Tuesday, February 16, 2021

नजर हटी दुर्घटना घटी !अपघातात जागेवरच मृत्यू

नजर हटी दुर्घटना घटी !
अपघातात जागेवरच मृत्यू 
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारनंतर सुमारे ४ - ३० चे दरम्यान सफाळे पोलिस स्टेशन हद्दीतील पारगांव सफाळे रोडवरील नांगरमोडी गावाजवळ मोटरसायकल चालक मोहम्मद शहाबुद्दीन शेख वय वर्षे ४१ राहणार, ०१, फातिमा को. आॅप. हौ. सोसा. एम. बी.ईस्टेट -इंडियन बँक जवळ, विरार पश्चिम, तालुका वसई. आपली ( पॅशन प्रो )मोटरसायकल ( क्रमांक एम, एच, ०४ / इ डब्ल्यू  २६३७ ) भरधाव वेगाने चालवताना गाडीवरील नियंत्रण सुटून, नांगरमोडी गावाच्या नाक्याजवळील दिशादर्शक लोखंडी बोर्डला ठोकर लागुन अपघात घडला असताना , मोटरसायकल चालकास पोटावर - गळ्यावर - छातीवर मार लागुन गंभीर दुखापत झाल्याने, स्वतःच्या मरणास स्वतःच कारणीभुत असून पोलिस स्टेशन सफाळे ता,जि पालघर येथे गुन्हा रजि, नंबर ०७ / २०२१ ने    भारतीय दंड विधान संहिता कलम ३०४ ( अ ) २७९ ,३३७ ,३३८ , मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून तपासी अंमलदार श्री ए, व्ही , खोत वरिष्ठ प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...