Sunday, January 31, 2021

राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेत पालघरला पुरुष सांघिक गटाचे कांस्यपदक, नाशिक पुरुष प्रथम तर सातारा दुसऱ्या स्थानी.

राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेत पालघरला पुरुष सांघिक गटाचे कांस्यपदक, 
नाशिक पुरुष प्रथम तर सातारा दुसऱ्या स्थानी.

पालघर  दिनांक 31/1/2021 बाबासाहेब गुंजाळ

दिनांक ३१ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता पुणे फुलगांव येथे  सुभाष चंद्र मिलिटरी स्कूल मैदानात    झालेल्या राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेत पालघर जिल्ह्याच्या खेळाडूंनी भाग घेतला. कोरोना संकटानंतर पहिलीच क्रॉसकंट्री स्पर्धा असल्याने याच स्पर्धेकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलेलं होतं. पालघर जिल्ह्याच्या पुरुष, महिला, 20 वर्षाखालील मुले, मुली. 18 वर्षाखालील मुले, मुली व 16 वर्षाखालील मुले, मुली असे एकंदरीत बत्तीस खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते.
१० किलोमीटर अंतराच्या पुरुष गटातील क्रॉस कंट्री स्पर्धेत पालघर जिल्ह्याच्या पुरुषांचा संघ कांस्य पदकाचा मानकरी ठरला. पुरुष गटात नाशिक ने आपला दबदबा कायम राखत प्रथम क्रमांक पटकावला तर सातारा संघ द्वितीय स्थानी राहिला.            पालघर जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनच्या प्रयत्नांना हळू येत असून ग्रामीण भागातले खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये आपापली नावं चमकवत असल्याचे हे उत्तम उदाहरण आहे.शैलेश गांगोडा, अमित माळी,विशाल वळवी,ज्ञानेश्वर मोरागा, या खेळाडूंनी पहिल्यांदाच पालघर जिल्ह्याला क्रॉस कंट्री स्पर्धेत तिसऱ्या पारितोषिक मिळवून दिलं.
सदर पालघर जिल्हा क्रॉसकंट्री संघाला डॉ. रवींद्र वाल्मिकी स्प्रिंटर स्पोर्ट्स क्लब वसई यांच्याकडून टी-शर्ट पुरस्कृत करण्यात आले होते त्यांचे पालघर जिल्ह्यातील ॲथलेटिक्स असोसिअशन चे सचिव राकेश सावे यांनी आभार मानत विजयी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

बॉक्स
शैलेश गांगोडा:-  हा खेळाडू डहाणू मधील असून गेली अनेक दिवस परिस्थिती झटत सध्या डहाणू येथे वनपाल म्हणून वनविभागात काम करत आहे.

अमित माळी :
अमित माळी विक्रमगड चा खेळाडू असून परिस्थितीशी झगडत आखाडे सराव करतो आहे वनवासी कल्याण च्या माध्यमातून तो सराव करत इथवर पोचला आहे.


विशाल वळवी
: हा खेळाडू जव्हार सारख्या ग्रामीण भागातील आहे,घराची परिस्थिती हलाखीची आहे तरी त्याची जिद्द मोठी आहे.


ज्ञानेश्वर मोरघा:
 हा विक्रमगड चा खेळाडू असून परिस्थितीशी झगडत सराव करत असून वनवासी कल्याण आश्रम यांच्या माध्यमातून तो सराव करतो ज्ञानेश्वर ने याअगोदर मॅरेथॉन स्पर्धेत चांगले यश मिळवले असून नोकरीच्या शोधात तो आहे,

ग्रामपंचायत विराथन ख्रुर्द नव्या इमारतीचा व क्रीडांगणाचा उद्घाटन सोहळा संपन्न

ग्रामपंचायत विराथन ख्रुर्द नव्या इमारतीचा व क्रीडांगणाचा उद्घाटन सोहळा संपन्न 
   सफाळे ( हिरालाल लोखंडे )
३१ जानेवारी रोजी ग्रामपंचायत विराथन ख्रुर्द तालुका जिल्हा पालघर, यांच्या नव्या बांधलेल्या ग्रामपंचायत इमारतीचा व नव्यानेच तयार करण्यात आलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या वास्तुचे मान्यवरांच्या  हस्ते उद्घाटन करण्यात आले. 
       ग्रामपंचायत नवीन इमारत बांधकामासाठी जिल्हा परिषद पालघर, " जनसुविधा " योजनेअंतर्गत प्रशासकीय निधी /- ₹ अक्षरी बारा लाख रूपये मंजूर करण्यात आलेला असता, नवीन इमारतीचे बांधकाम अंदाजे रक्कम ( Estimate cost Rs.) रूपये १५,५०००० /- अक्षरी पंधरा लाख पन्नास हजार रूपये लोन काढून ( विश्वासनीय सूत्रा कडुन मिळालेली माहिती)  इमारतीचे बांधकाम पुर्ण करण्यात आले आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या जागेवर मातीची टेकडी होती, परंतु रेल्वे प्रशासनाने भरावासाठी मातीचा उपयोग केल्यानंतर ( महसूल विभाग परवानगीने )त्या सपाट झालेल्या जागेचा उपयोग करून, नवतरूणांना खेळण्यासाठी क्रीडांगण बनविण्यात आले असता मान्यवरांच्या हस्ते त्याचेही  उद्घाटन करण्यात आले. 
         कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री वसंत चव्हाण शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख, सौ भारती कामडी पालघर जिल्हा परिषद अध्यक्षा, सौ रंजना म्हसकर ( घोलप ) पालघर पंचायत समिती सभापती, डॉ विश्वास वळवी शिवसेना नेत, श्री दामोदर पि पाटील माजी बांधकाम सभापती, श्री अनुप पाटील जिल्हा समन्वयक, श्री चंद्रशेखर जगताप गटविकास अधिकारी, श्री जयेश पाटील तालुका प्रमुख,  रामदास पाटील उपतालुका प्रमुख, सौ राजश्री स किणी सरपंच विराथन ख्रुर्द, नचिकेत पाटील विभाग प्रमुख, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी मोठ्या संखेने कार्यक्रमाला उपस्थित होते.

मोहन पुरम परिसरात नागरिक कट्टा आणि सेल्फी पॉईंटचे लोकार्पण

मोहन पुरम परिसरात नागरिक कट्टा आणि सेल्फी पॉईंटचे लोकार्पण

*मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते झाले लोकार्पण*
*मनसे नगरसेविका अपर्णा कुणाल भोईर आणि मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांची संकल्पना*

अंबरनाथ(प्रतिनिधी) : अंबरनाथच्या मोहन पुरम परिसरात नागरिकांसाठी विरंगुळा कट्टा आणि सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. या कट्ट्याचे लोकार्पण शनिवारी मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मनसे नगरसेविका अपर्णा कुणाल भोईर आणि मनसे शहराध्यक्ष कुणाल सुभाष भोईर यांच्या माध्यमातून हा कट्टा उभारण्यात आला असून दिवंगत साहित्यिक प्रा. अरुण मैड सर यांचे नाव या कट्ट्याला देण्यात आले आहे. कानसई मोहनपूरम प्रभागाला स्वच्छता सर्वेक्षणात सर्वात स्वच्छ प्रभागाचे दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मागील वर्षी मिळाले होते. त्यातून आधी स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाची निर्मिती कानसई दत्तमंदिर परिसरात करण्यात आली होती. त्यानंतर आता मोहनपूरम भागात हा ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि सेल्फी पॉईंटची निर्मिती अपर्णा भोईर आणि कुणाल भोईर यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

कानसई परिसर, मोहनपूरम या भागात नागरिकांना संध्याकाळी विरंगुळा म्हणून बसण्यासाठी कट्टा नव्हता. त्यामुळे हा कट्टा उभारण्यात आला आहे. तर सेल्फी पॉईंटमुळे या परिसराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. शनिवारी मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत हा कट्टा आणि सेल्फी पॉइंटचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी कुणाल भोईर यांच्या प्रभागात आल्यानंतर दरवेळी काहीतरी कल्पकतेने उभारलेल्या, सौंदर्यदृष्टीने उभारलेल्या गोष्टी पाहायला मिळतात, असे म्हणत आमदार राजू पाटील यांनी अपर्णा भोईर आणि कुणाल भोईर यांचे कौतुक केले. तर आपण १० वर्षे जो विश्वास दाखवलात, तो यापुढेही दाखवाल, असा विश्वास मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी नागरिकांशी बोलताना व्यक्त केला. या कार्यक्रमाला मनसे जिल्हा संघटक हर्षद पाटील, संदीप लकडे, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष धनंजय गुरव, विजय इंगळे, योगेश भोईर यांच्यासह कानसई मोहनपुरम परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.

*रहिवाशांनी मानले आमदार राजू पाटील यांचे आभार*

या कार्यक्रमात मोहनपुरम आणि स्वामी देवप्रकाश गार्डन भागातील रहिवाशांनी मनसे आमदार राजू पाटील यांचे आभार मानले. काही दिवसांपूर्वीच या भागातील जमिनींवर असलेल्या वनविभागाच्या नोंदी हटवण्यात आल्या होत्या. त्यामुळे या इमारतींची जागा सोसायटीच्या नावावर होऊन पुनर्विकासातील अडथळे आणि अन्य अडचणी दूर होणार आहेत. यासाठी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मोठा पाठपुरावा केला होता. त्यामुळे मोहनपूरम आणि स्वामी देवप्रकाश गार्डनमधील रहिवाशांनी आमदार राजू पाटील यांचे आभार मानले.
यावेळी स्वामी देवप्रकाश संकुलातील चेअरमन क्रीश्णन,सेक्रेटरी भरत रामनानी,वसंत कांबळे,प्रकाश तुलसानी, मोहन पुरम संकुलाचे चेअरमेन हेमंत सातदिवे साहेब,आकाश यादव,रवी मिश्रा 

*नगरसेविका अपर्णा भोईर यांची लाठीकाठी*

नगरसेविका अपर्णा भोईर यांच्या माध्यमातून कानसई परिसरात महिला आमी मुलींसाठी लाठीकाठी प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. या महिला आणि मुलींनी कार्यक्रमाच्या ठिकाणी लाठीकाठीचे प्रात्यक्षिक दाखवले. विशेष म्हणजे नगरसेविका अपर्णा यांनीही याठिकाणी लाठीकाठी चालवत उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला. आमदार राजू पाटील यांनीही अपर्णा भोईर यांचे यावेळी विशेष कौतुक केले.

----------------------------------------------

Saturday, January 30, 2021

सफाळे पोलिसांनी केली, अवैध दारूविक्री करणार्यावर कारवाई सफाळे ( हिरालाल लोखंडे )

सफाळे पोलिसांनी केली, अवैध दारूविक्री करणार्यावर कारवाई 
    सफाळे  ( हिरालाल लोखंडे )
सफाळे पूर्व हद्दीतील जंगलपट्टी भागात अवैध धंदे सुरू असल्याची कुणकुण सफाळे पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी  श्री संदीप कहाळे यांना लागली असता, त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक श्री ए व्ही खोत व पोलिस शिपाई श्री एस एन राठोड यांना गावठी दारु बनवणारे व विक्री करणारे यांच्यावर कारवाई  करण्यासाठी आदेश दिले. 
  दिनांक २८ जानेवारी रोजी पोलिस नाईक खोत व पोलिस शिपाई राठोड हे पारगांव पोलिस चौकीवर कर्तव्य बजावत असताना गिरिळे येथे अवैध दारूविक्री निदर्शनास आली. तपास केला असताना, जितेंद्र दत्तात्रेय पाटील वय वर्ष ३९ राहणार गिराळे आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी राहत्या घराच्या टेंपररी शेड मधे गावठी दारू व दारू बनविण्याचे साहित्य  स्वतःजवळ बाळगून विक्री करीत असताना मिळून आला. गावठी दारू असलेला ५ लीटरचा प्लाटीक कॅन, काचेचे ग्लास, २० लीटर मापाचे दोन प्लाटीक ड्रम ,प्लास्टिक बाटलीत गुळ व नवसागर मिश्रीत २० लीटर वाॅश, एक अॅलिम्युनियम टोप एक अॅलिम्युनियम चाटू - दारू बनविण्यासाठी साधने, प्लाटीक गाळण असा एकूण ४१००/- ₹ मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन,  सदर आरोपी विरुध्द सफाळे पोलिस ठाणे मधे गुन्हा रजि, क्र. ०५ / २०२१ महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ ( ई  )  ( एफ ) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे

Friday, January 29, 2021

महामार्गावरील अपघात - वाहतुकीची कोंडी या बद्दल जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे नियोजन ?

महामार्गावरील अपघात - वाहतुकीची कोंडी या बद्दल जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे नियोजन ?
   पालघर  ( हिरालाल लोखंडे ) पालघर येथे दिनांक २९ जानेवारी  रोजी पालघर जिल्हा रस्ता समिती  पदाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी,पालघर पोलिस अधिक्षक, वसई - पालघर प्रादेशिक विभागाचे अधिकारी ,( D, Y, S, P)   महामार्ग ठाणे विभाग विभागाचे अधिकारी, महामार्ग वाहतूक पोलिस अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग चे प्रमुख अधिकारी व जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष खासदार श्री राजेंद्र गावीत यांची जिल्हा नियोजन समिती सभागृह -जिल्हाधिकारी कार्यालय पालघर या ठिकाणी एकत्रितपणे येऊन खालील विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
  विशेष करुन स्पोर्ट्स बाईक रायडर्स ला बंदी  ( आळा घालणे ) करणे, रोड ओव्हर ब्रिजचे काम लवकरात लवकर करणे, अँबुलन्स सेवाची संख्या वाढवणे, आरोग्याच्या दृष्टीने महामार्गावर ट्रामा केयर रुग्णालय उभारणे,शहरी भागातील वाहतूक  कोंडी, नो एन्ट्री यावर नियोजन करणे आदि विषयावर सविस्तर चर्चा करुन योग्य ते निर्णय घेण्यास अधिकारी वर्गास सांगण्यात आले.

