमकी देत व शिवीगाळ करत, जबरदस्तीने - दहशतीच्या जोरावर, साथीदाराच्या मदतीने दरोडा टाकुन कोळंबी नेत असताना, फिर्यादी यांनी हटकले असता कोळंबीच्या गोणी जागेवर टाकुन आरोपी यांनी पलायन केले.
सदर घटनेची फिर्याद कॅप्टन रंजितसिंह अजितसिंह पाटील वय वर्षे ३५ व्यवसाय - पंचम कोळंबी प्रकल्प. राहणार - मुंबई - सध्या मौजे जलसार पोस्ट टेंभिखोडावे ता,जि पालघर. यांनी सफाळे पोलीस स्टेशन ता,जि पालघर येथे दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ रोजी तक्रार दाखल केली असून घटनेची नोंद गुन्हा रजि नंबर ०८ / २०२१ भा.द.वि.सं कलम ३९५,५०४,५०६,३४, प्रमाणे सफाळे पोलीस ठाणे मधे करण्यात आली असून
सफाळे पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी श्री संदीप कहाळे साहेब सहा,पो निरीक्षक यांनी घटना स्थळी भेट दिली असून, तिन गोणी कोळंबी जातीचे मासे, अंदाजे वजन ७५ किलो किंमत अंदाजे ₹ २२,५०० /- अक्षरी बावीस हजार पाचशे रूपये मात्र. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार ( कोयता ) कोळंबी गोणी मुद्देमाल जमा केला असून या प्रकरणातील आरोपी १ ) अमित रमेश पाटील २ ) राजेंद्र दत्ताराम घरत ३ )विशाल जयवंत भोईर ४ ) विवेक अशोक भोईर ५ ) फैयाज शेख ६ ) नौशाद हनीफ शेख ७ ) अच्युत नामदेव वैती सर्व राहणार वेढी यांना अटक केली असून वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास श्री संदीप कहाळे साहेब करीत आहे
सन-2021-22नामांकीत इंग्रजीमाध्यमाच्या शाळेत इयत्ता 1 ली व इयत्ता 2 री प्रवेश अर्ज सादर करावे
सन-2021-22नामांकीत इंग्रजीमाध्यमाच्या शाळेत इयत्ता 1 ली व इयत्ता 2 री प्रवेश अर्ज सादर करावे
पालघर(प्रतिनिधी) दि 22 : आदिवासी विकास विभाग अंतर्गत प्रकल्प कार्यालय जव्हार मार्फत इयत्ता 1 ली व 2 री करीता प्रवेश अर्ज प्रकल्प कार्यालय जव्हार येथे दि. 24/02/2021 ते 10/03/2021 या कालावधीत वाटप व भरुन देण्यात यावा. प्रवेश फॉर्म घेतांना प्रकल्प कार्यालय शासकीय आश्रमशाळा शासकीय वसतिगृह येथुन प्राप्त केलेलेच फॉर्म स्वीकारले जातील झेरॉक्स फॉर्म ग्राहय धरण्यात येणार नाही.सदर फार्म विनामुल्य उपलब्ध आहेत. पालकांनी फॉर्म सोबत जन्मनोंदीचा पुरावा जोडावा. सदरचे प्रवेश फॉर्म इ.1 ली व 2 री करीता सुटीचे दिवस वगळुन सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 यावेळेत उपलब्ध होतील. प्रवेशाकरीता फॉर्म सोबत इच्छुक विद्यार्थ्यांच्या पालकांचा रहिवासी दाखला, पालकाचे सक्षमअधिका-याने दिलेला जातीचा दाखला, तहसिलदार यांचा सन-2020-21 चा उत्पनाचा दाखला, दारिद्रय रेषेचा ग्रामसेवकांनी दिलेलादाखला, विद्यार्थ्यांचे सन-2020-21 मध्ये ज्या वर्गात शिकतअसेल त्या वर्गाचा बोनाफाईड दाखला,शाळासोडल्याचा दाखला इयत्ता 1 ली साठी अंगणवाडीचा दाखला, पासपोर्ट साईज दोन फोटो, पालक अपंग असल्यास त्याबाबतचा सक्षम अधिका-याने दिलेले प्रमाणपत्र, विधवा/घटस्फोटित/निराधार/परितक्तयाअसल्यास ग्रामपंचायतीचा ग्रामसेवकाचा दाखला, बँकपासबुकची झेरॉक्स व विद्यार्थ्याचे आधारकार्ड झेरॉक्स इ. कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रति जोडाव्यात मुळकागदपत्रे जोडु नयेत. अपुर्ण व उशिरा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. तसेच विद्यार्थ्यांचे पालक शासकीय अथवा निमशासकीय नोकरीत नसलेबाबतचे हमीपत्र लिहुन दयावे लागेल, निवड झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा बदलता येणार नाही याबाबतचे हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे. इयत्ता 1 ली व 2 री करीता शहरातील नामांकीत शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार जि. पालघर यांचेकडुन करण्यात आले आहे.
डहाणू आदिवासी प्रकल्पाकडुन २६ फेब्रुवारी रोजी अनुसूचित जमातीच्या नोंदणीकृत युवक युवतींसाठी रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन महामेळाव्याचे आयोजन
डहाणू आदिवासी प्रकल्पाकडुन २६ फेब्रुवारी रोजी अनुसूचित जमातीच्या नोंदणीकृत युवक युवतींसाठी रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन महामेळाव्याचे आयोजन
पालघर(प्रतिनिधी) दि 22 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू जि-पालघर अधीनस्त वसई, पालघर, डहाणू व तलासरी तालुक्यातील प्रकल्प कार्यालयात नोंदणीकृत अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी शुक्रवार दिनांक २६.०२.२०२१ रोजी सकाळी १०.०० ते ६.०० वा. पर्यंत डहाणू नगरपरिषदेच्या बी.एस.ई.एस. हॉल, अदानी गेट, डहाणू जि-पालघर येथे स्पर्धापरिक्षा, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रकल्प कार्यालय डहाणू येथे सेवायोजन विभागात नोंदणीकृत असलेल्या अनसूचित जमातीच्या इ. १० वी पास/नापास, १२ वी पास/ नापास, डिप्लोमा, आयटीआय, बीएड, डीएड, कृषि पदवी/ पदविकाधारक, कौशल्य विकास, बॅकिंग क्षेत्रात नोकरी तसेच स्वयंरोजगार करण्यास इच्छूक उमेदवारांना मार्गदर्शन महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे महामेळाव्यासाठी प्रकल्प अधिकारी डहाणू, कामगार कल्याण विभाग, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी, ITI, LIC, KVK या विभागाचे तज्ज्ञ तसेच विविध कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी या रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन महामेळाव्यास नोंदणीकृत अनुसूचित जमातीच्या युवक-युवतींनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन डहाणूच्या प्रकल्प अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे. युवक-युवर्तींनी मार्गदर्शन महामेळाव्यास येताना मास्क वापरणे बंधनकारक आहे तसेच आपला बायोडाटा आणि शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती सोबत घेवून याव्यात.
Sunday, February 21, 2021
राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त, व्यायाम शाळेला आधुनिक साहित्य लोकार्पण !
दातिवरे ( हिरालाल लोखंडे ) दिनांक १९ फेब्रुवारी राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ग्रामपंचायत दातिवरे ता,जि पालघर, येथे व्यायाम शाळा विकास अनुदान योजना सन २०१९ / २०२० अंतर्गत अनुसूचित जाती योजना व्यायाम साहित्य, जिल्हा क्रिडा अधिकारी पालघर याच्या कडुन रूपये ७,०००००/-₹ अक्षरी सात लाख रूपये किंमतीचे आधुनिक व्यायाम साहित्य, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नगर, ग्रामपंचायत दातिवरे ता,जि पालघर यांना मिळाले आहे. सदर हे साहित्य जिल्हा परिषद शाळा आंबेडकर नगर येथील रिक्त असलेल्या दोन रूम मधे ठेवण्यात आललेले असून आधुनिक पध्दतीने व्यायाम करणे, हि काळाची गरज आहे हे ओळखून ग्रामपंचायत दातिवरे सरपंच, ग्रामसेवक व सदस्य यांनी जिल्हा क्रिडा अधिकारी यांच्या सहयोगाने साहित्य मिळवून जिल्हा परिषद मराठीचा शाळा यांच्या रिक्त वर्गांचा उपयोग करून तरूण मुलांना व्यायामाची सवय निर्माण व्हावी या करीता आधुनिक साहित्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी, शिव प्रतिमेचे पुजन करून मान्यवरांच्या हस्ते साहित्य लोकार्पण केले आहे.
