Sunday, February 14, 2021

आर .आर. (आबा )पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेच्या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन



आर .आर. (आबा )पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेच्या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन
  
 पालघर (प्रतिनिधी)जिल्हा परिषदेच्या ग्राम पंचायत विभागा  मार्फत  पालघर जिल्ह्यातील तालुका स्तरीय व जिल्हा स्तरीय निवड करण्यात आलेल्या गावाना (आर. आर. आबा ) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजने अंतर्गत  पुस्कार  देण्यात येणार आहे. नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे दि. १६/ ०२ /२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता हा समारंभ पार पडणार आहे. जि.प.अध्यक्ष भारती कामडी यांच्या अध्यक्षतेखाली आणि  जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचे  उद्घाटन करण्यात येणार आहे.जि.प.उपाध्यक्ष निलेश सांबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, सभापती पशु संवर्धन व कृषी  समिती, सुशील चुरी, सभापती महिला व बाल कल्याण समिती अनुष्का ठाकरे, सभापती बांधकाम व वित्त समिती काशिनाथ चौधरी , सभापती समाजकल्याण  समिती   विष्णू कडव  व सर्व  जिल्हा परिषद  सदस्य  यांच्या प्रमुख  उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.  वेवजी, बोर्डी, हिरवे, जांबुगाव, कुर्झे या ग्रामपंचायतीना   जिल्हा स्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. तर अन्य  २५ ग्राम पंचायतीना तालुका स्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.   स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक उर्जा आणि पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर या निकषांवर सदर ग्राम पंचायतीना  हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.  अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत (प्रभारी),  तुषार माळी यांनी दिली.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...