अपूर्ण रोस्टर - पदोन्नती थांबली - शिक्षकांवर अन्याय ? खासदार श्री, राजेंद्र गावित

अपूर्ण रोस्टर - पदोन्नती थांबली - शिक्षकांवर अन्याय ? 
   खासदार श्री, राजेंद्र गावित 
पालघर ( हिरालाल लोखंडे ) -- दिनांक २८ जानेवारी २०२१ रोजी  महाराष्ट्र राज्य शिक्षणसेना व मा. खासदार राजेंद्र गावित साहेब यांच्या बरोबर पालघर जिल्ह्यातील जिल्हापरीषद शाळांमधील प्रलंबित समस्या संदर्भात बैठक आयोजित केलेली. यामधे शिक्षकांच्या पदोन्नती - वरीष्ठ वेतनश्रेणी व  निवडश्रेणी रखडलेले प्रस्ताव, पदवीधर शिक्षक वेतनश्रेणी, वैद्यकीय बिले, प्रशिक्षित शिक्षकांना वेतनश्रेणी, डी सी पी सी ( DPCP )धारकाच्या कपातीसह हिशोब, जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया, शाळांची इंटरनेट जोडणी, वीजबिल भरणा, करोना उपाययोजना, शिक्षक गुणगौरव आदी समस्या विषयी शिक्षक सेना व शिक्षणविभागाचे अधिकारी.मा, खासदार साहेब यांच्या बरोबर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली.  
  या बैठकीस श्री केदार काळे - शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक, श्री जयेंद्र दुबळा - शिवसेना गटनेते जिल्हा परिषद, श्री एस एम जनाटे - जी.परिषद विस्तार विस्तार अधिकारी, श्री दीपक पिंपळे - गट शिक्षणाधिकारी, श्री संजय पाटील  - शिक्षक सेना जिल्हा अध्यक्ष, शिक्षण खात्यातील सौ तांडेल, श्री पी.के, चौधरी, माध्यमिक विभागाचे श्री बी. एस. कासले, वाय. बी. शिवगण तसेच शिक्षक सेनेचे अरुण भोईर, राकेश संखे, रवींद्र नाईक, निलेश सावे, भूषण ठाकूर, दिनेश खिलारे, जितेंद्र वडे, मनेश पाटील, प्रदीप पाटील, सौ रोशनी गावड. इत्यादी शिक्षक गण उपस्थित होते. 
    सहा वर्षाचे रोस्टर अपुर्ण असल्यामुळे शिक्षकांची पदोन्नती थांबवली आहे हा शिक्षकांवर अन्याय आहे. येत्या १५ फेब्रुवारी रोजी मी स्वतः सी,इ,ओ, (  C, E, O,) यांची मिटींग घेऊन आपल्या ( शिक्षकवर्गांच्या ) वरील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार.तसेच धोरणात्मक निर्णयासाठी व बदली होण्यापूर्वी पदोन्नती पुर्ण करणे, चटोपाध्याय आयोगाच्या,निवडसमितीच्या  शिफारसी स्विकारण्यात साठी राज्यसरकारकडे पाठपुरावा करेन  असे मा. गावीत साहेबांनी बैठकीत सांगितले.

कोकण विभागाच्या माहिती व जनसंपर्क कार्यालयातीलकर्मचाऱ्यांच्या कार्यसंस्कृतीचा होणार गौरव


कोकण विभागाच्या माहिती व जनसंपर्क कार्यालयातील

कर्मचाऱ्यांच्या कार्यसंस्कृतीचा होणार गौरव

नवीमुंबई(प्रतिनिधी), दि. २८- सन २०२० या वर्षात आपल्या वैशिष्टयपूर्ण कामाच्या माध्यमातून वेगळा ठसा उमटविणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत कार्यालयांतील  कर्मचाऱ्यांची उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी म्हणून निवड करण्यात आली आहे.

 कोकण विभाग अंतर्गत माहिती व जनसंपर्क विभागाचे एकूण ५ कार्यालये आहेत. या कार्यालयांच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोकोपयोगी उपक्रमांच्या प्रसिध्दीचे काम निरंतरपणे सुरु असते. गेल्या वर्षभरात कोरोना काळातही आपल्या पदाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडण्याबरोबरच इतर कामातही हिरीरीने सहभाग घेऊन उत्तम काम करणाऱ्या, तसेच कोरोनासारख्या आपत्कालिन परिस्थितीत तसेच निवडणुकीच्या कालावधीत उत्तम कार्य करणाऱ्या आणि अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीतही आलेल्या कामाची जबाबदारी स्वीकारुन माहिती तत्परतेने पोहचविणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कर्मचाऱ्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

वर्ष 2020 साठीच्या उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी म्हणून निवड करण्यात आलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. श्री. प्रशांत दैठणकर, जिल्हा माहिती अधिकारी रत्नागिरी,  श्री. गंगाधर जामनिक, दूरमूद्रण चालक-नि-टंकलेखक, जिल्हा माहिती कार्यालय, पालघर, श्री. योगेश मोडसिंग, दूरमूद्रण चालक-नि-टंकलेखक, जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी, श्री. सचिन काळुखे, लिपिक टंकलेखक, जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग, श्रीमती राजेश्री वाडेकर, लेखा लिपिक, विभागीय माहिती कार्यालय, कोकण भवन, नवी मुंबई, श्री. धनंजय कासार, सिनेयंत्र चालक, जिल्हा माहिती कार्यालय,ठाणे, श्री. प्रेम शुक्ला, सिनेयंत्र चालक, जिल्हा माहिती कार्यालय,ठाणे, श्री. शशिकांत केळकर, वाहनचालक, जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी श्री. अजित पड्याळ, रोनिओ ऑपरेटर, जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी, श्री. शशिकांत भोसले, शिपाई, जिल्हा माहिती कार्यालय, रायगड यांची निवड करण्यात आली.

            सदर अधिकारी कर्मचारी यांना मार्चच्या शेवटच्या आठवड्यात प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती कोकण विभागाचे उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी दिली आहे. 

Thursday, January 28, 2021

गच्च मिठी मारली पाहीजे *हातात हात पकडला पाहीजे

*गच्च मिठी मारली पाहीजे*
*हातात हात पकडला पाहीजे*

*नातं कोणतंही असो*
*मतभेद कितीही असो* 
*संबध तोडण्याची भाषा*  
*मुळीच कधी करू नये* 

*प्रत्येक माणूस वेगळा* 
*विचारसरणी वेगळी*
*मनुष्य जन्मा तुझी* 
*कहाणीच आगळी-वेगळी* 

*बापा सारखा मुलगा नसतो* 
*मुला सारखी सून नसते*
*नवरा आणि बायकोचे तरी*
*कुठे तेवढे पटत असते ?*

*जरी नाही पटले तरी*
*गाडी मात्र हाकायची आसते*
*अबोला धरून विभक्त होऊन*
*सार गणितं चुकायचे नसते*

*काही धरायचं असतं*
*काही सोडायचं असतं*
*एखाद्या वेळेस बिनसलं म्हणून* 
*एकमेकाला सोडायचं नसतं* 

*चुकल्यावर बोलावं*
*बोलल्यावर ऐकूण घ्यावं*
*एकांतात बसल्यावर*
*अंतरंगात डोकवावं*

*राग मनात ठेवला म्हणून*
*कोणाचं भलं झालं का ?*
*बिन फुलाच्या झाडा जवळ*
*पाखरू कधी आलं का ?*
 *
*समोरची व्यक्ती चुकली तरी* 
*प्रेम करता आलं पाहिजे* 
*झालं गेलं विसरून जाऊन* 
*गच्च मिठी मारली पाहिजे* 

*स्वागत होईल न होईल*
*जाणं येणं चालू ठेवल पाहीजे* 
*समोरचा जरी चुकला तरी* 
*म्हणा "खुशाल ठेव देवा त्याला !"*

*आयुष्य खूप छोटं आहे* 
*हां हां म्हणता संपुन जाईल*
*प्रेम करायचं राहिलं म्हणून*
*शेवटी खूप पश्चताप होईल* 

*लक्षात ठेवा नात्या पेक्षा*
*दुसरं काहीही मोठं नाही*
*आपलं माणूस आपल्या जवळ*  
*या सारखी श्रीमंती नाही* 

!*
*सर्व आप्तस्वकीयांना,* 
                *समर्पित*
                  आपला
              निलेश भोईर
           🌹🙏🙏🙏🌹*

कोकण विभागाच्या माहिती व जनसंपर्क कार्यालयातीलकर्मचाऱ्यांच्या कार्यसंस्कृतीचा होणार गौरव

                                                                                                                    

कोकण विभागाच्या माहिती व जनसंपर्क कार्यालयातील

कर्मचाऱ्यांच्या कार्यसंस्कृतीचा होणार गौरव

नवीमुंबई,(प्रतिनिधी) दि. २८- सन २०२० या वर्षात आपल्या वैशिष्टयपूर्ण कामाच्या माध्यमातून वेगळा ठसा उमटविणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत कार्यालयांतील  कर्मचाऱ्यांची उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी म्हणून निवड करण्यात आली आहे.

 कोकण विभाग अंतर्गत माहिती व जनसंपर्क विभागाचे एकूण ५ कार्यालये आहेत. या कार्यालयांच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोकोपयोगी उपक्रमांच्या प्रसिध्दीचे काम निरंतरपणे सुरु असते. गेल्या वर्षभरात कोरोना काळातही आपल्या पदाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडण्याबरोबरच इतर कामातही हिरीरीने सहभाग घेऊन उत्तम काम करणाऱ्या, तसेच कोरोनासारख्या आपत्कालिन परिस्थितीत तसेच निवडणुकीच्या कालावधीत उत्तम कार्य करणाऱ्या आणि अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीतही आलेल्या कामाची जबाबदारी स्वीकारुन माहिती तत्परतेने पोहचविणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कर्मचाऱ्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

वर्ष 2020 साठीच्या उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी म्हणून निवड करण्यात आलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. श्री. प्रशांत दैठणकर, जिल्हा माहिती अधिकारी रत्नागिरी,  श्री. गंगाधर जामनिक, दूरमूद्रण चालक-नि-टंकलेखक, जिल्हा माहिती कार्यालय, पालघर, श्री. योगेश मोडसिंग, दूरमूद्रण चालक-नि-टंकलेखक, जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी, श्री. सचिन काळुखे, लिपिक टंकलेखक, जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग, श्रीमती राजेश्री वाडेकर, लेखा लिपिक, विभागीय माहिती कार्यालय, कोकण भवन, नवी मुंबई, श्री. धनंजय कासार, सिनेयंत्र चालक, जिल्हा माहिती कार्यालय,ठाणे, श्री. प्रेम शुक्ला, सिनेयंत्र चालक, जिल्हा माहिती कार्यालय,ठाणे, श्री. शशिकांत केळकर, वाहनचालक, जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी श्री. अजित पड्याळ, रोनिओ ऑपरेटर, जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी, श्री. शशिकांत भोसले, शिपाई, जिल्हा माहिती कार्यालय, रायगड यांची निवड करण्यात आली.

            सदर अधिकारी कर्मचारी यांना मार्चच्या शेवटच्या आठवड्यात प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती कोकण विभागाचे उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी दिली आहे. 

रस्ते बांधणी, दुरुस्ती, इमारतींची पाहणी करण्यासाठी बांधकाम सभापती यांचा पाहणी दौरा

रस्ते बांधणी, दुरुस्ती, इमारतींची  पाहणी करण्यासाठी बांधकाम सभापती यांचा पाहणी दौरा

     पालघर (प्रतिनिधी)पालघर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत रस्ते बांधणी, रस्ते दुरुस्ती, अंगणवाडी इमारती बांधकामे व दुरुस्ती, शाळागृह इमारती बांधकामे व दुरुस्ती, प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामे व दुरुस्ती, उपकेंद्र बांधकामे व दुरुस्ती अशा प्रकारची कामे केली जातात. या कामांबद्दल स्थानिक लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, पत्रकार यांच्या  तक्रारी येत असून  प्रकारच्या   तक्रारीची पडताळणी करुन ज्या ठिकाणी अशा तक्रारी होत असतील अशा ठिकाणी प्रगतीत (सुरु) असलेल्या व पुर्ण झालेल्या अशा सर्व कामांची पहाणी करुन या संदर्भात संबधीत अधिका-यांना योग्य ते मार्गदर्शन करुन अशा प्रकारच्या तक्रारी पुन्हा होणार नाहीत याबाबत काही उपाययोजना करता येईल का , या बाबत दिनांक २८/०१/२०२१ रोजी झालेल्या पालघर जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीच्या सभेत बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ चौधरी यांनी सर्व उप अभियंता यांचेशी सविस्तर चर्चा केली.  या चर्चे दरम्यान लोकप्रतिनिधींकडून निकृष्ठ दर्जाची कामे होत असलेल्या तक्रारी व त्या शंकांच निरसण होणेसाठी व अशा प्रकारच्या तक्रारी वारंवार होणार नाहीत यासाठी उपाययोजना करणेसाठी बांधकाम समिती सभापती यांनी समिती सदस्यांसोबत प्रत्येक तालुक्याला पहाणी दौरा करण्याचे दिनांक २८/०१/२०२१ रोजी झालेल्या बांधकाम समिती सभेत ठराव करणेत आला. हा दौरा तीन टप्यात करावयाचा असुन पहिल्या टप्यात दिनांक ०२/०२/२०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता वाडा तालुका व त्याच दिवशी दुपारी २.०० वाजता विक्रमगड तालुक्यातील कामांचा पहाणी दौरा करण्याचे ठरले असुन दुसया व तिस-या टप्यात १० फेब्रुवारी अखेर उर्वरीत तालुक्यांचा दौ-या होणार असल्याचे  सभापती  काशिनाथ चौधरी यांनी सांगीतले. सदर पहाणी दौ-याच्यावेळी संबधीत पंचायत समितीमध्ये तालुक्यातील बांधकामा संबधीत सर्व यंत्रणांचे अधिकारी यांचेशी प्रथम अर्धा तास चर्चा करून अपूर्ण असलेली कामे, सुरु असलेली कामे, पुर्ण झालेली कामे व ज्या कामावर तक्रारी आहेत अशी कामे या कामांची प्रत्यक्ष पहाणी समिती करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.या दरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधी, पत्रकार व इतर तक्रारदारांनी संबंधीत पंचायत समितीच्या ठिकाणी येवून आपल्या तक्रारी किंवा सुचना मांडण्याचे आवाहन करून  दौरा पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण अहवाल किंवा माहिती वृत्तपत्राद्वारे प्रसिध्द करण्यात येईल असेही यावेळी सांगणेत आले.

