Wednesday, February 10, 2021

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपणी , उपविभाग सफाळे मर्यादित मार्गदर्शन मेळावा

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपणी , उपविभाग सफाळे मर्यादित मार्गदर्शन मेळावा 
  सफाळे ( हिरालाल लोखंडे ) दिनांक ११ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी उपविभाग सफाळे यानी कृषिपंप विजदेयक सवलत व नविन वीज जोडणी योजना या विषयावर ग्रामपंचायत सफाळे - उंबरपाडा ता,जि पालघर यांच्या कार्यालयातील सभागृहात सकाळी ११ वाजता मार्गदर्शन मेळावा आयोजित केलेला आहे. 
   कोव्हिडा १९ च्या बंदी मुळे, अनेक संकटाना तोंड देऊन ,मिळेल त्या किंमतीत शेतकर्‍यांना आपला माल विकावा लागला आहे. बागायती असलेल्या शेतकर्‍यांना वाहतुक बंदीमुळे मेहनतीने उगवलेल्या पालेभाज्या, फळ - फळावर फुले,किंमत ( ग्राहक )मिळत नसल्याने तयार माल फेकून  द्यावा लागला आहे. शेतकर्‍यांच्या मालास भाव ( किंमत ) नाही. उत्पादन खर्च हि निघत नव्हता तर विद्युत बिले भरणार कसे या करीता आता म. रा. वि.वि.कं.च्या उपविभाग सफाळे मार्फत मार्गदर्शन मेळावा आयोजित केला असुन, श्री दिनेश अग्रवाल मुख्य अभियंता कल्याण परिमंडळ, सौ किरण नागावकर अधिक्षक अभियंता पालघर परिमंडळ, श्री प्रताप मचिये कार्यकारी अभियंता पालघर विभाग आदी मान्यवर येऊन शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणार आहे तरी शेतकरी बंधूंनी लाभ घ्यावा हि विनंती.

1 comment:

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...