Tuesday, August 31, 2021

श्रीकांत कवळे लिखित अंतरंग मनाचे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

*श्रीकांत कवळे लिखित  अंतरंग मनाचे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न*


(अलिबाग - किशोर पाटील)  
   दि. ३१, 

    नायब तहसिलदार श्रीकांत कवळे, यांच्या *"अंतरंग मनाचे"* या शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या   पुस्तकाचे प्रकाशन श्रीकांत कवळे यांच्या मातोश्री,  स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय पांडुरंग कवळे यांच्या पत्नी  सत्यवती पांडुरंग कवळे यांच्या हस्ते तसेच डाॕ. श्रीपाल सबनीस (प्रख्यात जेष्ठ साहित्यिक , समीक्षक आणि ८९ व्या अखिल भारतीय मराठी  साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ) यांच्या  हस्ते याच पुस्तकाच्या  ईबुकचे प्रकाशन  सोहळा  वेव्हज या उपहारगृह आणि पार्टी हॉल, अलिबाग येथे  संपन्न झाला . 
        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी    प्रख्यात  जेष्ठ साहित्यिक   डाॕ. श्रीपाल सबनीस   होते.    त्यांच्या अध्यक्षीय आणि सर्वसमावेशक भाषणात पुस्तकाचे त्यांनी  सुरेख समीक्षण करून लेखकाबद्दल गौरवोद्गार काढले. शारदा प्रकाशनाच्या कार्याचा गौरव करून डॉ. सबनीस म्हणाले की , " महाराष्ट्रात प्रकाशक अनेक आहेत, पण सेवावृत्तीने आणि निष्ठेने प्रकाशन संस्था चालविणारे संतोष लक्ष्मण राणे यांच्यासारखे प्रकाशक दुर्मिळ आहेत. त्यांनी ' अंतरंग मनाचे ' हे पुस्तक प्रकाशित करून वाचकांना श्रीकांत कवळे या नव्या ताकदीच्या लेखकाची ओळख करून दिली आहे. लेखकाने काही कथा लिहिल्या असून त्या अतिशय उत्कंठावर्धक आहेत. श्रीकांत कवळे यांनी चित्रपट आणि मालिका सृष्टीत प्रवेश केल्यास सासू - सुना सोडून इतर विषय हाताळावेत. पटकथा आणि उत्कृष्ट संवाद लिहिण्याची लेखकाची क्षमता या पुस्तकातुन जाणवते. त्यांचे सर्वच लेख म्हणजे अलिबागच्या मातीचे अंतरंग आहे. प्रत्येक वाचकाला नवी उभारी देणारे हे पुस्तक संपूर्ण  महाराष्ट्रात गाजेल असा विश्वासही डॉ. सबनीस यांनी व्यक्त केला.
         मनोगत व्यक्त करताना लेखक श्रीकांत कवळे म्हणाले,  शासकीय सेवेत रोज अनेक माणसे भेटतात. या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपण हासू पाहू शकलो तर त्यासारखे पुण्याचे कार्य नाही. अशी अनेक पुण्यांची कामे करताना शब्द हाथ जोडून कधी उभे राहिले ते कळलेच नाही . विविध अनुभव एकत्र करून ते लिहीत गेलो. घरातील  सर्वाना लेखन आवडत गेले. त्यांनी प्रोत्साहन दिले . त्यातून सुंदर आणि वाचनीय पुस्तक आकाराला आले आहे."
       प्रकाशक प्रा. संतोष राणे यांनी आपल्या खुमासदार शैलीत तर  शिरीष चिटणीस यांनी वैचारिक शैलीत कार्यक्रमास बहार आणला . यावेळी सौ.सबनीस यांच्या हस्ते  लेखकाच्या  पत्नी सौ. अरुणा श्रीकांत कवळे आणि त्यांच्या मातोश्रींचा सत्कार करण्यात आला. यावेळी अर्जुन गावंड , सई सचिन  गावंड यांचीही भाषणे झाली.

या कार्यक्रमास  शिरीष चिटणीस ( म.सा.प. पुणे, पुणे शहर प्रतिनिधी ), प्रा. संतोष राणे, (प्रकाशक शारदा प्रकाशन ठाणे),   डॉ. सुचिता पाटील (लेखिका, कवयित्री, निवेदिका आणि व्हाईस आर्टिस्ट), प्रसाद पाटील (जेष्ठ विधीज्ञ आणि  माजी शासकीय अभियोक्ता रायगड)  जयपाल पाटील  (रायगड भूषण आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ञ ), जगदीश कवळे (संचालक सावतामाळी पतसंस्था अलिबाग), शशिकांत उखळकर (डेप्युटी जनरल मॅनेजर आर.सी.एफ. थळ),  संविधा  जाधव ( मुख्याध्यापिका, आर.सी.एफ. स्कुल कुरुळ),   अँड जयेंद्र गुंजाळ, (संचालक समर्थकृपा वृद्धाश्रम परहूर,  अलिबाग),  तसेच  कवळे, म्हात्रे, गावंड, पाटील , मोरे, जैन परिवार,  विविध क्षेत्रातील मान्यवर,  पत्रकार आणि जिवलग मित्र  परिवार इ. यावेळी उपस्थित होते.