या मातृभूमीसाठी

या मातृभूमीसाठी ! 
  (काव्यगीत)

या मातृभूमीसाठी
खेळ खेळतो गडी जीवाशी
या भारतात माझ्या 
नाही तमा पराजयाची,
'गड' राखतो युगा-युगाची
या भारतात माझ्या। । धृ । । 

संस्कार हेच आमचे
रक्षा  करी  देशाचे
ज्योत निष्ठेची पेटवतो
घर जाळूनी स्वताःचे
स्वदेश प्रेमासाठी
बनवी मशाल रणा-रणाची
या भारतात माझ्या । । १। । 

धडधडत्या स्पंदनांना
जरी वेध दुश्मनांचे
दीन-दुबळ्या जणांना
हृदय लाभते 'सुरांचे'
मानवतेसाठी मन हे
साक्ष देईल क्षणा-क्षणाची 
या भारतात माझ्या । । २। । 

दृष्टांत आहे आमुच्या, 
येथल्या घरा-घराला
देश रक्षणाच्या कामी,
माय जन्मते वीराला
त्याग भावना भूमीला,
आहे गंध हा कणा-कणाला
या भारतात माझ्या । । ३। । 


©️®️ श्री .वसावे एन.के.
C/04 साई आशिष अपार्टमेंट माहीम रोड,
पालघर (प.)ता.जि.पालघर -401404
                📞9923766502

Wednesday, January 27, 2021

शालेय विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षिततेचे धडे

शालेय विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षिततेचे धडे
सफाळे -- दिनांक २७ जानेवारी रोजी रस्ता सुरक्षा अभियान - २०२१ अनुषंगाने राजगुरू हरेश्वर महादेव पंडीत विद्यालय सफाळे पुर्व ता, जी, पालघर येथील १० वीत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थी यांना विद्यालयात जाऊन सफाळे पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी श्री  संदीप कहाळे यांच्या मार्गदर्शन खाली पोलिस उपनिरीक्षक श्री पंकज पाटील यांनी रस्ता सुरक्षा अभियान - २०२१ अनुषंगाने वाहतुकीचे नियम विद्यार्थीना समजवून सांगितले, अल्पवयीन मुलांनी वाहणे चालवू नये, चालविल्यास काय घडते, मुलांनी कायदा मोडल्यानंतर त्यांना शिक्षा होणार, पण जास्तीत जास्त शिक्षा पालकांना होते, कारण वाहन नियमावलीत तशी तरतुद आहे, तरी लहान मुलांनी वाहन चालवू नका . ट्राफिक अंमलदार पोलिस नाईक श्री संदीप नांगरे, पोलिस काॅ. श्री राजेंद्र घुगे, महिला पोलिस अंमलदार भुरकूट मॅडम आदि व्यासपीठावर विराजमान होते.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. मेघा वर्तक मॅडम,तसेच इतर शिक्षकांनीही रस्ता सुरक्षा हा विषय कार्यक्रम आपल्या जीवनाशी निगडित असल्याने कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शवली.

रस्ता सुरक्षा अभिनय - २०२१सफाळे -- प्रतिनिधी हिरालाल लोखंडे -

रस्ता सुरक्षा अभिनय - २०२१
सफाळे -- हिरालाल लोखंडे - 
    २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सफाळे पोलिस स्टेशन व्दारा रस्ता सुरक्षा अभिनय - २०२१ अंतर्गत पारगांव कोस्टल चेक पोस्ट ते इंद्रप्रस्थ चौक सफाळे पुर्व या ठिकाणी नाकाबंदी दरम्यान वाहन चालकांना गुलाबाचे फुल देऊन वाहतुकीचे नियम पाळणे, दुचाकीवरून प्रवासात हेल्मेट वापरणे, गाडी चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, या कडे दुर्लक्ष केल्यानंतर होणार्या संभाव्य नुकसानीचा परिणाम समजून सांगितले, चार चाकी वाहन चालविताना सीटबेल्ट लावावे, 
वाहतुकीचे दरम्यान काय काळजी घ्यावी, नियमांचे कसे पालन करावे रस्त्याचे परिस्थिती कडे लक्ष ठेऊन काळजीपूर्वक वाहन चालविणे, मद्यपान करुन वाहन न चालवणे, अशा प्रकारच्या सूचना देऊन मार्गदर्शन करून सदर वाहन चालकावर दंडात्मक कारवाई न करता त्यांना  गुलाबाचे फूल देऊन जनजागृती करून मोटर -सायकल, कार, टेम्पो चालकाचे प्रबोधन करण्यात आले.

तांदुळवाडी येथे बालवाचनलय सुरू

तांदुळवाडी येथे बालवाचनलय सुरू 
सफाळे -- लोखंडे  हिरालाल 
  २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषद शाळा तांदुळवाडी केन्द्र पारगांव या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या बालमनावर वाचनांचे संस्कार रुजवण्यासाठी - वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी बालवाचनालय वर्ग - खोलीचे उद्घाटन तांदुळवाडी सरपंच श्री रमेश चावरे यांच्या हस्ते करण्यात आले." डॉ,बाबासाहेब आंबेडकर " यांनीही त्यांच्या विचारात शिक्षणाला महत्व दिले आहे, सरकार सुध्दा सांगते शिकेल तो टिकेल - मुलगी शिकली कुटुंब शिकले. या वाचनालयात बोधप्रद गोष्टी, संदर्भ ग्रंथ, थोर व्यक्ती - इतिहास घडविणे शूर- विर योद्धे, संशोधक,यांच्या आत्मकथा, वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित गोष्टी, किशोर मासिक, जिवन शिक्षण, पर्यावरणावर आधारित माहिती पुस्तके, संशोधक, सामाजिक, राजकीय, कार्यकर्ते शिक्षक हस्त पुस्तीका, ग्रंथ आदि प्रकारे पुस्तके - मासिक - दैनिक पेपर उपल्ब्ध करण्यात आली आहे.  
      कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक गण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष - उपाध्यक्ष - सदस्य पालकवर्ग लोकप्रतिनिधी उपस्थित होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे यांनी वाचनालयाची व्याप्ती वाढविण्यासाठी मनोदय व्यक्त केला.

चार ग्रामसेवक निलंबित,मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कारवाई



चार ग्रामसेवक निलंबित,मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कारवाई
पालघर(प्रतिनिधी)
अंगणवाडी इमारतीचे बांधकाम विहित मुदतीत पूर्ण न केल्याने व बांधकाम निधी मध्ये अपहार केल्याचे निदर्शनास आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.पालघर सिद्धाराम  सालीमठ यांनी तीन ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केली आहे.तर अनेक कामात अनियमितता करून आपल्या  कर्तव्यात कर्तव्य पारायणता व सचोटी न ठेवता कामकाजात अक्षम्य दुर्लक्ष केल्याने एका ग्रामसेवकास निलंबित केलेले आहे.बिपिन जाधव असे या ग्रामसेवकाचे नाव असून  मनोज प्रजापत, कृष्णा शिंदा, राजू डोंगरकर अशी अन्य तीन ग्रामसेवकांची नावे आहेत.
  
  अंगणवाडी इमारतीचा निधी प्राप्त असताना ही मुदतीती काम पूर्ण न केल्याने तसेच खर्च दाखवून  त्या खर्चाच्या बदल्यात कोणतेही काम न करता व्यवहाराचा अपहार केल्याने सदर ग्रामसेवकांनी महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा( वर्तणूक ) नियम १९६७ मधील नियम ३ चा भंग केल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषदा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील नियम ३ नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधिकारानुसार मु.का.अ.यांनी १५/१/२०२१ निलंबनाची कारवाई केली.
तर वसुरी ता. विक्रमगड येथील दप्तर तपासणी करुन सादर केलेल्या चौकशी अहवालानुसार  बिपिन महादेव जाधव. ग्राम विकास अधिकारी यांनी लेखा परिक्षण मुद्दयांची पुर्तता मुदतीत न करणे, जनसुविधा योजना, १४ वा वित्त आयोग, ५% अवंध निरध यामधून विकास कामे व साहित्य
खरेदी करताना दरपत्रक/निविदा/ ई-निविदा प्रणालीचा अवलंब न करणे. टी.सी.एल.खरेदीचा नोंद साठा
रजिष्टरला न  घेणे, बोरसे पाडा अंगणवाडी दुरुस्ती करणे या कामावर अंदाजपत्रक व मुल्यांकन नसताना खर्च करणे, खरेदी करण्यात आलेल्या साहित्याची नोंद साठा रजिष्टरला न घेणे. विकास काम करताना ई निविदा न करणे, विकास काम करताना निर्माण झालेल्या मालमत्तेची नोंद मालमत्ता रजिष्टरला न घेणे, रक्कम रु.
३७५४/- हा खर्च करताना कंशबुक, प्रमाणक किंवा पावतीवर सदरचा खर्च कशासाठी करण्यांत आलेला आहे याची नोंद नसणे, कैशबुकावर सरपंच यांच्या स्वाक्षऱ्या नसणे. अशा प्रकारची अनियमितता केल्याचे निदर्शनास आल्याने बिपिन जाधव यांना ५/१/२०२१ रोजी निलंबित केले.
 अशा  कर्तव्यशून्य व बेजाजबदार कर्मचाऱ्यांना जरब बसावा व  जिल्हा परिषदेच्या विकास कामांत अडथळा येऊ नये यासाठी ही कारवाई केल्याचे मत मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी व्यक्त केले आहे.

कृषी सभापती सुशील चुरी यांच्या बंधूंनी पिंटू चुरी याने दिली गॅरेज व्यवसाय केला धमकी तीस हजाराची मागितली खंडणी पोलीस प्रशासन मात्र आंधळा बहिरे बनवून गुन्हेगारांना करते मदत?

कृषी सभापती सुशील चुरी यांच्या बंधूंनी पिंटू चुरी याने दिली गॅरेज व्यवसाय केला धमकी तीस हजाराची मागितली खंडणी पोलीस प्रशासन मात्र आंधळा बहिरे बनवून गुन्हेगारांना करते मदत?


प्रतिनिधी :- बाबासाहेब गुंजाळ, पालघर

सत्तेतील शिवसेना नेत्यांची सुरू आहे दादागिरी...
बोईसर एमआयडीसी मध्ये एखाद्या व्यक्तीला कंपनीमध्ये काही व्यवसाय करायचा असेल तर आता *घ्यावी लागणार का शिवसेना नेत्यांची परवानगी?*
जर शिवसेना नेत्यांच्या मर्जी विना एखाद्या कंपनीशी व्यवहार केला तर *द्यावी लागणार का खंडणी?*

यासाठीच केला होता अट्टहास? आघाडी सरकारमध्ये सामील होत शिवसेनेचा मुख्यमंत्री तसेच पालघर जिल्हा परिषदेवर अध्यक्षपद शिवसेनेकडे आल्यानंतर तसेच विविध सभापतीपद शिवसेना पक्षाकडे आल्यानंतर शिवसेना नेत्यांची मुजोर शाही वाढल्याचे चित्र गेल्या दोन वर्षात समोर येत आहे. नुकतंच एका कंपनीतील कामगार व स्थानिक स्थानिक नेत्यांमध्ये हाणामारी झाल्याचे चित्र समोर आलं होतं, तो वाद मिळतो ना मिळतो तोच सध्या कृषी सभापती सुशील चुरी यांचे बंधू नितेश चुरी उर्फ पिंटू चुरी यांनी एका गॅरेज व्यावसायिकाला फोन करून धमकावल्याचा व खंडणी मागितल्याचा धडधडीत पुरावा समोर आला आहे.
पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या तक्रारदारास पोलिसांनी आधी घाबरून सोडले, खंडणीचा गुन्हा दाखल न करता केवळ NCR दाखल करून थुकपट्टी करत प्रकरण दाबण्याचा केला गेला प्रयत्न?

सत्य घटना अशी आहे की बॉम्बे रेयॉन कंपनीतील 4 चाकी गाडी विक्री करण्यासाठी कंपनीकडून जाहिरात देण्यात आली होती. सदर जाहिरातीनंतर एक गॅरेज व्यवसाय करणे त्याचे कोटेशन बॉम्बे कंपनीला दिल्यानंतर बॉम्बे या कंपनीने सदर व्यक्तीला ती गाडी विकत देण्याचे मान्य करत सदर व्यक्तीकडून डीडी स्वरूपात त्या गाडीचे पैसे घेतले . सदर व्यक्ती गाडी घेत असल्याची गोष्ट पिंटू व साथीदारांना समजल्यानंतर त्यांनी त्याला कंपनीत जाऊन दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. ही गाडी तू विकत घेऊ नकोस. नाहीतर परिणाम गंभीर होतील अशा पद्धतीने धमकावले परंतु गाडी विकत घेणाऱ्या गॅरेज व्यवसाय करणे त्यांना मी गाडी चे पैसे पूर्ण भरले आहेत. त्यामुळे आता तो व्यवहार मी रद्द करू शकत नाही. याबाबत असमर्थता दर्शवली असता, मला विचारल्याशिवाय गाडी या ठिकाणाहून घेऊन जायची नाही नाहीतरी परिणाम गंभीर होतील . अशा स्वरूपाची दमबाजी कंपनीत केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस सदर व्यावसायिकाने गाडी आणल्यानंतर पिंटू सदर व्यावसायिकाला फोन करत दमबाजी करत मी इतरांकडून ५०,००० घेतो तू मला ३०,००० दे नाहीतर तुला मी मारीन तू ओळखीचा असल्यामुळे मी तुला काल मारला नाही नाहीतर तिथेच मारला असता, तुम्ही गॅरेज व्यवसायिक काम करता आम्ही त्याठिकाणी आडवे येतो का? तर तुम्ही बोईसर एमआयडीसी मध्ये का कोटेशन टाकतात आमच्या व्यवसायात आडवे घ्यायचे नाही. अशा विविध प्रकारे दमबाजी करून सदर व्यावसायिकाला मी तुला ३०,००० देतो नाहीतर तू मला ३०,००० दे अशा धमक्या दिल्या असताना देखील जेव्हा सदर व्यक्ती बोईसर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता, अवैध कामांचा रक्षणकर्ता, केमिकल माफियांचा माय बाप, रेती चोरांचा सहाय्यक नुकताच ज्याचा लेखनिक पैसे घेताना रंगेहात पकडला होता त्या बोईसर पोलीस ठाण्याचा प्रभारी याने मात्र गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत उद्या सकाळी ये अर्ज दे समोरच्यांना बोलावून चौकशी करतो अशा पद्धतीची उत्तरे देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकार उपविभागीय पोलिस अधिकारी बोईसर वळवी साहेब तसेच ऑडिशनल पोलीस अधीक्षक गायकवाड साहेब यांच्यापर्यंत ही रेकॉर्डिंग गेल्यानंतर केवळ ५०७ प्रमाणे अदखलपात्र गुन्हा नोंदवण्याची थातूरमातूर पणा बोईसर पोलिसांनी केला आहे. सदर प्रकारात तक्रारदाराची दबाव टाकून त्या तक्रारीत कुठेही पैसे मागितले याचा साधा पुसटसा उल्लेख देखील केला गेला नाही पत्रकारांनी पोलीस निरीक्षक कसबे यांच्याशी संपर्क साधला असता मला काहीच प्रकार माहित नाही अशी खोटी उत्तरे पत्रकारांना दिली राजकीय गुंडांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्याऐवजी त्यांना वाचविण्याचे काम सध्या कसबे हा पोलीस अधिकारी करत आहे सदर अधिकाऱ्याला पोलीस प्रशासन आतून वरदहस्त आहे की काय अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे.
बोईसर पोलीस स्टेशन अंतर्गत समुद्राची चोरटी वाळू नदीची चोरटी वाळू केमिकल टँकर अनधिकृत बांधकाम त्याचबरोबर इतरही अवैध कामांचा सुळसुळाट झाला आहे. ठाण्याचा प्रभारी कसबे यांच्या मागील कार्यकर्ती देखील गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही हे स्पष्ट दिसून येते लाखो रुपयांचा हप्ता देवाण-घेवाण सध्या होत असल्याच्या चर्चा राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळात सुरू आहेत. पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे हे कसबे यांच्यावर कारवाई करणार का मागे त्यांचा कर्मचारी लाच घेतल्याचा पुरावा मिळवून देखील पुन्हा कसबे बोईसर पोलीस ठाण्यात पून्हा कसे रुजू झाले? आता तक्रारदार यांच्या तक्रारी दाबून गुन्हेगारांना साहाय्य करणाऱ्या अधिकाऱ्याला पोलीस पदकासाठी शिफारस तर करणार नाही ना असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत.?