मा, श्री भिमसेन गायकवाड साहेब सहा,पो निरीक्षक केळवा सागरी पोलिस स्टेशन ता,जि पालघर यांनी शिव प्रतिमेचे प्रथम पुजन करूण, व्यायाम कक्षचे उद्घाटन केले. श्रीमती ज्योती तामोरे सरपंच दातिवरे, श्रीमती रेखा तरे पालघर पंचायत समिती सदस्य, श्री सुरेश जाधव पालघर जिल्हा रिपाई अध्यक्ष ( आठवले गट ) श्रीमती महानंदा राऊत माजी सरपंच, श्री प्रभाकर ठाकुर माजी उपसभापती पालघर, विनोद मोरे, ज्ञानेश्वर राऊत, प्रशांत ठाकुर, अॅ. किरण गायकवाड, हेमंत ठाकुर आदि मान्यवरांच्या उपस्थित व सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आंबेडकर नगर मधील राऊत परिवाराची तरूण पिढी, महिला वर्ग तसेच योगेश भोईर, मंगेश वाघ, अनिकेत वर्तक, धर्मेंद्र वैद्य यांनी कार्यक्रमा साठी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन श्री रूपेश राऊत तंटामुंक्ती कमिटी सचिव यांनी केले
नागरीकांनी कोवीड-१९ नियमांचे पालन करावे आणि कोवीड-१९ चा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करावे
नागरीकांनी कोवीड-१९ नियमांचे पालन करावे आणि कोवीड-१९ चा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करावे
पालघर (प्रतिनिधी)दि. 21 :- कोवीड-१९ विषाणूचा संसर्ग आणि वाढत्या रुग्णांची संख्या विचाराता घेता जिल्ह्यात सर्व उपविभागीय दंडाधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक व मुख्याधिकारी यांच्यामार्फत सार्वजनिक ठीकाणी भेटी देऊन कोवीड-१९ नियमांचा भंग करण्यात येणाऱ्या ठिकाणावरती कारवाया करण्याचे निर्देश डॉ. माणिक गुरसळ, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पालघर यांनी दिलेले आहेत.
त्यानुसार जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांत ६६ सार्वजनिक ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ३ सार्वजनिक ठिकाणी र.रु. ६६००/- इतक्या रक्कमेचा दंड करण्यात आला आहे. तसेच सदर ठिकाणी विनामास्क असणाऱ्या १८९ लोकांवरती दंडात्मक कारवाया करुन र.रु. ३६१५०/- इतक्या रक्कमेचा दंड वसुल करण्यात आला आहे.
तरी नागरीकांनी कोवीड-१९ नियमांचे पालन करावे आणि कोवीड-१९ चा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आव्हान मा.जिल्हाधिकारी महोदयांनी केले आहे.
Friday, February 19, 2021
दातीवरे - खार्डी - खाडीतील कांदरवन प्रजातीच्या झाडाची कत्तल
दातीवरे - खार्डी - खाडीतील कांदरवन प्रजातीच्या झाडाची कत्तल !
सफाळे ( हिरालाल लोखंडे )मौजे दातिवरे - खार्डी ता,जि पालघर, गावाच्या हद्दीतील खाडी किनारी कांदरवन मोठया प्रमाणात आहे, या राखीव असलेल्या कांदरवन सर्वे नंबर ६०५ मधे सी, आर, झेड, कायद्याचे उल्लंघन करून स्वतःच्या फायद्यासाठी राजेश यशवंत घरत राहणार दातिवरे - खार्डी ता,जि पालघर. सरकारी जमिनीवरील कांदरवन नष्टकरून लोखंडी बोट व पाईप यांच्या सहाय्याने कांदरवन झाडांची कत्तल करून रेती साठविण्यासाठी कुंडी व रस्ता बनवून लोखंडी बोटीच्या सहाय्याने रेती उपसा करून खाडी मार्गाने रेती आणून मोटर पंप व पाईप व्दारा रेती साठा करीत असल्याची लेखी तक्रार गांवक-यांच्या कडून मा. वनशेत्रपाल सफाळे ता,जि पालघर यांना मिळाल्यानंतर तक्रारीची दखला घेत पुढील कारवाई करण्यात आली.
दिनांक ११ फेब्रुवारी २०२१ रोजी मा, वनशेत्रपाल सफाळे यांनी आपले कर्मचारी व पंच यांच्यासह प्रत्यक्षात जागेवर जाऊन पाहणी केली असता, त्याठिकाणी रेती साठविण्याचे काम झाले असल्याच्या खुणा व पसरलेली रेती दिसुन येत होती. सदर जागा परिसरात कोणत्याही सिमांकींत खुणा, बुरूज, किंवा बोध चिन्ह, पिलर दिसून येत नसून जुने मिठागर केंद्राचे पंपहाऊसच्या खुणा दिसुन येतात. त्यावरून जागेच्या वस्तुस्थितीची खात्री होऊ शकत नाही.
मौजे खार्डी सर्वे नंबर ६०५ मधील घटना स्थळी जागेवर वनविभाग अधिकारी, कर्मचारी, व पंच प्रत्यक्षात गेले असता, त्या ठिकाणी कोणीही इसम आढळून आला नाही. झाडा झुडपात शोध घेतला असता, कोणत्याही अपवादात्मक वस्तु - सामान मिळुन आलेला नाही, सदर ठिकाणी साफसफाई करुन कुंडी बनविण्यात आली असून त्या जागेला लागून समोर मातीचा भराव टाकून रस्ता बनविण्यात आल्याचे दिसून येते. सदर जागेची जी पी एस रिडींग व जी पी एस ट्रॅक व रस्त्याचे मोजमाप घेतले असताना ते N - १९ .५४३३०६ , E ७२ . ८६००६९ असे असून मातीचा टाकून बनवलेला रस्ता लांबी ३० मीटर, रूंदी ६ मीटर ( १८० चौरस मीटर ) रेती साठवून ठेवण्यासाठी कुंडी, साफसफाई केलेली जागा, रस्ता बनविण्यासाठी टाकलेल्या भरावाखाली गेलेले १८० चौ. मीटर शेत्रावरील कांदरवन वृक्ष दबले गेले, पंचासमक्ष पाहणी केली असता आढळून आले. जागा मालकी बाबत ठामपणे सांगता येत नसल्याने सदर प्रकरणी चौकशी साठी महसूल विभाग मा. तहसीलदार साहेब पालघर यांच्या कडे पाठविण्यात आले असून योग्य माहिती प्राप्त होताच पुढील कारवाई होणार असल्याची माहिती अधिकारी वर्गाकडून मिळत आहे तर गावकरी या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेऊन कारवाईची मागणी करीत आहे.
Thursday, February 18, 2021
अवैध गौणखणीज उत्खनन !दोन डंपर व पोखरण जप्त .
अवैध गौणखणीज उत्खनन !
वाडा ( हिरालाल लोखंडे ) मौजे गुंज. तालुका वाडा जिल्हा पालघर येथील मालकी हक्क असलेल्या सर्वे नंबर ५६ ,५७ ,लगत असलेल्या बुधावली येथील संरक्षित वनविभाग सर्वे नंबर ५५ च्या हद्दीतील सिमांकित करण्यासाठी असलेल्या बुरूज पोखलनच्या सहाय्याने नष्ट करून ( उत्खनन करून ) स्वतःच्या फायद्यासाठी संरक्षित वनविभागातील गौणखनिज दोन डंपरच्या सहाय्याने वाहतूक करीत असल्याचे आढळून आल्यानंतर दिनांक १६ व १७ फेब्रुवारी २०२१ रोजी संध्याकाळच्या सुमारास वनपाल श्री अनिल कांबळे यांच्या फिरत्या पथकाने कारवाई करून गुन्हे कामात वापरण्यात आलेला एक पोखलन व दोन डंपर वाहने जप्त करण्यात आली असून, जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे ७० ते ८० लाख रूपये असावी असे वनविभाग कर्मचारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे.
भारतीय दंड संविधान वन अधिनियम १९२७ चे कलम ६३ ( क ) ३३ ( १ )अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, फरारी संशयित आरोपी यांचा तपास श्री धुमाळ साहेब उपवनसंरक्षक अधिकारी जव्हार, श्री सोनवणे साहेब सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी, श्री साफळे साहेब वनक्षेत्रपाल ( पश्चिम ) वाडा जिल्हा पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल श्री गुंज व त्यांच्या अधिपत्याखालील कर्मचारी पुढील तपास करीत आहे.
