Saturday, February 27, 2021

श्री राम मंदिर निर्माणासाठी ७६ वर्षीय आजीने दिले ५०००/-₹ !

श्री राम मंदिर निर्माणासाठी ७६ वर्षीय आजीने दिले ५०००/-₹ !
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) श्री राम मंदिर निर्माण करण्यासाठी पालघर तालुका संयोजक श्री शरद घरत व त्यांचे सहकारी १५ जानेवारी २०२१ ते १५ फेब्रुवारी २०२१ या एक महिन्याच्या काळात सफाळे परिसरातील जंगल पट्टी, बंदर पट्टी, विभागातील प्रत्येक गांव, पाडा, वस्त्या मधील बांधवांना भेटून त्यांच्याशी संवाद साधता आला. व बोलण्याची संधी मिळाली या बद्दल आयोजकांना समाधान मिळत आहे. 
      समुद्रात सेतु बांधताना श्रीरामांनी खारूताई सारख्या छोट्या जिवाची दखल घेतल्याचा उल्लेख रामायणात आहे. राम भक्त दारोदारी जाऊन राममंदिर निर्माण निधी संकलन करताना दहा रूपये पासून चार अंकी - पाच अंकी निधी मनोभावे देणारे दाते पहावयास मिळत आहे. सफाळे विभागातील ६५ गांव,पाडे, वस्त्या मिळून रामभक्ताचा मिळणारा  लाखो रूपयांचा निधी हिशोब जुळवून, बँकेत जमा करण्यात येत आहे. आपण सर्वांच्या सहभागाने, श्रीरामांच्या कृपेने काम करीत आलो, या पुढेही करीत राहणार आहोत. वडराई ता,जि पालघर येथील श्रीमती विशाला गावड वय वर्षे ७६ यांनी आपल्या पेन्शन मधून ५०००/- अक्षरी पांच हजार रूपये राममंदिर निधी दिला असता स्विकारताना श्री शरद घरत, अनिरुद्ध नामजोशी, निमिश म्हात्रे, ऋषिकेश कुडू

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...