प्रजासत्ताक दिनानिमित्त " केळवा सागरी पोलिस ठाणे " रक्तदान शिबिर संपन्न

प्रजासत्ताक दिनानिमित्त " केळवा सागरी पोलिस ठाणे " रक्तदान शिबिर संपन्न 
सफाळे -- हिरालाल लोखंडे  जगात विसाव्या शतकात कोव्हीडा  १९ या महामारीने थैमान मांडले असून त्यांचा प्रभाव कमी होत असलातरी, जागृतता हि काळाची गरज आहे. तेच काम   पोलिस अधिकारी - कर्मचारी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर -- कर्मचारी यांच्या सहकार्यांने होत आहे. प्रत्येक ठिकाणी पैशाने कामे होतातच असे नांही तर माणुसकी -- प्रेम -- भावना महत्त्वांच्या असतात. कोणत्याही प्रिय -- अप्रिय घटना घडली, घटनास्थळी मदतीसाठी " प्रथम " धावणारे आपले पोलिस बांधव." कोव्हीडा १९ च्या काळात किंवा कोणत्याही प्रसंगात पोलिस बांधव स्वतःचा किंवा आपल्या कुटूंबातील व्यक्तीचा विचार न करता ( कोव्हीडा १९ वेळी सर्व राजकीय - सामाजिक स्वयंघोषित  कार्यकर्ते- घरीच बसलेले - सर्वच नाही ) प्रथम कर्तव्याला प्राधान्य देत कर्तव्य करीत होते. तरीही काही समाजकंटक स्वार्थासाठी नियमानुसार कामे केली असता, तरी खाकी वर्दी कडे वाकडे बोटे करीत होते. काही महाभाग वेळप्रसंगी हात उचलीत असल्याचे दिसुन येत होते, तरीही खाकी वर्दीत कर्तव्य निष्ठ पणा, माणुसकीचा ओलावा आसलेला माणूस असतो हे दाखवून दिले आहे.  
     दिनांक २६ जानेवारी २०२१ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त केळवा सागरी पोलिस ठाणे येथे मा. पोलिस अधिक्षक - सो,पालघर, अप्पर पोलिस अधिक्षक - सो पालघर, मा.  पोलिस उप- अधिक्षक सो पालघर, उपविभागीय पोलिस अधिकारी पालघर यांनी दिलेल्या सुचने प्रमाणे सदर रक्तदान शिबिर आयोजित करुन यशस्वी रित्या पार पाडले. 
     केळवा सागरी पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी श्री भीमसेन गायकवाड यांनी रक्तदानाचे महत्व कर्मचारी वर्गास सांगितले, स्वतः रक्तदान करून, रक्तदाचे यांचा उत्साह वाढवून ३३० रक्तदाते कडुन रक्त संकलन केले. 
   केळवा सागरी पो, ठाणे अधिकारी गायकवाड साहेब यांनी कमी कालावधीत सुरक्षित प्रवासासाठी मार्गदर्शन करून, हेल्मेट सक्तीचे का ?, बाईक चालविताना मोबाईल वर बोलणे का टाळावे, त्यांचे परिणाम समजून सांगितले, आव्हाने केली,. एकतेचा संदेशही दिला. या मुळे जनतेला ते आपलेसे वाटू लागले आहेत.  
  रक्तदान शिबिरात जिल्हा परिषद सदस्य ,पंचायत समिती सदस्य,पोलीस पाटील, महिला दक्षता समिती सदस्य, सागरी सुरक्षा कमिटी सदस्य, शांतता कमिटी सदस्य, पोलिस ठाणे विभागात येणाऱ्या ग्रामपंचायती - सरपंच - उपसरपंच - ग्रा.पं.सदस्य,प्रतिष्ठित नागरिक तरूण वर्ग यांनी एकत्र ऐऊन रक्तदान केले त्यांना " रक्तदाता सन्मान पत्र " देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच भेट म्हणून टी शर्ट देण्यात आले.

Tuesday, January 26, 2021

शिवसेना कार्यकर्ता मेळावा व सदस्य नोंदणी कार्यक्रम संपन्न

शिवसेना कार्यकर्ता मेळावा व सदस्य नोंदणी कार्यक्रम संपन्न 
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) दिनांक २६ जानेवारी रोजी माकुणसर येथे सफाळे विभाग शिवसेना - युवासेना - महिला आघाडी आयोजित शिवसेना कार्यकर्ते मेळावा व शिवसेना सदस्य नोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला. 
 सदर कार्यक्रमाला मा, खासदार श्री, राजेंद्र गावीत साहेब, जिल्हा प्रमुख श्री वसंतभाई चव्हाण, जिल्हा महिला संघटक श्रीमती  ज्योती ताई मेहर यांचे नेतृत्व लाभलेले, मा, सभापती श्रीमती रंजना म्हस्के, जिल्हा युवा  पदाधिकारी श्री राकेश पाटील, विधानसभा संघटक श्रीमती नीलम संखे, तालुका प्रमुख श्री जयेश पाटील,  शिवसेना धडाडीचे व प्रमुख कार्यकर्ते श्री डाॅ. विश्वास वळवी,यांनी आपले परखड विचार मांडले, जिल्हा  परिषद सदस्य सौ, सरिता सुतार,-  सिमा रावते, पंचायत सदस्य रेखा तरे - मिना धोडी, विधानसभा समन्वयक श्री संदीप किणी, सहसमन्वयक श्री सदानंद किणी ,विधानसभा सहप्रमुख बिपिन बारी, विभाग प्रमुख नचिकेत पाटील, उप - विभाग प्रमुख मंगेश आक्रे, प्रकाश गावड, वंदेश पाटील तसेच विभागातील शिवसैनिक कार्यक्रमाला उपस्थित  होते.

पालघर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन समारंभ उत्साहात संपन्न ....


 
पालघर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन समारंभ उत्साहात संपन्न ....
 
पालघर (प्रतिनिधी):- पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष भारती भरत कामडी यांच्या हस्ते जिल्हा परिषद मुख्यालय, पालघर येथे ध्वजारोहण करून  ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष,  निलेश भागवान सांबरे, महिला व बाल कल्याण समिती सभापती,  अनुष्का ठाकरे, जिल्हा पोलीस अधीक्षक, दत्तात्रय शिंदे, अति मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक माणिक दिवे, तसेच जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
    तत्पुर्वी  उपाध्यक्ष,जिल्हा परिषद पालघर  निलेश भगवान सांबरे  यांच्या हस्ते मा. अध्यक्ष,जिल्हा परिषद पालघर यांच्या कार्यालयाच्या प्रांगणात, ध्वजारोहण कार्यक्रम संप्पन्न  झाला.

पालकमंत्री दादाजी भूसे यांनी नविन शासकीय इमारतीची केली पाहणी

पालकमंत्री दादाजी भूसे यांनी नविन शासकीय इमारतीची केली पाहणी
पालघर(प्रतिनिधी) दि.26 :- कृषी माजी सैनिक कल्याण मंत्री तसेच पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी निर्माणाधिन शासकीय इमारतीची पाहणी केली.
यावेळी खासदार राजेंद्र गावीत, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ, जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, तसेच विविध विभागाचे अधिकारी व सिडकोचे कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस अधिक्षक कार्यालय, सेशन कोर्ट, प्रशासकिय इमारत अ आणि ब, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी निवास व्यवस्था, गेस्ट हाऊस, ऑडिटोरियम, चार व्ही.आय.पी बंगले एवढ्या शासकिय इमारती 103 हेक्टर क्षेत्रफळामध्ये उभारल्या जात आहेत. या निर्माणाधिन कामाची पाहणी पालकमंत्री दादाजी भूसे यांनी केली.
**********

पालघर मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा---

पालघर मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
---
जिल्ह्याची विकासाच्या दिशेने वाटचाल
- दादाजी भूसे
पालघर(प्रतिनिधी) दि.26 :- कृषी, क्रिडा, शिक्षण, आदिवासी विकास अशा क्षेत्रा मधून पालघर जिल्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा विश्वास कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी व्यक्त केला.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिना निमित्त मूख्य शासकिय ध्वजारोहन पालकमंत्री श्री भूसे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.
गोलंदाजी आणि फलंदाजी मध्ये अष्टपैलू कामगीरी करुन पालघरचे भूमिपुत्र शार्दुल ठाकूर यांनी देशाला विजय प्राप्त करुन दिल्यामुळे शार्दुल ठाकूर यांना पालघर रत्न हा पुरस्कार पालकमंत्री श्री भूसे यांच्या हस्ते देण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेवर आधारित "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या अभियानाच्या माध्यमातून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी यावेळी करण्यात आली.
नगराध्यक्षा उज्वला काळे, खासदार राजेंद्र गावीत, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ, जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी, नागरीक, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरीक आदि उपस्थित होते.
जिल्ह्यामध्ये विविध कृषी योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना फायदा झाला आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांतीकारी योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमधून जिल्ह्यातील एकुण 1065  शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. जिल्ह्यातील जव्हार आणि मोखाडा तालुक्यात अति दुर्गम आदिवासी भागातील शेतकरी पारंपारिक भात, नाचणी व वराई ची शेती करतात. आदिवासी शेतकरी स्वतः आधुनिक शेतीकडे वळले आहेत. त्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली स्ट्रोबेरी झाडांची लागवड करून आपला आर्थिक स्थर उंचावला आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी 26,000 स्ट्रोबेरीच्या रोपांची प्रायोगिक तत्त्वावर लागवड केली असून प्रती दिन 250 किलो स्ट्रोबेरीचे उत्पादन मिळत आहे. याची बाजारपेठेत प्रती किलो 200 रु. प्रमाणे विक्री करण्यात येत आहे. जिल्ह्यात जवळपास 550 हेक्टर क्षेत्रावर मोगरा लागवड झाली आहे. यापासून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हातभार लागत आहे. मोगरा लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे गट करून जव्हार येथे "वृंदावन पुष्प उत्पादक शेतकरी कंपनी" स्थापन करण्यात आली असून सर्व शेतकऱ्यांची फुले दादर-मुंबई बाजारपेठेत सकाळी लवकर पोहचत आहेत. शेतक-यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी याकरिता पिक पद्धतीत बदल करण्यावर भर देण्यात आला आहे. या माध्यमातून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत 7281 लाभधारकांनी विविध फळपिकांची 3558.07 हेक्टर वर लागवड करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या मध्ये प्रामुख्याने काजूच्या जवळ पास 2 लाख कलमांची लागवड करण्यात आली आहे. एक जिल्हा एक उत्पादन योजनेअंतर्गत चिकू पिकाची राज्यस्तरावरून निवड करण्यात आली असल्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.
जिल्ह्यामध्ये महाआवास अभियान राबवण्यात येत आहे या अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत 25759 लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी 21195 घरे आज अखेर पूर्ण झालेली आहेत. याच बरोबर राज्य पुरस्कृत रमाई, शबरी आणि आदिम योजनेंतर्गत 6106 लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आली असून यापैकी 4006 घरकुले पूर्ण झालेली आहेत. या अभियानांतर्गत जिल्ह्याचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. जल जीवन मिशन योजने अंतर्गत सन 2020-21 मध्ये 68,843 कुटुंबांना वैयक्तिक स्वरूपात नळाने पाणीपुरवठा पुरविण्यासाठी कनेक्शन पुरविण्यात आले आहेत. जिल्ह्यामध्ये कातकरी उत्थान अभियानंतर्गत खाजगी जागेवरील 3188 घरांचे, बन विभागाच्या जागेवरील 820 घरांचे, शासकीय जागेवरील 393 घरांचे, आणि गावठाण जागेवरील 2755 घरांचे अतिक्रमण नियमानाकूल करून आदिवासीच्या नावे करून दिली आहेत. जिल्हा वनहक्क समिती कक्ष स्थापन करून वनहक्क दावे मंजूरीचे कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत. जिल्ह्यात वनहक्क कायदयांतर्गत आजअखेर 44522 वैयक्तिक वनहक्क दावे मंजूर करण्यात आले असून त्याचे क्षेत्र 50385 एकर इतके आहे. मागिल 4 महिन्यात 4229 वैयक्तिक वनहक्क दावे मंजूर करून, आदिवासींना हक्क देण्यात आले आहेत. तसेच 437 सामुहिक वनहक्क दावे मंजूर असून त्याचे क्षेत्र 55 हजार 41 एकर इतके आहे.
रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूरांना पौष्ठीक अन्न माफक दरात मिळावे यासाठी शिवभोजन हि योजना चालू करण्यात आली होती या योजनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभरात 4,53,119 (चार लाख त्रेपन्न हजार एकशे एकोणीस) थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. शिवभोजन केंद्रामधून प्रति दिन 2850 थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.
"क्यार" व "महा" चक्रीवादळामुळे झालेल्या अवेळी पावसामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी आपद्ग्रस्तांना विशेष दराने मदत देण्यासाठी 42,74,78000/ - (अक्षरी बेचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लाख अठ्याहत्तर हजार रुपये) इतके अनुदान शासनामार्फत वाटप करण्यात आलेले आहे. जुन ते ऑक्टोबर 2020 मध्ये अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतपिकांच्या नुकसानीपोटी आपद्ग्रस्तांना विशेष दराने मदत देण्यासाठी रक्कम रुपये 25,58,52,000/-(पंचवीस कोटी अठ्ठावण्ण लाख बावन्न हजार रुपये) अनुदान वाटप करण्यात आले. जिल्ह्यात मजुरांना गावातच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी 9,550( नऊ हजार पाचशे पन्नास) एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामे उपलब्ध करुन दिली आहेत. जिल्ह्यासाठी कोव्हिशिल्ड 19,500 (एकोणीस हजार पाचशे) लस प्राप्त झाली असून 17,411 (सतरा हजार चारशे अकरा) व्यक्तींना लस देऊन उद्दिष्ठ गाठायचे आहे. यात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी यांना ही लस देण्यात आली आहे. मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात जनजागृती करुन कोव्हिड रुग्णाच्या संख्येत नियत्रंण आणण्यात आले आहे. त्यामुळे कोव्हिड रुग्ण बरे होण्यामध्ये पालघर जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्यात एकुण 45000 (पंचेचाळीस हजार) कोव्हिड रुग्ण आढळून आले होते. यापैकी 97 टक्के रुग्ण बरे झाले असल्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.
********

Monday, January 25, 2021

समनेरे ता.इगतपुरी येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कर्मयोगी स्पोर्ट्स क्लब तर्फे हिंदुरुदयसम्राट चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

समनेरे ता.इगतपुरी येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कर्मयोगी स्पोर्ट्स क्लब तर्फे हिंदुरुदयसम्राट चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

 नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.
 