       स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय पांडुरंग कवळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ कवळे कुटुंबीयांकडून  अँड. जयेंद्र गुंजाळ यांना साहित्य संगम प्रतिष्ठान, अलिबाग यांच्या वतीने समाज भुषण तर कवी  नवनाथ  आनंदा रणखांबे साहित्य क्षेत्रातील उगवता तारा यांना साहित्य सेवा  पुरस्कार प्रदान करून सामाजिक बांधिलकी दर्शविण्याचा परिपाठ घालून दिला .
         मेघा म्हात्रे यांनी ईश्वस्तवन आणि लेखक , कवी  श्रीकांत कवळे यांची श्राद्ध ही कविता सुरेल आवाजात गाऊन रसिकांची मने जिंकून घेतली. डॉ. सुचिता पाटील यांनी त्यांच्या सुमधुर वाणीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून कार्यक्रम एक वेगळ्याच उंचीवर नेला तर या   कार्यक्रमाचे आभार  जगदिश कवळे यांनी केले.

स्वामी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अभोना येथील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

*स्वामी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अभोना येथील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*

 नाशिक प्रतिनिधी / सतीश पाटील. 

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने डी. फार्मसी प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. बहुउद्देशीय सामाजिक ग्रामीण व शैक्षणिक संस्था विंचूरे संचलित स्वामी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अभोना ता. कळवण जि. नाशिक येथील डी. फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या वर्षाचा निकाल 100% टक्के लागला असून प्रथम वर्षामध्ये प्रथम क्रमांक निकम दामिनी नानाजी ८८.९१%  द्वितीय क्रमांक गोरे सार्थक सुधाकर ८३.९१% व तृतीय क्रमांक खैरनार दीपक संजय ८३.७३% तसेच द्वितीय वर्षामध्ये प्रथम क्रमांक पवार स्वप्नाली रघुनाथ ८७.४०% द्वितीय क्रमांक शिंदे दिपाली दत्तात्रेय ८१.८०% व तृतीय क्रमांक देशमुख प्राची विजय ८१.५०%. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री संजय गायकवाड व मा. श्रीमती सचिव संगीता गायकवाड व प्राचार्य किरण पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

कल्याण आर एस पी युनिट च्या माध्यमातून झकारिया एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट च्या सौजन्याने सांगली जिल्ह्यातील 200 पूरग्रस्तांना कपडे,रेशन आणि भांडी वाटप..

कल्याण आर एस पी युनिट च्या माध्यमातून झकारिया एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट च्या सौजन्याने सांगली जिल्ह्यातील 200  पूरग्रस्तांना कपडे,रेशन आणि भांडी वाटप..
भिवंडी दि ३१ ( किशोर पाटील )
 सांगली जिल्ह्यात अचानक आलेल्या पावसाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेले असताना कोयना नदीच्या पात्राणे अनेक लोकांचे जीवन विस्कळीत झाले. अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनतेचा  संसार उध्वस्त झाला असताना कल्याण डोंबिवली ठाणे विभागाचे आर एस पी कमांडर मणिलाल शिंपी यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दलाचे महासमादेशक अरविंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झकरिया एज्युकेशन फौंडेशन यांच्या सौजन्याने सांगली जिल्ह्यातील तासगाव, नागठाणे, सांगली धामणी रोड येथील पुरग्रस्त २०० लोकांना, नागठाणे येथील उद्योजक व सरपंच प्रशांत पाटील ,ग्रामपंचायत सदस्य रूशाली पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत एक महिन्याचे किराणा किट, भांडी, आणि कपडे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आर एस पी महासमादेशक अरविंद देशमुख यांनी सांगितले की, कल्याण ठाणे युनिट चे कार्य संपूर्ण महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे. कमांडर मनिलाल शिंपी आणि त्यांची टीम पहिल्या लॉकडाऊनपासून गोरगरिबांची आणि सर्वसामान्य जनतेची सेवा करीत आहे. विविध समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात शक्य असेल ती मदत पोचवण्याचे कार्य स्वामीनारायण ट्रस्ट युवक संघ, जेजस लाइफ ट्रस्ट, समाजसेवक सोन्या पाटील, समाज सेवक रामचंद्र देसले साहेब, सी एन पाटील फाउंडेशन, झकारिया एज्युकेशन ट्रस्ट यासारख्या सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून 40 ते 50 हजार कुटुंबांना रेशन वाटप ,चादर वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप असे उपक्रम राबवित आहेत. नागठाणे येथील सरपंच यांनीही आमच्या गावाला मिळालेली मदत ही खूप महत्त्वाची आणि मोलाची आहेत व योग्य वेळी प्राप्त झाले त्याबद्दल आभार व्यक्त केले. त्याचप्रमाणे सांगली धामणी रोड येथील स्थलांतरित कामगारांची संपूर्ण जीवन उध्वस्त झाले होते अशा ठिकाणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कृष्णा कांबळे आणि हेड कॉन्स्टेबल अशोक कोळी, मनोज टोणे, मुख्याध्यापक वाघमारे यांच्या उपस्थितीत तेथील मजुरांना देखील भांडी,रेशन किट आणि कपडे वाटप करण्यात आले. या संदर्भात बोलताना झकारिया एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन झकारिया लकडावाला, यांनी सांगितले की मनीलाल शिंपी यांच्यामुळेच आम्हाला खऱ्या गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचविणे शक्य होत आहे आणि यापुढे आम्ही शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्यानेच सेवा करत राहणार असे सांगितले. या  उपक्रमासाठी आर एस पी अधिकारी कल्याण घनश्याम सोनवणे, छोटू अहिरे, झकारिया एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्त मलाड मुंबईचे श्रीराज शेख ,फिरोज हाजमी, सनी चौघ, यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच तासगाव तालुका समादेशक शहाजी खरमाटे, आर एस पी अधिकारी अभिजित तासगावकर, सी.वाय होरे, साजिद मुजावर, यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी नियोजनासाठी मोलाचे परिश्रम घेतले. वाळवा नागठाणे, नांदगाव परिसरातील प्रसिद्ध उद्योजक प्रशांत पाटील यांनी दात्यांचे  विशेष आभार मानले.

भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर महा विकास आघाडीचे वर्चस्व कायम

भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर महा विकास आघाडीचे वर्चस्व कायम
भिवंडी दि.३१(किशोर पाटील)
भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापतीची निवडणूकीत महा विकास आघाडीने वर्चस्व कायम राखले असुन रिक्त झालेल्या सभापती पदाची निवडणूक घेण्यात आली.या निवडणुकीत महाविकास आघाडीकडू‌न शिवसेनेचे उमेदवार डाँ.संजय पाटील यांना ९ मते मिळाली तर भाजपचे दयानंद पाटील यांना ८ मते मिळाली.एकूण १८ सदस्य संख्या असलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीच्या वेळी एक सदस्य गैरहजर असल्याने १७ सदस्यांनी यावेळी मतदान केले.
बाजार समितीच्या सभापती पदाच्या झालेल्या अटी-तटीच्या लढतीत भाजपचा पराभव झाला‌ असुन महाविकास आघाडीचे डाँ.संजय पाटील यांचा एका मताने मताने विजय झाला.यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील,आमदार शांताराम मोरे यांनी नवनिर्वाचित सभापती डॉ संजय पाटील यांचे अभिनंदन केले.यावेळी शिवसेनेचे इरफान भुरे,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गणेश गुळवी,मजुर फेडरेशनचे मा.अध्यक्ष पंडित पाटील इत्यादी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
गुप्त पध्दतीने घेण्यात आलेल्या या निवडणुकीत  निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून ठाणे सहाय्यक निबंधक  शामकांत साळुंखे यांनी काम पाहिले.तर
कृषी बाजार समितीचे सचिव यशवंत म्हात्रे हेही उपस्थित होते.

बहुजन विकास आघाडीत,इतर पक्षातील सक्रिय कार्यकर्त्यांचे इनकमिंग सुरूच.......!

बहुजन विकास आघाडीत,इतर पक्षातील सक्रिय कार्यकर्त्यांचे इनकमिंग सुरूच.......!

प्रतिनिधी - किशोर पाटील

वसई :- वसई विरार शहर महानगपालिकेचे प्रथम महापौर राजीवजी पाटील,आमदार राजेश पाटील,ठाणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष काशिनाथ जी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बोईसर विविध भागातील तरुणांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी नवनिर्वाचित बहुजन विकास आघाडी जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ घरत, आणि महिला अध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्या भावना ताई विचारे यांचा सत्कार करण्यात आला.तसेच कोरोना काळात चांगली कामगिरी केल्याबद्दल सचिव अनिष शेख यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सर्व उपस्थितांना  आमदार राजेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी या कार्यक्रमास तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील, तालुका अध्यक्ष नागेश पाटील, ज्येष्ठ नेते अविनाश चुरी, माजी समाज कल्याण  सभापती विष्णू कडव,पंचायत समिती सदस्य अनिल रावते, पंचायत समिती सदस्य विनोद भावर,संघटक मिलिंद साखरे,अल्पसंख्यांक अध्यक्ष अमजद अली,युवती अध्यक्षा धनश्री रेवंडकर,डायमंड चड्डा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

योगसंध्या वैलनेस स्टूडियो के माध्यम से मनाया गया धूम धामसे जन्माष्टमी महोत्सव!

