Monday, February 8, 2021

ब्रम्हांड दर्शन तांदुळवाडी !

ब्रम्हांड दर्शन तांदुळवाडी !
  सफाळे ( हिरालाल लोखंडे ) ग्रामीण भागातील खगोलशास्त्र प्रेमी व विद्यार्थी वर्गाला ग्रह - तारे, आकाशगंगा पाहण्यासाठी नेहरू तारांगण मुंबई येथे जावे लागत असे,  आता हि सोय अॅग्रो वेंचर शैक्षणिक संस्था द्वारा तांदुळवाडी ता,जि पालघर येथे उपल्ब्ध करुण देण्यात आली आहे. 
         दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सफाळे ( पुर्व ) रेल्वे स्टेशनपासून ३ ते ४ किलो मिटर अंतरावर असलेल्या तांदुळवाडी निसर्ग रम्य भागात साईबाबा मंदिराच्या पटांगणात, पालघर तालुक्यांतील शालेय विद्यार्थी, शिक्षक, खगोलीय निरीक्षण प्रेमी, लोकप्रतिनिधी, सर्वसामान्य आकाश प्रेमी साठी मोफत आकाश दर्शन, खगोल शास्त्र ओळख, आकाशातील ग्रह - तारे - नक्षत्र ओळख, आकाशगंगेत होणारे बदल. विद्यार्थी वर्गाला निरीक्षणा साठी मोफत संधी उपल्ब्ध करूण देण्यात आली आहे. 
      साई अॅग्रो वेंचर शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्र पुरूषोत्तम पाटील, श्री मंगेश सुतार, श्री भाविक भाई यांच्या सौजन्याने व ब्रम्हांड दर्शन महाभ्रमण केंद्र यांच्या सहयोगाने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला. या पुढेही असे कार्यक्रम होतील असे श्री राजेंद्र पाटील यानी आमच्या प्रतिनिधी सांगितले आहे. 
        कार्यक्रमाला सौ विनया पाटील - पालघय जि. प. सदस्य, श्री चेतन पाटील - पालघर पं समिती उपसभापती,श्री तुषार पाटील पालघर पं समिती सदस्य, श्री हेमंत दि संखे सरपंच ग्रा पं दापोली, जि पालघर, सौ रूपाली कोळेकर ग्रामसेवीका दापोली, प्रवीण पाटील उपसरपंच ग्रा पं साखरे, सरपंच धुकटण, ग्रामपंचायत सदस्य ,भाविका मॅडम, बहाडोली हायस्कूल शिक्षिका सौ हिमानी संखे, श्री शशिकांत पाटील सर ह.म.प. विद्यालय सफाळे, गांवकरी ,विद्यार्थी, प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी झालेले .

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...