समनेरे येथे स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कर्मयोगी स्पोर्ट्स क्लब तर्फे आयोजीत हिंदुह्रदयसम्राट चषक, अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील 36 संघानी सहभाग घेतला व या स्पर्धेत प्रथम पारीतोषिक घोटीच्या टारगेट क्रिकेट संघाने मिळविले तर द्वितीय इगतपुरी क्रिकेट संघाने, तृतीय बेलगाव संघाने तर चतुर्थ कर्मयोगी स्पोर्ट्स क्लब ने मिळविले. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व उदघाटक शिवसेना नाशिक उप जिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव हे होते. या स्पर्धेत प्रथम बक्षीस ११००० रु.श्री साहेबराव भिकाजी जाधव सरपंच समनेरे,
द्वितीय ७००० रु.श्री सोमनाथ जोशी, सभापती पंचायत समिती इगतपुरी,
तृतीय ५००० रु. श्री देविदास जाधव चेअरमन मोगरे वि.का.सो.
चतुर्थ ३००० रु. श्री प्रभाकर गायकर उपसरपंच मालुजै यांच्या तर्फे जाहीर करण्यात आलेत व सर्व सन्मान चिन्ह श्री रामदास जाधव मा.सरपंच समनेरे तसेच श्री राधाकृष्ण जाधव कर्मयोगी कन्सट्रक्शन, श्री तुकाराम जाधव कर्मयोगी कृषी सेवा केंद्र,श्री जयेश मादंळे, मादंळे ज्वेलर्स व श्री कानु भंडारी आनंद फर्नीचर अँड स्टिल यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाच्या बक्षिस वितरण प्रसंगी श्री सुनिल जाधव, श्री मछिंद्र खातळे, श्री हनुमंता गायकवाड, श्री फकिरा धांडे, रतन लोते, कैलास जाधव,प्रताप जाखेरे, संजय लोते, गेणु जाखेरे, मच्छीद्र कुंदे, मकुदा जाधव, समाधान उगले, राजु डगळे तसेच परिसरातिल क्रिकेट प्रेमी व समनेरे ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी धनंजय जाधव, शरद उगले, महेश जाधव, बाळासाहेब जाधव, पवन जाधव यानी परिश्रम घेतले.

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 71 वा वर्धापन दिन समारंभ

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 71 वा वर्धापन दिन समारंभ

पालघर (प्रतिनिधी)दि.25 :- पालघर येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार दि. 26 जानेवारी 2021 रोजी सकाळी 9.15 वा. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय पोलीस परेड मैदान, कोळगांव, जैनेसिस औद्योगिक परिसराच्या बाजूचे मैदानात कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री  तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे  यांच्या शुभहस्ते होणार आहे. 
तरी या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केले आहे.
दिनांक 26 जानेवारी 2021 रोजी सकाळी 8.30 ते 10.00 वा. च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. तसेच सदर शासकीय समारंभासाठी  राष्ट्रीय पोषाख परिधान करावा असे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी  सांगितले.
०००००

Sunday, January 24, 2021

पालकमंत्री दादाजी भुसे* *दि.25 व 26 रोजी पालघर जिल्हा दौऱ्यावर*

*पालकमंत्री दादाजी भुसे*
  *दि.25 व 26 रोजी  पालघर जिल्हा दौऱ्यावर*
पालघर , (प्रतिनिधी)दि. 24:  मंत्री कृषी,माजी सैनिक कल्याण तथा पालकमंत्री दादाजी भुसे पालघर जिल्हा. हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार दि. 25  जानेवारी 2021  रोजी सकाळी  7.30 वा शासकीय निवासस्थान येथून शासकीय मोटारीने वसई  जि.पालघरकडे येथे प्रयाण सकाळी 10 वाजता  वसई विरार महानगरपालिका  क्षेत्रातील  विकास कामांचा आढावा
बैठक स्थळ :- वसई विरार महानगरपालिका
11 ते 12  यावेळेत बस आगार खातीवली जि पालघर पाहणी, श्वान निर्जबीकरण केंद्र. पाहणी नवघर,मणिपूर पाहणी, म.न.पा. नवीन प्रशासकीय इमारत  व क्रीडा संकुलांची  पाहणी. 
दुपारी 12 वाजता  वसई येथून  शासकीय  मोटारीने  पालघरकडे प्रयाण 
  बैठकीचे स्थळ:- जिल्हाधिकारी  कार्यालय पालघर  ,दुपारी  2.00  वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक,  जिल्हा वार्षिक  योजना , अनुसुचित जाती, उपायोजना ) आढावा बैठक, डोंगरी विकास आढावा ,जल-जीवन मिशन  आराखडा बैठक त्यानंतर
 जिल्हाधिकारी  कार्यालय पालघर येथे
  शासकीय विश्रामगृह  पालघर कडे प्रयाण  आगमन व मुक्काम.
मंगळवार दि. 26 जानेवारी 2021 रोजी   सकाळी 9.15  भारतीय प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण पालकमंत्री महोदयांच्या हस्ते व  मुख्य शासकीय कार्यक्रमास उपस्थिती  सोईनुसार  मुंबई कडे प्रयाण .
  
*****************

रक्त दान शिबिर कार्यक्रम संपन्न

*स्व. हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुंदन भाऊ संख्ये यांनी आयोजित केलेल्या रक्तदान सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित राहिलेल्या म.रा.म.वी. महामंडळ अध्यक्षा सौ. ज्योती ताई ठाकरे,  शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख श्री. राजेश भाई शहा, जिल्हा परिषद गटनेते श्री. जयेंद्र दुबळा यांच्या समवेत उपस्थित राहण्याचा योग आला.अतिशय नियोजनबध्द व उदंड प्रतिसाद लाभलेला हा रक्तदान सोहळा.दुपारपर्यंत 192 बॉटल रक्त्त जमा झाालं

प्रजासत्ताक दिनानिमित्त सर फाउंडेशनचा आॅनलाईन कलामहोत्सव सफाळे ( हिरालाल लोखंडे ) देशभरातील विद्यार्थी व शिक्षकांचा गुणवत्ता विकास, नेतृत्व गुण, कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच शैक्षणिक प्रगती साठी, देशपातळीवर काम करणारी शिक्षकांची सर्वात मोठी संस्था " सर फाउंडेशन " या वर्षी २६ जानेवारी - प्रजासत्ताक दिना निमित्ताने आॅनलाईन कलामहोत्सव साजरा करीत आहे. " सर फाउंडेशन " पालघर जिल्हा यांच्या पुढाकाराने यासाठी विविध उपक्रमाचे फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून पारपाडणार असून यामध्ये शिक्षक व विद्यार्थी यासाठी -- भूमिका अभिनय, मी क्रांतीकारी बोलतोय, देशभक्तीपर गीत गायन, देशभक्तीपर व सांस्कृतिक लोकगीत -- नृत्य सादरीकरण, आदर्श व्यक्तीची मुलाखत, देशभक्तीपर आधारित कविता लेखन, प्रश्न मंजुषा इत्यादी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये जिल्हयातील जास्तीत जास्त शिक्षक - विद्यार्थीनी सहभागी होण्याचे आव्हान या उपक्रमाचे आयोजक " सर फाउंडेशन " चे पालघर जिल्हा समन्वयक श्री विजय वाघमारे श्री आनंद आनेमवाड शिल्पा वनमाळी यांनी केले आहे

प्रजासत्ताक दिनानिमित्त सर फाउंडेशनचा आॅनलाईन कलामहोत्सवप्रजासत्ताक दिनानिमित्त सर फाउंडेशनचा आॅनलाईन कलामहोत्सव 
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) देशभरातील विद्यार्थी व शिक्षकांचा गुणवत्ता विकास, नेतृत्व गुण, कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच शैक्षणिक प्रगती साठी, देशपातळीवर काम करणारी शिक्षकांची सर्वात मोठी संस्था " सर फाउंडेशन " या वर्षी २६ जानेवारी - प्रजासत्ताक दिना निमित्ताने आॅनलाईन कलामहोत्सव साजरा करीत आहे.  
  " सर फाउंडेशन " पालघर जिल्हा यांच्या पुढाकाराने यासाठी  विविध उपक्रमाचे फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून पारपाडणार असून यामध्ये शिक्षक व विद्यार्थी यासाठी -- भूमिका अभिनय, मी क्रांतीकारी बोलतोय, देशभक्तीपर गीत गायन, देशभक्तीपर व सांस्कृतिक  लोकगीत -- नृत्य सादरीकरण, आदर्श व्यक्तीची मुलाखत, देशभक्तीपर आधारित कविता लेखन, प्रश्न मंजुषा इत्यादी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये जिल्हयातील जास्तीत जास्त शिक्षक - विद्यार्थीनी सहभागी होण्याचे आव्हान या उपक्रमाचे आयोजक " सर फाउंडेशन " चे पालघर जिल्हा समन्वयक श्री विजय वाघमारे श्री आनंद आनेमवाड शिल्पा वनमाळी यांनी केले आहे

Saturday, January 23, 2021

शिवसेना प्रमुख स्व. श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन

शिवसेना प्रमुख स्व. श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन 
पालघर ( हिरालाल लोखंडे) पालघर शिवसेनेच्या वतीने शिवसेना प्रमुख -हिंद सम्राट रयतेचा वाली स्व. श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतीमा पूजना करण्यात आले, श्रीमान बाळासाहेब ठाकरे अमर रहे, शिवसेना जिंदाबाद घोषवाक्यांनी वातावरण भारावून गेले, शिवसेना आराध्य दैवत बाळासाहेब ठाखरे यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले 
    पालघर शिवसेनेच्या वतीने स्व, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सेनेचे जेष्ठ नेते श्री उदयबंधू पाटील, श्री केतन पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख श्री, राजेशभाई शहा, आमदार श्री श्रीनिवास वनगा, तसेच श्री चंद्रकांत दांडेकर, सौ, डाॅ, उज्ज्वला काळे --नगराध्यक्ष पालघर, श्री उत्तम घरत - उपनगराध्यक्ष पालघर, सौ, ज्योती मेहेर - जिल्हा महिला संघटक, श्री केदार काळे - जिल्हा सहसमन्वयक, श्री भुषण संखे - शहर प्रमुख तसेच सर्व नगरसेवक - गटनेते - सर्व विषय समितीचे सभापती - जि .प. सदस्य - पं. स. सदस्य - शहर - तालुका - जिल्हा पदाधिकारी, युवासेना - पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते सर्वानी नतमस्तक होऊन साहेबांना मानवंदना दिली.

Friday, January 22, 2021

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पालघर येथे साखळी उपोषण..

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पालघर येथे साखळी उपोषण..

(प्रतिनिधी)
दिल्ली येथे मोदी सरकार द्वारे आणलेल्या शेतकरी विरोधी बिलच्या विरोधात सुरू असलेले शेतकरी आंदोलनाला पाठींबा देत गोरसेना राष्ट्रीय संघटनेच्या वतीने दोन दिवसाच्या साखळी उपोषणचे आयोजन विजय जाधव विभागीय संयोजक, गोरसेना यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला होता. यावेळी रवी राठोड प्रदेश संघटक बंजारा टायगर्स, विजय जाधव, सुभाष राठोड, विठ्ठल चौहान, श्रावण राठोड, श्रीनाथ राठोड, शारदा बाई राठोड, सुरेश राठोड व रेणुका बाई राठोड इत्यादी पुरुष व महिला कार्यकर्ते उपस्थित होते.
  दिल्ली येथे मागील 50 दिवसांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलनामध्ये अद्यापपर्यंत 80 शेतकरी आंदोलनकर्त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. यादरम्यान शेतकऱ्यांबरोबर सरकारची अनेक चर्चा होऊनही अद्यापपर्यंत मोदी सरकारकडून ठोस निर्णय घेण्यात आला नाही, याउलट आंदोलनाला दाबण्यासाठी वेग-वेगळे उपाय योजना करताना मोदी सरकार दिसून आली. भारतीय उच्च न्यायालयाने सुध्दा शेतकरी विरोधी कायद्यावर स्थायीबंदी आणल्याऐवजी तात्पुरती स्वरूपात अस्थायी बंदी लावली आहे. शेतकरी विरोधी असलेल्या या काळ्या कायद्याला रद्द करण्यासाठी अद्यापही कुठले पाऊले उचलण्यात आलेले नाही, म्हणून गोरसेना राष्ट्रीय संघटना व इतर संघटनेकडून देशभरात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय समोर दोन दिवसीय साखळी उपोषणचे आयोजन दि.21 व 22 जानेवारी 2020 रोजी करण्यात आले आहे. जर मोदी सरकारने हा काळा कायदा परत घेतला नाही तर बंजारा समाजाची देशभरातील सर्व संघटना एकत्र येऊन  रस्त्यावर आणखी तीव्र आंदोलन करतील, असं इशारा रवी राठोड, महाराष्ट्र प्रदेश संघटक बंजारा टायगर्स यांच्या कडून देण्यात आला.

शिक्षक सेना पालघर तालुकाप्रमुखपदी निलेश भोईर यांची निवड

शिक्षक सेना पालघर तालुकाप्रमुखपदी निलेश  भोईर यांची निवड

पालघर (प्रतिनिधी)पालघर शहरातील आर्यन हायस्कुल शाळेत कार्यरत शिक्षक निलेश यशवंत भोईर यांची  शिक्षक सेना पालघर तालुकाप्रमुख पदी निवड झाल्याने तालुक्यातील शिक्षक वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, व निलेश भोईर यांना शुभेच्छांचे वर्षाव देखील सुरू झाले आहे. निलेश भोईर आर्यन एज्युकेशन सोसायटीचे उच्च माध्यमिक शाळेत मागील 10 वर्षांपासून आपली सेवा देत आहेत. त्याच बरोबर समाज सेवेत ही त्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. शाळे बरोबर परिसरातील गोर-गरीब विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहणारे निलेश भोईर ने कोरोना काळात असंख्य गोर-गरीब विद्यार्थ्यांना तसेच त्यांचे कुटुंबियांना आर्थिक मदत तसेच मोफत अन्न  वाटप देखील केले आहेत. राष्ट्रीय ग्राहक संरक्षण फाउंडेशनच्या वतीने ही ते नेहमी समाजकार्य करताना दिसून येतात. त्याच बरोबर शिक्षकांचे अडी-अडचणीतहि ते नेहमी धावून येतात,गेल्या 8 वर्षांपासून 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त *सावित्रीच्या लेकी* या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा ते सन्मान करतात तसेच 8 मार्च रोजी जागतिक महिला दिवस सुद्धा मोठया प्रमाणात साजरे करतात म्हणूनच त्यांचे शिक्षक, विद्यार्थी तसेच समाजासाठी केलेल्या या सेवांसाठी पोचपावती म्हणून त्यांची पालघर तालुका शिक्षक सेना प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे नियुक्ती पत्र महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना(कोकण विभाग) चे अध्यक्ष ज्ञानेश्वर  म्हात्रे यांच्या हस्ते निलेश यशवंत भोईर यांना पालघर येथील चाफेकर कॉलेज मध्ये आयोजित कार्यक्रमात देण्यात आले..