Wednesday, February 17, 2021
श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून सफाळे १९ तारखेला कार्यक्रम आयोजित
श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून सफाळे १९ तारखेला कार्यक्रम आयोजित ( हिरालाल लोखंडे ) शुक्रवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी सुमारे १० नंतर देवभुमी हाॅल सफाळे पुर्व पोस्ट उंबरपाडा ता,जि पालघर येथे मान्यवर, कार्यक्रम अध्यक्ष श्री अमोद जाधव सरपंच ग्रामपंचायत उंबरपाडा - सफाळे, प्रमुख अतिथी मा, श्री, डाॅ, दयानंद सुर्यवंशी - जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा पालघर, श्री संदीप कहाळे सहा,पो, निरीक्षक सफाळे पोलिस स्टेशन, श्री राजेश म्हात्रे ( बंटी दादा ) उपसरपंच ग्रा, पं, उंबरपाडा सफाळे ,विषेश व्याख्याते शिवश्री ,नितिन मोकाशी, विभागीय अध्यक्ष ( कोकण विभाग ) मराठ सेवा संघ यांच्या उपस्थित शिवजयंतीचे औचित्य साधुन, सदर दिवशी कोविडा - १९ संसर्ग काळामध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता, कोविडा - १९ या संसर्गजन्य रोगापासून समाजाला वाचविण्यासाठी अहोरात्र कर्तव्य करणारे अधिकारी - पदाधिकारी - कर्मचारी यांचा गुणगौरव समारंभ नियमांचे पालन करून जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थित करण्यात येणार आहे
केळवा सागरी पोलिस स्टेशन व्दारा मायेची ऊब !
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) खाकी वर्दीतील पोलिस म्हणजे " कायदा - सुरक्षीतता " आद्य रक्षक, पण या पेक्षाही त्यापलीकडे जाऊन आपण समाजाचे आपण एक घटक आहोत, असे समजून समाजाचे आपल्यावर देणे आहे या भावनेने कार्य करणारे श्री भीमसेन गायकवाड यांचे अभिनंदन करणे या साठी शब्द अपुरे पडतात. दिनांक १५ फेब्रुवारी रोजी केळवा सागरी पोलिस स्टेशन अधिकारी - कर्मचारी यांच्या व्दारा व मा, डॉक्टर श्री चव्हाण साहेब ( पालघर ) यांच्या सौजन्याने केळवे गावातील " हनुमान मंदिर " परिसरात रोजी - रोटी मिळविण्यासाठी सहकुटुंब स्थलांतरित होऊन आलेल्या गरिब आदिवासी मजूर बांधवांना रात्रीच्या थंडी पासून स्वरक्षण व सुरक्षा मिळण्यासाठी " मायेची ऊब " म्हणून बॅल्केट वाटप करण्यात आली. या कार्यक्रमा मुळे गावकर्यांनकडून पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक करण्यात येत आहे.
Tuesday, February 16, 2021
सर्व ग्रामपंचायतींनी पुरस्कारप्राप्त असे कार्य करावे- भारती कामडी
सर्व ग्रामपंचायतींनी पुरस्कारप्राप्त असे कार्य करावे- भारती कामडी
पालघर (प्रतिनिधी)पुरस्कार प्राप्त ग्राम पंचायती नि चांगले कार्य केले असून तालुका स्तरावरील पुरस्कार घेतलेल्या ग्रामपंचायतिनी जिल्हा स्तरीय पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत,तसेच अन्य ग्राम पंचायतींनी पुरस्कार प्राप्त असे काम आपल्या ग्राम पंचायत मध्ये करावे असे आवाहन जि.प.अध्यक्ष भारती कामडी यांनी आज केले. आज जिल्हा परिषदेच्या ग्राम पंचायत विभागा मार्फत पालघर जिल्ह्यातील तालुका स्तरीय व जिल्हा स्तरीय निवड करण्यात आलेल्या गावांना आज आर.आर.पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आर. आर. (आबा ) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजने अंतर्गत पुस्कार देण्यात आले. नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे हा समारंभ संपन्न झाला. जि.प.अध्यक्ष भारती कामडी यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले , त्या वेळी त्या बोलत होत्या. तर कोरोना अद्याप पूर्ण नष्ट झाला नसून प्रत्येकाने मास्क वापरा असे आवाहन केले.
गाव सुंदर आणि स्मार्ट करण्यासाठी अनेक कल्पना आहेत, त्या प्रत्यक्षात राबवण्यात आल्या पाहिजेत त्यासाठी प्रशासना कडून निधी ची कमतरता भासणार नाही. सरपंचांचे प्रशिक्षण, योग्य कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक मुक्त गाव असे उपक्रम राबवणे गरजेचे आहे असे मत यावेळी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी व्यक्त केले. जि.प.उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी तालुका व जिल्हा स्तरीय पुरस्कार प्राप्त विजेते हे कधीतरी महाराष्ट्र व देश पातळी वरचा पुरस्कार मिळवतील असे अभिप्रेत आहे. शासनाची प्रत्येक योजना शेवट च्या व्यक्ती प्रर्यंत पोचली पाहिजे. असे मत व्यक्त केले.
सभापती पशु संवर्धन व कृषी समिती, सुशील चुरी, सभापती बांधकाम व वित्त समिती काशिनाथ चौधरी , सभापती समाजकल्याण समिती विष्णू कडव पंचायत समिती सभापती वाडा योगेश गवा, पंचायत समिती सभापती वसई स्नेहलता सातवी व सर्व जिल्हा परिषद सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) टी .ओ.चव्हाण यांनी प्रास्ताविक सादर केले. वेवजी, बोर्डी, हिरवे, जांबुगाव, कुर्झे या ग्रामपंचायतीना जिल्हा स्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर अन्य २५ ग्राम पंचायतीना तालुका स्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक उर्जा आणि पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर या निकषांवर सदर ग्राम पंचायतीना हे पुरस्कार देण्यात आले.
नजर हटी दुर्घटना घटी !अपघातात जागेवरच मृत्यू
नजर हटी दुर्घटना घटी !
अपघातात जागेवरच मृत्यू
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारनंतर सुमारे ४ - ३० चे दरम्यान सफाळे पोलिस स्टेशन हद्दीतील पारगांव सफाळे रोडवरील नांगरमोडी गावाजवळ मोटरसायकल चालक मोहम्मद शहाबुद्दीन शेख वय वर्षे ४१ राहणार, ०१, फातिमा को. आॅप. हौ. सोसा. एम. बी.ईस्टेट -इंडियन बँक जवळ, विरार पश्चिम, तालुका वसई. आपली ( पॅशन प्रो )मोटरसायकल ( क्रमांक एम, एच, ०४ / इ डब्ल्यू २६३७ ) भरधाव वेगाने चालवताना गाडीवरील नियंत्रण सुटून, नांगरमोडी गावाच्या नाक्याजवळील दिशादर्शक लोखंडी बोर्डला ठोकर लागुन अपघात घडला असताना , मोटरसायकल चालकास पोटावर - गळ्यावर - छातीवर मार लागुन गंभीर दुखापत झाल्याने, स्वतःच्या मरणास स्वतःच कारणीभुत असून पोलिस स्टेशन सफाळे ता,जि पालघर येथे गुन्हा रजि, नंबर ०७ / २०२१ ने भारतीय दंड विधान संहिता कलम ३०४ ( अ ) २७९ ,३३७ ,३३८ , मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून तपासी अंमलदार श्री ए, व्ही , खोत वरिष्ठ प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहे.
Monday, February 15, 2021
आई बाबा फाउंडेशन आयोजित माजी नगरसेविका चषक 2021 संपन्न
आई बाबा फाउंडेशन आयोजित माजी नगरसेविका चषक 2021 पालघर (प्रतिनिधी)दिनांक 13 आणि 14 फेब्रुवारी रोजी डुंगीपाडा नाका येथील मैदानावर अंडरम क्रिकेटचे सामने भरवण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी माजी नगरसेविका बिंदिया दिक्षित यांच्या माध्यमातून संजू धोत्रे यांनी आयोजन केले होते उदघाटनाला आई बाबा फाउंडेशनचे आधारस्तंभ श्री. संतोष दीक्षित, अध्यक्षा सौ.बिंदिया दिक्षित,संजू धोत्रे उपस्थित होते,एकूण 24 संघांनी सहभाग नोंदवला, बक्षीस वितरणासाठी सौ. बिंदिया दिक्षित,संजू धोत्रेआणी निलेश भोईर, महेश म्हस्के उपस्थित होते. प्रथम पारितोषिक आकर्षक ट्रॉफी आणि 8000 रुपये *पास्थल संघाने* जिंकले,द्वितीय पारितोषिक आकर्षक ट्रॉफी आणि 5000 रुपये *वाय बी सी सी* संघ, वेऊर तर तृतीय पारितोषिक , आकर्षक ट्रॉफी व रोख रक्कम 3000 रुपये *माऊली संघ* ला रोख मिळाले.
आई बाबा फाउंडेशन गेल्या 7 वर्षांपासून हे सामने भरवण्याचे कार्य करतात.
" श्री माघी गणेश जयंती उत्सव " तिन आसनी रिक्षाचालक - मालक संघटना, पालघर शहर.
" " श्री माघी गणेश जयंती उत्सव "
तिन आसनी रिक्षाचालक - मालक संघटना, पालघर शहर.
पालघर ( हिरालाल लोखंडे ) दर वर्षा प्रमाणे आजही सोमवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ रोजी श्री गणेश तिन आसनी रिक्षाचालक - मालक संघटना ( रजि. ) लोकमान्य हॉटेल थांबा पालघर पश्चिम,येथील रिक्षाचालक मालक संघटनेच्या वतीने श्री माघी गणेश जयंती साजरी करण्याचे ९ वे वर्ष आहे.
