Thursday, February 25, 2021

1 मार्च रोजी जात वैधता प्रमाणपत्रा संदर्भात वेबिनारचे आयोजन

*1 मार्च रोजी जात वैधता प्रमाणपत्रा संदर्भात वेबिनारचे आयोजन*

पालघर (प्रतिनिधी)दि. 25 :- जात प्रमाणपत्रांची पडताळणी करुन जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करणेची प्रकिया दिनांक 01/08/2020 पासून पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आलेली आहे. सदर प्रक्रियेमध्ये अर्जदारांनी ऑनलाईन अर्जामध्ये परिपूर्ण माहिती भरणे, आवश्यक दस्तऐवज स्कॅन करुन अपलोड करणे तद्नंतर अर्ज ऑनलाईन सबमिट करणे आवश्यक आहे. सदर पूर्तता केल्यावर अर्जाची प्रिंट काढून विहित मार्गाने पूर्वीप्रमाणेच सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत या समितीस अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.
महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांचे निर्देशानुसार सदर प्रक्रियेची सर्वसामान्य नागरिक, अर्जदार यांना माहिती व्हावी या दृष्टीकोनातून दिनांक 01/03/2021 रोजी दुपारी 3.30 वा. वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर वेबिनारची लिंक पुढीलप्रमाणे आहे.
विषय:-जात प्रमाणपत्र पडताळणी
वेळ:- दिनांक ०१/०३/२०२१, दुपारी ३.३० वा.
ZOOM Meeting
Meeting ID- ८२४६९९९५८८४.
Password- १२३४५६७८९
सदर वेबिनारमध्ये सहभाग घेण्यास इच्छुक असलेल्या सर्व नागरिकांनी  ZOOM App डाऊनलोड करुन त्याद्वारे सदर वेबिनारमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती चे सदस्य विशाल नाईक यांनी केले आहे.

000000000000

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...