वाड्यात १३ लाख ५० हजारांचा टेम्पोसह गुटखा जप्त; दोघांना अटकेत, वाडा पोलीसांची धडक कारवाई

वाड्यात १३ लाख ५० हजारांचा टेम्पोसह गुटखा जप्त; दोघांना अटकेत,
 वाडा पोलीसांची धडक कारवाई

वाडा(शेखर पवार) वाडा तालुक्यातील खानिवली येथे १३ लाख ५० हजारांचा  गुटखा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये टेम्पोतील  दोघांना अटक करण्यात आली असून वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
दमण या ठिकाणा वरून भिवंडी या ठिकाणी अवैध गुटख्याची  वाहतूक करणाऱ्या टेम्पो  वाहन क्रमांक-MH04 CU 7291 वाडा पोलिसांनी वाडा तालुक्यातील खानीवली नाका या ठिकाणी दि.२१ जानेवारी २०२१ रोजी रात्री २.३० सुमारास अंदाजे १३ लाख 50 हजार रुपये मुद्देमालासहित  पकडले आहे.
    सदर या कारवाई मध्ये चालक शिवकुमार सरोज वय ३६ व्यवसाय चालक, उत्तर प्रदेश, रवी तुसामत वय २८ वर्ष रामदेव पार्क चाळ, आनंद नगर मीरारोड पुर्व असुन एक आरोपी फरार असल्याचे सांगण्यात येते आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुधीर संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार आर.पी. पोटे यांनी केली असुन अधिक तपास करीत आहेत

11 वा राष्ट्रीय मतदार दिवस पालघर येथे साजरा होणार

11 वा राष्ट्रीय मतदार दिवस पालघर येथे साजरा होणार 
पालघर (प्रतिनिधी)दि.22 :- भारत निवडणूक आयोगामार्फत 11 वा राष्ट्रीय मतदार दिवस, दिनांक 25 जानेवारी, 2021 रोजी साजरा करणेंत येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालघर जिल्हयामध्ये जिल्हा स्तरावर, मतदार नोंदणी अधिकारी स्तरावर व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले आहे. पालघर जिल्हा पातळीवरील राष्ट्रीय मतदार दिवसाचा कार्यक्रम तहसिल कार्यालय सभागृह हॉल, पालघर ता.जि.पालघर येथे दिनांक 25 जानेवारी, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजतां आयोजित करणेत आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष.डॉ. माणिक गुरसळ (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, पालघर हे आहेत. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून. सिध्दाराम सालीमठ (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर, दत्तात्रय शिंदे (भा.पो.से.), पोलीस अधिक्षक पालघर व. दिलीप गुट्टे, अपर जिल्हाधिकारी, पालघर हे उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय मतदार दिवसाच्या कार्यक्रमामध्ये नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांचे फोटो ओळखपत्राचे वाटप व या मतदारांचा सत्कार करणेंत येणार आहे. तसेच दिव्यांग मतदार, सैनिक मतदार, महिला मतदार यांना फोटो ओळखपत्राचे वाटप व सत्कार करणेत येणार आहे.  मा. भारत निवडणूक आयोगाकडून 'सभी मतदाता बने: सशक्त, सतर्क, सुरक्षित एवं जागरूक " (Making our Voters Empowered, Vigilant, Safe and Informed) असे अकराव्या राष्ट्रीय मतदार दिवसाचे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगामार्फत मतदार जनजागृती होणेच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय मतदार  दिवसाचा कार्यकम आयोजित करणेत येत आहे. असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदिप कळंबे यांनी कळविले आहे.
**********

मध केंद्र योजना (मधमाशी पालन)संस्था व पात्र व्यक्तीकडून अर्ज मागविण्यात येत आहे

मध केंद्र योजना (मधमाशी पालन)संस्था व 
पात्र व्यक्तीकडून अर्ज मागविण्यात येत आहे 
पालघर (प्रतिनिधी)दि २२ :- महाराष्ट्र शासन, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई ३२ यांचा शासन निर्णय क्र. केव्हीबी -२०१७/प्र.क्र. १६/उद्योग-६, दि. १८ जून २०१९ अन्वये महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना ( मधमाशी पालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वीत झालेली आहे. याकरीता पात्र व्यक्ती / संस्थाकडुन खालील दर्शविल्याप्रमाणे अर्ज मागविण्यात येत आहे.
अ) योजनेची वैशिष्टे - मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुतंवणुक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष/छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती.
ब) योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता -
१) वैयक्तिक मधपाळ -
पात्रता - अर्जदार  साक्षर असावा,स्वतःची शेती असल्यास प्राधान्य, वय १८ वर्षापेक्षा जास्त,अर्जदाराने मंडळाचे मान्यता प्राप्त प्रशिक्षण केंद्रात १० दिवसाचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील.
२) केंद्रचालक प्रगतिशिल मधपाळ - व्यकती पात्रता - किमान १० वी पास, वय वर्ष २१ पेक्षा जास्त, अशा व्यक्तिच्या नांवे किमान किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नांवे किमान १ एकर शेत जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन, लाभार्थीकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्यांची क्षमता व सुविधा असावी. 
३) केंद्रचालक संस्था- पात्रता - संस्था नेंदणीकृत असावी, संस्थेच्या नांवे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान १००० चौ. फुट सुरयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्यांची क्षमता असलेली सेवा असावीत.
क) अटी व शर्ती - लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणांपुर्वी मध व्यवसाय सुरू करणेसंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य राहील.मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य
ड) अधिक माहितीसाठी संपर्क
३) जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, लक्ष्मी विष्णु सदन,महर्षि कर्वे रोड,नौपाडा,ठाणे-४०० ६०१ फोन नं.२५३६६०७५ 
४) संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, शासकीय बंगला नं. ५, मु.पो. ता. महाबळेश्वर, जि. सातारा- ४१२८०६, दुरध्वनी ०२१६८ - ३२६०२६४ यांच्याशी सपर्क साधावा असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी  पालघर यांनी  केले आहे.

मा खासदार श्री राजेंद्र गावित साहेब ह्यांच्या खासदार निधीतून झालेल्या खारेकुरण येथील रस्त्याचे लोकार्पण गुरूवार

*मा खासदार श्री राजेंद्र गावित साहेब ह्यांच्या खासदार निधीतून झालेल्या खारेकुरण येथील  रस्त्याचे लोकार्पण गुरूवार
पालघर (चंद्रकांत पाटील) दिनांक २१/ १/२१ रोजी झाले*
हा रस्ता होण्यापूर्वी तेथील जनतेला विषेश पावसाळ्यात खुप त्रास सहन करावा लागत होता , स्थानीक जनतेच्या मागणीला प्रतीसाद देउन खासदार राजेंद्र  गावित साहेब ह्यानी रुपये दहा लाखचा  खासदार निधी मधून देउन रस्ता पुर्ण केला , स्थानीकानी धन्यवाद दिले .
खारेकुरण - मुरबा पुल करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे ,साधारण साठ कोटी रुपये खर्च येणार असल्याचे गावित साहेबानी आपल्या भाषणात सांगीतले ,मी मंत्री असताना पालघर - खारेकुरण रस्ता जो पालघर कॉलेज वरुन येतो  त्या साठी पाठपुरावा केला , काही भाग बजेट व काही भाग  नाबार्ड मधुन रस्ता पुर्ण झाला ,
लोकार्पण कार्यक्रमात शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक केदार काळे ,माजी सभापती रवींद्र पागधरे ,सरपंच सौ गिता पाटील ,उपसरपंच सदानंद पाटील ,मच्छिमार सोसायटी चेअरमन प्रशांत नाईक , मच्छिमार अध्यक्ष जयकुमार भाय ग्रामपंचायत सदस्य हितेश देसले ,योजीता किणी ,निलम पाटील ,राकेश पागधरे व गावकरी उपस्थित होते ,अनेक विकासकामे अपूर्ण आहेत ती उर्वरित चार वर्षांत आपण सर्व मिळून पुर्ण करु ,असे खासदार गावित साहेब म्हणाले .
२०२० हे करोना मध्ये गेले ,त्या मुळे साधारण १० महीने विकास कामाना खिळ लागली

Thursday, January 21, 2021

आदिम जमातीच्या बचत गटांना विटभटटी उभारणेसाठी अर्थसहाय्य

*आदिम जमातीच्या बचत  गटांना विटभटटी उभारणेसाठी अर्थसहाय्य*

                  पालघर (प्रतिनिधी)दि.21 : आदिम जमातीचे संरक्षण व विकास कार्यक्रमा अंतर्गत प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,जव्हार  अंतर्गत जव्हार,मोखाडा,विक्रमगड व वाडा या चार तालुक्यातील आदिम जमातीच्या (कातकरी) विटभटटी  उत्पादक गटांमार्फत  आदिम जमातीचे संरक्षण व विकास करणे या उद्येशाने  स्थलांतर रोखने , रोजगारनिर्मिती व विपणन व्यवस्थेचे बळकटीकरण व्हावे या उद्देशाने आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत Financial support for the productin of bricks to tribal SHGS  (आदिम जमातीच्या बचत  गटांना विटभटटी उभारणेसाठी अर्थसहाय्य देणे )  हि योजना मंजुर करण्यात आलेली आहे. 
                  लाभार्थ्यांनी खालील कागदपत्रांसह या कार्यालयात दि.21.01.2021 ते दि.29.01.2021 या कालावधीत विहीत नमुन्यात अर्ज सादर करावे. 
                  अटी व शर्ती तसेच कागदपत्रांबाबत तपशिल खालीलप्रमाणे
लाभार्थी गट हा नोंदणीकृत असावा,नोंदणीचे प्रमाणपत्र सादर करावे, लाभार्थी गट हा आदिम जमातीचाच असावा, गटातील लाभार्थ्यांचे जातीचे दाखले जोडण्यात यावे, लाभार्थी भाजिपाला उत्पादक गटाचा ठराव जोडण्यात यावा, लाभार्थ्यांकडे विटभट्टीसाठी जमिन उपलब्ध असल्याची कागदपत्रे सोबत जोडावी, लाभार्थ्यांचा रहीवाशी दाखला असावा, ग्रामसभेचा ठराव व नाहरकत दाखला, लाभार्थ्याचे आधारकार्ड व रेशनकार्ड च्या छायांकीत प्रती अर्जासोबत सादर कराव्या, बचत गटाच्या बँक पासबुकची झेरॉक्स जोडण्यात यावी, बचत गटातील प्रत्येक लाभार्थ्यांचा अर्ज, बचत गटातील सर्व सदस्यांचे एकत्रित व्यवसाय करण्याचे संमतीपत्र.(सर्व सदस्यांचे स्वाक्षरीसह), विधवा,परितक्त्या ,दिव्यांग लाभार्थ्यांच्या भाजिपाला उत्पादक गटांना  योजना मंजुर करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल, बचत गटातील लाभार्थ्यांचे फोटोरजिस्टर खालिल नमुन्यात देण्यात यावे. अ.क्र. बचतगटाचे नांव, सदस्याचे नांव, जात, शिक्षण, दारीद्यरेषेचा क्रमांक, आधार क्रमांक, फोटो, स्वाक्षरी
अंतिम लाभार्थी निवडीबाबतचे सर्व अधिकार प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी,जव्हार यांनी  राखुन ठेवण्यात आले आहेत, विहीत नमुन्याचे लाभार्थी अर्ज कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत, यापुर्वीचे सर्व अर्ज बाद करण्यात आलेले आहेत.
          सदरची योजना कातकरी लाभार्थ्यांसाठीच असल्याने कातकरी लाभार्थ्यांनीच विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प कार्यालयातुन नोंदणी करुन घेवुन जावेत व परीपुर्ण भरुन सादर करावे.   
                                   
.

नवीन आश्रम शाळा सर्व सुविधा युक्त व ५० वर्ष टिकून बांधकाम व्हावे -- श्री राजेंद्र गावित खासदार

नवीन आश्रम शाळा सर्व सुविधा युक्त व ५० वर्ष टिकून बांधकाम व्हावे -- श्री राजेंद्र गावित खासदार 
पालघर -हिरालाल लोखंडे 
गुरुवार २१जानेवारी रोजी पालघर जिल्ह्यातील आश्रम शाळा आढावा बैठकीत,आश्रम शाळांचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम या बद्दल खासदार साहेबांनी खेद व्यक्त केली.मी स्वतः तसेच अनेक आजी-माजी आदिवासी आमदार -- मंत्री महोदय यांनी त्यांचे शिक्षण आश्रम शाळेत पूर्ण केले आहे, त्या वेळी आम्ही जे आश्रम शाळेत भोगले ते पुढील पिढीला भोगावे लागणार नाही या बद्दल दक्षता घ्यायला हवी, अशी सुचना सौम्य भाषेतून अधिकार्यांना दिली, शासनाकडून मिळणाऱ्या निधीचा यथोचित भविष्याच्या दृष्टीने पुढील ५० वर्षाचा विचार करून स्ट्रक्चर प्लॅन बनवावे, आजच्या परिस्थितीत किती आश्रम शाळा खाजगी जागेत आहे .आढावा घेणे गरजेचे आहे. तसेच नवीन आश्रम शाळा बांधण्यासाठी शासकीय जागा उपल्ब्ध आहे का ? नवीन आश्रम शाळा बांधकामासाठी निधी उपल्ब्ध आहे का?  ह्या बदल चौकशी करून अडचणी दुर करण्यासाठी सर्वत्र प्रयत्न करेल असे खासदार साहेबांनी अढावा बैठकीत सांगितले. 
     श्री केदार काळे -शिवसेना लोकसभा सहसमन्वयक, सौ नाग मॅडम - मुख्य कार्यकारी अभियंता एकात्मिक आदिवासी प्रकल्प जिल्हा पालघर ,श्री एस एम पाटील - कार्यकारी अभियंता एकात्मिक आदिवासी प्रकल्प, श्री सोनवणे - सहाय्यक अधिकारी आदिवासी प्रकल्प, श्री गोवेकर - सहाय्यक अधिकारी आदिवासी प्रकल्प, श्री देसाई - कनिष्ठ अभियंता , सर्व अधिकारी वर्ग एकात्मिक आदिवासी प्रकल्प पालघर जिल्हा.

