Monday, November 30, 2020

सामाजिक संस्था व शासनाच्या समन्वयाने प्रश्न सोडवू-मु.का.अ.सिद्धाराम सालीमठ*

*सामाजिक संस्था व शासनाच्या समन्वयाने प्रश्न सोडवू-मु.का.अ.सिद्धाराम सालीमठ*
पालघर(प्रतिनिधी) पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात विशेषतः जव्हार, मोखाडा, विक्रमगड तलासरी डहाणू या तालुक्यांमधे अनेक सामाजिक संस्था जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या महिला बाल विकास विभाग ,आरोग्य ,पाणी पुरवठा, मनरेगा, पाणी स्वच्छता, शिक्षण, व इतर   विभागांमध्ये आपापल्या परीने आपापल्या क्षेत्रात काम करीत आहेत. कुपोषण, पाणीटंचाई, आरोग्य, शिक्षण इत्यादी विषयांमध्ये या सामाजिक संस्था जिल्ह्यात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. या सोबत च जिल्हा परिषद व सामाजिक संस्थांच्या  समनव्याने विकासाला आणखी चालना मिळावी या उद्देशाने  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम  सालीमठ यांनी या संस्थांचा आढावा घेतला.

 यावेळी  जिल्ह्यात सुरू असलेल्या सामाजिक कामांबाबत विविध सामाजिक संस्था व  सामाजिक दायित्व विभागाचे
अधिकारी यांनी २८ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या 
अधिकारी यांच्यासमोर आपल्या कार्यासंदर्मात माहितीचे
सादरीकरण केले. 

ज्या संस्था जिल्ह्यातील महत्वाच्या  प्रश्नांवर काम करतात अशा संस्थांकडून त्यांच्या कार्याचा अहवाल मागविण्यात आला होता
या मध्ये ऍक्शन अगेंस्ट हंगर, आदिवासी युवा सेवा संघ, ASK फौंडेशन, टाटा मोटर सीएसआर ठाणे , आरोहन, दीपक फौंडेशन, दिगंत स्वराज फौंडेशन, रोटरी क्लब ऑफ पालघर,  प्रसाद चिकित्सा, अगा खान एजन्सी फॉर हॅबिटट इंडिया, आयुष वारली पेंटिंग क्लस्टर डेव्हलपमेंट, जेएम फायनान्शियल फौंडेशन, ग्राममंगल, इंटरनॅशनल असोसिएट ऑफ लायन्स क्लब, केशव सृष्टी, गिरी वनवासी एज्युकेशनल ट्रस्ट, पार्टनर्स फॉर  अर्बन नॉलेज ॲक्शन अँड रीसर्च, क्वालिटी एज्युकेशन, सपोर्ट ट्रस्ट  सर नेस वाडिया फौंडेशन, गॅब्रिएल प्रोजेक्ट चारीटेबल ट्रस्ट,  मेकिंग अ डिफरन्स फौंडेशन, युवा मित्र आरोग्य मित्र, टाटा मोटर्स  फाउंडेशन या संस्था सहभागी झाल्या होत्या.

 सदर संस्थांनी यावेळी आपण जिल्ह्यात करत असलेली आपापल्या क्षेत्रातील करत असलेले उपक्रम, यशस्वी उपक्रम, प्रलंबित कामे,  शासनाचा सहभाग,  अपेक्षित सहकार्य , कामे करताना येणाऱ्या अडचणी  व इतर  अनेक बाबी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोर सादर केल्या. यात प्रामुख्याने कुपोषण, शिक्षण,आरोग्य, महिला सक्षमीकरण, पाणी टंचाई,   मनरेगा, शेतकऱ्याचे प्रश्न, शाश्वत उपजीविका, शेतीला पूरक व्यवसाय, स्वच्छता, स्थलांतर, व जिल्ह्यातील  इतर अनेक विषयांवर करत असलेले उपक्रमांबद्दल माहिती दिली.
 यावेळी मु.का.अ. सिद्धाराम सलिमठ  यांनी  सदर संस्थांच्या कामाचे कौतुक करून त्यांना आवश्यक त्या या मार्गदर्शक सुचना दिल्या कामकाजाची व्याप्ती वाढवण्यासाठी
जिल्ह्यातील प्रश्नांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यानुसार सामाजिक संस्थांनी कामे करावीत असे यावेळी मुका यांनी सुचित केले यामध्ये संस्थांना जेथे गरज असेल तेथे शासकीय यंत्रणेचे सर्वतोपरी सहकार्य लाभेल, तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील समस्या मार्गी लावायच्या असतील , विकासकामे करावयाची असतील  तर शासन व  सामाजिक संस्थांनी एकमेकांसोबत समनव्य साधून कार्य केले पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी अति.मु.का.अ चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक माणिक दिवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) तुषार माळी,  महिला व बाल विकास विभागाचे प्रमुख प्रवीण भावसार,पाणी पुरवठा, शिक्षण विभाग प्राथमिक माध्यमिक आरोग्य इतर  विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

Sunday, November 29, 2020

दिग्गज वार्ताहर *सकाळच्या बातम्यादिनांक :- ३०.नोव्हेंबर २०२०वार। :- सोमवार

*दिग्गज वार्ताहर *सकाळच्या बातम्या
दिनांक :- ३०.नोव्हेंबर २०२०
वार।    :- सोमवार

१) देशाच्या सीमेवरील दुश्मनांशी लढण्यासाठी सीबीआय आणि ईडीला पाठवा; शिवसेनेचा केंद्रावर निशाणा

१) लव्ह जिहादविरोधात उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या बेकायदा धर्मांतर विरोधी कायद्यांतर्गत बरेली जिह्यात पहिला गुन्हा दाखल

3) कोव्हीशिल्ड लसीने शरीरावर गंभीर परिणाम, चेन्नईच्या स्वयंसेवकाने केली पाच कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी

४) विद्यार्थ्यांमधील गणित, विज्ञानाची भीती घालवा, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शिक्षकांना सूचना

५) दुकानदार, फेरीवाले, आरोग्यसेवक, सफाई कर्मचारी, स्थलांतरितांच्या कोरोना चाचण्या वाढल्याने रुग्ण वाढले

६) नगरचा बीएसएफ जवान अडकला हनिट्रपमध्ये, पंजाब पोलिसांकडून चौकशी सुरू

७) तुम्हाला विधानसभेत उलटं टांगीन, भाजप नेते बबनराव लोणीकरांची पोलीस अधिकाऱ्याला धमकी

८) ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथने रविवारच्या सामन्यांत 64 चेंडूत 104 धावांची खेळी करत मास्टर ब्लास्टरसह सचिनच्या पंक्तीत पटकावलं स्थान

९) Moto G9 Plus स्मार्टफोन लवकरच होणार भारतात लॉन्च, रिपोर्टमधून खुलासा

१०) आशिकी फेम राहुल रॉय यांना आला ब्रेन स्ट्रोक, नानावटी रुग्णालयात केलं दाखल

जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी केली रेल्वे स्थानकाची पाहणी* पालघर(प्रतिनिधी) दि 29

*जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी केली रेल्वे स्थानकाची पाहणी*                                         पालघर(प्रतिनिधी) दि 29 
:. कोरोना बधितांचा आकडा नियंत्रणात ठेवण्यात जिल्हा प्रशासनास. यश आले होते परंतू काही दिवसा पासून कोरोना बधिताच्या आकड्यात थोड्या प्रमणात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्शवभूमीवर जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी पालघर, बोईसर ,  डहाणू रेल्वे स्थानकाची पाहणी केली.   
                     जिल्ह्यामध्ये  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढूनये यासाठी दळण वळनाचे मुख्य साधन रेल्वे असुन या रेल्वे स्थनकामध्ये तसेच रेल्वे मध्ये प्रवासी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी  नियमाचे पालन करत आहेत का ? नागरिक मास्क, सॉनिटायझर चा वापर करत आहेत का ?   सोशल डीस्टसिंग चे नियम पाळत आहेत का ? या बाबतची पहणी जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी  पालघर, बोईसर , डहाणू    रेल्वे स्थानकात  केली.
           पश्चिम  रेल्वे येथून सुटणाऱ्या विशेष रेल्वे  विशेषता दिल्ली राजस्थान, गुजरात, आाणि गोवा  याकडे जाणाऱ्या  डहाणू ,बोईसर, पालघर , रेल्वे स्टेशन वर पोहचणाऱ्या रेल्वे प्रवाशांची  कोविडची चाचणी  करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी दिले . गोवा , गुजरात ,राजस्थान दिल्ली येथून येणाऱ्या ट्रेनमधून   प्रवांशाच्या  तपासणीचीही व्यवस्था  बघण्यात आली .
.जिल्हाधिकारी  डॉ माणिक गुरसळ  यांनी कोरोनाचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी  संबधित रेल्वे स्टेशन वर नियूक्त केलेल्या केंद्राची  पाहणी करुन सबधितांना  सुचना दिल्या . बाहेरुन आलेल्या व्यकतीची   कोव्हिड चाचणी करण्यात यावी अशा सुचना यावेळी त्यांनी दिल्या . या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.किरण महाजन, प्रातं अधिकारी, गटविकास अधिकारी, रेल्वे स्टेशन अधिक्षक, रेल्वे स्टेशन मधील कर्मचारी , सुरक्षा कर्मचारी  बोईसर  ग्रामपंचातीचे पदाधिकारी   उपस्थित होते .           यावेळी नागरिकांच्या अडचणी जिल्हाधिकारी डॉ माणिक  गुरसळ यानी जाणून घेतल्या.
********************

* दिग्गज वार्ताहर *सकाळच्या बातम्यादिनांक:- २९.नोव्हेंबर २०२०वार। :- रविवार

* दिग्गज वार्ताहर *सकाळच्या बातम्या
दिनांक:- २९.नोव्हेंबर २०२०
वार।   :- रविवार

१) भारत आणि चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पूर्व लडाख सीमेवर भारताचे सागरी कमांडो; भारतीय हवाई दलाचे गरुड कमांडो दल पूर्व लडाखमध्ये आधीपासून तैनात आहे

२) आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची मोदी सरकारची तयारी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह; ३ डिसेंबरला चर्चा करण्यासाठी येण्याचे आवाहन

३) 'दिल्ली चलो' आंदोलनातील अनेक शेतकऱ्यांवर हरयाणात गुन्हे दाखल; सरकारी कामात अडथळा आणणे, खुनाचा प्रयत्न करणे, दंगल असे आरोप ठेवले आहेत

४) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेतलेल्या 'एमएचटी-सीईटी' परीक्षेचा निकाल शनिवारी रात्री जाहीर; 'पीसीएम' ग्रुपमधून पुण्याची सानिका गुमास्ते, तर 'पीसीबी' ग्रुपमधून पुण्याचाच अनिश जगदाळे राज्यात प्रथम

५) राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी चार हजार चारशे कोटी रुपये कर्ज उभारणीचा 'एशियन डेव्हलपमेंट बँके'कडे प्रस्ताव; राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
महाराष्ट्रात २४ तासात ५ हजार ९६५ कोरोना रुग्ण आढळले; २४ तासात ३ हजार ९३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले, रिकव्हरी रेट ९२.४ टक्के

६) केंद्र सरकारच्या कृषीविषयक कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला काही राजकीय पक्ष आणि संघटनांची फूस असल्याचा हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांचा आरोप

७) रशियाची कोरोनावरील स्पुटनिक लस भारतात तयार होणार; आरडीआयएफसोबत हेटरो लॅब लिमिटेड या औषध बनवणाऱ्या कंपनीचा करार; वर्षाला 10 कोटी डोस बनणार

८) कोरोनामुळे प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगाम लांबणीवर; दरवर्षी जुलै ते सप्टेंबरदरम्यान होणारी ही लीग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याचे संयोजकांकडून स्पष्ट

९) फिल्म मेकर जगतातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा आणि आशियाचे ऑस्कर असा मानला जाणारा यंदाचा 'यंग सिनेमा अवॉर्ड' हा पुरस्कार मराठी दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांना जाहीर

Friday, November 27, 2020

*कोकण विभाग*. ( विशेष लेख)*कोव्हिड वर मात करुन प्रशासनाचे पाऊल पुढे*

*कोकण विभाग*.    (  विशेष लेख)