योगसंध्या वैलनेस स्टूडियो के माध्यम से मनाया गया धूम धामसे जन्माष्टमी महोत्सव!

कल्याण - किशोर पाटील
दिनांक 30 अगस्त 2021 ,श्री कृष्ण जन्माष्टमी के उपलक्ष मैं कल्याण के बहुचर्चित योगसंध्या वैलनेस स्टूडियो ने श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सव बड़े धूम धाम से मनाया. डॉक्टर संध्या जी के अलावा मुख्य अतिथि के रूप में कल्याण के श्री स्वामीनारायण हॉल के अध्यक्ष और समाज सेवक श्री दिनेश भाई ठक्कर जी, कल्याण दृष्टि ऑप्टिकल्स के प्रोपराइटर श्री अमोल जोशी जी, कल्याण गिरिराज ट्रेडर्स के श्री पीयूष कार्य जी , श्री हीराभाई लाल नामादिया जी और योगसंध्या वैलनेस स्टूडियो के सभी योगियों ने बढ़ चढ़कर भाग लिया. श्री कृष्ण जन्माष्टमी के अवसर पर डॉक्टर संध्या जी ने अपने योगियों के साथ ,योग लीला का रंगारंग कार्यक्रम पेश किया और इस कोरोना के काल में विश्व शांति के लिए योग ध्यान भी किया जिसमें उन्होंने श्री कृष्णा भगवान के जीवन काल के सभी लीलाएं का ध्यान कराया और उसे अपने वास्तविक जीवन में कैसे अपनाएं और उसके महत्व समझा कर सभी योगियों को मंत्रमुग्ध किया.

दहिसरचा बाळकृष्ण जनता जनार्दनांच्या सेवेत आजही कार्यरत....!

दहिसरचा बाळकृष्ण जनता जनार्दनांच्या सेवेत आजही कार्यरत....!