अन्न व औषध प्रशासन खात्याचे कार्यालय पालघर मधे 21मार्च 2021 पासून सुरु होणार -- मा.खासदार राजेंद्र गावीत साहेब

अन्न व औषध प्रशासन खात्याचे कार्यालय पालघर मधे 21मार्च 2021 पासून सुरु होणार -- मा.खासदार राजेंद्र गावीत साहेब 
पालघर --हिरालाल लोखंडे 
     पालघर किराणा माल होलसेल व रिटेल व्यापारी यांना अन्न व औषध प्रशासनाकडून अनेक अडचणी येत होत्या त्या संदर्भात खासदार मा. गावीत साहेब, श्री केदार काळे --शिवसेना लोकसभा सहसमन्वयक, श्री मनिष चौधरी, श्री योगेंद्र पोळ, अन्न सुरक्षा अधिकारी ---श्री दत्तात्रेय साळुंखे, प्रविण सूर्यवंशी, तसेच व्यापारी असोसिएशन चे पदाधिकारी श्री भगवान जैन ,सावाराम चौधरी, हितेन शहा, विनोद जैन, आदी उपस्थित होत. 
      नविन परवाना, ( लायसन्स) जुने परवाने आॅन लाईन आहेत तरी सर्व कागदपत्रे योग्य असतील  तर  ४५ दिवसात मिळणार. गोडाऊन लायन्स फी व ऐका पेक्षा जास्त गोडाऊन असल्यास काय करावे ?  दुकानातील साफसफाई --स्वछ़ता या बाबतीत व्यापारी -- अन्न व औषध प्रशासन ह्यांची चर्चा. 
      सर्व व्यापारी यांना अन्न व औषध प्रशासनाचे कायदे -- नियम समजावे या करीता प्रशासनाने व्यापारासाठी कार्यशाळा घ्यावी, गोडाऊन फी बाबत मी केंद्राकडे पाठपुरावा करणार परंतु अन्न व औषध प्रशासनाने व्यापारी वर्गाला त्रास देऊ नये असे सांगितले.

Wednesday, January 20, 2021

केरळ राज्या प्रमाणे वीज बिलाचे कारण जाहीर केली

केरळ राज्या प्रमाणे वीज बिलाचे कारण जाहीर केली


 पालघर (प्रतिनिधी)महावितरण ने वीजबिल थकबाकी दारांकडून वीजबिल वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याचा जो आदेश काढला आहे त्याचा महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना , पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रकाश लवेकर यांनी निषेध करून आंदोलनाचा इशारा दिला आहे,

करोना काळामध्ये आलेले वाढीव वीजबिल सामान्य ग्राहकांना माफ करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी वेळोवेळी विजमंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली होती त्यांनतर त्यांनी दिवाळी ला तुम्हाला गोड बातमी देतो असे आश्वासन दिले होते परंतू प्रत्यक्षात कडु बातमी दिल्याचा आरोप लवकर यांनी केला  आहे,
आजही केरळमध्ये करोना काळातील ५० टक्के  वीजबिल माफ करण्यात आले आहे,   याप्रमाणे महाराष्ट्रात ही सर्वसामान्य विजग्राहकांचे ऑक्टोबर पर्यंत वीजबिल माफ करावे व उरलेल्या विजबिलावर ज्यांना एकत्र वीजबिल भरणे शक्य नाही त्यांना हप्ते पाडून द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना , पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रकाश लवेकर व कार्यवाह निखिल मेस्त्री यांनी केली आहे,

वीज वितरण व राज्य शासनाने या बाबत धोरण जाहीर करून मागणी मान्य केली  नाहीतर मोठे आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा संघटने तर्फे दिला आहे,
 या प्रसंगी विजबिलासाठी कोणाची वीज खंडीत करण्यात येत असेल तर त्यांनी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे,

Tuesday, January 19, 2021

ग्राहक संरक्षण फाउंडेशन तर्फे वसईत(जनजागृती) कार्यशाळा संप्पन

ग्राहक संरक्षण फाउंडेशन तर्फे वसईत(जनजागृती) कार्यशाळा संप्पन
दि.१७/०१/२०२१ रोजी ग्राहक संरक्षण फाउंडेशन (भारत सरकार मान्यता प्राप्त) संस्थेच्या वसई कार्यकारणी यांचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम जिमखाना हॉल पापडी वसई येथे वसई तालुका अध्यक्ष श्री. सतीश पोतदार व पालघर जिल्हा सचिव सौ. सानिका पोतदार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले असता सदर कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय महासचिव निलेश भोईर, महाराष्ट्र प्रदेश सचिव रवी राठोड व पालघर जिल्हा अध्यक्ष मिलिंद चुरी उपस्थित होते.  ग्राहक संरक्षण कायद्याची जनजागृती होऊन ग्राहकांना आपले अधिकार, कर्तव्य व जबाबदारीची जाणीव झाली तर त्यांची फसवणूक होणार नाही त्याबद्दल मार्गदर्शन केले.तसेच भेसळ, वजन काटा, दूध, मसाले यांचे भेसळ असेल तर ते कसे ओळखावे याचे प्रात्येशिक दाखविण्यात आले.या कार्यक्रमाला वसई तालुका कार्यकारणी  श्री सुनील पचलोड, उपाध्यक्ष, सुभाष विश्वकर्मा, उपाध्यक्ष, नवनाथ सुरवसे, मुख्य सचिव, अमोल हटकर, खजिनदार प्रमोद गुरव, सचिव, राजकुमार विश्वकर्मा, गणेश माने, कल्पना गंभीरे,अजित सातघरे,जयंत चव्हाण तसेच मोठ्या संख्येने  परिसरातील नागरीक उपस्थित होते.

Monday, January 18, 2021

वनजमीन विकास कामासाठी खासदार मा. श्री राजेंद्र गावित वनविभागास संगणक देणार

वनजमीन विकास कामासाठी खासदार मा. श्री राजेंद्र गावित वनविभागास संगणक देणार 
पालघर- ( हिरालाल लोखंडे)  दिनांक १८जानेवारी २०२१ रोजी पालघर येथे वनजमीनीवरील रखडलेली विकास कामे मार्गी लागण्यासाठी खासदार श्री राजेंद्र गावित साहे यांच्या सह झालेल्या बैठकीत विकास कामे मार्ग निघत असून वनविभागाच्या कामासाठी गती येणे कामी गावित साहेब खासदार निधीतून संगणक  देणार. 
मा खासदार श्री राजेंद्र गावित यांनी वनाधिकारी, लोकप्रतिनिधी, स्थानिक गावकरी यांना एकत्रीत  करून वनविभागामूळे रखडलेल्या विकासासबंधित आढावा  बैठक आयोजित केलेली.  विकास कामा बाबतीत असलेल्या अडचणी दुर करण्याबद्दल योग्य त्या सूचना वनविभागाच्या अधिकारी वर्गास करण्यात आल्या.  
 सागावे --नावझे रस्ता, मासवण -- ७ गावे गावांतील पाणी योजना, कोढांण ६ गावांची पाणी योजना,  देवखोप -- थालेपाडा व गडग पाडा रस्ता,  वाघोबा येथील सोई-सुविधा कामाचा आढावा. 
     पालघर येथील सामान्य जनतेला नक्षत्र उद्यान उपल्ब्ध करुन देखरेखीसाठी नगरपरिषद पालघरला देणे चर्च. मुंबई - अहमदाबाद महामार्ग - वनजमीनीवरील अतिक्रमण, घोडबंदर ते तलासरी बाबत कारवाई करणे, महावितरण  विकासाच्या कामात वनजमीनी मुळे आलेल्या समस्या चर्चा, अनेक विकास कामात येणाऱ्या समस्यांवर चर्चा करून सबंधित अधिकारी कर्मचारी यांना सुचना दिल्या.  
या बैठकीत श्री केदार काळे -- शिवसेनेचे पालघर लोकसभा सहसमन्वयक, श्री विजय भिसे - डहाणू डि, एफ, ओ, श्री गजानन सानप सहा- डि, एफ, ओ, पालघर.तसेच वनक्षेत्रपाल पालघर - दहिसर -( तर्फे मनोर)  सफाळे आदी. श्री आर एस संखे,महावितयण अधिकारी, जयेंद्र दुबळा-जी. प.गट नेते, सौ विनया पाटील जी. प. स.सदस्य ,तुषार पाटील - प. स. सदस्य, रामदास बोंड - सरपंच  सावरे. समिर पाटील, विकास पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. तिन महिन्यानंतर वरिल कामाची आढावा बैठक आयोजित करण्यात येईल.

राष्ट्रीय स्तरावरील रिसेन्ट ट्रेन्ड ईन ट्रीटमेन्ट ऑफ कोव्हीड -19. ई-पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा मातोश्री कॉलेज ऑफ डी.फार्मसी एकलहरे येथे संपन्न : संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी सहभागी.

राष्ट्रीय स्तरावरील रिसेन्ट ट्रेन्ड ईन ट्रीटमेन्ट ऑफ कोव्हीड -19. ई-पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा मातोश्री कॉलेज ऑफ डी.फार्मसी एकलहरे येथे संपन्न : संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी सहभागी.

 नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.

एकलहरे नाशिक येथील मातोश्री कॉलेज ऑफ डी.फार्मसी तर्फे राष्ट्रीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा डिप्लोमा फार्मसी च्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर "रिसेन्ट ट्रेन्ड ईन ट्रीटमेन्ट ऑफ कोव्हीड -19" या विषयावर आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचे नियोजन मातोश्री कॉलेज ऑफ डी.फार्मसीचे विभाग प्रमुख प्रा.प्रशांत चव्हाण, समन्वयक प्रा.ज्योत्सना महाजन आणि प्राचार्य डॉ.गोकुळ तळेले यांच्या मार्गदर्शनाखाली केले. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे परीक्षक डॉ.नितीन हिरे, डॉ.नितीन हसवाणी, डॉ.तेजस पाचपुते, डॉ.किरण पाटील, डॉ.महेश पवार, डॉ.डी.के.पाटील, प्रा. सौ.रशमी मिसाळ यांनी गुणमापण करुण १६ विद्यार्थ्यांची निवड केली व गुगल मीट या ॲपच्या माध्यमातून त्यांची ऑनलाईन स्क्रीनिंग परीक्षा घेण्यात आली. ऑनलाईन स्क्रीनिंग मध्ये विद्यार्थ्यांनी आपापल्या पोस्टर्सचे प्रेझेन्टेशन परीक्षक मंडळासमोर केले. स्पर्धा संपन्न झाल्यानंतर परीक्षक मंडळाने निकाल जाहीर केला त्यामध्ये प्रथम पारितोषिक १००१ रु. विलास बांगर,परिक्रमा कॉलेज ऑफ फार्मसी, आष्टी-श्रीगोंदा-अहमदनगर, द्वितीय पारितोषिक ७०१ रु. आसिफ तन्वर,एच आर पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,शिरपूर तर तृतीय पारितोषिक ५०१ रु. निशा चौधरी महाराणी अहिल्याबाई होळकर कॉलेज ऑफ फार्मसी,बोराडी यांना जाहीर करण्यात आले. सदर विजयी विद्यार्थ्यांचे मातोश्री शिक्षण मंडळाचे सचीव श्री . कुणाल दराडे प्राचार्य गोकुळ तळेले यांनी अभिनंदन केले . कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन स्पर्धेचे नियोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.

Sunday, January 17, 2021

राज्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या वेळेत बदल, पशुपालकांनी या नव्या वेळेचा लाभ घ्यावा.

राज्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या वेळेत बदल, 
पशुपालकांनी या नव्या वेळेचा लाभ घ्यावा.

पालघर (प्रतिनिधी)दि. 08 :- पशुसंवर्धन विभागातील सर्व पशुवैद्यकीय दवाखाने हे या यापूर्वी दोन सत्रात कार्यरत असल्याने पशुपालकांना या वेळा या अत्यन्त गैरसोयीच्या ठरत असल्याने आयुक्त पशुसंवर्धन, पुणे या कार्यालयास विविध निवेदने प्राप्त होत होती.
त्या अनुषंगाने पशुसंवर्धन आयुक्त, पुणे यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या वेळेत बदल झाला असून जिल्ह्यातील सर्व श्रेणी 1 व श्रेणी 2 हे दवाखाने आता सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 9.00 ते दुपारी 04.30 वाजेपर्यंत चालू राहणार आहेत. यामध्ये जेवणाच्या सुट्टी ची वेळ दुपारी 1.00 ते 1.30 वाजेपर्यत असणार आहे. तसेच दर शनिवारी दवाखाने हे सकाळी 8.00 ते दुपारी  1.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. पशुपालकांना आकस्मिक प्रसंगी 24 तास पशुसेवा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी या नव्या वेळेची दाखल घेऊन आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थे मधून पशुसेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त पालघर डॉ.प्रशांत ध. कांबळे यांनी केले आहे.
*********

मल्हार प्रतिष्ठान मुंबई द्वारा मायेचे पांघरुण

मल्हार प्रतिष्ठान मुंबई द्वारा मायेचे पांघरुण 
सफाळे - (हिरालाल लोखंडे)  
करोना प्रादुर्भाव काळात अनेकांना आपल्या नोकर्‍या गमवाव्या लागल्या, अनेकांचे रोजगार बुडाले अश्या काळात पालघर जिल्ह्यातील अनेक आदिवासी, मोलमजुरी करणारे बांधवांचे हातावर पोट असल्याने त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या, सर्वसामान्य जनतेच्या हाल अपेष्टा वाढल्या, त्यातच हिवाळा ऋतू - असल्याने थंडीत गारठून दिवस काढत असताना " मल्हार प्रतिष्ठान मुंबई " द्वारा -- जागृत संस्था --- सामाजिक कार्यकत्यांनी  "मायेचे पांघरुण -- मायेची ऊब " या उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत तांदुळवाडी येथील आदिवासी पाडा " उचावली " येथे ब्लँकेट - कपडे - जीवनावश्यक वस्तू - मास्क आदी मल्हार प्रतिष्ठान  मुंबई यांच्या सौजन्याने ग्रामस्थांना  मोफत वाटप करण्यात आले 
     मल्हार प्रतिष्ठान मुंबई गेली सतत ४ वर्षे विविध ठिकाणी सामाजिक कार्य करीत असून, या  संस्थे मार्फत आजपर्यंत ८० ते ९० मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करून अंधशाळा, वृद्धाश्रम, कर्करोग रुग्ण, आदींना आपुलकीचा एक हात देत आहे. असे श्री रमेश सोनावणे - संस्थापक अध्यक्ष यांनी बोलताना  सांगितले. श्री गणेश काळे -संस्थेचे  सचिव यांनी भविष्यात संस्थे मार्फत असे अनेक उपक्रम राबविण्यात येणार असे भाकीत केले. 
    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  सौ उज्ज्वला जैन उपसरपंच तांदुळवाडी, श्री सुजित पाटील पोलिस पाटील तांदुळवाडी, श्री प्रतिक पंडीत -सामाजिक कार्यकर्ते यांनी मोलाचे कार्य केले श्री रमेश सोनवणे -अध्यक्ष मल्हार  प्रतिष्ठान, श्री यशवंत मुणगेकर -सरचिटणीस, श्री उमेश सोनवणे - खजिनदार ,श्री शिवाजी सोळस्कर - उपाध्यक्ष जगदीश भाई , संतोष सपकाळ ,आदि मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते तर सफाळे पोलीस स्टेशनचे कार्यरत कर्मचारी श्री विशाल वसावे, श्री शिवपाल प्रधाने यांनी " खाकी वर्दितही दर्दी "असतो कार्यक्रमात हजेरी लावून जनतेस दाखवून दिले. ग्रामस्थांनी संस्थेचे व यांचे प्रमुख पाहुणे मनोमन आभार मानले.