*कोव्हिड वर मात करुन प्रशासनाचे पाऊल पुढे*
विशेष प्रतिनिधी:-
कोराना महासंकटाच्या काळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्याची धुरा साभाळण्यास सुरुवात केली जेमतेम शासनास चार महिने होत नाहीत तोपर्यंत या महामारीने रुद्र रुप दाखवण्यास सुरवात केली होती. जनतेचे प्राण वाचवणे हे शासनाचे प्रथम लक्ष होते. या साठी शासनाने आपली तिजोरी खाली केली निधीमधील मोठा हिस्सा कोरोना आटोक्यात आणण्यास दिला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांच्या प्रचंद इच्छा शक्ती मुळे तसेच अविरत कामामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाले तसेच मृत्यूदर फार मोठ्या फरकाने खाली घरसला हे सर्व करत असताना जिल्ह्यातील विकास कामे करण्यावर भर दिला गेला.
जिल्ह्यात कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या वैद्यकिय आपत्कालिन परिस्थितीवर जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागांच्या समन्वयाने नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सामुहिक प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सरासरी  90  टक्के एवढे झाले आहे. रूग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा मुख्यालय आणि तालुका स्तरावर वॉर रूम कार्यान्वित आहेत. त्याद्वारे रूग्णांच्या सहवासितांचा शोध घेऊन संनियंत्रण करण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे.
जिल्ह्यात वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात एकुण 5 तर पालघर ग्रामीण भागात 22 कोविड केअर सेंटर(CCC) असुन वसई-विरारमहानगरपालिका क्षेत्रात 4 हजार तर पालघर ग्रामीण भागात जवळपास  3246 बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात 3 तर पालघर ग्रामीण भागात 5 डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर(DCHC) आहेत. तसेच वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात 4 तर पालघर ग्रामीण भागात देखिल डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल (DCH)आहेत. या ठिकाणी रूग्णांना विविध आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टर्स आणि स्टाफनर्स व पॅरामेडीकल कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून गरजे नुसार रिक्तपदांवर भरती सुरू आहे. संशयित रुग्णांची RTPCR आणि रॅपिड ॲन्टीजन तपासणीद्वारे चाचणी केली जाते. डहाणू येथील MRHRU (मॉडर्न रूरल हेल्थ रिसर्च युनिट)
या लॅबमध्ये दररोज चाचण्या करण्यात येत आहेत. तेथे अत्याधुनिक RTPCR मशिन बसवण्यात आले चाचण्याची क्षमता वाढवण्यात येत आहे. तसेच ग्रामीण रूग्णालय पोशेरी येथे ट्रुनॅट मशिनद्वारा चाचण्या केल्या जातात. चाचण्यांसाठी प्रयोगशाळा, रॅपीड ॲन्टीजन कीटस्, दुर्गम भागात मोबाईल व्हॅनद्वारे ॲन्टीजन टेस्टींग आदींचे नियोजन करण्यात येत आहे. गरजेनुसार संस्थात्मक अलगीकरण करण्यात येत असून विलगीकरण सुविधा क्षमता वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. या करीता राज्य शासनाकडून आपत्ती व्यवस्थापन निधी मधून गरजेनुसार निधी राज्य शासन उपलब्ध करून देत आहे.
कोव्हिड-19 वर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध नाविन्य पूर्ण कृतिशील उपक्रमही राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात 18001215532 या टोल फ्री क्रमांकासह प्रत्येक गावात व नगरपालिकेच्या प्रभागामध्ये कोरोना प्रतिबंधक समिती कार्यान्वित करण्यात आली आहे. जोखमीच्या व्यक्तींचे नियमित सर्वेक्षण करण्यासाठी प्रत्येक आशा स्वयंसेविकांना पल्सऑक्सीमीटर तसेच थर्मल स्कॅनर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या शिवाय कोव्हिड-19 साठी प्रतिबंधात्मक उपाय, घ्यावयाची काळजी, रूग्णाची काळजी घेणाऱ्या व्यक्तींसाठी सूचना आदींबाबत विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे.
आरोग्य विभागाच्या बरोबरीने महसुल विभाग, पोलिस दल, जिल्हा परिषद, नगरपरिषद या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी स्वत:ला कोव्हिड-19 च्या काळात झोकून देऊन काम करीत आहेत. आपले कर्तव्य बजावत असताना पोलीस, डॉक्टर, अंगणवाडी सेविका, व अन्य विभागातील कर्मचारी कोरोनाने शहिद झाले आहेत.
लॉकडाऊनमध्ये पालघर जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील 75,771 मजूरांना पालघर जिल्ह्यातून उत्तरप्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, मध्यप्रदेश, बिहार, ओडीशा व पश्चिम बंगाल राज्यात जाण्याकरिता 45 विशेष श्रमिक ट्रेन सोडण्यात आल्या. सदर विशेष श्रमिक रेल्वे प्रवास भाड्याची रक्कम रुपये 4,31,42,585/- (अक्षरी सुमारे चार कोटी एकतीस लक्ष बेचाळीस हजार  पाचशे पंच्याऐंशी रुपये मात्र) मा.मुख्यमंत्री सहायता निधीमधून अदा करण्यात आलेली आहे. या विशेष श्रमिक ट्रेन सोडण्यासाठी जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वयंसेवी संस्था यांचा येथे विशेष उल्लेख करणे आवश्यक आहे. त्यांनी श्रमिकांची नोंदणी करून सर्व नियमांचे पालन करुन श्रमिकांना त्यांच्या घरी सुखरुप पोचवण्यास मदत केली.
तसेच गुजरात येथील पोरबंदर व वेरावळ या बंदरामध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील 20 हजारहून अधिक मच्छिमार बंधुना लॉकडाऊनच्या काळात डहाणू बंदरात उतरवून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मुंबई व परिसरातून त्यांच्या मुख्य गावी पायी निघालेल्या मजुरांसाठी लेबर कॅम्प उघडून त्यामध्ये मजुरांची सोय करण्यात आली.

*प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना*

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत माहे एप्रिल ते जूलै 2020 या कलावधीत पात्र लाभार्थ्यांना 2 लाख 95 हजार 698 क्विंटल तांदूळ व 21 हजार 936 क्विंटल गहू मोफत वितरीत करण्यात आला आहे. माहे मे व जून 2020 या काळामध्ये आत्मनिर्भर भारत आर्थिक पॅकेज योजनेअंतर्गत विनाशिधापत्रिकाधारक व विस्थापित मजूर यांना 13 हजार 500 क्विंटल तांदुळ,  व  615क्विंटल अख्खास चणा मोफत वितरीत करण्यात अला आहे. लॉकडाऊनच्या काळात शासनातर्फे 13  कम्युनिटी किचन द्वारे 37 लाख 24 हजार 223 व NGO 10 लाख 72 हजार 408 असे एकुण 47 लाख 96 हजार 631 असे फुड पॅकेट वितरीत करण्यात आले.
राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याकरिता पालघर जिल्ह्यात 26 जानेवारी 2020 पासून शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

*महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान योजना 2019*

महाराष्ट्र शासनाचे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान योजना 2019 जाहिर केली. सदर योजनेनुसार ज्या शेतकऱ्यांना दुष्काळ, अतिवृष्टी, नापिकीमुळे त्यांचे पिककर्ज मुदतीत परतफेड करता आले नाही. त्यामुळे त्यांना नवीन पिक कर्ज मिळत नव्हते अशा शेतकऱ्यांना त्यांचे कर्जा पासुन मुक्ती देण्यात आली. पालघर जिल्ह्यात सदर योजनेनुसार आतापर्यंत 11 हजार 200 शेतकऱ्यांना रु. 62.00 कोटींचा लाभ देण्यात आला. तसेच या शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत 5,500 शेतकऱ्यांना नव्याने पिक कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले असुन उर्वरीत शेतकऱ्यांना चालु हंगामात पिक कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
जिल्ह्याचे खरीप हंगामातील सरासरी क्षेत्र 1 लाख 03 हजार 225 हेक्टर असून आतापर्यंत 88,030 हेक्टर वर (85%) पेरणी झाली आहे. उर्वरीत पेरणी अंतिम टप्प्यात आहे. यात प्रामुख्याने भात 68,270 हेक्टर, नागली 7474 हेक्टर चा समावेश आहे.
खरीप हंगामात कृषी विभागाने 67 हजार आदिवासी शेतकऱ्यांसाठी प्रती शेतकरी 250 ग्राम तुरीचे बियाणे मोफत वाटप करून त्याची पेरणी भाताच्या शेताच्या बांधावर करून घेतली आहे. यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना येणाऱ्या कालावधीत चांगल्या प्रतीची तूर उपलब्ध होईल. यामुळे त्यांच्या आहारात प्रथिनांच्या प्रमाणात वाढ होऊन कुपोषण कमी होण्यास मदत होणार आहे.
भाताच्या एक पद्धतीमध्ये जोखिम असल्याने फळबाग आधारित शेती पद्धतीस चालना देण्यासाठी जिल्ह्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 2572 हेक्टर वर फळबाग लागवड करण्यात आली आहे. प्रामुख्याने जव्हार, मोखाडा व विक्रमगड तालुक्यात जवळपास 1 लाख 75 हजार काजू कलमे लावण्यात आली आहेत. ही कलमे रत्नागिरी जिल्ह्यातून CSR अंतर्गत L&T व JSW यांच्या सहयोगाने वाहतूक करून शेतकऱ्यांना मोफत देण्यात आली.
जिल्ह्यात एक वर्षापूर्वी अतितीव्र कुपाषित बालकांची 273 तर मध्यम कुपोषित बालकांची संख्या 2480 इतकी होती.  जिल्ह्यातील कुपोषण व बाल मृत्यु कमी करण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष टास्क फोर्सच्या माध्यमातून केलेल्या कामामुळे आज अनुक्रमे 234 व 2225 इतकी कमी करण्यात यश आले आहे. शासनाने नुकतीच आदिवासी बहुल भागातील नागरिकांसाठी लॉकडाऊनच्या परिस्थितीत विशेष मदत मिळण्यासाठी खावटी योजना मंजुर केली असून त्याचा जिल्ह्यामधील नागरिकांना फायदा होईल.
पालघर जिल्ह्याचे सुसज्ज व आदर्श असे प्रशासकीय मुख्यालय नजीकच्या काळात जिल्हावासियांना लाभणार आहे. सिडकोकडून सदर प्रकल्पाचे काम सुरू असून इमारतीचे स्थापत्य बांधकाम पूर्ण होत आहे. विद्युतीकरण, फर्निचर व रंगरंगोटीचे काम सुरू आहे. सदर काम पूर्ण होऊन लवकरच जिल्हा प्रशासनाचे काम नवीन इमारतीतून सुरू होईल.
आज पालघर जिल्ह्यात जी विकासकामे सुरू आहेत, ती पाहता लवकरच आपला जिल्हा राज्यात प्रगतीशील जिल्हा म्हणून ओळख निर्माण करेल यात शंका नाही. शासन आणि जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न तसेच जनसहभाग यामुळेच हे साध्य होत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भलेल्या आपतकालीन परिस्थितीत सर्व नागरिकांनी आता पर्यंत विशेष सहकार्य केले आहे. विशेषत: शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकत म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे व गृह भेटीद्वारे शिक्षण देण्याचे काम सुरू आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानाच्या माध्यमातुन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात शासनाला यश मिळाले आहे.  या अभियाना अंतर्गत या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे व वारंवार हात धुणे या बाबींचा अंगीकार करून त्याचे पालन केल्याचे जानवत आहे. या अभियानामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियत्रणात ठेवण्यात प्रशासनास यश मिळाले आहे.
कोरोना गेला नाही नागरिकांनी काळजी घेऊन आपले दैनंदिनी व्यवहार करावे असे अवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी जनतेला वेळोवेळी केले आहे. जनतेने सुध्दा या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन जिल्हा प्रशासनाच्या हातात हात घालून या युध्दात अटीतटीचा संघर्ष केल्याचे निदर्शनास आले आहे.

जिल्हा माहिती अधिकारी,
पालघर

*८९२ वैयक्तिक वनपट्ट्यांना मंजुरी*

*८९२ वैयक्तिक  वनपट्ट्यांना  मंजुरी*  

 प्रतिनिधी:-पालघर जिल्हयामध्ये अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्काची मान्यता)*अधिनियम २००६, नियम २००८  नियम व सुधारीत नियम २०१२ च्या
अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय वनहक्क समितीची बैठक दि.
२७/११/२०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे मा. जिल्हाधिकारी तथा
अध्यक्ष, जिल्हास्तरीय वनहक्क समिती यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. 
या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत डहाणू तालुक्यातील ८४९, तलासरी तालुक्यातील १३, पालघर तालुक्यातील ३० असे
एकूण ८९२ वैयक्तिक वनपट्ट्यांना  अंतिम मंजुरी देण्यात आली. प्रकल्प अधिकारी
एकात्मिक आदिवासी विकास विभाग डहाणू, जव्हार तथा सहाय्यक जिल्हाधिकारी
डहाणू, जव्हार यांनी सदर दाव्यांना लॅमिनेशन  करुन देण्याचा निर्णय मा. जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी घेतला.

जिल्हास्तरीय वनहक्क समितीचे सचिव  सुरेंद्र नवले,
उपजिल्हाधिकारी (सा.प्र.),  हनमंत धुमाळ उप वनसंरक्षक, जव्हार डहाणू
(सदस्य), तसेच समितीचे अशासकीय सदस्य  गणेश उंबरसाडा,  गुलाब
राऊत, जिल्हा परिषद सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.

 जिल्हाधिकारी यांनी वनहक्क दावे मंजुर करण्याचे कामकाजाला प्राथमिकता दिली असून पालघर जिल्हयातील प्रलंबित वनहक्क दाव्यांचे कामकाज लवकरात लवकर पूर्ण करण्याचा विश्वास  जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी व्यक्त केला आहे.
तसेच वनहक्क शाखेचे  अ.का.हरीश सोनवणे, वनहक्क सहाय्यक शरद गजले, अक्षय महाले,सुनील वरठा,मोहसीन तडवी 
म.स मोनिका ब्राम्हणकर उपस्थित होते.

