Tuesday, February 9, 2021

केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिका यांचा शोध घेऊन रद्द होणार

अपात्र शिधापत्रिका रद्द होणार

पालघर(प्रतिनिधी) दि 9 :  जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना सूचीत करणेत येते की, केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत.                       .                 सार्वजनिक वितरण व्यवस्था (नियंत्रण) आदेश, २०१५ मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे. त्यामुळे अपात्र शिधापत्रिका शोधून रद्द करण्याकरीता खास शोध मोहिम राबविणे आवश्यक असल्याने. राज्यातील कार्यरत बी.पी.एल., अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी शुभ्र व आस्थापना कार्ड या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करणेसाठी शोध मोहिम दि. ०१/०२/२०२१ ते दि. ३०/०४/२०२१ या कालावधीमध्ये राबविण्याबाबतच्या सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागा कडून संबंधित कार्यालयास सूचना प्राप्त झाल्या   आहेत. तरी सर्व शिधापत्रिकाधारकांना आवाहन करण्यात येते की, अपात्र शिधापत्रिका मोहिम

राबविण्याबाबत तपासणी करण्यासाठी त्या त्या भागातील अधिकृत शिधावाटप दुकानातुन शासकीय कर्मचारी / तलाठी यांचेमार्फत ठरवून दिलेल्या वेळेत नमुना फॉर्म वाटप करण्यात येतील. सदरचे फॉर्म विहीत मुदतीत आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित कार्यालयात जमा करण्यात यावे. सदरचा फॉर्म भरुन देताना फॉर्म सोबत शिधापत्रिकाधारकांनी ते त्या भागात राहात असल्याचा पुरावा द्यावा. पुरावा म्हणून उदा. भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, LPG जोडणी क्रमांक, बँक पासबुक विजेचे देयक, टेलिफोन/मोबाईल देयक, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र (कार्यालयीन / इतर), मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, इत्यादीच्या प्रती घेता येतील. दिलेला पुरावा हा एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जूना नसावा. याची शिधापत्रिकाधारकांनी नोंद घ्यावी.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...