कुणबी नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न*

*कुणबी नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न*
*****************************
*टीडीसीसी बॅंकेचे संचालक निलेश भोईर यांच्या हस्ते संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन*
    वाडा(प्रतिनिधी) वाडा तालुक्यातील ‌अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली व विश्वासपात्र ठरलेल्या कुणबी नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. १७/१/२०२१ रोजी पंचायत समिती प्रशिक्षण हॉलमध्ये पार पडली.
     सभेच्या सुरुवातीलाच गेल्या वर्षभरात मृत पावलेल्या पतसंस्थेच्या संचालकांच्या तसेच सभासदांच्या नातेवाईकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर पतसंस्थेने छापलेल्या *सन २०२१ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सभेसाठी विशेष निमंत्रित असलेले  ठाणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक निलेश भोईर यांच्या हस्ते करण्यात आले.* तसेच *संस्थेच्या सचिव सौ. वर्षाताई गोळे यांची वाडा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व संस्थेचे संचालक प्रफुल्ल मुकूंद पाटील यांची वाडा शहर व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.*
     त्यानंतर अल्पावधीतच संस्थेची यशस्वीरित्या सुरु असलेल्या वाटचालीचा लेखाजोखा संस्थेचे अध्यक्ष युवराज ठाकरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून, सचिव सौ. वर्षा गोळे यांनी आपल्या मनोगतामधून तर व्यवस्थापिका प्रज्ञा डोहाळे यांनी आपल्या अहवाल वाचनातून मांडला.
     संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा आलेख पाहता *संस्थेचे सल्लागार प्रफुल्ल (काका) पाटील यांनी आपल्या मनोगतामधून संस्थेच्या कार्याची प्रशंसा करुन समाधान व्यक्त केले. तर निलेश भोईर यांनीही संस्थेच्या यशस्वी वाटचालीबाबत कौतुक करुन संस्था गेली तीन वर्षे सतत ब ऑडीट वर्ग घेऊन सभासदांना लाभांश वाटपाचा ठराव घेत असल्याबाबत सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन करुन येत्या काळात ठाणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या माध्यमातून संस्थेला, संस्था मोठी होण्यासाठी सर्वतोपरी मदत दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.*
     सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा होऊन ठराव पारित करण्यात आले. यावेळी संस्थेचे सल्लागार डॉ. विवेक पाटील, संस्थेचे अध्यक्ष युवराज ठाकरे, उपाध्यक्ष विठ्ठल गोरे, सचिव वर्षा गोळे, सहसचिव हेमंत सांबरे, संचालक, प्रल्हाद सावंत, सौ. दिक्षिता पाटील, प्रफुल्ल पाटील, अजित ठाकरे, तज्ञ संचालक नाशिकराव पाटील, मोहन सोनावणे, संस्थेचे लेखा परिक्षक एन. बी. पाटील यांच्यासह संस्थेचे सभासद उपस्थित होते.
     सभेचे सूत्रसंचलन संस्थेचे सभासद ॠषिकेश सावंत यांनी केले तर आभार वर्षा गोळे यांनी मानले.

Saturday, January 16, 2021

२५७ आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरण*

*२५७ आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरण*

   पालघर(प्रतिनिधी) दि 16 : कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणास
जिल्हाधिकारी डॉ. माणिक
गुरसळ आणि जिल्हा परिषद मुख्य कार्याकारी अधिकारी
सिध्दाराम सालीमठ यांच्या
उपस्थितीत सुरवात झाली. पहिल्या टप्प्यात उपजिल्हा रुग्णालयडहाणू, उपजिल्हा रुग्णालय जव्हार,ग्रामीण रुग्णालय पालघर आणि वसई - विरारमहानगरपालिका क्षेत्रात वरूण इंडस्ट्रीस या चार केंद्रांवर २५७ आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. पालघर ग्रामीण रुग्णालयात आज जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. सागर पाटील यांना पहिली लस टोचून लसीकरणाचा शुभारंभ
करण्यात आला. पालघर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. उज्वला काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल
थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. राजेंद्र केळकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.
दयानंद सुर्यवंशी तसेच इतर
आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.४०० लसीकरणाचे उद्दीष्ट असून आज २५७ व्यक्तींना लस देण्यात आली. संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत लसीकरण सुरू होते. ग्रामीण रुग्णालयाच्या परिचारिकांमार्फत ही लस देण्यात आली.
    जिल्ह्यात १७ हजार ४११ लाभार्थ्यांना ही लस देण्यात
येणार आहे. त्यासाठी १९ हजार
५०० डोसेस जिल्ह्यात प्राप्त झाले आहेत.

*प्रादेशिक परिवहन ठाणे कार्यालयातर्फे ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन* *सुमारे महिनाभर राबवणार रस्ते सुरक्षा विषयक कार्यक्रम

🔴➖*प्रादेशिक परिवहन ठाणे कार्यालयातर्फे ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन*
 
*सुमारे महिनाभर राबवणार रस्ते सुरक्षा विषयक कार्यक्रम*

ठाणे (प्रतिनिधी):  प्रादेशिक परिवहन विभागातर्फे २२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात होणार असून महिनाभर चालणाऱ्या या अभियानातंर्गत रस्ते सुरक्षा विषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे ठाण्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वभंर शिंदे यांनी सांगितले.
 जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या नियोजन भवन येथेया राष्ट्रीय सुरक्षा अभियानाचे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रितसर उदघाटन  होणार आहे. या कार्यक्रमास खासदार आणि केंद्र शासनाच्या जिल्हा रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष कपिल पाटील, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, ठाणे ग्रामिणचे पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने,  ठाण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विलास कांबळे, ठाण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या अभियानात मंगळवार १९ जानेवारीला वायू प्रदूषण करणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम आयोजित करण्यात आली आहे. सोमवार २५ जानेवारीला ऑटो रिक्षाचालकांसाठी कार्यशाळा होणार आहे.  बुधवार २७  जानेवारीला जिल्ह्यातील विविध टोल नाक्यांवर रस्तासुरक्षक साहित्याचे वाटप करणार आहेत. शनिवार ३० जानेवारी रोजी महिलांची बाईक रॅली होईल. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरणाऱ्या या बाईक रॅलीसाठी सिने अभिनेते डॉ गिरीश ओक उपस्थित राहणार आहेत. शनिवार ६ फेब्रुवारी रोजी शालेय विदयार्थ्यांची वाहतूक करणारे चालक आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी कार्यशाळा होईल.  मंगळवार ९ फेब्रुवारी रोजी रिक्षा, टॅक्सी चालकांना  कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन करण्यात येईल. बुधवार १० फेब्रुवारीला दुचाकी वाहनांची मोफत यांत्रिकी   तपासणी शिबीर होणार आहे. बुधवार १७ फेब्रुवारी रोजी या अभियानाची सांगता होणार असून समारोपाच्या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी वैदही रानडे,  अपर पोलीस आयुक्त संजयसिंह येनपुरे उपस्थित राहणार असल्याचे ठाण्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंतकुमार पाटील यांनी सांगितले.

Thursday, January 14, 2021

जि.प. उपाध्यक्षांच्या हस्ते जव्हार व डहाणू तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा सत्कार*

*जि.प. उपाध्यक्षांच्या हस्ते जव्हार व डहाणू  तालुका  आरोग्य  अधिकाऱ्यांचा  सत्कार*
        जव्हार (प्रतिनिधी) कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया १००% च्या वर यशस्वी करण्याचे उद्दिष्ठ पूर्ण केल्याबद्दल डहाणू व जव्हार तालुक्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा जि.प. उपाध्यक्ष तथा  आरोग्य समिती सभापती निलेश सांबरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जव्हार तालुका आरोग्य अधिकारी डॉ.किरण पाटील आणि डहाणू तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप गाडेकर यांना यावेळी गौरविण्यात आले. 
       आदिवासी लोकसंख्या  अधिक असणारे  जव्हार व  डहाणू  तालुक्यांनी  कुटुंब कल्याण  चे उद्धिष्ठ पूर्ण करून उत्तम कामगिरी केली असून इतर तालुक्यांनी त्यांच्या पासून प्रेरणा  घेऊन त्यांनीही लवकरात लवकर आपले उद्दिष्ठ पूर्ण करावे असे प्रतिपादन यावेळी जि.प. उपा ध्यक्ष निलेश सांबरे यांनी केले. 
    कुटुंब कल्याण  शस्त्रक्रिया करण्यामध्ये जव्हार तालुक्याने  १२०% तर डहाणू तालुक्याने  ११०%  उद्दिष्ठ पूर्ण  केले. प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिरे आयोजित करून कोरोना काळात आतापर्यत जव्हार ने ४४७  उद्दिष्ठ असताना ५५५ शस्त्रक्रिया केल्या. यात ९ पुरुष शस्त्रक्रियांचा  समावेश आहे.  तर डहाणू तालुक्याने १२२९ उद्दिष्ठ असताना १३३१ शस्त्रक्रिया केल्या यात १८ पुरुष शस्त्रक्रियांचा समावेश आहे.   आरोग्य सेविकांनी या मोहिमेमध्ये  विशेष मोलाची भूमिका बजावली आहे.  यावेळी आरोग्य समितीचे सर्व सदस्य, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद चव्हाण, डॉ.अजय ठाकरे, डॉ. सागर  पाटील तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

करोना रूपी संक्रांत जाऊ दे ! सफाळावासी महिलांचे देवीला साकडे

करोना रूपी संक्रांत जाऊ दे ! सफाळावासी महिलांचे देवीला साकडे !
सफाळे ( हिरालाल लोखंडे)  कोरोना महामारीचे जग भरात सावट असतानाही, सफाळे येथे मकरसंक्रांतीचा सण मोठ्या उत्साहाने सालबाद प्रमाणे या वर्षी सुध्दा सफाळ्यातील शिक्षक कुटुंबातील महिलांनी सफाळे गावदेवी कुर्लाई मातेला सुवासनिचा वाण अर्पण करून मकरसंक्रांत साजरी केली. या प्रसंगी उपस्थित सुहासिनी महिलांनी " कोरोना रुपी संक्रांत जाऊ दे, सर्व जगातील लोकांना चांगले आरोग्य लाभू दे व नूतन वर्षात सर्वाच्या जीवनात गोडी - गुलाबा, सद्भावना राहुन संकटे टळू दे, असे साकडे देवीला घालण्यात आले. 
   सफाळे परीसरात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व अन्य भागातील   अनेक शिक्षक कुटुंबीय वास्तव्य करीत आहे, सुमारे दीड दशका पासून शिक्षक कुटुंबातील महिला कुर्लाई मातेच्या ( देवीच्या ) मंदिरात एकत्र येऊन त्यांच्या प्रथा --परंपरा -- रूढी -- चालीरीती प्रमाणे मकरसंक्रांतीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. परंपरे प्रमाणे एकमेकींना सुवासनिचे वाण देतात. तिळगूळ देऊन देवीकडे सुखी संसाराचे मागणं करतात.

Wednesday, January 13, 2021

सफाळे करांचा प्रामाणिकपणासापडलेले सोन्याचे मंगळसुत्र परत दिले सफाळे ( हिरालाल लोखंडे )

सफाळे करांचा प्रामाणिकपणा
सापडलेले सोन्याचे मंगळसुत्र परत दिले 
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) 
दिनांक २३ डिसेंबर २०२० रोजी सौ, दिपा दिपक पाटील  राहणार सफाळेगाव लग्नकार्याला जात असताना सकाळी सफाळे बाजार  भागात तिच्या गळ्यातील मंगळसुत्र हरले. शोध घेतला असताना मिळुन आले नाही परंतु लग्नाला जाणे गरजेचे असल्याने त्या लग्नाला निघुन गेल्या,  असता त्याच वेळेस सफाळे येथील रहिवासी श्री केतन कांतीलाल शहा हे कामा निमित्त रेल्वे फाटकातून जात असताना मंगळसुत्र पडलेले आढळले, त्यांनी ते मंगळसुत्र उचलून घेऊन त्यांनी त्यांचे मामा श्री किशोर बाबुभाई शहा यांच्या निदर्शनास आणून दिले , किशोर शहा यांनी सफाळे पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले ट्राफिक पोलिस श्री संदीप नांगरे यांना मंगळसुत्र मिळाल्याचे सागितले, श्री नांगरे यांनी सादर माहिती वरिष्ठांना दिली असता सदर हरलेल्या वस्तु बद्दल पोलिस स्टेशन मधुन स्पिकर द्वारे हरवलेल्या वस्तुची वारंवार  घोषणा करण्यातआली, सोशल मीडिया व्दारे लोकांना कळविण्यात आले ,सदर दागिना त्या दरम्यान पलक ज्वेलर्सचे मालक श्री नितीन कच्छारा सफाळे यांच्या कडे ठेवण्यात आला होता,  
      सदर हरवलेल्या दागिन्यांचा शोध घेत असताना सौ दिपा पाटील याना माहिती मिळाली सफाळे पोलिस स्टेशन मधे एक मंगळसुत्र मिळुन आले आहे, त्यानी सदर हरवलेले मंगळसुत्र याची आपले असल्याचे वेळ - काळ-ठिकाण आदी सांगितले असता ओळख पटल्याने दिनांक १३ जानेवारी २०२१ रोजी संध्याकाळच्या सुमारास सफाळे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री संदीप कहाळे याच्या उपस्थितीत श्री किशोर बाबुभाई शहा, नितिन कच्छारा यांच्या हस्ते  सदर महिलेला मंगळसुत्र परत दिले, हरवलेले मंगळसुत्र परत मिळाल्यानंतर महिलेने पोलिस - अधिकारी,पोलिस तसेच ज्यांनी तो दागिना सापडलेला तरी परत दिल्या बद्दल सर्वाचे आभार मानून  समाधान व  चेहर्‍यावर आनंद येऊन समाधानाने पोलिस स्टेशन मधुन गेली,

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...