शनिवार दि. 28 नोव्हेंबर 2020वर्षपूर्ती शासनाची…

शनिवार दि. 28 नोव्हेंबर 2020
वर्षपूर्ती शासनाची… गतीमान वाटचाल कोकणाची
कोकण महसूल विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र असे वैशिष्ट्य आहे. सागरी, डोंगरी, शहरी आणि औद्योगिकरणात विभाग पुढे आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या  सरकारने वर्षभरात कोकण विभागात अनेक महत्वाचे निर्णय घेतले. गणपतीपुळे विकास कार्यक्रमाअंतर्गत भरीव निधी देण्यात येवून पर्यटनाच्या विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना  देण्यात आली. कोरोना सारख्या महाभयंकर आपत्तीला महाराष्ट्र्राने समर्थपणे तोंड दिले. कठीण काळ होता. तरीही विकासाचा वेग आणि सर्वसामान्य माणासाच्या हिताचा निर्णय घेण्यास शासन कमी पडले नाही. महाराष्ट्र थांबणार नाही हे दाखवून दिले. कोकणात आलेल्या ‘निर्सग’ चक्री वादळामुळे खूप मोठे नुकसान झाले. शासनाने यासाठी भरीव मदत केली. तत्काळ मदतकार्य लोकांपर्यंत पोहचविले. मुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांनी आपत्तीच्या काळात वेग देऊन जनतेला दिलासा दिला.  कोकण थांबले नाही  आणि थांबणारही नाही. हे करुन दाखविले.
महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षभरात अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले. केवळ सांगितलेच नाही  तर, करुन दाखविले. आरोग्याच्या बाबतीत वर्षभरात घेतलेल्या निर्णयांची पावती जनेतला मिळाली. कोरोना काळात सर्वात आवश्यक होते ते सॅनिटायझर याची मागणी वाढली आणि  वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अल्कोहोल उत्पादक (डिस्टिलरीज) यांना एक दिवसात परवाना मंजूर करण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलात देखील आणला. योग्य किमतीत अन्न पदार्थ  मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील, यासाठी सर्व उत्पादक व वितरकांच्या अडचणी  सोडविण्यासाठी मुख्यालय व जिल्हास्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे रुग्णांसाठी ऑक्सिजन कमी पडू नये व रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्यातील इच्छुक ऑक्सिजन उत्पादकांना तत्काळ परवाना मंजूरी देण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन घाऊक वितरक, दहा किरकोळ औषध विक्रेत्यांकडे खासगी व्यावसायिकांसाठी माफक दरात पीपीई किट व एन-95 मास्क किंवा त्या दर्जाचे इतर मास्क उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आले. कोविड-19 प्रादुर्भाव काळात लक्षणीय कामगिरी. अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त कार्यालयात 24 तास नियंत्रण कक्ष. जनतेच्या, रुग्णांच्या तक्रारी नोंदवून तत्काळ चौकशी करण्याची व्यवस्था केली. टाळेबंदी काळात राज्यातील सर्व दुकानांमध्ये जीवनावश्यक वस्तू पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील, याची यशस्वी खबरदारी घेतल्यामुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा कमी पडला नाही. कोविडसाठी लागणारे रेमेडिसिवीर जनऔषधी केंद्रावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचले.कोकण विभागात आरोग्य व्यवस्थेने अत्यंत चांगले कार्य केले त्यामुळे कोरोनावर प्रतिबंध करण्यात यश मिळाले. 
शासनाची महत्वकांक्षी योजना म्हणजे शिवभोजन योजना होय. 26 जानेवारी 2020 पासून शिवभोजन योजना सुरू झाली. शिवभोजन थाळीचा दर शहरी भागात 50 व ग्रामीण भागात 35 रुपये असा निश्चित  करण्यात आला.  सुरुवातीला  ग्राहकाला 10 रुपये प्रतिथाळी याप्रमाणे जेवण उपलब्ध करून दिली.  हे दहा रुपये व शहरी भागासाठीचे 40 व ग्रामीण भागासाठीचे 25 रुपये प्रति थाळीची उरलेली रक्कम शासनामार्फत अनुदान म्हणून शिवभोजन केंद्रांना वितरित करण्यात आली. गरीब आणि कष्टकरी जनतेला यामुळे शासनाविषयी विश्वास निमार्ण झाला. शासन आपल्यासाठी आहे. ही भावना शिवभोजन केंद्रात लाभ घेणाऱ्या अनेकांच्या मनात आहे. राज्यात 907 शिवभोजन केंद्रे सुरू आहेत. 7 नोव्हेंबर पर्यंत 2 कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी योजनेचा लाभ घेतला. शासनाने  शेतकऱ्यांनी पिकविलेल्या अन्नधान्य साठवण्यासाठी 31,320 मे.टन क्षमतेच्या 21 नवीन गोदामांना मान्यता दिली.  आणि सुमारे 51 कोटी रुपयांचा निधीही  वितरित करण्यात आला. 
शासनाने अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी महत्वपूर्ण निर्णय वर्षभरात घेतले. राज्यात शासनाने सर्व धर्मीयांना समान न्याय दिला. अल्पसंख्यांक समाजातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना बचतगटाच्या माध्यमातून संघटित करून उद्योग व्यवसाय करण्यासाठी  प्रोत्साहित करण्याच्या योजनेला 31 मार्च 2025 पर्यंत 5 वर्षांची मुदत वाढ देण्यात आली.  महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत 8 हजार 800 महिलांचे संघटन करून 800 बचत गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला.  सध्या कार्यरत असलेल्या 3 हजार 200 बचतगट  व  नव्याने स्थापन होणाऱ्या 800 बचत गटातील सदस्यांना कौशल्य वृद्धीचे प्रशिक्षण, त्यांची बँकांशी जोडणी व कर्ज उपलब्धता करून देऊन बचत गटांच्या उपक्रमांना चालना देण्याचा निर्णय घेतला. अल्पसंख्यांक समाजाचे शासकीय सेवेतील प्रमाण वाढवण्याकरिता  युपीएससी स्पर्धापरीक्षा प्रशिक्षण योजना. प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांच्या विद्या वेतनात 2 हजारांवरून 4 हजार रुपये इतकी वाढ केली. वक्फच्या जमिनी, मालमत्ता कवडीमोल दराने भाड्याने देण्यास आळा  घातला. आणि मुंबईतील एका वक्फ मालमत्तेच्या भाड्यात अडीच हजारावरून 2.55 लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यास मान्यता. देण्यात आली. डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेतून 168 मदरसांना शिक्षकांच्या मानधनासाठी 2.31 कोटी रुपये वितरित करण्यात आले. राज्यातील शासकीय आणि खासगी 84 आयटीआय मध्ये 8  हजार 348 अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण  देण्याची  सोय केली. अल्पसंख्यांक समाजातील मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना  देण्यासाठी  राज्यात 23 ठिकाणी  शैक्षणिक संकुलांमध्ये वसतिगृहे प्रवेश प्रक्रिया सुरू  करण्याचा  निर्णय घेतला. पोलीस भरतीच्या तयारीसाठी अल्पसंख्यांक तरुणांसाठी विविध जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण योजना लागू केली. याचा फायदा कोकण विभागात अधिक झाला. 
कोकणाच्या  सागरी  संसाधनांच्या सुयोग्य वापरासाठी महाराष्ट्र ओशन अप्लॉईड सायन्सेस युनिव्हर्सिटी रत्नागिरी येथे स्थापन करण्यासाठी  समिती गठित करण्यात आली.  याचा लाभ संपूर्ण कोकणाला होईल.  आजी माजी सैनिकांच्या पाल्यांना व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता 5 टक्के आणि कमाल 5 जागांची अट रद्द करून एकूण प्रवेश क्षमतेच्या 5 टक्के जागा आरक्षित करण्यात आल्या. केंद्र शासन सेवांमध्ये मराठी विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. भविष्यात कोकणातील अनेक तरुण भारतीय प्रशासकीय सेवेत असतील.  छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने  प्रकाशन समिती  तसेच लोकमान्य टिळक चरित्र साधने प्रकाशन समिती  स्थापन  करण्याचा निर्णय झाला.  अतिवृष्टी, पूरपरिस्थिती  व कोविडमुळे बाधित झालेल्या विद्यार्थ्यांकरिता परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाव्यतिरिक्त इतर वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पूर्वीच्या सत्रातील कामगिरी आणि अंतर्गत मूल्य मापनाच्या आधारे प्रवेश देण्यात आला. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन / ऑफलाइन / मिश्र पद्धतीने सुरळीतपणे पार पाडण्यात आल्या.
सामूहिक प्रोत्साहन योजना 2019 अंतर्गत कृषी व अन्न प्रक्रिया क्षेत्रातील मोठ्या व विशाल प्रकल्पांच्या गुंतवणूक निकषांमध्ये बदल केला. त्यानुसार राज्यातील आरक्षित जिल्ह्यातील उद्योगांना 110 टक्के, मराठवाडा, विदर्भ, धुळे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधील उद्योग घटकांना 100 टक्के व उर्वरित महाराष्ट्रातील ड/ड+ तालुक्यांमधील उद्योगांना 100 टक्के व उर्वरित तालुके जे अ/ब/क प्रवर्गात येतात त्यांच्या कृषी आधारित व अन्न प्रक्रिया उद्योगांशी संबंधित प्रकल्पांना भांडवली गुंतवणुकीच्या मर्यादेत अनुक्रमे 50 टक्के व 75 टक्के प्रोत्साहन देण्याचा निर्णय झाला.  एक खिडकी योजनेद्वारे ‘मैत्री’ मार्फत या वर्षामध्ये 51,700 ना-हरकत प्रमाणपत्रे / परवाने देण्यात आले. उद्योग घटकांना सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत या वर्षी 2 हजार 600 कोटी रुपये वित्तीय भांडवल व इतर प्रोत्साहने देण्याची लक्षणीय कामगिरी  केली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उद्योगांसाठी ‘प्लग अॅसण्ड प्ले’ सुविधा तयार करुन गाळे उपलब्ध करुन देण्यात आले.  मोठ्या गुंतवणुकदारांना त्यांचे उद्योग सुरू करण्यासाठी ‘उद्योगमित्र’  संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला. यामुळे उद्योग वाढीसाठी भविष्यात कोकण विभागात चालना मिळेल. पर्यटनासोबत कोकणात उद्योग वाढीस लागतील. स्थानिकांना यामुळे नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
निसर्ग चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या महावितरणाच्या पायाभूत सुविधांची पुनर्स्थापना विक्रमी वेळेत पूर्ण करण्याचा पायंडा  या काळात झाला.  रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील वीज मिळण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. फळपीक विमा योजनेत यावर्षी 2.43 लाख शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानी पोटी 719 कोटी रुपये विमा रकमेचे वाटप करण्यात आले. पीक विमा सुलभी करणासाठी ‘मोबाइल अॅरप’ निर्माण करुन शेतकऱ्यांना अधिक सोपे तंत्रज्ञान उपलब्ध  झाले.  फळपीक विमा योजनेत पहिल्यांदा स्ट्रॉबेरीचा समावेश शासनाने केला.  
कोकण विभागात रानभाज्यांना मोठी मागणी आहे. पारंपारिक  भाज्या रोजच्या आहारात खाल्या जातात. मात्र यंदा शासनाने ‘रानभाज्यांचा  महोत्सव’ भरुन विशिष्ट मर्यादेत भाज्यांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याबरोबरच जनतेला नवीन भाज्यांची माहिती करुन दिली. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात या महोत्सावाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.  यामुळे राज्यभरात सुमारे 96 प्रकारच्या भाज्यांच्या प्रकारांची नोंद करण्यात आली हे विशेष होय. यातून  सुमारे 14 लाख रुपयांची उलाढाल आणि 119 ठिकाणी रानभाज्या विक्री सुविधा निर्माण करण्यात शासन यंत्रणेला यश आले. 
  लॉकडाऊन काळात मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर येथील सुमारे 530 बांधकामांच्या ठिकाणी अडकलेल्या 82 हजार कामगारांना भोजनाची  सोय करण्यात आली.  जिल्ह्या- जिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाइन रोजगार मेळावे व इतर उपक्रमांमधून जानेवारी ते ऑक्टोंबर 2020 पर्यंत राज्यात 1 लाख 48 हजार 343 बेरोजगारांना मिळाला रोजगार. महास्वयम वेबपोर्टलवर उद्योजक व उमेदवारांसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या. उमेदवारांना रोजगारासंबंधी ऑनलाइन समुपदेशन. 5 हजार प्रशिक्षण केंद्रांचे महास्वयम पोर्टलवर जीआयएस मॅपिंग करण्यात आले. त्यामुळे प्रशिक्षण केंद्राची अचूक व वास्तविक माहिती मिळणे शक्य झाले आहे.
वैद्यकीय क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण घेतलेल्या सुमारे 10 हजार 815 युवकांच्या याद्या कोविड-19 कालावधीत सर्व आयुक्त, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी-जिल्हा परिषद यांना नियुक्तीसाठी सुपुर्द केले आणि त्यांचा खूप चागंला उपयोग झाला. 
रायगड जिल्ह्यातील माणगांव येथे विभागीय क्रीडा संकुल आणि  प्रशिक्षण केंद्र उभारणीसाठी निधी आणि जमिनी उपलब्ध करुन देण्यात आली.  शासनाने संशोधन, प्रशिक्षण व कौशल्य विकास यामधील गुणवत्ता निर्माण करण्यासाठी आंतर राष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. 
कोकणातील खार जमिन विकासाचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित होता. शासनाने वर्षभरात यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले त्याचा फायदा कोकण विभागाला झाला. त्यात नारवेल, ता. पेण, जि. रायगड, काचलीपीट ता. अलिबाग, जि.रायगड आणि पालघर येथील खार भूमी योजनांची कामे सुरू झाली.  हे काम  दिड वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे.  यामुळे 2 हजार 52 हेक्टर क्षेत्रात पुनर्वापर होणार आहे.  याशिवाय  पालघर जिल्ह्यातील कोल व बापानेता, वसई योजनांच्या नुतनीकरणाची  कामे सुरू केली. माणकुले, सोनकोठा, हाशीवरे या तीन योजनांची कामे दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन केले. यामुळे 918 हेक्टर क्षेत्रात पुनर्वापर होणार आहे.  याशिवाय शासनाने गृहनिर्माण, जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, ग्रामविकास, गृह, नगरविकास, नियोजन, पणन, पर्यावरण आणि वातावरणीय बदल, परिवहन, पर्यटन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायविकास, पाणी पुरवठा व स्वच्छता, फलोत्पादन, मत्स्यव्यवसाय, बंदरे, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन,  मराठी भाषा, महसूल, महिला व बालविकास, माहिती तंत्रज्ञान, मृद् व जलसंधारण, राज्य उत्पादन शुल्क, रोजगार हमी, वने, वित्त, विधी व न्याय, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, संसदीय कार्य, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य, सहकार, सामान्य प्रशासन, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक बांधकाम  या क्षेत्रातही भरीव कामे शासनाने केली आहेत. 
पर्यटनाला चालना देण्यासाठी समुद्रकिनारी आनंद कुटी (बीच सॅक्स)उभारण्याचा निर्णय झाला.  या निर्णयामुळे गोव्याकडे जाणारे पर्यटक कोकणाकडे आकर्षित होतील. काजूपासून तयार होणाऱ्या फेणीला कर सवलतीचा निर्णय आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पाजवळ ‘ईको टुरिझम’ प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. कोकणातील मच्छीमारांच्या डिझेल अनुदानासाठी 5 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. समुद्राच्या लाटांपासून वीज निर्मितीसाठी संशोधन सुरु केले आहे. मांडवा ते अलिबाग रस्त्याच्या कामाला गती दिली आहे. भाऊचा धक्का ते मांडवा रो- रो सेवा सुरु करुन पर्यटनाला चालना दिली आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटक वाढावेत यासाठी पायाभूत सेवांची निर्मिती करण्यात आली आहे. कोकणात अतिवृष्टी, निसर्ग चक्रीवादळ, आणि कोरोना सारखे महाभयंकर संकट येऊनही कोकण थांबला नाही आणि पुढेही थांबणार नाही. 
मुख्यमंत्री, श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी 28 नोव्हेबर 2019 रेाजी उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्यासह 33 मंत्री आणि 10 राज्यमंत्री  यांनी  शपथ घेऊन कामकाज सुरु केले होते. आज बरोबर एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या वर्षभरात महाराष्ट्र आणि विशेषत: कोकणासाठी शासनाने घेतल्या महत्वपूर्ण निर्णयाची दिशा स्पष्ट झाली आहे. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या  संवर्धनसाठी 20 कोटी  रुपये निधी देऊन सरकारने कामाची सुरुवात केली होती. आज वर्षभराचे सिंहावलोकन केले असता महाराष्ट्र आणि कोकण विभागासाठी  शासन विश्वासार्ह, पारदर्शक दमदार वाटचाल करीत असल्याचे चित्र दिसून येते.  हे खूप आशादायक चित्र आहे. 

