Wednesday, February 17, 2021

केळवा सागरी पोलिस स्टेशन व्दारा मायेची ऊब !

केळवा सागरी पोलिस स्टेशन व्दारा मायेची ऊब !
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) खाकी वर्दीतील पोलिस म्हणजे " कायदा - सुरक्षीतता "  आद्य रक्षक, पण या पेक्षाही त्यापलीकडे जाऊन आपण समाजाचे आपण एक घटक आहोत, असे समजून समाजाचे आपल्यावर देणे आहे या भावनेने कार्य करणारे श्री भीमसेन गायकवाड यांचे अभिनंदन करणे या साठी शब्द अपुरे पडतात.     दिनांक १५ फेब्रुवारी रोजी केळवा सागरी पोलिस स्टेशन अधिकारी - कर्मचारी यांच्या व्दारा व मा, डॉक्टर श्री चव्हाण साहेब ( पालघर ) यांच्या सौजन्याने केळवे गावातील " हनुमान मंदिर " परिसरात रोजी - रोटी मिळविण्यासाठी सहकुटुंब स्थलांतरित होऊन आलेल्या गरिब आदिवासी मजूर बांधवांना रात्रीच्या थंडी पासून स्वरक्षण व सुरक्षा मिळण्यासाठी "  मायेची ऊब " म्हणून बॅल्केट वाटप करण्यात आली. या कार्यक्रमा मुळे गावकर्‍यांनकडून पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...