प्रतिनिधी - किशोर पाटील

मुंबई:- ईश्वर सेवा हीच मानव सेवा ! जनसेवाहितार्थ निस्वार्थ परोपकारीवृतीचे शिवसेनेचे कार्यरत सेवाभावी नगरसेवक श्री बाळकृष्ण ब्रीद यांचा आज मंगळवार दिनांक ३१\०८\२०२१ जन्मदिवस आहे. विशेषतः गोकुळाष्टमी दहिकाला आणि बाळकृष्ण ब्रीद यांचा जन्मदिवस एकाच दिवशी हा दुग्धशर्करा योगायोग आहे.तसेच शिवसेना शाखाप्रमुख, विभागसंघटक ते बृहन्मुंबई महानगर पालिकेतील धडाडीचे कार्यसम्राट नगरसेवक असा त्यांचा नेत्रदीपक उल्लेखनीय प्रवास प्रत्येक शिवसैनिकांना, तमाम नागरिकांना अभिमानास्पद आहे. त्यामागे हिन्दुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा शुभाशीर्वाद ! शिवसेना पक्षप्रमुख माननीय मुख्यमंत्री महोदय श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन, बृहन्मुंबई महानगर उपनगर पालकमंत्री महोदय युवासेना अध्यक्ष माननीय श्री आदित्य उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेतून दहिसरचे शिवसेनेचे नगरसेवक श्री बाळकृष्ण ब्रीद आपल्या कुटुंबासह जिवावर उदार राहून कोरोना काळात दीडदोन वर्ष जनसेवाहितार्थ  दिवस रात्र राबत आहेत.त्यांचा नगरसेवक मतदारसंघ दहिसर विधान सभा आणि मागाठाणे विधान सभा क्षेत्रात समाविष्ट आहे.दहिसर चेकनाकापासून ते केतकीपाडा,कानडे मैदान,वैशाली नगर ओवरीपाड्यातील शांतीनगर टेकडी टपाल कार्यालय , आणि शिधावाटप कार्यालयाच्या शैलेंद्र नगर जवळून गोलाकार एक्स्प्रेस हायवे,ते स्वामी विवेकानंद मार्ग असा मोठा संमिश्र भाषिक मतदारसंघाचे नेतृत्व करीत असतानाच बाळकृष्ण ब्रीद यांच्या नगरसेवक या नात्याने प्रत्यक्ष सामाजिक, विधायक कार्याचे डौलदार डोंगर दिसून येतात. त्यांनी स्वतःचे घरदार विसरून कोरोना काळात प्रथम कोराना महामारीच्या संकटाला महत्त्व दिले.जगापुढे, देश-राज्य- बृहन्मुंबई महानगरात बाळकृष्ण ब्रीद यांची मानवता आणि माणूसकी दिसून आली.अगदी सुरूवातीला सन २०१९-२०२० गत वर्ष संपत असताना त्या काळात याविषयीची साधन सामुग्री फारशी उपलब्ध नसताना देखील दहिसर पोलीस ठाणे, दहिसर अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगर आरोग्य सेवेला सुरुवातीलाच चेहर्‍यावरील कपड्याची मुखपट्टी (मास्क), सॅनिटायझर, हातमौजे उपलब्ध करून दिले. तसेच तातडीने संपूर्ण मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य डिपार्टमेंटच्या वतीने नागरिकांमध्ये जनजागृतीपर समाजप्रबोधन स्तुत्य उपक्रम, स्वच्छता अभियान खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक  बांधिलकीची जाणीव ठेवून सतत कार्यरत राहिल्यामुळे विभागातील अनेकांना जीवदान मिळाले.तसेच संसर्गजन्य महारोगराई महामारीत त्यांचे सर्वत्र रोगनिदान चाचणी आरोग्य चिकित्सा शिबीराचे आयोजन ठिकठिकाणाहून मोठ्याप्रमाणात रूग्णांना तातडीने बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य रूग्णालयात अलगीकरण दाखल करण्यात आले.तसेच त्यांच्या रूग्णाच्या कुटुंबासह विलगीकरण करून त्यांचीही आपुलकीने काळजीपूर्वक चांगली रहाणे,जेवणखाण, अशी सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली. तसेच घरासारखी आपुलीकीच्या मायेने सेवा केल्याने प्रत्येकाला बाळकृष्ण ब्रीद हे जणु देवच वाटत आहे.जनतेच्या मदतीला धावणारा असा हा देवमाणूस आहे. विशेषत: त्यांनी या कामाचे सर्व श्रेय आपल्या शिवसेना पक्षाला,नेतृत्वाला,तर विद्यमान आमदार महोदयाकडून आदरणीय शिवसेना विभागप्रमुख श्री विलासभाई पोतनीस, तसेच कार्यसम्राट आमदार महोदय आदरणीय श्री प्रकाशदादा सुर्वे, विभागसंघटक, उपविभागप्रमुख, महिला विभाग संघटक,उपविभाग संघटक, युवाविभाग अधिकारी, भारतीय विद्यार्थी सेना पदाधिकारी, कामगार सेना, तर खांद्याला खांद्या लावून काम करीत आहेत, असे आमचे शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, सर्वच महिला पुरूष शिवसैनिक आजही कार्यरत आहे.