  डॉ.गणेश व.मुळे
  उपसंचालक (माहिती)
कोकण विभाग, नवी मुंबई
000000

दिग्गज वार्ताहर*सकाळच्या बातम्यादिनांक :-२७.नोव्हेंबर २०२०वार। :- शुक्रवार

दिग्गज वार्ताहर*सकाळच्या बातम्या
दिनांक :-२७.नोव्हेंबर २०२०
वार।    :- शुक्रवार

१) जेलमधून भाजप आमदाराला फोन करणं महागात, लालू यादवांविरोधात गुन्हा दाखल

२) मोदींना प्रचारासाठी घेऊन या, तुमच्या किती जागा येतात बघू; ओवेसींचं भाजपला थेट आव्हान

३) आचारसंहितेचे पालन करत निवडणूक प्रक्रिया सतर्कतेने पार पाडा - मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह

४) पाकिस्तानने दहशतवादी हाफिज सईदला तुरुंगातून बाहेर काढले, गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांची माहिती

५) 'निवार' चक्रीवादळामुळे पाँडेचरीत अतिवृष्टी; राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता

६) उद्धव ठाकरे मराठाद्वेषी; ते मुख्यमंत्री असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही: नितेश राणे

७) विरोधी पक्षांकडून राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आंदोलन, उदय सामंतांची मनसे, भाजपवर टीका

८) Nokia 2.4 स्मार्टफोन भारतात लॉन्च, 4500mAh च्या दमदार बॅटरीसह मिळणार 'अनेक आकर्षक' फिचर्स

९) बजरंग पुनिया व संगीता फोगाट अडकले लग्न बंधनात, सप्तपदीच्या जागी घेतल्या अष्टपदी

१०) बॉलिवूड स्टार वरुण धवन आणि सारा अली खान यांचा बहुचर्चित कुली नंबर १ सिनेमा 25 डिसेंबर रोजी रिलीज होणार

Thursday, November 26, 2020

पालघर रेल्वे स्थानकातील राष्ट्रध्वज गायब,आमदार श्रीनिवास वनगा यांनी व्यक्त केली नाराजी*

*पालघर रेल्वे स्थानकातील राष्ट्रध्वज गायब,आमदार श्रीनिवास वनगा यांनी व्यक्त केली नाराजी*
पालघर(प्रतिनिधी)
पालघर जिल्हा मुख्यालय व पश्चिम रेल्वे चे महत्वाचे रेल्वे स्टेशन म्हणून पालघर स्थानक सर्वश्रुत आहे. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या व लोकल वाहतूक तसेच जिल्ह्याचे मुख्यालय म्हणून हजारो रेल्वे प्रवासी ये जा करतात.दरम्यान भारतीय रेल्वेतर्फे प्रमुख स्थानकांवर १०० फुटांचे राष्ट्रध्वज लावण्यात आले होते.
पालघर रेल्वे स्थानक हे जिल्ह्यामुख्यालयाचे स्थानक असून येथे सुद्धा राष्ट्रध्वज लावण्यात आला होता.
आॅगस्ट महिन्यांपासून हा राष्ट्र ध्वज तांत्रिक अडचणी सांगुन काढून ठेवण्यात आला होता,राष्ट्रध्वज लावला जावा म्हणून अनेक रेल्वे प्रवाशी संगठना,सामाजिक कार्यकर्ते व पालघरच्या नागरिकांनी वेळोवेळी याबाबत रेल्वे प्रशासनास निवेदने दिली,मात्र नेहमी स्थानिक रेल्वे प्रशासन थातूर मातूर उत्तरे देऊन प्रवासी संघटनेस सहयोग देत नव्हती,  आणि प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तरे देऊन बोळवण करीत होते,प्रवाशी संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांनी पालघरचे शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांची भेट घेऊन याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली,
दरम्यान आज २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन असून ही राष्ट्रीय ध्वज लावला गेला नाही याची दखल घेत आमदार श्रीनिवास वनगा यांनी पालघर रेल्वे स्थानकास भेट दिली, व रेल्वे अधिकारी ना याबाबत विचारणा केली,
भारतीय संविधान दिन असून ही रेल्वे कडून राष्ट्रीय ध्वज लावला जात नाही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली,
दरम्यान सोमवार दिनांक रोजी आम्ही राष्ट्रीय ध्वज लावू असे  अधिकारी यांनी सांगितले,
यावेळी जर पुन्हा अशी हयगय केल्यास शिवसेना स्टाईल ने आंदोलन करु अशी आमदार वनगा यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितले,
यावेळी शिवसेना शहरप्रमुख भूषण संखे,महिला शहर संघटक व नगरसेविका अनुजा तरे, युवासेनेचे शहर प्रमुख निमेश पाटील, रेल्वे स्थानक समितीचे सदस्य ललित जैन, हिमांशू वर्तक,प्रदीप पाटील,विराग म्हात्रे,निलेश राऊत  व रेल्वे स्टेशन सुप्रीडेंटेड  जाधव आदी उपस्थित होते,

Wednesday, November 25, 2020

बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना

जि.प.पालघरदि.२५/११/२०२०*GPDP प्रमाणे निधीचं वाटप झाल्यास जिल्ह्याचा विकास कोणी रोखू शकणार नाही-उपाध्यक्ष निलेश सांबरे*

जि.प.पालघर
दि.२५/११/२०२०
*GPDP प्रमाणे निधीचं वाटप झाल्यास जिल्ह्याचा विकास कोणी रोखू शकणार नाही-उपाध्यक्ष निलेश सांबरे*
  
    पालघर (प्रतिनिधी)आमचा गाव आमचा विकास उपक्रमा अंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखड्या प्रमाणे निधीचे वाटप झाले तर पालघर जिल्ह्याचा विकास कोणी रोखू शकणार नाही, असे प्रतिपादन आज पालघर जि. प. उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी केले. जिल्हा परिषद पालघर ग्रामपंचायत विभागामार्फत राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत 'आमचा गाव आमचा विकास' उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करणेबाबत सर्व जि प सदस्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन आज उपाध्यक्ष सांबरे यांच्या हस्ते बोरगाव हॉटेल हिलझिल येथे करण्यात आले ,त्यावेळी ते बोलत होते . यावेळी वित्त सभापती काशिनाथ चौधरी, बांधकाम सभापती विष्णू कडव, जि. प. सदस्य राजेश मुकणे,  मनीषा निमकर, ज्योती पाटील  व जिल्हा परिषदेचे सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत हे उद्घाटन करण्यात आले.
 ७३ वर्षापासून जिल्ह्याचा विकास थांबलेला आहे व त्याला चालना मिळणे आवश्यक असून सर्व लोकप्रतिनिधी हे अभ्यासू आहेत, गुणवत्तेने काम करण्याकडे त्यांचा कल आहे,  त्यामुळे सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम केले तर इतिहासात पालघर जिल्ह्याची नोंद होईल याची मला खात्री आहे ,असे मतही या वेळी उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी व्यक्त केले.
   हे प्रशिक्षण सदस्यां साठी उपयुक्त असून गाव विकास आराखड्यात सदस्यांची भूमिका महत्वाची आहे. असे मत अति.मु.का.अ.चंद्रकांत वाघमारे यांनी व्यक्त केले.
  टी.ओ.चव्हाण उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प) यांनी आपल्या प्रास्ताविकात ग्राम विकास आराखडा तयार करताना त्यातील सदस्यांचा सहभाग, भूमिका व जबाबदाऱ्या, सभेचे प्रकार,१५ व्या वित्त अयोगातून मिळणाऱ्या निधीचा आराखडा तयार करणे इ बाबत विस्तृत स्पष्टीकरण दिले.
 या एकदिवसीय कार्यशाळेत जीपीडीपी मागोवा , ग्राम सूची ,मानव विकास  व शाश्‍वत विकास, जीपीडीपी आराखडा नियोजन, प्रक्रिया संसाधन गटकार्य महत्व व भूमिका ,ग्रामसभेची तयारी, जीपीडीपी प्रक्रिया ग्रामपंचायत संसाधने, परिस्थितीचे विश्लेषण, लोकसहभाग गावावर आधारित नियोजन प्रक्रिया,जीपीडीपी च्या माध्यमातून आदर्श गाव संकल्पना राबवणे, यंत्रणांची भूमिका कर्तव्य व जबाबदारी , जीपीडीपी आराखडा निर्मिती प्रक्रिया टप्पेनिहाय माहिती, ग्रामपंचायत विकास आराखड्याची अंमलबजावणी, इ व अनेक विषयांवर या कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
    यशदा येथील प्रवीण प्रशिक्षण नागेश्वर संखे,नरेश बरफ,यांच्या मार्फत हे प्रशिक्षण देण्यात आले.

वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातून वगळण्यासाठी प्रस्तावित 29 गावांसंदर्भात लेखी सुचना व हरकती दाखल करण्याची मुदत 01 डिसेंबर 2020 पर्यंत पालघर (प्रतिनिधी)दि. 25 :- शासन अधिसूचना क्र.

वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातून वगळण्यासाठी प्रस्तावित 29 गावांसंदर्भात 
लेखी सुचना व हरकती दाखल करण्याची मुदत 01 डिसेंबर 2020 पर्यंत
 पालघर (प्रतिनिधी)दि. 25 :- शासन अधिसूचना क्र. वविम-2009/88/प्रकरण 244/09/नवि-23 दिनांक 31.05.2011 संदर्भात मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे सुरु असलेल्या याचिकेमध्ये दिनांक 08/10/2020 रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान मा. उच्च न्यायालयाने वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातून वगळण्यासाठी प्रस्तावित 29 गावांसंदर्भात त्या क्षेत्रातील सर्व घटकांसोबत व्यापक सल्लामसलत करुन तद्नंतर यथोचित अंतिम निर्णय घेण्याचे शासनास आदेश दिले आहेत. त्यानुसार शासनाने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच दिनांक २३/११/२०२० च्या पत्रान्वये "Unit of Administration" काय असावे ? याबाबत देखील हरकती सुचना प्राप्त करुन योग्य अभिप्राय सादर करणेत कळविले आहे.
सद्यस्थितीतत कोव्हीड-19 चा प्रार्दुभाव विचारात घेता प्रत्यक्ष सुनावण्या घेणे संयुक्तिक होणार नाही याकरीता प्रस्तुत क्षेत्रातील व्यक्ती/संस्था/लोकप्रतिनिधी इत्यादीनाआपल्या लेखी हरकती /सूचना /निवेदने सादर करण्यासाठी पुरेशी संधी देणे आवश्यक असल्यामुळे वाढीव कालावधी देण्यात येत आहे.वसई विरार महानगरपालिकेतून 29 गावे वगळणे बाबतच्या हरकती सूचना बरोबरच संबंधित 29 गावे हि महापालिकेतून वगळल्यास/ वेगळी झाल्यास "Unit of Administration" काय असावे म्हणजेच ती ग्रामपंचायतीच्या स्वरुपात रहावी अथवा त्यांची स्वतंत्र नगरपालिका व्हावी. याबाबत नागरिकांना हरकती/सुचना/निवेदने दाखल करणेसाठी खालील प्रमाणे कार्यक्रम निश्चित केला आहे व अधिकारी यांना निर्देशित करण्यात येत आहे.

लेखी सुचना व हरकती दाखल करण्याचा कालावधी  : 
२५ नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर २०२० (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत)

सुचना व हरकती दाखल करण्याची ठिकाणे :
1) उपविभागीय अधिकारी कार्यालय, वसई जि-पालघर - उपविभागीय अधिकारी, वसई
2) वसई-विरार शहर महानगरपालिका, उपायुक्त यांचे कार्यालय, विरार - उपायुक्त,(सामान्य) वसई विरार शहर महानगरपालिका
3) निवासी उपजिल्हाधिकारी यांचे कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर - निवासी उपजिल्हाधिकारी, पालघर
4) प्रादेशिक उपसंचालक यांचे कार्यालय, कोकण भवन, नवी मुंबई. - प्रादेशिक उपसंचालक, नगरपालिका प्रशासन, कोकण विभाग.

तरी या जाहीर सुचनेद्वारे आवाहन करण्यात येते की उक्त कार्यक्रमानुसार वसई विरार शहर महानगरपालिकेतुन 29 गावे वगळण्याबाबत तसेच गावे वगळल्यास "Unit of Administration" म्हणजेच पुन्हा ग्रामपंचायती ठेवाव्या अथवा स्वतंत्र नगरपालिका स्थापन करावी याबाबत देखील संबंधित इच्छुक व्यक्ती/संस्था/ लोकप्रतीनिधी इत्यादी यांनी उपरोक्त नमूद ठिकाणी सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत लेखी हरकती/सुचना/निवेदने सादर करावी.

शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी दि. 13 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2020 पर्यंत मनाई आदेश लागू

शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी दि. 13 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2020 
पर्यंत मनाई आदेश लागू

पालघर (प्रतिनिधी)दि. 25 :- पालघर जिल्ह्यात कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव आहे. दिनांक 30 नोव्हेंबर 2020 रोजी गुरूनानक जयंती हा सण या कालावधीत साजरे होणार आहेत. तसेच राजकीय पक्ष व संघटना यांचेकडून त्यांचे विविध मागण्यांकरिता मोर्चे, उपोषण, धरणे, आंदोलने व रस्ता रोको करण्याची शक्यता आहे.
पालघर जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक पालघर यांचे कार्यकक्षेत सर्वत्र शांतता व सुव्यवस्था तसेच जनजीवन सुरळीत रहावे म्हणून खालील कृत्यास बंदी करण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी,पालघर डॉ.किरण महाजन, यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून पोलीस अधिक्षक पालघर यांचे  कार्यकक्षेतील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक 28 नोव्हेंबर 2020 ते 11 डिसेंबर 2020 या कालीवधीमध्ये खालील बाबींसाठी मनाई आदेश लागु करीत आहे.
1) शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, सोटे, बंदुका, सुरे, लाठ्या अथवा काठ्या अथवा‍ शारिरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे.
2) कोणतीही क्षारक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे.
3) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे.
4) व्यक्तीचे प्रेत किंवा आकृती किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे.
5) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे.
6) ज्यामुळे सभ्यता अगर निती यास धक्का पोहाचेल अशा किंवा सुरशितता धोक्यात येईल अशा     प्रकारची भाषणे तत्वे हावभव करणे, सोंग आणणे किंवा चित्रे, चिन्हे, फलक किंवा कोणतीही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किंवा लोकात प्रचार करणे.
सदरचा आदेश प्रेतयात्रांना लागु असणार नाही. तसेच सदरचा आदेश केंद्र व राज्य सरकारच्या नोकरीत असलेल्या व त्यांचे वरीष्ठांचे आदेशानुसार अगर कर्तव्याच्या किंवा अपंगत्त्वामुळे लाठी, काठी बाळगणे आवश्यक आहे अशांना लागु असणार नाही.
************

डहाणू, बोईसर, पालघर व वसई या रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांची कोविड-१९ तपासणी करणेकामी समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक

डहाणू, बोईसर, पालघर व वसई या रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांची 
कोविड-१९ तपासणी करणेकामी समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक

पालघर (प्रतिनिधी)पालघर दि 25 :- राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोविड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च, २०२० पासून लागू करुन खंड २,३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. सदर शासन अधिसूचनेच्या नियम १० नुसार जिल्हाधिकारी पालघर यांना पालघर जिल्हयाच्या कार्यक्षेत्रात कोव्हिड-१९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. राज्यामध्ये दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा येथून येणाऱ्या प्रवासांची कोविड-१९ च्या अनुषंगाने तपासणी करणेकामी कार्यप्रणाली (SOP) नुसार मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. सदर मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने पालघर जिल्हयातील डहाणू, बोईसर, पालघर व वसई या रेल्वे स्टेशनवर दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा येथून येणाऱ्या प्रवाशांची कोविड-१९ च्या अनुषंगाने तपासणी करणेकामी समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करणे आवश्यक आहे.
त्याअर्थी मी, डॉ माणिक गुरसळ, जिल्हाधिकारी पालघर मला आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ व महाराष्ट्र कोव्हिड १९ उपाययोजना नियम, २०२० चा नियम १० नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये पालघर जिल्हयातील डहाणू, बोईसर, पालघर व वसई या रेल्वे स्टेशनवर दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा येथून येणाऱ्या प्रवाशांची कोविड-१९ च्या अनुषंगाने तपासणी करणेकामी समन्वय अधिकारी (Nodal Officer) म्हणून खालील अधिकाऱ्यांची नेमणूक करीत आहे.

अधिकाऱ्याचे नांव व पदनाम, कार्यालयाचे नांव, व नेमणूक केलेल्या रेल्वे स्टेशनचे नांव पुढील प्रमाणे :
1) श्री. प्रदीप जांभळे पाटील, सहायक आयुक्त - वसई विरार शहर महानगर- पालिका, विरार - वसई
2) श्री. चंद्रशेखर जगताप, गट विकास अधिकारी - पंचायत समिती पालघर - बोईसर
3) श्रीम, स्वाती देशपांडे, मुख्याधिकारी - पालघर नगर परिषद - पालघर
4) श्री.सोहम गुरव, प्रशासकीय अधिकारी - डहाणू नगर परिषद – डहाणू

१) वर नियुक्त केलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी (Nodal Officer) यांनी त्यांना नेमणूक केलेल्या रेल्वे स्टेशनला दिल्ली, राज्यस्थान व गुजरात येथून येणार्या प्रवासांची कोविड-१९ च्या अनुषंगाने तपासणी करण्याकामी संयुक्त पथकांची नेमणूका कराव्यात.
२) सदर पथकामध्ये आरोग्य विभागातील अधिकारी/कर्मचारी यांचा समावेश करावा. तसेच Thermal Scanner / Gun उपलब्ध करुन द्यावेत.
३) दिल्ली, राज्यस्थान व गुजरात येथून येणाऱ्या प्रवाशांच्या व कोविड- १९ बाधित असल्याची लक्षणे असलेल्या प्रवाशांच्या नोंदी ठेवाव्यात.
४) कोविड-१९ लक्षणे असलेल्या प्रवाशांची Antigen Test Positive आल्यास नजीकच्या कोविड केअर सेंटर (CCC) येथे पाठविण्याची व्यवस्था करावी.
५) नेमणूक केलेल्या रेल्वे स्टेशनला येणाऱ्या रेल्वे बाबत संबंधित स्टेशन प्रबंधक यांचेशी समन्वय साधावा.
सदरचा आदेश हे या कार्यालयाच्या पुढील आदेशापर्यंत अंमलात राहतील. 
उक्त आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी. सदरहू आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील ५१(b), भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ व साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ नुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील.
****************

बार्टी मार्फत संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा-२०२० उत्तीर्ण झालेल्याउमेदवारांना एकावेळी एकरकमी रक्कम रु. ५०,०००/- आर्थिक सहाय्य योजना जाहिर

बार्टी मार्फत संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा-२०२० उत्तीर्ण झालेल्या
उमेदवारांना एकावेळी एकरकमी रक्कम रु. ५०,०००/- आर्थिक सहाय्य योजना जाहिर

पालघर (प्रतिनिधी)पालघर दि २५ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी). पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याकारिता स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारी व प्रशिक्षणाकरिता (UPSC) दर वर्षा मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य देण्यात येते. संघ लोकसेवा आयोगातर्फ नागरी सेवा पूर्व परीक्षा -२०२०. दि. ०४ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात आली. व परीक्षेचा निकाल दि. २३/१०/२०२० रोजी संघ लोकसेवा आयोगाच्या संकतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. या वर्षी सन २०२० मध्ये अनुसूचित जातीचे जे विद्यार्थी संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० उत्तीर्ण झाले आहेत व बार्टीचे पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेकरिता एकावेळी एकरकमी रक्कम रु. ५०,०००/- आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. बार्टी मार्फत मुख्य परीक्षेकरिता देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्यासाठी जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांनी बार्टीच्या संकेतस्थळावर भेट देऊन पात्रतेचे स्वरूप तपासून, अर्ज डाऊनलोड करून व अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून बार्टीच्या अर्जामध्ये असलेल्या ई-मेल वर दि. ०८/१२/२०२० रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत अर्ज पाठविण्यात यावेत असे आवाहन मा. महासंचालक, श्री. धम्मज्योती गजभिये, बार्टी, पुणे यांनी केले आहे.
***********

नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विस्तारीत रुग्णालय सक्षम* पालकमंत्री दादाजी भूसे

*नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विस्तारीत रुग्णालय सक्षम*
                    पालकमंत्री दादाजी भूसे
पालघर (प्रतिनिधी)पालघर दि. 25 : वसई व परीसरातील नागरीकांना  1860 पासुन हे रुग्णालय सेवा देत असून या इमारतीचे नुतनीकरण करण्यात येणार असून हे रुग्णालय आरोग्याच्या कोणत्याही समस्यांशी लढण्यासाठी सक्षम असल्याचे . पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.
       यावेळी जि. प. अध्यक्षा भारती कामडी, माविम अध्याक्षा ज्योती ठाकरे, खासदार राजेंद्र गावित, सर्वश्री आमदार रविंद्र फाटक, क्षितिज ठाकूर, श्रीनिवास वनगा, माजी महापौर प्रविण शेट्टी, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, वसई-विरार महानगरपालिका आयुक्त गंगाथरन. डी तसेच शासकिय अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
कोरोना महासंकटाच्या काळात वैद्यकिय क्षेत्राने उल्लेखनिय काम केले आहे. या ईमारतीच्या नुतनीकरण केल्याने 100 खाटांचे रूग्णालय जिल्ह्यासाठी उपयोगाचे ठरणार असल्याचे.  पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले .
 नागरिकांनी कोरोनाला दुर ठेवण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या  जनजागृती नुसार  प्रबोधन केलेल्या बाबींचे काटेकोरपणे पालन करावे  असे पालकमंत्री श्री. भूसे यांनी सांगितले
पालघर जिल्ह्याची सिमा गुजरात राज्याला लागून असल्याने   जिल्ह्यातील सिमा भागातील प्रवेश द्वारावर दहा टिम तयार करण्यात आल्या आहेत. या दहा टीम च्या माध्यमातून चेक पोस्टवर राज्यात येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.   वसई व परिसरातील कोरोना रुग्णांवर उपचार करणारे  कोरोना योद्धा डॉ.हेमंत पाटील यांना पालकमंत्री श्री भुसे यांनी श्रध्दांजली वाहीली.
*************

Tuesday, November 24, 2020

**कातकरी समाजाचे स्थलांतर थांबवण्यासाठी विटभटटी योजने अंतर्गत अनुदान योजना*.

**कातकरी समाजाचे स्थलांतर थांबवण्यासाठी विटभटटी योजने अंतर्गत अनुदान योजना*.

पालघर (प्रतिनिधी)पालघर दि 24 :  जिल्हातील कातकरी ही आदिम जमात असुन कातकरी समाज हा अती मागासलेला असुन रोजगारासाठी व कुंटुबांच्या उदरनिर्वाहासाठी स्वताचे गाव सोडून शहराकडे कामकरण्यासाठी विटभटटीकाम करण्यासाठी स्थलांतर होत असतो, त्यामुळे त्याचे जिवनमान उंचावणे व शैक्षणिक प्रगती यामध्ये बाधा येते.     सन २०१८-१९ या वर्षासाठी आदिम जमाती संरक्षण तथा विकास अंतर्गत जमातीचे स्थलातर रोखण्यासाठी आदिवासी विकास विभागाने आदिम जमातीच्या बचत गटांना विटभटटी व्यवसायाकरिता १० लाख रुपयांचे आर्थिक् सहाय्य करण्याबाबत योजना मंजुर करण्यात आली आहे.

प्रकल्प कार्यालय डहाणू अंतर्गत डहाणू, तलासरी, पालघर व वसईचा अंर्तभाव असुन कातकरी कुंटूबांचे उत्पन्न वाढी करता त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे व शैक्षणिक प्रगती करिता सामुहिक स्वरुपात बचत गटांना रोजगार मिळण्याकरिता १० लाख रुपये विटभटटी योजना राबविण्यासाठी मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. प्रकल्प कार्यालय डहाणू अंतर्गत ७ बचत गटांची निवड करण्यात येऊन योजना राबविण्याबाबत मार्गदर्शन व योजना सुरु करण्यासाठी योजनेचा पहिला हप्ता प्रती बचत गट रु. १,५०,०००/- बंचत गटांना प्रकल्प अधिकारी यांच्या हस्ते दिनांक १९/११/२०२० रोजी सुपूर्त करण्यात आला.

सदर कार्यक्रमाच्या वेळी प्रकल्प अधिकारी यांनी कातकरी समाजाचा विटभटटी या व्यवसायातील विधि अनुभव व कामात निपुण असल्यामुळे त्यांचे कडुन हि योजना चांगल्या प्रकारे राबविली जाईल अशी आशा व्यक्त केली. तसेच सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी योजना राबविताना घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन केले. सदर योजनेमुळे कातकरी समाजाचे स्थलांतर रोखण्यास मदत होईल त्यांच्या राहणीमानाचा दर्जा वाढण्यास मदत होईल जेणेकरुन त्यांची मुले शिक्षणाच्या मुळ प्रवाहात येतील.

Monday, November 23, 2020

नाशिक जिल्ह्यातील सटाना तालुक्यातील पिंपळवाडे गावचे कुलदीप जाधव हे देशसेवा बजावतांना शहीदशासकीय इतमामात करण्यात आले अंतिमसंस्कारनाशिक प्रतिनिधी/ तुषार बऱ्हे

नाशिक जिल्ह्यातील सटाना तालुक्यातील पिंपळवाडे गावचे कुलदीप जाधव हे देशसेवा बजावतांना शहीद

शासकीय इतमामात करण्यात आले अंतिमसंस्कार

नाशिक प्रतिनिधी/ तुषार बऱ्हे
भारतीय सैन्य दलात जम्मू-काश्मीर जवळील राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ सेवेत असलेल्या सटाणा येथील कुलदीप नंदकिशोर जाधव (वय 25)यांचा शनिवारी झोपेतच मृत्यू झाला. कुलदीप जाधव हे चार वर्षापासून सैन्यात कार्यरत होते. जाधव हे जम्मू-काश्मीरच्या लेह भागात 508 एसी बटालियनमध्ये तैनात होते. राजौरी  सेक्टर या भागात प्रचंड थंडी असल्याने झोपेतच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती जिल्हा सैन्य अधिकारी ओंकार कपाळे यांनी दिली. कुलदीप जाधव हे नाशिक मधील सटाणा तालुका येथील पिंगळवाडे गावचे रहिवासी असून सटाणा येथील भक्षी रोड परिसरात वास्तव्यास होते. 
आठ दिवसांपूर्वीच त्यांना मुलगा झाला होता नुकत्याच जन्मलेल्या बाळाला पाहण्यासाठी ते रविवारी सुट्टी घेऊन घरी येत होते तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.आज शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले आहे. यावेळी जिल्ह्याभरातून विविध पक्षाचे नेते, व मान्यवर जनसमुदाय आपल्या शहीद जवानाला श्रध्दांजली देण्यासाठी आलेला होता. काही दिवसांपूर्वीच आपल्या कुटुंबाशी त्यांचे फोनवर बोलणे झाले होते व बाळाला पाहण्यासाठी येण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली होती परंतु बाळाला पाहण्याचे त्यांचे स्वप्नही पूर्ण होऊ शकले नाही. शहीद कुलदीप जाधव यांच्या मागे आई, वडील, भाऊ, पत्नी व आठ दिवसाचा मुलगा असा परिवार आहे.