कोव्हिडा १९ च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुण व माननीय महाराष्ट्र पोलिस यांच्या कायद्यातील तरतुदींच्या बंधनात राहून, माघी गणेशोत्सव साजरा करत, श्री गणेश भक्तांना श्री गणेश दर्शन व मनोकामना पुर्ण करण्यासाठी यावे,व तिर्थ - प्रसादाचा लाभ घ्यावा विनंती.
श्री गणेश तिन आसनी रिक्षाचालक - मालक संघटना, पालघर शहर
Sunday, February 14, 2021
गरिबांसाठी रेल्वे सुरू करा ग्राहक संरक्षण फाऊंडेशन भुसावळ यांची मागणी.
प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.
भुसावळ जिल्हा जळगांव,प्रा, श्री विनोद जी गायकवाड,, दिनांक १५/०२/२०२१ रेल्वे विभागाने श्रीमंतांना खुश करण्यासाठी रेल्वे गाडी चालू केली मात्र गरिबांसाठी गरीब लोकांची गाडी म्हणजे रेल्वे पॅसेंजर अद्याप चालूच केली नाही, गोर गरीब आणि गरजू लोकांना दिलासा देण्यासाठी रेल्वे विभागाने गरिबांचा गरीब रथ अर्थात रेल्वे पॅसेंजर त्वरित चालू करावी,, अशी मागणी ग्राहक संरक्षण फाऊंडेशन चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री विनोद जी गायकवाड सर यांनी केली,, याबाबत अधिक माहिती देताना गायकवाड सर म्हणाले की केंद्र सरकारने रेल्वेची सुविधा कोरोना महामारीच्या काळात रेल्वेने सर्वच गाड्या बंद केल्या होत्या, आणि आता काही दिवसापूर्वी रेल्वे ने श्रीमंतांच्या रेल्वे गाड्या सुरू केल्या मात्र गरिबांसाठी पॅसेंजर गाडी अद्यापही चालू केलेली नाहीच,त्या मुळे भुसावळ हे रेल्वेचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या भुसावळ विभागातून संपूर्ण भारवर्षात गोर गरीबां साठी पॅसेंजर गाड्या धावत असतात, भुसावळ विभागात भरपूर मोठ्या संख्येने मजूर वर्ग वास्तव्यास आहे, मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग इतर भागातून शिक्षणा साठी ये जा करत असतो, श्रीमंत तर आरक्षणावर पैसा खर्च करून प्रवास करू शकतो परंतु गरीब प्रवाशांचे काय, असा प्रश्न ग्राहक संरक्षण चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा, श्री विनोद गायकवाड यांनी उपस्थित केला, त्यामुळे रेल्वे विभागातील वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊनज्या प्रमाणे श्रीमंतांसाठी रेल्वे गाडी चालू केली आहे तशीच गोरगरीब, मजूर,विद्यार्थी, आणि गर्जुंसाठी गरिबांचा रथ म्हणून ओळखली जाणारी पॅसेंजर गाडी लवकरच आपल्या भुसावळ विभागातून चालू करावी, आणि गोर गरिबांचे आशिर्वाद घ्यावे, अशी मागणी ग्राहक संरक्षण मार्फत करतांना प्रा, श्री विनोद गायकवाड बोलत होते, याबाबत लवकरच आमचे एक शिष्ट मंडळ रेल्वे विभागा ला भेटणार आहे असे त्यांनी सांगितले.
तंबाखू मुक्त शाळा, वेवजी - सिगलपाडा ता, तलासरी
तंबाखू मुक्त शाळा,
सलाम मुंबई फाउंडेशन व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने " तंबाखू मुक्त शाळा " अभियान राबवलेले, या करीता पालघर जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक वर्गाची आॅन लाईन कार्यशाळा घेण्यात आलेली असताना, सौ लता सानप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिक्षण अधिकारी,यांनी पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गट शिक्षण अधिकारी, गट विकास अधिकारी, व शिक्षण विभागातील प्रमुख अधिकारी वर्ग यांना आपल्या जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा " तंबाखू मुक्त " करण्यासाठी आवाहन करण्यात आलेले,
तलासरी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद येथील गट शिक्षण अधिकारी श्री कमलाकर सुतार, विस्तार अधिकारी श्री दामोदर चाबके,वे़वजी केंद्र प्रमुख श्री संजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली वेवजी सिगलपाडा शाळा तालुका तलासरी शाळेतील मुख्याध्यापिका संगीता चिखलकर, उपशिक्षक श्री लक्ष्मण ननवरे, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत वेवजी, शिक्षक गण, पालक, विद्यार्थी यांनी तंबाखू नियंत्रणासाठी तंबाखू मुक्तता शपथ घेऊन शाळेच्या १०० मीटर परिसरात तंबाखू विक्री, सेवन करणार्यावर दंड आकारण्यात येईल असे सांगून, व शाळेच्या १०० मिटर पर्यंतच्या परिसरात पिवळ्या रंगाने रेखांकन करून तेथे " तंबाखू मुक्त क्षेत्र " लिहिले, जाहिर केले.
सलाम मुंबई फाउंडेशन, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्री मिलींद रूपचंद पाटील - पालघर जिल्हा संघटक यांनी तलासरी तालुक्यातील दूसरी व वेवजी केंद्रातील पहिला, " तंबाखू मुक्त शाळा " घोषित केली.
सलाम मुंबई फाउंडेशन व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, खाजगी शाळा, महाविद्यालये तंबाखू मुक्त अभियान राबविण्यात येत आहे. श्री राहुल म्हात्रे गट विकास अधिकारी तलासरी यांनी श्री लक्ष्मण ननवरे व त्यांचे सहकारी शिक्षक, विद्यार्थी, पालक वर्ग यांनी एकत्र येऊन तंबाखू मुक्त शाळा व परिसर कार्याबद्दल अभिनंदन केले.
जिल्हा परिषद शाळा वेवूर विद्यार्थीना सलाम
जिल्हा परिषद शाळा वेवूर विद्यार्थीना सलाम !
पालघर ( हिरालाल लोखंडे ) शासनाने डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम स्पेस रिसर्च यांच्या वतीने पेरोडा क्युब चॅलेंज हा उपक्रम राबविण्यात आलेला. या उपक्रमात महाराष्ट्र राज्यातील ३८०विद्यार्थी सहभागी झालेले, एकाचवेळी १०० उपग्रह सोडणे, या उपक्रमाची नोंद जागतीक कीर्तीच्या गिनीज बुकात घेण्यात आलेली आहे. सदर या उपक्रमात जिल्हा परिषद शाळा वेवूर ता,जि, पालघर येथील ६ विद्यार्थी यांनी सहभाग घेतलेला. त्याना मार्गदर्शन करणारे शिक्षक, यांच्या यशस्वी योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने गुणवंत असे ६ विद्यार्थी व त्यांना प्रशिक्षण देणारे श्री अजित दळवी सर ( गुरूजी ) यांना शाल, श्रीफळ,व सन्मान पत्र देऊन श्री सुहास राऊत - जिल्हा परिषद शिक्षक संघटना अध्यक्ष श्री महेश जाधव - कार्याध्यक्ष, श्री संतोष संखे - कार्यवाह,श्री प्रकाश भोईर जिल्हा उपाध्यक्ष, श्री हरेश वैद्य समन्वय समिती सदस्य, आदी मान्यवर, श्रीमती कांचना पाटील मुख्याध्यापिका जि. प.शाळा वेवूर, तसेच पूनम संखे, प्रतिक्षा संखे शिक्षक वर्ग, कर्मचारी कार्यक्रमात सहभागी झालेले. उपस्थित शिक्षकांनी संघटनेचे आभार मानले.
आर .आर. (आबा )पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेच्या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन
आर .आर. (आबा )पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेच्या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन
पालघर (प्रतिनिधी)जिल्हा परिषदेच्या ग्राम पंचायत विभागा मार्फत पालघर जिल्ह्यातील तालुका स्तरीय व जिल्हा स्तरीय निवड करण्यात आलेल्या गावाना (आर. आर. आबा ) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजने अंतर्गत पुस्कार देण्यात येणार आहे. नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे दि. १६/ ०२ /२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता हा समारंभ पार पडणार आहे. जि.प.अध्यक्ष भारती कामडी यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.जि.प.उपाध्यक्ष निलेश सांबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, सभापती पशु संवर्धन व कृषी समिती, सुशील चुरी, सभापती महिला व बाल कल्याण समिती अनुष्का ठाकरे, सभापती बांधकाम व वित्त समिती काशिनाथ चौधरी , सभापती समाजकल्याण समिती विष्णू कडव व सर्व जिल्हा परिषद सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. वेवजी, बोर्डी, हिरवे, जांबुगाव, कुर्झे या ग्रामपंचायतीना जिल्हा स्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. तर अन्य २५ ग्राम पंचायतीना तालुका स्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक उर्जा आणि पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर या निकषांवर सदर ग्राम पंचायतीना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत (प्रभारी), तुषार माळी यांनी दिली.