याचा मला अभिमान नक्कीच वाटतो.तसेच कोरोना काळात अनेक श्रमिकांनी आपल्या गावांकडे जाताना दहिसर चेकनाकावर असंख्य लोकांपर्यंत पिण्यास शुध्द मुबलक पाणी,प्रथमोपचार वैद्यकीय उपचार, खानपान सेवा आणि आपले कोरोना यौध्दा पोलीस, अग्निशमन दल, आणि वैद्यकीय सार्वजनिक आरोग्यसेवक, बृहन्मुंबई महानगर पालिकेचे सफाई कामगार, बेस्ट, एसटी वहातूक कर्मचारी या सर्वांसाठी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी आपले जनसंपर्क कार्यालय रात्र दिवस कार्यरत ठेवले आहे.तसेच आपल्या मतदारसंघातील विभागातील प्रत्येक कुटुंबियांना लाॅकडाऊन टाळेबंदी आणि संचारबंदीच्या कोरोना काळात वेळेवर दूध, किराणा माल, भाजीपाला, सर्व अत्यावश्यक सेवेपासून व्यवस्था शिवसैनिकां मार्फत स्वतःच जातीने रस्त्यावर उतरून काम करीत असलेला सच्चा शिवसैनिक नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद हे आपल्या मतदारसंघात डोंगराळ भागात, झोपडपट्टीतून,चाळी , इमारतीत   गृहनिर्माण सहकारी सोसायटीत अत्यावश्यक वस्तू पुरवठा सेवाकेंद्र उभारून सुसज्ज पध्दतशीर मानव सेवेत बाळकृष्ण ब्रीद आजही रमलेले आहेत. शासकीय आदेशानुसार ते आजही सामाजिक सुरक्षिततेचा विचार व्यक्त करताना तोंडावर मास्क आवश्यक, तर सॅनिटायझरने वारंवार हात स्वच्छ धुवून दोन व्यक्तीमधील अतंर ठेवून विद्यमान जागृत नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी आपल्या मतदारसंघात प्रत्येक नागरिकांची काळजीपूर्वक विचारपूस करतात.आदरपूर्वक उपयुक्त वस्तुचे वितरण विनामूल्य वेळोवेळी केलेले आहे. त्यांनी वैशाली नगर नरेंद्र पार्क संजिवनी हायस्कूलच्या शानदार सभागृहात दहिसर विधान सभा,मागाठाणे विधान सभा क्षेत्रातील गृहनिर्माण, गृहसहकारी सोसायटीतील जमिन मालकी हक्क हस्तांतरित कनवेस्ट शासकीय महसूल विभागांतर्गत कामकाज शिबीर जेष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड अजित मांजरेकर यांच्या मार्गदर्शनपर यशस्वी केले होते.जनतेचा खूप छान प्रतिसाद या स्तुत्य उपक्रमाला लाभला होता. व्यक्तीमत्व व्यक्तीविशेष शिबीर, व्यवसाय, स्वयंरोजगारासाठी शिबीर, आरोग्य चिकित्सक शिबीर आयोजित करण्यात आली होती. त्यांच्या पाठीशी कायम निष्ठापूर्वक प्रत्येक कामात पाठींबा आहे.विभागातील त्यांच्या बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या विकास कामांचा धडाका आजही सर्वांनाच पहायला मिळतोय. सार्वजनिक सुसज्ज आधुनिक शौचालयापासून अनेक वास्तूचीं उभारणी केली आहे.आज त्यांच्याबरोबर त्यांचे दोन्ही सुपुत्र समाजसेवत कार्यरत आहेत. युवासेना विभाग संघटक अधिकारी श्री ऋषी बाळकृष्ण ब्रीद कल्पकतेतून उत्कृष्ट जनसंपर्क, जनसेवाहितार्थ सामाजिक अनेक स्तुत्य उपक्रम राबविण्याचे काम करीत आहे.आज मंगळवार दिनांक ३१ऑगस्ट २०२१ सकाळी दहापासून दुपारी एक वाजेपर्यंत जीवन सुकन्या प्रत्येक महिलांची हितकारक शासकीय योजनेंतर्गत भारतीय टपाल सेवा, जनसेवाहितार्थ पोहचविण्याचे काम आपल्या जन्मदिवशी गोकुळाष्टमी शुभ दिवशी दहिसर प्रभाग क्रमांक तीन   मतदारसंघात शिवसेना नगरसेवक श्री बाळकृष्ण ब्रीद पोहचविण्याचे काम करीत आहेत .या विभागातील अनेक मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. अशी माहिती दत्ताराम घुगे यांनी दिली.