*जिल्हयातील इ.९ वी ते १२ वी वर्गाच्या शाळा चालू करणार*जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ

*जिल्हयातील इ.९ वी ते १२ वी वर्गाच्या शाळा चालू करणार*
जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ 

पालघर (प्रतिनिधी)पालघर जिल्हयाचे पालकमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देशानुसार दिनांक २३/११/२०२० रोजी  पालघर जिल्हयातील इयत्ता ९ वी ते १२ वी वर्गाच्या शाळा सुरु करणेबाबत आढावा बैठक घेतली . या बैठकीत शाळा लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी  सांगितले.       शासनाचे शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक १०/११/२०२० रोजीचे परिपत्रकानुसार या बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्हयातील लोक प्रतनिधी यांच्या सोबत चर्चा करण्यात आली. आयुक्त,वसई विरार शहर महानगरपालिका यांच्याशी चर्चा करण्यात आली होती.

त्यानुसार पालघर जिल्हयातील शाळा सुरु करणेबाबत खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आला.

१) वसई विरार महानगरपालिका क्षेत्र, पालघर, डहाणू, जव्हार नगरपालिका क्षेत्र, तलासरी, वाडा, मोखाडा, विक्रमगड नगरपंचायत क्षेत्र तसेच बोईसर, तारापूर औद्योगिक परिसराचे क्षेत्रातील ग्रामपंचायत क्षेत्र यामध्ये दिनांक ३१/१२/२०२० पर्यंत शाळा सुरु करु नये.

२) पाच हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये तुर्तास शाळा सुरु करण्यात येऊ नये. ३) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे पालकांकडून दिनांक ३०/११/२०२० पर्यत संमती पत्र घ्यावे. तद्नंतर शाळा व्यवस्थापन समितीने शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा.

४) ज्या ठिकाणी शाळा सुरु होणार असतील तेथील शिक्षकांनी नजीकच्या आरोग्य उपकेंद्र अथवा

CCC Centre येथे RTPCR चाचणी करावी. ५) ज्या शिक्षक /कर्मचारी यांना यापुर्वीच कोरोना झाला आहे त्यांनी तृर्त चाचणी करण्याची आवश्यकता नाही.

६) लक्षणे असलेल्या शिक्षकांनी Antigen चाचणी करावी, चाचणी Negative आल्यास RTPCR चाचणी करावी.

७) ज्या गावात कोविड-१९ चा एकही रुग्ण नाही तेथे शाळा सुरु करण्यात यावी.

८) E-learning सुविधा नसलेल्या ठिकाणी व Mobile Network अडचणी असलेल्या ठिकाणी शाळा प्राधान्याने सुरु कराव्यात. तथापि सदर क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्रात असल्यास शाळा सुरु करु नयेत.

९) पालकांनी पाल्य आजारी असल्यास पाल्यास शाळेत पाठवू नये. १०) परिस्थितीनुसार शाळेच्या मोकळया पटांगणात शाळा भरविण्याचा प्रयत्न करावा.

११) शासन निर्देशानुसार Sanitation ची प्रक्रीया/ कार्यवाही करावी.

१२) ज्या ठिकाणी शाळा सुरु करण्यास दिनांक ३१/१२/२०२० पर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. तेथे पालकांचे संमती घेण्याची कार्यवाही दिनांक ३१ डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण करावी तुर्त सदरहु

शाळेतील शिक्षकांनी कोविड-१९ चाचणी करु नये.

१३) शाळा व्यवस्थापन समितीने पालक शिक्षक संघ (PTA) यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा. १४) जिल्हा आरोग्य अधिकारी / जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी Testing चे नियोजन करावे.

१५) प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये (Containment Zone ) शाळा सुरु करु नयेत.
१६) शाळा सुरु करताना व सुरु झाल्यानंतर शासन परिपत्रक दिनांक १०/११/२०२० परिशिष्ट 'अ' व 'ब' मधील सुचनांप्रमाणे कार्यवाही करावी. १७) शिक्षकांनी स्वत:ची राहण्याची व्यवस्था ते ज्या गावात शाळेवर नियुक्त आहेत त्या गावातच

करावी.

१८) शासन परिपत्रक दिनांक १५/०६/२०२० प्रमाणे संबंधीत ग्रामपंचायतीने आवश्यक कार्यवाही करावी.

१९) आरोग्य विभागाने किमान ५ ते कमाल १० शाळांकरीता फिरते आरोग्य तपासणी केंद्र कार्यरत ठेवावे.

२०) निवासी आश्रम शाळा, कस्तूरबा गांधी बालिका विद्यालय, समाज कल्याण विभागाअंतर्गत

वसतिगृहे व इतर निवासी शाळा ह्या सुरु करणेबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल. असे जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी सांगितले.

Sunday, November 22, 2020

दिग्गज वार्ताहर* सकाळच्या बातम्यादिनांक :- २३ नोव्हेंबर २०२०वार। :- सोमवार

**दिग्गज वार्ताहर*  सकाळच्या बातम्या
दिनांक :- २३ नोव्हेंबर २०२०
वार।   :- सोमवार

१) काश्मिरात आंतरराष्ट्रीय सीमेवर दीडशे मीटर लांबीच्या भुयाराचा शोध; ठार झालेल्या दहशतवाद्यांनी वापर केल्याचा संशय

२) बीसीजी लशीमुळे कोरोनाच्या संसर्गाची जोखीम कमी; संशोधनाचा निष्कर्ष; सेडार्स-सिनाई हेल्थ सिस्टीम या संस्थेत हे संशोधन करण्यात आले

३) ट्विटरवर भारतीय रिझर्व्ह बँकेचा बोलबाला; गाठला १ मिलियन फॉलोअर्सचा टप्पा; ८५ वर्षे जुनी असलेल्या या बँकेने कायमच भारताला आणि जगाला आ
र्थिक उन्नतीचा मार्ग दाखवला आहे

४) यंदाच्या शैक्षणिक वर्षात आठ महिन्यांनंतर कोरोनाच्या छायेत राज्यातील २२ जिल्ह्यांतील शाळांमध्ये आज (सोमवारी) प्रथमच नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरणार

५) राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बाधितांची संख्या वाढली; राज्यात दिवसभरात ५७५३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ तर, नवीन ४०६० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले

६) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे भ्रष्टाचारात अव्वल; पुणे परिक्षेत्रामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यावर्षी भ्रष्टाचाराचे सर्वाधिक १२६ गुन्हे दाखल

७) दादर, माहीम, धारावीत कोरोनाविरोधात मोर्चेबांधणी; आजपासून १० ठिकाणी चाचणी शिबिरे; २३ ते २८ नोव्हेंबरपर्यंत विशेष कोरोना चाचणी शिबिरे घेण्यात येणार

८) रशियात कोरोनास्थिती गंभीर; रुग्णालये अपुरी; रशियातील आरोग्य यंत्रणा मोठी असली तरी तेथे निधीची कमतरता आहे

९) विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघनिवड महत्त्वाची! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेबाबत माजी क्रिकेटपटू इयान चॅपेल यांचे मत

१०) अभिनेत्री मंदाना करीमीने चित्रपट निर्माते महेंद्र धारीवाल यांच्यावर केला शोषणाचा गंभीर आरोप; मंदानाचे आरोप प्रोड्यूसरने फेटाळले

१) काश्मिरात आंतरराष्ट्रीय सीमेवर दीडशे मीटर लांबीच्या भुयाराचा शोध; ठार झालेल्या दहशतवाद्यांनी वापर केल्याचा संशय

२) बीसीजी लशीमुळे कोरोनाच्या संसर्गाची जोखीम कमी; संशोधनाचा निष्कर्ष; सेडार्स-सिनाई हेल्थ सिस्टीम या संस्थेत हे संशोधन करण्यात आले

३) ट्विटरवर भारतीय रिझर्व्ह बँकेचा बोलबाला; गाठला १ मिलियन फॉलोअर्सचा टप्पा; ८५ वर्षे जुनी असलेल्या या बँकेने कायमच भारताला आणि जगाला आ
र्थिक उन्नतीचा मार्ग दाखवला आहे

४) यंदाच्या शैक्षणिक वर्षात आठ महिन्यांनंतर कोरोनाच्या छायेत राज्यातील २२ जिल्ह्यांतील शाळांमध्ये आज (सोमवारी) प्रथमच नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरणार

५) राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बाधितांची संख्या वाढली; राज्यात दिवसभरात ५७५३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ तर, नवीन ४०६० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले

६) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे भ्रष्टाचारात अव्वल; पुणे परिक्षेत्रामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यावर्षी भ्रष्टाचाराचे सर्वाधिक १२६ गुन्हे दाखल

७) दादर, माहीम, धारावीत कोरोनाविरोधात मोर्चेबांधणी; आजपासून १० ठिकाणी चाचणी शिबिरे; २३ ते २८ नोव्हेंबरपर्यंत विशेष कोरोना चाचणी शिबिरे घेण्यात येणार

८) रशियात कोरोनास्थिती गंभीर; रुग्णालये अपुरी; रशियातील आरोग्य यंत्रणा मोठी असली तरी तेथे निधीची कमतरता आहे

९) विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघनिवड महत्त्वाची! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेबाबत माजी क्रिकेटपटू इयान चॅपेल यांचे मत

१०) अभिनेत्री मंदाना करीमीने चित्रपट निर्माते महेंद्र धारीवाल यांच्यावर केला शोषणाचा गंभीर आरोप; मंदानाचे आरोप प्रोड्यूसरने फेटाळले

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाशिक जिल्ह्यातील शाळा व कॉलेज 4 जानेवारी 2021 पर्यंत बंदच राहणार : जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत निर्णय. नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाशिक जिल्ह्यातील शाळा व कॉलेज 4 जानेवारी 2021 पर्यंत बंदच राहणार : जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत निर्णय.

 नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे. 
 दिनांक 23 नोव्हेंबर पासून जिल्ह्यातील शाळा व कॉलेज टप्प्याटप्प्याने सुरू करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिली होती मात्र त्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांची कोरोना तपासणी करणे अनिवार्य असल्याने अनेक शिक्षकांची पूर्व तपासणी करण्यात आली व त्यामध्ये अनेक शिक्षक कोरोना बाधित आढळून आल्याने शाळा सुरु करणे बाबत शिक्षक, पालक व जिल्हा प्रशासन यामध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती.
पालक संघटना व शिक्षक संघटना यांच्या आग्रही भूमिकेनंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली या बैठकीत शाळा व कॉलेज दिनांक 4 जानेवारी 2021 पर्यंत बंदच राहणार व पहिली ते आठवी प्रमाणे नववी ते बारावी चे वर्ग सुद्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
पालकमंत्री छगन भुजबळ जिल्हाधिकारी सुरज मांढरे शिक्षक संघटना प्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाने शिक्षक व पालक यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Saturday, November 21, 2020

पतीनेच सुपारी देऊन काढला पत्नीचा काटा: आपल्या सहकार्‍यांसोबत केला मास्टर प्लॅन,अनैतिक संबंधातून प्रकार घडल्याचे पोलीसांकडून उघड. नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.

पतीनेच सुपारी देऊन काढला पत्नीचा काटा: आपल्या सहकार्‍यांसोबत केला मास्टर प्लॅन,अनैतिक संबंधातून प्रकार घडल्याचे पोलीसांकडून उघड.

 नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे. 
 अनैतिक संबंधांच्या प्रकारामुळे पतीनेच सुपारी देऊन पत्नीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे. मुंबई-आग्रा महामार्गालगत राहुड शिवारात मंगळवार (दि.१६) नाल्यात एका महिलेचा मृतदेह नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या हद्दीत आढळून आला होता. काही दिवसातच ह्या महिलेची ओळख पटवून आरोपींपर्यंत पोहचण्यास पोलिसांना यश आले. पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून पतीनेच तिच्या खुनाची सुपारी दिल्याचे तपासात उघड झाले असून, पोलिसांनी पती व त्याच्या साथीदाराना गजाआड केले आहे.

नीता नारायण चित्ते (वय ३९, रा. चित्ते प्लाझा, प्लॉट नंबर ०१, नाशिक) असे या मृत महिलेचे नाव आहे. तिचा पती नारायण चित्ते हा तिच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळला होता म्हणून खुनाची सुपारी दिली व सहकार्‍यांसोबत तिचा खून केल्याची कबुली पती नारायण चित्ते याने पोलिसांना दिली आहे.
पतीला एकट्याला हे शक्य होणार नव्हते म्हणून त्याने त्याचा मित्र विनय निंबाजी वाघ (वय ५२ , गुलमोहर नगर, म्हसरूळ) व भरत देवचंद मोची उर्फ मोरे (२८ , रा. भीमनगर, उल्हासनगर) यास १० लाखाची सुपारी दिली.
 
नीता ही रविवारी पती नारायण चित्ते यास सांगून सिडकोत माहेरी गेली होती. दरम्यान भरत देवचंद मोची उर्फ मोरे याने आपला मित्र वाहिद अली शराफत अली (रा. पंचशील नगर, उल्हासनगर) याला नीताशी व्हाट्सएप्प वर मैत्री कर अशी सूचना आधीच  केली त्यानुसार वाहिद अलि याने नीताशी मैत्री करून तिचा विश्वास संपादन केला आणि नीताला आडगाव नाक्यावरील उड्डाणपुलाजवळ बोलविले त्याप्रमाणे नीता तिथे आली.
ठरलेल्या प्लॅनप्रमाणे त्यांनी नीता हिला स्विफ्ट कार (एम एच ०१, पीए ५६३२) मध्ये बसविले व राहुड घाट परिसरात नेले. घाटात गेल्यावर तिचा गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी तिचा मृतदेह महामार्गालगतच्या नाल्यात फेकून दिला. काम पूर्ण झालेले असल्याने दुसऱ्या दिवशी सहकारी सकाळी विनय वाघ यांच्याकडून ५ लाख रुपये घेण्यात आल्याचे देखील उघड झाले आहे. विनय वाघ यास देखील अटक करण्यात आलेली आहे.
नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्यात पत्नी हरविल्याची तक्रार देखील तिच्या पतीनेच दाखल केलेली होती.त्यानुसार तपासाला गती देत पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय पोलिस अधिकारी समीर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या पथकाने या गुन्ह्याची माहिती उघड केली.

