Tuesday, February 23, 2021

पालघर जिल्हा परिषदेमार्फत संत गाडगे महाराज जयंती साजरी



पालघर जिल्हा परिषदेमार्फत संत गाडगे महाराज  जयंती साजरी
  पालघर (प्रतिनिधी)पालघर जिल्हा परिषदे मार्फत आज संत गाडगे महाराज जयंती साजरी करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  
संत गाडगे महाराज यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ झाला असून २० डिसेंबर १९५६ रोजी मृत्यू झाला. डेबुजी झिंगरजी  जानोरकर असे मूळ नाव असलेले हे संत  गाडगे बाबा म्हणून महाराष्ट्रभर ओळखले जाऊ लागले. गाडगे बाबा महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्या काळात  स्वच्छतेचे महत्व त्यांनी जनतेला पटवून दिले. “देव हा माणसात असतो” हा मोलाचा संदेश त्यांनी दिला.  विविध गावांना  फिरून सामाजिक न्याय देणारे गाडगे महाराज एक सामाजिक शिक्षक होते. पायात फाटकी चप्पल आणि हातात मातीची कटोरी चालत फिरणारे बाबा हीच त्यांची मुख्य ओळख होती.  अशा थोर महापुरुषाची आज जयंती साजरी करण्यात आली. या वेळी अति. मुख्य कार्यकारी चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक माणिक दिवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), टी.ओ.चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) संघरत्ना खिल्लारे  तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...