Monday, August 30, 2021

महा आवास अभियान-ग्रामीण" मधील उत्कृष्ट काम करणाऱ्या कोकण विभागातील संस्था/व्यक्तींना पुरस्कार जाहीर 3 सप्टेंबर रोजी पुरस्कार वितरण


*"महा आवास अभियान-ग्रामीण" मधील उत्कृष्ट काम करणाऱ्या* 
*कोकण विभागातील संस्था/व्यक्तींना पुरस्कार जाहीर*
 _*3 सप्टेंबर रोजी पुरस्कार वितरण*_  

नवी मुंबई (प्रतिनिधी)दि.30 :- “महा आवास अभियान-ग्रामीण" अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी व कामगिरीबाबत मुल्यमापन करुन उत्कृष्ट काम करणाऱ्या कोकण विभागातील संस्था व व्यक्तींना "महा आवास अभियान-ग्रामीण ' पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम दि.3 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 2.00 वा. श्री.विलास पाटील, विभागीय महसूल आयुक्त यांच्या शुभहस्ते विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन, येथे आयोजित करण्यात आला आहे.  
सन 2021-21 या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यात दि. 20 नोव्हेंबर, 2020 रोजीच्या राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून दि.20 नोव्हेंबर, 2020 ते 5 जुन, 2021 या कालावधीत “महा आवास अभियान ग्रामीण " राबविण्यात आले. “सर्वांसाठी घरे-2022" या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व गुणवत्ता आणणे हे या अभियानाचे उद्दिष्ट होते. हे अभियान कोकण विभागामध्ये यशस्वीरित्या राबविण्यात आले. 
या अभियानांतर्गत शासनाने विभागस्तरीय समितीचे गठन केले होते. या समितीचे विभागीय आयुक्त हे अध्यक्ष असून अपर आयुक्त, आदिवासी विकास, अपर कामगार आयुक्त/कामगार उपायुक्त, विभागीय उप आयुक्त, समाजकल्याण, उप आयुक्त (महसूल), उप आयुक्त (पुरवठा), बँक क्षेत्रिय अधिकारी हे सर्व सदस्य आहेत. तर उप आयुक्त (विकास) हे सदस्य सचिव आहेत. या समिती मार्फत उत्कृष्ट कामगिरीच्या विभागस्तरीय पुरस्कारांची निवड प्राप्त नामांकनामधुन विभागस्तरीय अंमलबजावणी, सनियंत्रण व मुल्यमापन करण्यात आले आहे. 
कोकण विभागातील सर्व जिल्हा परिषदांकडून प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत प्राप्त माहितीनुसार व शासनाने गठीत केलेल्या विभागस्तरीय समितीच्या निकषानुसार गुण विचारात घेता उच्चतम गुणवत्ता पंचायत राज संस्था पुढीलप्रमाणे आहेत. 
प्रधानमंत्री आवास योजना- सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद प्रथम क्रमांक-जिल्हा परिषद ठाणे, द्वितीय क्रमांक-जिल्हा परिषद रत्नागिरी तृतीय क्रमांक-जिल्हा परिषद रायगड .
 सर्वोत्कृष्ट पंचायत समिती प्रथम क्रमांक-पंचायत समिती म्हसळा, जि.प.रायगड, द्वितीय क्रमांक-पंचायत समिती दापोली, जि.प.रत्नागिरी, तृतीय क्रमांक-पंचायत समिती कुडाळ, जि.प.सिंधुदुर्ग, 
सवोत्कृष्ट ग्रामपंचायत-प्रथम क्रमांक-ग्रामपंचायत वाडोस, ता.कुडाळ, जि.प.सिंधुदुर्ग, द्वितीय क्रमांक-ग्रामपंचायत आखवणे भोम, ता.वैभववाडी, जि.प.सिंधुदुर्ग, तृतीय क्रमांक- ग्रामपंचायत सडुरे शिराळे, ता.वैभववाडी, जि.प.सिंधुदुर्ग, 
सर्वोत्कृष्ट वित्तीय संस्था प्रथम क्रमांक- उमेद- ता. जव्हार, जि.पालघर द्वितीय क्रमांक- उमेद- ता.वाडा, जि.पालघर तृतीय क्रमांक- उमेद- ता. डहाणू, जि.पालघर शासकिय जागा उपलब्धता-प्रथम क्रमांक-तहसिलदार, ता.कल्याण,जि.ठाणे द्वितीय क्रमांक- तहसिलदार, ता.शहापूर, जि.ठाणे तृतीय क्रमांक-निरंक, 
राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद-प्रथम क्रमांक-जिल्हा परिषद रत्नागिरी, द्वितीय क्रमांक-जिल्हा परिषद सिंधुदुर्ग तृतीय क्रमांक-जिल्हा परिषद ठाणे. 
सर्वोत्कृष्ट पंचायत समिती- प्रथम क्रमांक-पंचायत समिती मोखाडा, जि.प.पालघरद्वितीय क्रमांक-पंचायत समिती तलासरी, जि.प.पालघर तृतीय क्रमांक- पंचायत समिती वैभववाडी जि.प.सिंधुदुर्ग. 
सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत- प्रथम क्रमांक-ग्रामपंचायत अणाव, ता.कुडाळ, जि.प.सिंधुदुर्ग, द्वितीय क्रमांक- ग्रामपंचायत मांगवली, ता.वैभववाडी, जि.प.सिंधुदुर्ग, तृतीय क्रमांक- ग्रामपंचायत उमरोली, ता.मंडणगड, जि.प.रत्नागिरी. 
सर्वोत्कृष्ट वित्तीय संस्था-प्रथम क्रमांक- उमेद- ता. जव्हार, जि.पालघर द्वितीय क्रमांक-उमेद-ता.वाडा, जि.पालघर तृतीय क्रमांक- उमेद-ता.डहाणू, जि.पालघर यांना देण्यात आले आहेत.
कोकण  विभागातील सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत व सर्वोत्कृष्ट गृहसंकुल पुढीलप्रमाणे आहेत. 
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत-प्रथम क्रमांक-ग्रामपंचायत चिंचवली, ता.भिवंडी, जि.प.ठाणे. 
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट गृहसंकुल प्रथम क्रमांक- श्रीम.सखुबाई दाजीबा निकम, ग्रा.पं. मुणगे, ता.देवगड, जि.प.सिंधुदुर्ग यांना देण्यात येणार आहेत.
अभियानातील कार्पोरेट संस्थासाठी देण्यात येणारा सर्व उत्कृष्ट जिल्हा पालघर रोटरी डिस्ट्रीक्ट 3141 “अशियाना” ता.वाडा जि.पालघर यांना घोषित करण्यात येणार आहे.

नरेश जाधव यांच्या प्रयत्नातून खुपरी येथे सेवा स्वभाग्य ट्रस्ट च्या वतीने रेशनकीट व मुलांना खाऊच वाटप

नरेश जाधव यांच्या प्रयत्नातून खुपरी  येथे सेवा स्वभाग्य ट्रस्ट  च्या वतीने  रेशनकीट व मुलांना खाऊच  वाटप 