Wednesday, November 18, 2020

जागतिक शौचालय दिनानिमित्त ग्रामीण भागात शाश्वत स्वच्छता राखण्यासाठी विशेष अभियान*

*जागतिक शौचालय दिनानिमित्त ग्रामीण भागात शाश्वत स्वच्छता राखण्यासाठी विशेष अभियान* 

     पालघर (प्रतिनिधी)    ग्रामीण भागातील जीवनमानाचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने, वैयक्तिक स्वच्छता, वैयक्तिक शौचालय, शाळा, अंगणवाडीमध्ये शौचालयाची सुविधा , घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन , सार्वजनिक शौचालयांची योग्य देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे.  या बाबींचा विचार करून जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी  सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत दि. १९ नोव्हेबंर या जागतिक शौचालय दिनानिमित्ताने दि. १७ नोव्हेंबर २०२०ते २७ नोव्हेबर २०२० या कालावधीत विशेष विशेष अभियान राबविले जाणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता विभाग) तुषार माळी यांनी दिली. 
    जिल्ह्यात हागणदारी मुक्त झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेचे सातत्य कायमराखण्यासाठी तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालयांची उपलब्धता या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ ची सुरूवात झाली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सदर अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून दि. १९ नोव्हेंबर रोजी या जागतिक शौचालय   दिनाचे औचित्य साधून वैयक्तिक, सार्वजनिक,शाळा अंगणवाडी शौचालय संदर्भात दि. १७ नोव्हेबर २०२० ते दि.२७ नोव्हेंबर २०२० या कालावधीत विशेष अभियान राबविले जाणार आहे. या अभियान कालावधीत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये सार्वजनिक, वैयक्तिक, शाळा व अंगणवाडी शौचालय बांधकाम करणे, निधी वितरण , देखभाल दुरूस्ती तसेच  स्वच्छतेमधील सातत्य याबाबत गृहभेटी देऊन जनजागृती केली जाणार आहे. यामध्ये सार्वजनिक शौचालयामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करणे, वीज जोडणी करणे ,परिसर स्वच्छता, कूटूंबस्तर शौचालय परिसर स्वच्छता, वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम करून अनुदान वाटप करणे  करणे, वैयक्तिक व सार्वजनिक  नादुररूस्त शौचालयांची दुरूस्ती करणे  आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील शाश्वत स्वच्छता कायम ठेवण्यासाठी सर्व ग्रामपंचायतीनी उत्स्फूर्त सहभाग घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.  इपक्रम राबवितांना कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत आरोग्य विभागाने दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करून अभियान यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेने केले आहे. 

•जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये सार्वजनिक, वैयक्तिक शाळा व अंगणवाडी शौचालय बांधकाम करणे
• वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची देखभाल दुरूस्ती करणे 
• स्वच्छतेमधील सातत्य याबाबत गृहभेटी देवून जनजागृती करणे.
• सार्वजनिक शौचालयामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे .
• सार्वजनिक शौचालयामध्ये वीज जोडणी  उपलब्ध करून देणे.
• सार्वजनिक शौचालय परिसर स्वच्छता, कुटूंबस्तर शौचालय परिसर स्वच्छता आणि सुशोभिकरण
• नादुरूस्त सार्वजनिक शौचालय, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालयातील नादुरूस्त शौचालयांची दुरूस्ती 
• वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम व प्रोत्साहन अनुदान वाटप करणे

इ विशेष उपक्रम जागतिक शौचालय दिनानिमित्त विशेष अभियानामध्ये राबविले जाणार आहेत.

*ग्राहक संरक्षण फाउंडेशन कार्यकारणी जाहीर*भुसावळ (प्रतिनिधी)

*ग्राहक संरक्षण फाउंडेशन कार्यकारणी जाहीर*
भुसावळ (प्रतिनिधी)
 *अध्यक्ष डि. व्ही. पाटील , राष्ट्रीय महासचिव निलेश भोईर,संतोष राणे राष्ट्रीय उपाध्यक्ष यांच्या आदेशानुसार आज शासकीय विश्रामगृह भुसावळ येथे *महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा. विनोद जी गायकवाड* यांच्यामार्फत जळगाव जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.
 ग्राहक संरक्षण फाऊंडेशनचे कार्य सध्या सोळा राज्यांमध्ये   योग्यरीतीने वाटचाल चालू आहे.दरवर्षीप्रमाणे मार्च महिन्यामध्ये नियुक्ती केल्या जातात.परंतु देशात आलेल्या कोरोना या संकटामुळे नियुक्त्या उशिरा करण्यात आल्या.  भुसावळ येथे शासकीय विश्रामगृहात प्रदेशाध्यक्ष विनोद गायकवाड  यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र, पदाचे कार्ड वाटप करून त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदेशाध्यक्ष यांनी ग्राहक संरक्षण कायद्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.आपल्या संस्थेचे ध्येय धोरण विषयी सखोल माहिती दिली,ग्राहक संरक्षण फाउंडेशन या संस्थेला संपूर्ण महाराष्ट्र भर पोहचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न आपण सर्वांनी करायचे आहे  असे यावेळी प्रा. विनोद गायकवाड यांनी सांगितले,त्यावेळी दत्तात्रय महाजन जिल्हाध्यक्ष,विशाल दांडगे जिल्हा उपाध्यक्ष, हीतेश तायडे जिल्हा उपाध्यक्ष,नामदेव राठोड जिल्हा उपाध्यक्ष,राहुल कोल्हे  जिल्हा महासचिव,दिनेश  कुमार वाघ जिल्हा महासचिव, पराग वारके जिल्हा कोषागार,सुरेश भालेराव संघटक सचिव,अँड.विजय तायडे सल्लागार,अतुल कोळी सचिव, संदीप कोळी  सचिव, सुरेश पाटील सचिव, संघरत्न सपकाळे सचिव,सरफराज तडवी सहसचिव,अतुल साळवे सचिव, परमेश्वर पाटील सचिव, भारत सोनवणे, गौतम पवार, नितीन सूर्यवंशी, गजानन माळी या  पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल दांडगे आणि प्रास्ताविक  दिनेशकुमार वाघ यांनी केले.हितेश तायडे यांनी आभार मानले.या वेळी जळगाव जिल्हा पदाधिकारी तसेच सदस्य उपस्थित होते.

Tuesday, November 17, 2020

10 वी आणि 12 वीच्या परीक्षा काळात केंद्र, उपकेंद्र व परीरक्षण केंद्र परिसरात मनाई आदेश लागू*

.     *10 वी आणि 12 वीच्या परीक्षा काळात केंद्र, उपकेंद्र व परीरक्षण केंद्र     परिसरात मनाई आदेश   लागू*                               पालघर (प्रतिनिधी)दि. 17 :- विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, वाशी नवी मुंबई यांचेतर्फे दि.20/11/2020 ते दि.10/12/2020 या कालावधीमध्ये एच. एच.सी. (12 वी) व दि.20/11/2020 ते दि.05/12/2020 या कालावधीत एस.एस.सी. (10 वी) च्या पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहेत. पालघर जिल्हयात इयत्ता 12 वी च्या (03 परीक्षा केंद्रावर) व इयत्ता 10 वी च्या (05 परीक्षा केंद्रावर) परीक्षा घेण्यात येणार असून 04 परीरक्षण कंद्रे आहेत.
उपरोक्त परीक्षा कालावधीमध्ये परीरक्षण केंद्र, परीक्षा केंद्र/उपकेंद्र व परीसरात काही असामाजिक तत्वे परीक्षा प्रक्रियेत गैर व्यवहार व बाधा निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच परीक्षा केंद्राच्या परीसरातील झेरॉक्स सेंटर, फॅक्स सेंटर, टेलीफोन बुथ, कम्युनिकेशन सेंटर या ठिकाणाहून गैरप्रकार होण्याची शक्यता असून बेकायदेशीर जमाव जमून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान अगर शांतता भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. करीता या अप्रक्रियांना प्रतिबंध घालणे जरूरीचे आहे.
फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) (3) अन्वये  पालघर जिल्हयातील दि.20/11/2020 ते दि.10/12/2020 या कालावधीमध्ये एच.एच.सी. (12 वी) व दि.20/112020 ते दि.05/12/2020 या कालावधीमध्ये एस.एस.सी. (10 वी) च्या पुरवणी परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्र, उपकेंद्र व परीरक्षण केंद्र यांच्या सभोवताली 100 मीटर परिसरात परीक्षा प्रक्रियेशी संबंधीत विभागांचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस अधिकारी व अंमलदार, तसेच अंध व अपंग परीक्षार्थी यांचे बरोबर आलेले नातेवाईकांखेरीज इतर बेकायदेशीर जमावास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम (ARP) अन्वये दि.20/11/2020 रोजी 00-00 वा. पासून ते दिनांक 10/12/2020 रोजीचे 24.00 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षा केंद्रावर व उपकेंद्राच्या ठिकाणी परीक्षेच्या वेळापत्रकाप्रमाणे तसेच परिरक्षण केंद्राच्या ठिकाणी पूर्ण कालावधीकरीता प्रवेश करण्यास मनाई आदेश लागू करीत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट मेल आयडी;प्रतिसाद न देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन*

*जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट मेल आयडी;प्रतिसाद न देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन*

    पालघर (प्रतिनिधी)  पालघर जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ  यांच्या नावाने एका  अज्ञात व्यक्तीने बनावट मेल आयडी तयार केला असून  हा मेल आयडी अधिकृत नसून यास कोणी कुठलाही प्रतिसाद न देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी केले आहे

.Dr.Manik Gursal I. A. S exec.director72@mail.com  अशा नावाने हा मेल आयडी असून  जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी  आपण कोणालाही मेल केला नसून अशा प्रकारच्या बनावट  इमेल द्वारे फसवणूक टाळण्यासाठी त्यास प्रतिसाद देऊ नये असे आवाहन केले आहे. 
काही शासकीय अधिकाऱ्यांना या मेल आयडी वरून  वैयक्तिक मेल गेल्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांना विचारणा केल्यावर हा प्रकार उघड झाला. या अज्ञात व्यक्ती च्या विरोधात सायबर सेल मध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून PSI दीपाली लंभाते  पुढील तपास करीत आहेत.

Sunday, November 15, 2020

नाशिक एकलहरे येथील मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे १००% यश संपादन. नाशिक प्रतिनिधी / सतीश पाटील.

नाशिक एकलहरे येथील मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे १००% यश संपादन. 

 नाशिक प्रतिनिधी / सतीश पाटील.
 नाशिक एकलहरे येथील मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा फार्मसी द्वितीय वर्ष या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही १००% निकाल लागला आहे. हे सर्व शक्य झाले आहे येथील अनुभवी शिक्षक वृंद व त्यांनी दिलेल्या  उच्चतम सोयी सुविधांमुळे. कॉलेज तर्फे वेळोवेळी शिक्षकांनी विविध सेमिनारचे आयोजन केले, संदर्भासाठी ग्रंथालय,  अत्याधुनिक प्रयोगशाळा, टेस्ट सिरीज, नोट्स या सर्व सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात आल्यात व त्यामुळे कॉलेजमधील सुकन्या कानडे व श्याम ढोकरे यांनी ९५% असे समान गुण मिळवून प्रथम क्रमांक, ज्योती पाळदे हिने ९४.४०% गुण मिळवून दुसरा, अनिकेत भारती याने ९४.३०% गुण मिळवून तिसरा क्रमांक तर तेजस्विनी कानडे हिने ९३.६०% गुण मिळवून चौथा क्रमांक  पटकविला. विद्यार्थी आणि कॉलेज व्यवस्थापन यांच्या समन्वयाचा या निकालावर परिणाम झाला आहे असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
 मातोश्री एज्युकेशन सोसायटीचे सचिव कुणाल दराडे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोकुळ तळेले आणि फार्मसी डिप्लोमा विभागाचे प्रमुख प्रशांत चव्हाण यांच्या तर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्यात.

नाशिक त्रंबकेश्वर येथील त्र्यंबक राजाचे देवस्थान सोमवारपासून होणार खुले त्र्यंबकवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण.

नाशिक त्रंबकेश्वर येथील त्र्यंबक राजाचे देवस्थान सोमवारपासून होणार खुले त्र्यंबकवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण. 
 नाशिक प्रतिनिधी /  तुषार बऱ्हे. 
 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचे नियम शिथिल करीत दिवाळी पाडव्याला राज्यातील सर्व देवस्थाने जनतेसाठी खुली करण्यात येतील असे जाहीर केले. नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिर कोरोना काळात दिनांक 18 मार्चपासून बंद होते. मंदिर सुरू व्हावे यासाठी गावातील जनतेने ठीक ठिकाणी खूप निवेदने दिली  परंतु त्यांना फक्त आश्वासनेच मिळाली. परंतु ठाकरे सरकार यांच्या मंदिरे खुली करण्याच्या निर्णयाने त्र्यंबक वासियांची खऱ्या अर्थाने दिवाळी गोड होणार आहे. मंदिरावर पूर्ण त्र्यंबकेश्वर गावाची रोजीरोटी व आर्थिक व्यवहार चालत असल्याने मागील सहा महिन्यापासून गावाची परिस्थिती बिकट झाली होती परंतु आता पुन्हा सर्व परिस्थिती सुरळीत होणार व खऱ्या अर्थाने आता दिवाळी साजरी होणार असे गावकर्‍यांचे म्हणणे आहे. दररोज एक हजार भक्तांना दर्शनाची व्यवस्था त्रंबकेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात येणार असून मास्क व सॅनिटायझेशन केल्याशिवाय मंदिरात प्रवेश मिळणार नाही व ऑनलाइन दर्शन बुकिंग चाही विचार केला जाणार आहे असे त्रंबकेश्वर देवस्थान विश्वस्त प्रशांत गायधनी यांनी जाहीर केले.