Saturday, February 13, 2021
जेमिनी इन्स्ट्राटेक लि. अंबड.नाशिक या कंपनीच्या कामगार विरोधी बेकायदेशीर निलंबनाविरोधात कामगारांचे बेमुदत ठिय्या आंदोलन.
जेमिनी इन्स्ट्राटेक लि. अंबड.नाशिक या कंपनीच्या कामगार विरोधी बेकायदेशीर निलंबनाविरोधात कामगारांचे बेमुदत ठिय्या आंदोलन.
नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.
जेमिनी इन्स्ट्राटेक लि.अंबड. नाशिक या कंपनीतील कायम कामगार मागील १५ ते २० वर्षापासून सदर कंपनीत काम करीत आहेत परंतु सदर कंपनीत कामगारांना कुठल्याही आरोग्य सुरक्षा सुविधा देत नाहीत व त्यामुळे कामगारांचे आरोग्य नेहमी धोक्यात असते व यासंदर्भात कामगारांनी युनियन स्थापन करून कामगारांना आरोग्य सुविधा व प्रदूषण मुक्ती संबंधित सुविधा देण्यात याव्या अशा मागण्या युनियनद्वारे केल्यात परंतु कंपनी व्यवस्थापन व मालक यांनी युनियन स्थापन केल्याचा राग म्हणून १८ कामगारांना खोटे आरोप लावून कामावरून निलंबित केले व कामगार युनियनचा बोर्ड फाडून फेकून दिला असे कामगारांनी सांगितले.
याविषयी कामगारांनी कामगार आयुक्तालय,औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग सातपूर,नाशिक यांनाही निवेदन दिले कि कामगारांना स्वतःच्या सुरक्षा सुविधा मागितल्यास कामावरून कमी करण्यात येते व आपण चौकशीसाठी पाठवलेले अधिकारी कंपनीने ठरवलेल्या कामगारांशीच बोलतात तसेच काही महत्त्वाचे डिपार्टमेंट कडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात.
1) कंपनीत असलेला ETP प्लांट बंद असून त्याची सर्व दुर्गंधी कंपनीत पसरते आहे व त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंतू तयार होतात.
2) कंपनीत ब्रेझिंग मशीन वरती कॉपर ब्रेझिंग होते सदर ब्रीजिंग झालेला कॉपर जॉब ऍसिड मध्ये टाकतात त्याचा खूप मोठ्या प्रमाणात धूर होतो, सदर मशीन 8x10 च्या खोलीत असून तेथे काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्यास धोका आहे. अशा इतर समस्या या निवेदनात दिल्या आहेत.
असे असूनही ही कंपनी बेकायदेशीर स्वरूपात बिनदिक्कत पणे चालू आहे असे निवेदन कामगारांनी आरोग्य व प्रदूषण विभाग, कामगार विभाग यांना दिले आहे व अद्यापपर्यंत निवेदनावर कुठल्याही प्रकारची योग्य ती कार्यवाही करण्यात आलेली नाही. कामगारांचे निलंबन मागे घेऊन कामगारांना योग्य त्या सुविधा देण्यात याव्यात तरच हे आंदोलन मागे घेण्यात येईल अन्यथा आंदोलन तीव्र स्वरूपात होईल अशी सूचना भारतीय मजदूर सभा या युनियन द्वारे देण्यात आली.
रेशन दुकानातून धान्याची अनाधिकृत विक्री ?
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) दातिवरे ता,जि पालघर येथील रास्त भाव धान्य दुकान नंबर येथून दुकानातील धान्याची अनधिकृत विक्री ( जास्त पैसे घेऊन ) होत असल्याची माहिती गावकर्यांना मिळाल्यानंतर सदर बाबींचा शोध घेत असताना शनिवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे १२-३० ते १ वाजेच्या दरम्यान एक इसम मोटारसायकलवर रेशन दुकानातून धान्याची भरलेली गोणी नेत असताना गावकर्यांनी विचारणा केली असता भरलेल्या गव्हाची गोण ग्रामपंचायत दातिवरे पटांगणात टाकुन निघून गेला. गांवक-यांनी सदर घटने बद्दल पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क साधला गव्हच्या गोणी बद्दल माहिती दिला असून, सागरी पोलिस स्टेशन अधिकर प्रभारी गायकवाड साहेब यांना कळविले, असता साहेब स्वतः जागेवर जाऊन पाहणी केली,असता पुरवठा अधिकारी पुढील कारवाई करतील असे सांगतात गावकर्यांना सांगितले.
पोलिस कर्मचारी व पुरवठा विभागातील अधिकारी घटना स्थळी पोहचले असून पुढील कारवाई सूरू आहे
Friday, February 12, 2021
पर्यटन विकासाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पर्यटन विकासाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पालघर(प्रतिनिधी) दि 12 : पर्यटनाच्या दृष्टीने जिल्ह्याची भौगोलिक रचना अनुकूल असुन जिल्ह्याला विस्तीर्ण सागर किनारा लाभला आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासा साठी पर्यटन स्थळाचा विकास करणे आवश्यक असल्याने पर्यटन विकासाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यवर होते त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्री ठाकरे बोलत होते. नव्याने जिल्हा अस्तित्वात आल्याने जिल्ह्यासाठी लागणाऱ्या आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी , पोलिस अधीक्षक तासेच जिल्हा परिषदेच्या इमारतीचे काम लवकरच पुर्ण होउन नागरिकांसाठी ऊपलब्ध होणार आहे
कुपोषण पुर्णपणे थांबवायचे असल्याने जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यात असुन आदिवासी समाजाला मुख्य धारेत आणून पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी सांगितले.
जिल्ह्याला समूद्र किनारा लाभला आहे. तसेच जिल्ह्यात हिल स्टेशन तसेच नैसर्गिक सानिध्य लाभल्याने पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पर्यटन स्थळाचा विकास करण्यात येणार आहे
आदिवासी संस्कृती व परंपरा जपून समाजाचा विकास करण्यावर शासनाचा भर आहे. जिल्ह्यात दळणवळण, रोजगार, पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले . जव्हार तालुक्यातील जामसर प्राथमिक आरोग्य केंद्राची आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पाहणी केली.
प्रवेशद्वारावर असलेल्या फळ्यावर लिहिलेल्या हस्ताक्षरा बद्दल विचारणा करून कलाप्रेमी असल्याचे दिसून आले सर्व वैद्यकीय कक्ष आणि झाल्यानंतर विविध रंगात काढलेली रांगोळी तील बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र पाहून मुख्यमंत्री आनंदित झालेले चित्रकार राहुल श्रीराम सहाने या विद्यार्थ्या सोबत आलेले कलाशिक्षक प्रवीण अवतार यांचीही चौकशी केली पालघर जिल्ह्यातील वारली पेंटिंग कला अधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यातील चित्रांना संकल्पना देऊन विविध रंगात रंगविण्यात यावी यासाठी मुलांचे लहान गट करण्यात यावेत तसेच ही कला नव्या पिढीपर्यंत देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना आहे मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली रांगोळी कला ही चित्रकले पेक्षा कठीण असून त्यात खूप मेहनत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले जव्हार दौऱ्यावरून मुख्यमंत्री यांचे कला प्रेम दिसून आले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी , महिला अर्थिक महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, खासदार राजेंद्र गावित सर्वश्री आमदार श्रीनिवास वानगा, सुनिल भुसारा, रविंद्र फाटक, कोकण विभागाचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ कोकण परिषेत्र पोलीस महानिरक्षक. संजय मोहिते जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सलीमठ, वसई विरार महानगर पालिका आयुक्त डी. गंगाथरण , सहायक जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, पी. नायर तसेच जिल्ह्यातील अधिकारी व नागरिक उपस्थित होते
पालघर नगर परिषद तर्फे माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत रेलीचे आयोजन संपन्न
पालघर (प्रतिनिधी)आज शुक्रवार दिनांक 12 फेब्रुवारी 21रोजी पालघर नगर परिषदेतर्फे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत हवेच्या गुणवत्ता सुधारणेसाठी सायकल रॅली चे आयोजन केले होते
शंभरपेक्षा जास्त तरुणाने तरुणींनी लहान मुलांनी व नागरिकांनी त्यात उत्स्फूर्तपणे भाग घेतला.
पालघरच्या नगराध्यक्षा डॉक्टर सौ उज्वला केदार काळे यांनी भाग घेणाऱ्या स्पर्धकांन कडून प्रथम वसुंधरेची म्हणजेच पृथ्वीला प्रदूषण विरहित ठेवण्यासाठी शप्पथ म्हणून घेतली. त्यानंतर सायकल रॅली संपूर्ण पालघर शहरात फिरली त्यावेळेस उपनगराध्यक्ष उत्तम घरत आरोग्य सभापती अमोल पाटील भारतीय जनता पार्टीचे गटनेते भावानंद संखे महीला बालकल्याण सभापती सौ राधा पामाळे ,नगरसेवक चंद्रशेखर वडे .
