Thursday, February 18, 2021

अवैध गौणखणीज उत्खनन !दोन डंपर व पोखरण जप्त .

अवैध गौणखणीज उत्खनन !
दोन डंपर व पोखरण जप्त .
वाडा ( हिरालाल लोखंडे ) मौजे गुंज. तालुका वाडा जिल्हा पालघर येथील मालकी हक्क असलेल्या सर्वे नंबर ५६ ,५७ ,लगत असलेल्या बुधावली येथील संरक्षित वनविभाग सर्वे नंबर  ५५ च्या हद्दीतील सिमांकित करण्यासाठी असलेल्या बुरूज पोखलनच्या सहाय्याने नष्ट करून ( उत्खनन करून ) स्वतःच्या फायद्यासाठी संरक्षित वनविभागातील गौणखनिज दोन डंपरच्या सहाय्याने वाहतूक करीत असल्याचे आढळून आल्यानंतर दिनांक १६ व १७ फेब्रुवारी २०२१ रोजी संध्याकाळच्या सुमारास वनपाल श्री अनिल कांबळे यांच्या फिरत्या पथकाने कारवाई करून गुन्हे कामात वापरण्यात आलेला एक पोखलन व दोन डंपर वाहने जप्त करण्यात आली असून, जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे ७० ते ८० लाख रूपये असावी असे वनविभाग कर्मचारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे. 
भारतीय दंड संविधान वन अधिनियम १९२७ चे कलम ६३ ( क ) ३३ ( १ )अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, फरारी संशयित आरोपी यांचा तपास श्री धुमाळ साहेब उपवनसंरक्षक अधिकारी जव्हार, श्री सोनवणे साहेब सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी, श्री साफळे साहेब वनक्षेत्रपाल ( पश्चिम ) वाडा  जिल्हा पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल श्री गुंज व त्यांच्या अधिपत्याखालील कर्मचारी पुढील तपास करीत आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...