Friday, November 13, 2020

घंटागाडी ठेकेदाराचा नाशिक महानगरपालिकेकडून पैसे उकळण्याचा गोरखधंदा उघड : आयुक्तांचे दंडात्मक कार्यवाहीचे आदेश. नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे

घंटागाडी ठेकेदाराचा नाशिक महानगरपालिकेकडून पैसे उकळण्याचा गोरखधंदा उघड : आयुक्तांचे दंडात्मक कार्यवाहीचे आदेश.

 नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे 
 नाशिक रोड विभागातील मे. तनिष्क सर्विसेस या कंपनीकडे घंटागाडीचे व्यवस्थापन कंत्राटी तत्वावर आहे. घराघरांमधून बाहेर पडणारा घनकचरा  घंटागाडी द्वारे संकलित केला जातो, कचरा संकलनास जाण्याआधी घंटागाडीचे वजन केले जाते व पाथर्डी येथील कचरा डेपोवरील खत प्रकल्पावर गाडी रिकामी करण्याआधी कचऱ्यासह  घंटागाडीचे पुन्हा वजन केले जाते व ठेकेदारास 500 ते 600 रुपये प्रति टन प्रमाणे अदा केले जातात. वजनानुसार पैसे अदा  केले जात असल्याने ठेकेदारने घंटागाडीचे वजन वाढवण्यासाठी वेगळीच शक्कल लढवली, गाडीचे वजन वाढविण्यासाठी कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली माती व दगड टाकले जात होते हा प्रकार मागील खूप दिवसापासून सुरू होता परंतु घंटागाडीचे वजन अधिक भरल्याने वजन वाढवण्याचा हा प्रकार महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या पाहणीत उघड झाला व महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांनी संबंधित ठेकेदारावर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिलेत.

Thursday, November 12, 2020

*वसई-विरार महानगरपालिकेतील 29 गावे वगळण्यासाठी हरकती*

*वसई-विरार महानगरपालिकेतील 29 गावे वगळण्यासाठी हरकती*

प्रतिनिधी   :-नवी मुंबई,दि.12 :- वसई-विरार महानगरपालिकेतून 29 गावे वगळणेबाबत दि.8 ऑक्टोंबर 2020 रोजी झालेल्या सुनावणीमध्ये मा.उच्च न्यायालयाने वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील 29 गावातील सर्व संबंधित व्यक्ती, नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी, संघटना यांनी या विषयीच्या आपल्या  लेखी सूचना व हरकती दि.25 नोव्हेंबर 2020 पर्यंत सादर कराव्यात. असे विभागीय आयुक्त, कोकण विभाग , नवी मुंबई यांनी कळविले आहे.

सद्यस्थितीत कोविड-19 चा प्रादूर्भाव विचारात घेता प्रत्यक्ष सुनावण्या घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील व्यक्ती, संस्था, लोकप्रतिनिधी यांना आपल्या लेखी हरकती, सूचना, निवेदने सादर करण्यासाठी पुरेशी संधी देणे आवश्यक असल्याने  हरकती, सूचना, निवेदने लेखी स्वरुपात स्विकारण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यक्रम निश्चित केला आहे व अधिकारी यांना निर्देशित करण्यात आले आहे. लेखी सूचना व हरकती दाखल करण्याचा कालावधी दि.17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2020 (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत) असा राहील. सूचना व हरकती दाखल करण्याची ठिकाणे पुढीलप्रमाणे *1)* उपविभागीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय वसई जि.पालघर *2)* उपायुक्त (सामान्य), वसई-विरार महानगरपालिका उपायुक्त यांचे कार्यालय, विरार जि.पालघर *3)* निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर जि.पालघर *4)* प्रादेशिक उपसंचालक, नगरपालिका प्रशासन विभाग, कोकण भवन नवी मुंबई. तरी उक्त कार्यक्रमानुसार वसई-विरार महानगरपालिकेतून 29 गावे वगळण्याबाबत संबंधित इच्छुक व्यक्ती, संस्था, लोकप्रतिनिधी यांनी उपरोक्त नमुद ठिकाणी सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत लेखी हरकती, सूचना, निवेदने सादर कराव्यात. असे विभागीय आयुक्त, कोकण विभाग , नवी मुंबई यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे

-------------

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली नाशिक रोड पोलीस ठाणे यांचेकडून सर्व जनतेला सतर्कतेचे आवाहन. नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली नाशिक रोड पोलीस ठाणे यांचेकडून सर्व जनतेला सतर्कतेचे आवाहन.

 नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे
 कोरोना काळातील मागील सहामाही संपून शहरातील परिस्थिती पूर्वपदावर येत असताना सध्या चोरी, घरफोडी व चेन स्नॅचिंगचे प्रमाण खूप वाढले आहे असे असून सध्या दीपावलीचा सण सुरू होत आहे त्यानिमित्ताने बाजारात खरेदीसाठी गर्दी होत आहे तरी सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करावे आणि महिलांनी बाजारात जाताना आपले मंगळसूत्र जपावे व मौल्यवान वस्तू, रोख रक्कम घरी ठेवून जाऊ नये. 
 दीपावली निमित्त बाहेरगावी जाताना आपल्या मौल्यवान वस्तू व पैसे बँकेत ठेवणे किंवा सोबत घेऊन जाणे. व्यापारी दुकानदार व सराफ यांनीही या काळात मोठ्या प्रमाणात माल खरेदी केलेला असतो व या काळात खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात तरी दुकानदारांनी रात्रीच्या वेळेस कडक सुरक्षाव्यवस्था ठेवावी.
 जनतेने कुठल्याही प्रकारच्या ऑनलाईन व्यवहाराच्या आमिषाला बळी पडू नये. आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्या कॉलनीत काही संशयित  हालचाली, संशयित इसम किंवा काही अनुचित प्रकार दिसून आल्यास नाशिक रोड पोलीस ठाणे 0253- 2465533/133 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली नाशिक रोड पोलीस ठाणे यांनी केले आहे.

अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत* पालघर (प्रतिनिधी)दि 12 : जिल्हयामध्ये दिनांक ०१/०१/२०२१ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत केला आहे . कार्यक्रमाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे .

*अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत*                                 पालघर (प्रतिनिधी)दि 12 :  जिल्हयामध्ये दिनांक ०१/०१/२०२१ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत केला आहे . कार्यक्रमाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे .


१. एकत्रीकृत प्रारुप मतदार यादयांची प्रसिध्दी, दि .१६ नोव्हेंबर , २०२०(सोमवार)
२.  दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी, दि . १६ नोव्हेंबर २०२० (सोमवार) ते दि .१५ डीसेंबर , २०२० ( मंगळवार )
३. विशेष मोहिमांचा कालावधी, दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी , महाराष्ट्र यांनी निश्चित केलेले दोन शनिवार आणि रविवार .
४. दावे व हरकती निकालात काढणे, दि . ०५ जानेवारी , २०२१ ( मंगळवार ) पर्यंत
५. प्रारूप मतदार यादीच्या मापदंडाची तपासणी करणे आणि मतदार यादीच्या अंतिम प्रसिध्दी करिता आयोगाची परवानगी घेणे, दि . १४ जानेवारी , २०२१ ( गुरुवार ) पर्यंत
६. डाटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी यादीची छपाई इत्यादी, दि . १४ जानेवारी , २०२१ ( गुरुवार )
७. अंतिम मतदार यादी प्रसिध्दी, दि . १५ जानेवारी , २०२१ ( शुक्रवार )

जिल्हयातील रहिवाश्यांनी दि . १६ नोव्हेबर , २०२० ते दि . १५ डीसेंबर , २०२० या कालावधीमध्ये खालीलप्रमाणे योग्य तो फॉर्म - नमुना नोंदविणेकामी आवाहन करणेत येत आहे . 
१ ) फॉर्म - नमूना नं . ६ - नव्याने मतदार नोंदणी करणे 
२ ) फॉर्म - नमूना नं . ७ - मयत मतदार , कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदार यांचे मतदार यादीतील नाव वगळणेकामी 
३ ) फॉर्म - नमूना नं . ८ - मतदार यादीतील नावांची किंवा तपशीलाची दुरुस्ती करणेकरिता 
४ ) फॉर्म - नमूना नं . ८ अ - मतदार संघामध्ये स्थलांतर झाले असल्यास नाव नोंदणीकरिता 

दि .०१ जानेवारी , २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने नाव नोंदणी करणेचे शिल्लक असल्यास अशा नवतरुण मतदारांना मा.भारत निवडणूक आयोग , यांनी पुन्हा संधी दिली आहे . त्यामुळे अशा मतदारांनी तसेच इतर काही मतदार आहेत ज्यांची नावातील दुरुस्ती कायमस्वरुपी स्थानात बदल मयत मतदार असे अर्ज संबंधित तहसिलदार कार्यालय , उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच मतदान केंद्र स्तरीय अधिकारी यांना नियुक्त केलेल्या ठिकाणी सादर करता येतील . 

मतदार यादया पुनरिक्षण कार्यक्रमाकामी पालघर जिल्हातील सर्व नागरिकांनी तसेच सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करणेबाबत डॉ . माणिक गुरसळ , जिल्हाधिकारी तथा  जिल्हा निवडणूक अधिकारी पालघर यांनी आवाहन केले.

Wednesday, November 11, 2020

दिग्गज वार्ताहर" बातम्यादिनांक:- १२.नव्हेंबर २०२०वार :- गुरुवार

*दिग्गज वार्ताहर" बातम्या
दिनांक:- १२.नव्हेंबर २०२०
वार     :- गुरुवार


● दोन कोटी बांधकाम कामगारांना पाच हजार कोटींची मदत; कामगारमंत्री संतोष गंगवार यांची माहिती; योजनेच्या अंमलबजावणीसाठी ८० अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्ती

● दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर देशभरातील बाजारात चीनला जवळपास 60 हजार कोटींचं नुकसान; 7 कोटी व्यापाऱ्यांनी उघडला मोर्चा; बाजारपेठांमध्ये चीनी वस्तूंवर पूर्णत: बहिष्कार टाकला जात आहे

● देशामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ५ लाखांहून कमी; सध्या ४,९४,६५७ सक्रिय रुग्ण; एकूण रुग्णसंख्या ८६ लाख ३६ हजारांवर पोहोचली


● विकास हाच भाजपच्या यशाचा आधार! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकर्त्यांना संदेश; बिहारमधील यशाबद्दल आभार; मुख्यमंत्री नितीशकुमारच; नरेंद्र मोदी यांचे संकेत

● बिहारमध्ये ७ लाखांवर मतदारांकडून ‘नोटा’चा वापर; एकूण ७ लाख ६ हजार २५२, म्हणजे एकूण मतदारांपैकी १.७ टक्के लोकांनी ‘नोटा’चा पर्याय स्वीकारला

● राज्यात दिवसभरात ९ हजार १६४ जणांची कोरोनावर मात; दिवसभरात ४ हजार ९०७ नवे कोरोनाबाधित आढळले; राज्याचा रिकव्हरी रेट ९२.२३ टक्के

● रशियाची स्पुटनिक व्ही लस ९२ टक्के परिणामकारक ठरल्याचे देशाच्या आरोग्य मंत्रालयाने केले जाहीर

● ट्रम्प पराभव कबूल करीत नसल्याने अध्यक्षीय परंपरेत बाधा : जो बायडेन; ट्रम्प यांनी तीन नोव्हेंबरला झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत त्यांच्या विरोधात गेलेला कौल मान्य करण्यास नकार दिला आहे

● टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा कोरोनामुळे रद्द; गेल्या वर्षी या स्पर्धेत १० ग्रँडमास्टर्सनी घेतला होता सहभाग; गतवर्षी ही स्पर्धा विश्वविजेता नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने जिंकली होती

● अक्षय कुमारनं केली कमाल; ‘लक्ष्मी’नं ‘दिल बेचारा’ला मागे टाकत रचला नवा विक्रम; बंदी घालण्याची मागणी होत असलेल्या लक्ष्मीनं रच�

अतिवृष्टी व पूरामूळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत वाटप-जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ

अतिवृष्टी व पूरामूळे  बाधित झालेल्या  शेतकऱ्यांना तातडीने मदत वाटप
-जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ
पालघर(प्रतिनिधी) दि. 11 :- माहे  जून ते ऑक्टोंबर  2020 या कालावधीत  अतिवृष्टी व पुरामूळे  पालघर जिल्हयातील बाधित झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत वाटप करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले. जिल्ह्यातील 62798 शेतकऱ्यांचे 25580.66 हेक्टर  क्षेत्राच्या शेतीपिकांच्या नुकसान झाले आहे. आपद्ग्रस्तांना शेतपीकांसाठी (जिरायत व आश्वासित सिंचनाखालील पिके) यापुवीच्या शासन  निर्णयानुसार  रु. 6800/- प्रति  हेक्टरी  इतकी  तरतूद होती. त्यामध्ये रु. 3200/- प्रति हेक्टरी वाढ करुन एकूण रु. 10000/-प्रति हेक्टरी  दि. 9/11/2020  रेजीच्या  शासन निर्णयान्वये  मदत जाहिर केली आहे.
तसेच बहूवार्षिक  पिकांसाठी  यापुर्वीच्या  शासन निर्णयानुसार  रु.18000/- प्रति हेक्टरी  इतकी तरतूद  होती. त्यामघ्ये  रु 7000/- प्रति हेक्टरी  वाढ करुन एकूण  रु. 25000/-प्रति हेक्टरी  दि. 9/11/2020 रोजीच्या  शासन निर्णयान्वये मदत जाहिर केली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.
निधी नुसार रक्कम  रुपये 7,54,43000, (अक्षरी   सात कोटी चौपन्न लाख  त्रेचाळीस हजार )   रुपये  मात्र इतके  अनुदान शासन  महसूल  व  वनविभाग ( मदत व पुनवर्सन आ व्य.. प्रभाग)यांचेकडून प्राप्त. झाले आहे. सदरच्या  अतिवृष्टी व पूरामूळे  बाधित झालेल्या  शेतकऱ्यांना तातडीने मदत वाटप  करणे बाबत  जिल्ह्यातील  सर्व तहसिलदार यांना  आदेश   देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसाळ यांनी सांगितले.

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...