नगरसेवक राजेंद्र पाटील नगरसेविका अनुजा तरे हिंदवी पाटील ,सौ रोहिणी अंबुरे
प्रियांका म्हात्रे ,शिल्पा बाजपेयी नगरसेवक अक्षय संखे ही मंडळी उपस्थित होती .भारत सायकने रॅलीतील सदस्याना टिशर्ट प्रायोजित केली होती .
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पालघर नगर परिषदेने याआधीही विविध कार्यक्रम आयोजित केले होते उदाहरणार्थ लोकजागृती साठी प्रभात फेरी ,प्लॅस्टिक बंदीसाठी पथनाट्य तसेच प्लास्टिक गोळा करण्यासाठी संकलनकेंद्र ,विद्यार्थ्यांची ऑनलाईन निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या . वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन केले .
स्वच्छ व सुंदर पालघर साठी पालघर नगरपरिषद मोठ्या प्रमाणात माझी वसुंधरा अभियान राबवत आहे.
अनिल जाधव यांचे दुःखद निधन
सफाळे ( हिरालाल लोखंडे )
सफाळे पुर्व डोंगरी येथील प्रसिद्ध जाधव कुटूंबातील अनिल काशिनाथ जाधव उर्फ छोट्या - मामा - नावाने ओळखले जाणारे व्यक्तीमत्व, लहान -थोर - वयोवृद्ध यांच्याशी प्रेमळपणे व आपुलकीने वागणारे. यांचे दिनांक ०६ फेब्रुवारी २०२१ रोजी अल्पशा आजाराने वयाच्या ५५ व्या वर्षी दुःखात निधन झाले. त्यांचे दिवसकार्य ( १३ ) वे गुरूवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२१ रोजी राहत्या घरी पोलिस स्टेशनच्या पुढे, फॉरेस्ट आॅफीसच्या बाजुला सफाळे पुर्व ता. जि पालघर येथे करण्यात येणार आहे
शोकाकुल जाधव परिवाराच्या दुःखात सर्व गावकरी सहभागी आहोत.
Thursday, February 11, 2021
महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी मार्गदर्शन मेळावा संपन्न,
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) दिनांक ११ फेब्रुवारी २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी - उपविभाग सफाळे, व्दारा कृषीपंप विजदेयक सवलती व नवीन विज जोडणी योजना मेळावा सफाळे ग्रामपंचायत सभागृहात संपन्न झाला.
शेतकर्यांनी मेळाव्यात येऊन थकित विजबिलाची ५०% टक्के रक्कम एकदाच भरून ५०% टक्के सवलतींचा कायमस्वरूपी फायदा घेतला आहे. विषेश -- सप्टेंबर २०१५ पुर्वीच्या थकबाकी वरील विलंबित आकार व व्याज १००% टक्के माफ करून मुळ थकबाकी ग्राह्य धरली आहे, यांचा शेकडो शेतकरी बांधवांना झाला आहे.
नवीन कृषीपंप विज जोडणी धोरण २०२० अनुसार, १) कृषी पंपाचे ठिकाण दाब वाहिनी पासून ३० मीटरच्या आत असेल तर तात्काळ जोडणी. २) विज जोडणी २०० मीटरच्या आत असेल तर एरियल बॅच प्रमाणे ३ महिन्यात, नवीन जोडणी, आवश्यक पोल व एरियल बंच केबल अर्जदाराला स्वतःच्या खर्चाने करून, उभारणी करावी लागले. खर्चाचा परतावा विज बिला मधून केला जाईल. ३) विज जोडणी २०० ते ६०० मीटरच्या आत असेलतर अर्जदाराला, उच्चदाब वितरण प्रणाली ( HDVS ) चा पर्याय उपल्ब्ध असून ग्राहकास तात्काळ वीजपुरवठा पाहिजे असल्यास उच्चदाब वाहिनी रोहित्र, स्वखर्चाने उभारावे लागले, व खर्चाचा परतावा विज बिलामधून करण्यात येईल, २) विज जोडणी ६०० मीटरच्या पेक्षा जास्त अंतरावर सौरपंप महाऊर्जा व्दारे आस्थापित करण्यात येईल. ग्राहक आग्रही असल्यास ग्राहकास स्वखर्चाने उच्चदाब वितरण प्रणाली ( HDVS ) विज पुरवठा देण्यात येईल, परंतु परताव्याची रक्कम ६०० मिटर पर्यंतच्या मंजूर अंदाजपत्र प्रक्रिया रक्कमे प्रमाणे मर्यादित राहिल.
मार्गदर्शन मेळाव्यास श्री दिनेश अग्रवाल मुख्य अभियंता कल्याण, श्री प्रताप मचिये कार्यकारी अभियंता पालघर, श्री मुकुंद देशमुख उपकार्यकारी अभियंता सफाळे, यांनी आपल्या योजना शेतकरी बांधवांना समजवून सांगितल्या, श्री अमोद
जाधव सरपंच ग्रामपंचायत सफाळे, सौ मनिषा निमकर जिल्हा परिषद सदस्या पालघर, यांनी योजनेचा फायदा घेण्याचे उपस्थित ४०० ते ५०० शेतकरी बांधवाना केले. उपस्थित ७३ शेतपंप धारकांनी प्रतिसाद देऊन सवलतींचा फायदा घेतला असता, ३,७०,२८० /- रूपये महावितरणच्या खात्यात एकाच वेळी जमा झाले आहेत. मेळाव्यास अनेक ग्रामपंचायती मधील आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य शेकडो शेतकरी यांनी उपस्थित नोंदलेली.
कार्यक्रमाला घेतलेले सभागृह लहान असल्याने अनेक शेतकरी बंधूंना हाॅ़लच्या बाहेरआपली उपस्थिती दर्शवली,पत्रकार यांनीही उभ्यांनेच वृत संकलन करावे लागले.सदर व्हिडिओ चित्रीकरणात दिसत आहे
Wednesday, February 10, 2021
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपणी , उपविभाग सफाळे मर्यादित मार्गदर्शन मेळावा
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) दिनांक ११ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी उपविभाग सफाळे यानी कृषिपंप विजदेयक सवलत व नविन वीज जोडणी योजना या विषयावर ग्रामपंचायत सफाळे - उंबरपाडा ता,जि पालघर यांच्या कार्यालयातील सभागृहात सकाळी ११ वाजता मार्गदर्शन मेळावा आयोजित केलेला आहे.
कोव्हिडा १९ च्या बंदी मुळे, अनेक संकटाना तोंड देऊन ,मिळेल त्या किंमतीत शेतकर्यांना आपला माल विकावा लागला आहे. बागायती असलेल्या शेतकर्यांना वाहतुक बंदीमुळे मेहनतीने उगवलेल्या पालेभाज्या, फळ - फळावर फुले,किंमत ( ग्राहक )मिळत नसल्याने तयार माल फेकून द्यावा लागला आहे. शेतकर्यांच्या मालास भाव ( किंमत ) नाही. उत्पादन खर्च हि निघत नव्हता तर विद्युत बिले भरणार कसे या करीता आता म. रा. वि.वि.कं.च्या उपविभाग सफाळे मार्फत मार्गदर्शन मेळावा आयोजित केला असुन, श्री दिनेश अग्रवाल मुख्य अभियंता कल्याण परिमंडळ, सौ किरण नागावकर अधिक्षक अभियंता पालघर परिमंडळ, श्री प्रताप मचिये कार्यकारी अभियंता पालघर विभाग आदी मान्यवर येऊन शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहे तरी शेतकरी बंधूंनी लाभ घ्यावा हि विनंती.
Tuesday, February 9, 2021
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० पाच दिवसीय वेबिनार संपन्न
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० पाच दिवसीय वेबिनार संपन्न
पालघर (प्रतिनिधी)राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शिक्षण व्यवस्थेतील सर्व अधिकारी, कर्मचारी , मुख्याध्यापक , शिक्षक यांना समजावे व शिक्षण प्रेमी ,पालक , विद्यार्थी यांच्या पर्यंत पोहचावे या साठी महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था ( मिपा ) औरंगाबाद यांच्या मार्गदर्शक सुचनानुसार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था , पालघर व शिक्षण विभाग प्राथ / माध्य जि .प .पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने दि .२२ ते २८ जानेवारी २०२१ या कालावधीत पाच दिवसीय वेबिनार डायट पालघर या फेसबुक पेज च्या लाईव्ह माध्यमातून संपन्न झाले .
सिद्धाराम सालीमठ सर, ( मुख्य कार्यकारी अधिकारी , जि .प .पालघर यांच्या मार्गदर्शनाने हे वेबिनार पार पडले.
