जेमिनी इन्स्ट्राटेक लि. अंबड.नाशिक या कंपनीच्या कामगार विरोधी बेकायदेशीर निलंबनाविरोधात कामगारांचे बेमुदत ठिय्या आंदोलन.
नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.
जेमिनी इन्स्ट्राटेक लि.अंबड. नाशिक या कंपनीतील कायम कामगार मागील १५ ते २० वर्षापासून सदर कंपनीत काम करीत आहेत परंतु सदर कंपनीत कामगारांना कुठल्याही आरोग्य सुरक्षा सुविधा देत नाहीत व त्यामुळे कामगारांचे आरोग्य नेहमी धोक्यात असते व यासंदर्भात कामगारांनी युनियन स्थापन करून कामगारांना आरोग्य सुविधा व प्रदूषण मुक्ती संबंधित सुविधा देण्यात याव्या अशा मागण्या युनियनद्वारे केल्यात परंतु कंपनी व्यवस्थापन व मालक यांनी युनियन स्थापन केल्याचा राग म्हणून १८ कामगारांना खोटे आरोप लावून कामावरून निलंबित केले व कामगार युनियनचा बोर्ड फाडून फेकून दिला असे कामगारांनी सांगितले.
याविषयी कामगारांनी कामगार आयुक्तालय,औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग सातपूर,नाशिक यांनाही निवेदन दिले कि कामगारांना स्वतःच्या सुरक्षा सुविधा मागितल्यास कामावरून कमी करण्यात येते व आपण चौकशीसाठी पाठवलेले अधिकारी कंपनीने ठरवलेल्या कामगारांशीच बोलतात तसेच काही महत्त्वाचे डिपार्टमेंट कडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात.
1) कंपनीत असलेला ETP प्लांट बंद असून त्याची सर्व दुर्गंधी कंपनीत पसरते आहे व त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंतू तयार होतात.
2) कंपनीत ब्रेझिंग मशीन वरती कॉपर ब्रेझिंग होते सदर ब्रीजिंग झालेला कॉपर जॉब ऍसिड मध्ये टाकतात त्याचा खूप मोठ्या प्रमाणात धूर होतो, सदर मशीन 8x10 च्या खोलीत असून तेथे काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्यास धोका आहे. अशा इतर समस्या या निवेदनात दिल्या आहेत.
असे असूनही ही कंपनी बेकायदेशीर स्वरूपात बिनदिक्कत पणे चालू आहे असे निवेदन कामगारांनी आरोग्य व प्रदूषण विभाग, कामगार विभाग यांना दिले आहे व अद्यापपर्यंत निवेदनावर कुठल्याही प्रकारची योग्य ती कार्यवाही करण्यात आलेली नाही. कामगारांचे निलंबन मागे घेऊन कामगारांना योग्य त्या सुविधा देण्यात याव्यात तरच हे आंदोलन मागे घेण्यात येईल अन्यथा आंदोलन तीव्र स्वरूपात होईल अशी सूचना भारतीय मजदूर सभा या युनियन द्वारे देण्यात आली.
No comments:
Post a Comment