या वेबिनार मध्ये मानसी भोसले यांनी संपूर्ण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील पायाभूत माहीती सविस्तर पणे मांडली. धोरणाची आखणी कशी केली, धोरण केंव्हा पासुन आखण्यास सुरुवात झाली, हे धोरण तयार करण्याची का गरज पडली याबाबत सखोल अशी सोप्या भाषेत माहीती दिली . दिनेश चौधरी यांनी शालेय नेतृत्व आणि सातत्यपूर्ण विकास या विषयावर -शिक्षकांचे सक्षमीकरण, शालेय नेतृत्व व व्यवस्थापन प्रशिक्षणाची माहीती ,नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सेवाजेष्ठता व वेतनवाढ या बद्दल माहीती दिली . वैशाली काकडे यांनी आधुनिक काळातील शालेय नेतृत्व याविषयावर सजगतेने स्पष्टीकरण केले . राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये शिक्षकाचे नेतृत्व कसे असावे त्याचे ध्येय काय उद्देश काय याची सविस्तर उकल केली . राजेश बनकर यांनी शालेय समूह व शालेय संकुल संकल्पना स्पष्ट केली. शालेय संकुल म्हणजे काय , त्याची रचना व स्वरुप, शालेय संकुल व्यवस्थापन समिती , समितीचा आराखडा याविषयी सखोल माहीती दिली .संदीप वाकचौरे यांनी नव्या शैक्षणिक धोरणाची आव्हाने याविषयावर प्रकाश टाकताना या सत्राला उपस्थितांना विचार प्रक्रिया करण्यास भाग पाडले .वेबिनारच्या समारोप कार्यक्रमात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ.नेहा बेलसरे संचालक , महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था ( मिपा ) औरंगाबाद यांनी येत्या काळात भारताचा भावी नागरीक ज्ञानपूर्ण , सर्वगुणसंपन्न होण्यासाठी नेतृत्व संकल्पना अधिक रूजणे गरजेचे आहे असे मत मांडले यावर अधिक मार्गदर्शन करताना येत्या काळात विदयार्थी इंडीपेंडट थिंकर हा दृष्टीकोन विकसीत होणे गरजेचे आहे . शालेय नेतृत्व ही संकल्पना स्पष्ट करताना शिक्षक , शाळा यांची महत्वपूर्ण अशी भूमिका विशद करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 याबद्दल उत्तम मार्गदर्शन केले .
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पालघर चे प्राचार्या ,विषय सहाय्यक व समुपदेशक यांनी वेबिनार ची मालिका यशस्वीरित्या पूर्ण केली या बद्दल विशेष अभिनंदन केले . शालेय नेतृत्व या साठी मिपा औरंगाबाद च्या वतीने अयोजीत करण्यात येणारी प्रशिक्षणे व त्याचा फायदा मुख्याध्यापक व शिक्षक यांना कसा होणार आहे याची माहीती दिली .
दिनकर टेमकर संचालक , राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद लता सानप प्राचार्या , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ,पालघर तथा शिक्षणाधिकारी प्राथ . जि .प .पालघर , संगीता भागवत शिक्षणाधिकारी माध्य . जि .प .पालघर यांचे पूर्ण मार्गदर्शन या वेबिनार ला लाभले . वेबिनारचे आयोजन तानाजी डावरे जिल्हा नोडल अधिकारी , डायट पालघर यांनी केले .
जिल्हास्तरीय या वेबिनारचा लाभ जिल्हयातील सर्व गटशिक्षणाधिकारी ,विस्तार अधिकारी , केंद्रप्रमुख , साधन व्यक्ती ,आयडी स्टाफ , मुख्याध्यापक ,शिक्षक यांनी लाभ घेतला . एकूण ११२३४ अधिकारी व कर्मचारी यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे प्रत्यक्ष सहभाग घेतला तर १८००० अधिकारी व कर्मचारी यांनी या वेबिनारच्या फेसबुक व्हिडीओ द्वारे लाभ घेतला .
केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिका यांचा शोध घेऊन रद्द होणार
अपात्र शिधापत्रिका रद्द होणार
पालघर(प्रतिनिधी) दि 9 : जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना सूचीत करणेत येते की, केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत. . सार्वजनिक वितरण व्यवस्था (नियंत्रण) आदेश, २०१५ मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे. त्यामुळे अपात्र शिधापत्रिका शोधून रद्द करण्याकरीता खास शोध मोहिम राबविणे आवश्यक असल्याने. राज्यातील कार्यरत बी.पी.एल., अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी शुभ्र व आस्थापना कार्ड या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करणेसाठी शोध मोहिम दि. ०१/०२/२०२१ ते दि. ३०/०४/२०२१ या कालावधीमध्ये राबविण्याबाबतच्या सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागा कडून संबंधित कार्यालयास सूचना प्राप्त झाल्या आहेत. तरी सर्व शिधापत्रिकाधारकांना आवाहन करण्यात येते की, अपात्र शिधापत्रिका मोहिम
राबविण्याबाबत तपासणी करण्यासाठी त्या त्या भागातील अधिकृत शिधावाटप दुकानातुन शासकीय कर्मचारी / तलाठी यांचेमार्फत ठरवून दिलेल्या वेळेत नमुना फॉर्म वाटप करण्यात येतील. सदरचे फॉर्म विहीत मुदतीत आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित कार्यालयात जमा करण्यात यावे. सदरचा फॉर्म भरुन देताना फॉर्म सोबत शिधापत्रिकाधारकांनी ते त्या भागात राहात असल्याचा पुरावा द्यावा. पुरावा म्हणून उदा. भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, LPG जोडणी क्रमांक, बँक पासबुक विजेचे देयक, टेलिफोन/मोबाईल देयक, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र (कार्यालयीन / इतर), मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, इत्यादीच्या प्रती घेता येतील. दिलेला पुरावा हा एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जूना नसावा. याची शिधापत्रिकाधारकांनी नोंद घ्यावी.
Monday, February 8, 2021
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष इगतपुरी तालुका प्रमुख पदी बाळा गव्हाणे यांची निवड.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष इगतपुरी तालुका प्रमुख पदी बाळा गव्हाणे यांची निवड.
नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.
युवासेना नाशिक उपजिल्हा प्रमुख बाळा गव्हाणे यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, इगतपुरी तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली असुन घोटी येथील परिवार हॉटेल येथे विनोद काळे व सहकारी यांच्या हस्ते शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन पदभार सोपविण्यात आला.
प्रेम प्रकरणातून रक्त पात ! गुन्हा दाखल, आरोपीस अटक.
प्रेम प्रकरणातून रक्त पात !
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) दिनांक ७ फेब्रुवारी २०२१ रोजी सफाळे रेल्वे स्टेशन पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या ठाकुरपाडा - कपासे येथे दुपारच्या वेळी अंदाजे १२ ते ३ च्या दरम्यान आरोपी दिलीप तानाजी ठाकरे वय वर्ष ४० राहणार ठाकुरपाडा ता,जि पालघर यांने आपली पत्नी सौ संगीता दिलीप ठाकरे वय वर्ष ३६ .व तिचा भाऊजी पांड्या बाळकृष्ण श्रावणे वय वर्ष ३६ राहणार दहिसर तर्फे मनोर ता,जि पालघर यांची शाररीक क्रिडा रास, चालू असल्याचे प्रत्यक्ष डोळ्यानी पाहिले असता राग अनावर झाल्याने मागचा पुढचा कोणताही विचार न करता, हातात आलेल्या कुऱ्हाडीने मारहाण करून निर्घृणरीत्या दोघाचा खून केला असल्याची फिर्याद आरोपीचा मुलगा मनोज दिलीप ठाकरे वय वर्ष २१ राहणार ठाकुरपाडा यांने दिली
सफाळे पोलीस स्टेशन ता,जि पालघर येथे दिनांक ०७ / ०२ /२०२१ रोजी गुन्हा रजि नं. ०६ / २०२१ भा.द .वि. स. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून मा, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटना स्थळी भेट दिली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सफाळे पो. स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री संदीप कहाळे सहा. पो. निरीक्षक यांनी आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरू आहे
ग्रामपंचायत वेढी -मांर्जूली ग्रामविकासभवन उद्घाटन सोहळा संपन्न
ग्रामपंचायत वेढी -मांर्जूली
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) ग्रामपंचायत इमारत दुरस्ती - नविन बांधकाम या साठी जिल्हा परिषद पालघर " जनसूविधा " योजना अंर्तगत सन २०१७ -- २०१८ , प्रशासकीय निधी रक्कम रूपये १२,६४०००/-₹ अक्षरी बारा लाख चौसष्ट हजार रूपये मिळालेल्या निधीमधून गृप ग्रामपंचायत वेढी मांर्जुली ता,जि पालघर यानी ग्रामविकास भवन ( इमारत ) उभारली असून दिनांक ७ फेब्रुवारी २०२१ रोजी श्री वसंतभाई चव्हाण शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख, सौ भारती कामडी जिल्हा परिषद अध्यक्षा, यांच्या हस्ते व मान्यवर सौ रंजना म्हसकर - घोलप पालघर जि. परिषद सदस्य, सौ सरिता सुतार पालघर जि. परिषद सदस्य, सौ उषा पाटील सरपंच ग्रा. पं. वेढी मांर्जूली, उपसरपंच अनंत जाधव ग्रा. पं. वेढी मांर्जूली, शिवसेना विभाग प्रमुख व ग्रामपंचायत वेढी मांर्जूली सदस्य नचिकेत पाटील, भाविका पाटील, सागर सुतार, सौ आशा तिवाड, सौ वैभवी पाटील, सौ प्रणिती भोईर, मनस्वी शेलार ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच सभासद ग्रामस्थ समक्ष सोहळा पार पडला
--------------------------------------यत समिती सदस्य श्री तुकाराम देवजी सुमडा ( शिवसेना ) राहणार कांद्रेभुरे ता. जि. पालघर यांची प्रकृती बरी नसल्याचे ग्रा, पं. वेढी मांर्जूली कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख पाहुणे श्री वसंतभाई चव्हाण, सौ भारती कामडी व सर्व मान्यवर समजताच त्यानी कांद्रेभुरे गावात जाऊन सरपंच श्री जगदीश पाटील याच्या सह सुमडा याच्या घरी जाऊन त्याची भेट घेऊन प्रकृती बद्दल विचारले, आपण एकटे नाहीत आम्ही सर्व आपल्या बरोबरच आहे
असताना सुमडा यांना व सरपंचयांना जो आनंद झाला त्याचे वर्णन करता येणार नाही
ब्रम्हांड दर्शन तांदुळवाडी !
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) ग्रामीण भागातील खगोलशास्त्र प्रेमी व विद्यार्थी वर्गाला ग्रह - तारे, आकाशगंगा पाहण्यासाठी नेहरू तारांगण मुंबई येथे जावे लागत असे, आता हि सोय अॅग्रो वेंचर शैक्षणिक संस्था द्वारा तांदुळवाडी ता,जि पालघर येथे उपल्ब्ध करुण देण्यात आली आहे.
दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सफाळे ( पुर्व ) रेल्वे स्टेशनपासून ३ ते ४ किलो मिटर अंतरावर असलेल्या तांदुळवाडी निसर्ग रम्य भागात साईबाबा मंदिराच्या पटांगणात, पालघर तालुक्यांतील शालेय विद्यार्थी, शिक्षक, खगोलीय निरीक्षण प्रेमी, लोकप्रतिनिधी, सर्वसामान्य आकाश प्रेमी साठी मोफत आकाश दर्शन, खगोल शास्त्र ओळख, आकाशातील ग्रह - तारे - नक्षत्र ओळख, आकाशगंगेत होणारे बदल. विद्यार्थी वर्गाला निरीक्षणा साठी मोफत संधी उपल्ब्ध करूण देण्यात आली आहे.
साई अॅग्रो वेंचर शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्र पुरूषोत्तम पाटील, श्री मंगेश सुतार, श्री भाविक भाई यांच्या सौजन्याने व ब्रम्हांड दर्शन महाभ्रमण केंद्र यांच्या सहयोगाने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला. या पुढेही असे कार्यक्रम होतील असे श्री राजेंद्र पाटील यानी आमच्या प्रतिनिधी सांगितले आहे.
कार्यक्रमाला सौ विनया पाटील - पालघय जि. प. सदस्य, श्री चेतन पाटील - पालघर पं समिती उपसभापती,श्री तुषार पाटील पालघर पं समिती सदस्य, श्री हेमंत दि संखे सरपंच ग्रा पं दापोली, जि पालघर, सौ रूपाली कोळेकर ग्रामसेवीका दापोली, प्रवीण पाटील उपसरपंच ग्रा पं साखरे, सरपंच धुकटण, ग्रामपंचायत सदस्य ,भाविका मॅडम, बहाडोली हायस्कूल शिक्षिका सौ हिमानी संखे, श्री शशिकांत पाटील सर ह.म.प. विद्यालय सफाळे, गांवकरी ,विद्यार्थी, प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी झालेले .
Sunday, February 7, 2021
सफाळे पोलीस स्टेशन व्दारा विधीश राऊत यांच्या सन्मानित
सफाळे पोलीस स्टेशन व्दारा विधीश राऊत यांच्या सन्मानित
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) ग्रामीण शिक्षण संस्था सफाळे यांच्या शाळेत इयत्ता ४ थी मधे शिक्षण घेत असलेला विधीश जयेश राऊत वय वर्ष १० राहणार सफाळे, यांने मार्गदर्शन, दररोज सराव, स्वयंम कौशल्य यावर राष्ट्रीय योगासन स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून आपल्या शाळेचे व जन्मदाते राऊत कुटुंबाचे नाव पंचक्रोशीत उज्ज्वल केले आहे.
ग्रामीण भागात राहत असल्याने आधुनिक सुविधा उपल्ब्ध नसताना, अॅडव्हेंचर समर कॅप मधील शिक्षक यांनी विधीश यांचे कौशल्य गुण ओळखले, व त्याच्या मातापिता यांच्याशी संपर्क साधुन योग्य मार्गदर्शन करण्यासाठी सल्ला दिला. पालकांनी प्रोत्साहन पर सहमती दर्शवली.
जिल्हा योग संघटनेच्या उपाध्यक्षा सुचिता ठाकुर यांनी विधीशला प्रोत्साहन देऊन, त्याच्या कडून ३२ व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करवून घेतली, राज्य, जिल्हा, मुंबई उपनगर, कलाक्रीडा महोत्सव अशा विविध पातळीवर विधीशने आपल्या कलागुणांचा ठसा उमटवून अनेक पारितोषिके, प्रशस्तीपत्र मिळावीत आहे. अश्याकलागुण बाळाचे सफाळे पोलीस स्टेशनचे प्रभावी अधिकारी श्री संदीप कहाळे साहेब, कर्मचारी यांच्या हस्ते शाल व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.मुलांचेपालक यांनी मुलाच्या कौतुक समारंभात सहभागी होऊन कहाळे साहेब व कर्मचारी यांचे आभार मानले.
Saturday, February 6, 2021
महा आवास अभियान च्या प्रभावी अंमलबजावणी साठी विभागीय सम्पर्क अधिकारी यांची क्षेत्रीय भेट
महा आवास अभियान च्या प्रभावी अंमलबजावणी साठी विभागीय सम्पर्क अधिकारी यांची क्षेत्रीय भेट
महा आवास अभियान ग्रामीण १०० दिवस महा आवास अभियान च्या प्रभावी अंमलबजावणी करिता विभागीय सम्पर्क अधिकारी संजय घोगळे सहा.लेखाधिकारी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष,ग्रामीण गृहनिर्माण कक्ष यांनी आज पालघर मध्ये क्षेत्रीय भेट दिली. बऱ्हाणपूर, चहाडे,वाडा येथील घरकुलांची पाहणी करून जिल्हयातील सर्व ग्रामीण गृहनिर्माण अभियंते,घरकुलांचे काम पाहणारे विस्तार अधिकारी,व कर्मचारी यांच्या मार्फत प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा माणिक दिवे यांनी जिल्ह्यातील महा आवास अभियानाचा सविस्तर आढावा सादर केला.
जिल्ह्यातील डेमो हाऊस, गवंडी प्रशिक्षण, व इतर योजना यावर लक्ष देऊन सर्वांनी मिळून काम करूया, या स्पर्धेत आपण उतरलो असून पालघर जिल्हा महाआवास अभियानात अव्वल राहील या साठी प्रयत्न करूया असे आवाहन यावेळी प्रकल्प संचालक माणिक दिवे यांनी उपस्थितांना केले.
यावेळी संजय घोगळे यांनी अभियानाबाबत लाभार्थ्यांमध्ये जागरूकता असली पाहिजे,यासाठी बॅनर, होर्डिंग्ज याचा वापर केला पाहिजे,तसच तुमचं घर सुंदर झालं पाहिजे यासाठी लाभार्थ्यांना प्रोत्साहित केले पाहिजे असे मत व्यक्त केले.
सदर बैठकीस सहा. प्रकल्प अधिकारी प्रतिभा भागवत, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जिल्हा प्रभारक, व कर्मचारी उपस्थित होते.
Subscribe to:
Posts (Atom)
ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द
* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द* पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...
-
*नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी माैजे ऊसर येथील जागा हस्तांतरित* *नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी पालकमंत्री कु.अादिती तटकरेंच...
-
वाहतूक नियंत्रण अधिसूचना यांना करण्यात येत आहे. पालघर :-ज्याअर्थी उपोद्घातातील अ.क्र.१ वर अंतर्भुत असलेल्या पत्रान्वये पालघर पोलीस ठाण्याचे ...
-
*स्व. हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुंदन भाऊ संख्ये यांनी आयोजित केलेल्या रक्तदान...