वाडा / किशोर पाटील
       समाजाप्रती प्रत्येकाला काही तरी देणे आहे. असे समजून व्यक्ती अथवा संस्थानी समाजास उपयुक्त ठरतील अशा सामाजिक कर्तव्याचा  निर्वहान करण्याची जबाबदारी नैतिक दुष्टिकोनातुन स्वीकारने गरजेचे असून आपल्या गावातील गरजूना मदतीचा हात दिल्यास सामाजिक सलोखा निर्माण होण्यास मदत होणार असल्याने मत  नरेश जाधव यांच्या वतीने आयोजित खुपरी येथील गोर गरिब असलेल्या गरजुंना रेशनकीट व मुलांना खाऊच  वाटप  कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले
या कार्यक्रमाचे अयोज सामाजिक कार्यकर्ते नरेश जाधव यांनी केले होते  शहरातील विविध भागात वास्तवयाने असलेल्या आर्थिक अडचणीतील व निराधार गरजुंना नरेश जाधव यांच्या प्रयत्नातून 
वाटप करण्यात आले.  या कार्यक्रमाचे उद्घाटन  समाजसेवक श्री.कमलाकर पाटील साहेब यांच्या शुभहास्ते करण्यात आले. यावेळी  कार्यक्रमात संतोष निखुर्डे (अपंग वाडा  तालुका अध्यक्ष) जनसेवा पदाधिकरी वत्सला पवार,सुरज  जाधव,वैभव भोईर , तसेच सेवा स्वभाग्य ट्रस्टी चे सर्व पदाधिकरी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमास गडकपाडा येथील बचत गटातील महिलांनी सहकार्य केले यावेळी महिलांना कोरोना सन्मानपत्र ही देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता समाजसेवक श्री. नरेश जाधव यानी विशेष मेहनत घेतली.

जर्मनीत एकाच वेळी नाशिकचे सहा आयर्न मॅन

जर्मनीत एकाच वेळी नाशिकचे सहा आयर्न मॅन

नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.

अत्यंत खडतर परिस्थिती शारीरिक क्षमतांचा कस पाहणारी 'आयर्न मॅन' स्पर्धा जर्मनीतील येथील हमबर्ग येथे पार पडली. त्यात सहा नाशिककरांनी यशस्वीपणे ही स्पर्धा पूर्ण केलीविशेष म्हणजे यात नाशिकच्या एका महिलेने उल्लेखनीय साहस करत देशातील फास्टेस्ट इंडियन लेडी आयर्नमनचा किताब पटकावला. एक-दोन नव्हे तर तब्बल सहा नाशिककरांनी अतिशय अवघड अशी ही स्पर्धा पार करून नाशिककरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात यश मिळवले.
नाशिकचे प्रख्यात डॉ. वैभव पाटील यांनी ही स्पर्धा १४ तास २६ मिनिटांत पूर्ण केली. तर, डॉ अरुण गचाले यांनी दुसऱ्यांदा आयर्नमनचा किताब पटकावला. त्यांना स्पर्धा पूर्ण करण्यासाठी १५ तास ३७ मिनिटे लागली. अरुण पालवे यांनी १५ तास ४ मिनिट, तर नीलेश झंवर यांनी सर्वप्रथम ११ तास ५९ मिनिटांत स्पर्धा पूर्ण केली. अनिकेत झंवर यांनी १४ तास ३५ मिनिटांत अंतर कापले. विशेष म्हणजे नाशिकच्या या टीममध्ये डॉ. देविका पाटील यांचाही सहभाग होता. त्यांनी १३ तास ३ मिनिटांच्या विक्रमी वेळेत ही स्पर्धा पूर्ण करण्याचा बहुमान पटकावला. त्यामुळे डॉ. पाटील या फास्टेस्ट इंडियन लेडी आयर्नमन ठरल्या. याआधी हा विक्रम ब्लॉसम नामक महिलेच्या नावावर होता. नाशिकमधून तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांची कन्या रविजा सिंगल यांच्यानंतर डॉ. देविका पाटील आयर्नमन ठरल्याने महिलांचा या साहसी स्पर्धेकडे कल वाढत असल्याचं दिसून येत आहे.
नाशिकच्या आयर्नमन यादीत डॉ. सुभाष पवार स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंगमध्ये मागे पडले. विशेष म्हणजे त्यांनी ६५ व्या वर्षी सहभाग नोंदवला होता. नाशिकसाठी ६५ वर्षांच्या व्यक्तीने या साहसी स्पर्धेत सहभाग घेणे हेदेखील विशेष आहे.
अशी होती स्पर्धा स्पर्धेचा कट ऑफ टाईम १५ तास ५० मिनिटे इतका होता. यामध्ये स्विमिंग ४ किलोमीटर, सायकलिंग १८० किलोमीटर, रनिंग ४२ किलोमीटर होते. हे सर्व स्पर्धकाला १५ तास ५० मिनिटात पूर्ण करावे लागते.

पोलीस मित्र संघटनेचा जेष्ठांना मदती हात.

*पोलीस मित्र संघटनेचा जेष्ठांना मदती हात.*
पालघर (प्रतिनिधी)
 मानव सेवा हीच खरी ईश्र्वर सेवा, हे ब्रीदवाक्य घेऊन आणि समाजसेवेचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन, पोलिस मित्र संघटनेच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त तथा पोलिस मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. राजेंद्र कपोते साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक २९/०८/२०२१ रोजी पालघर येथील आनंद वृद्धाश्रम शिरगाव येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप   करण्यात आले. सदर कार्यक्रमाला सातपाटी पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक श्री. मयुरेश अंबाजी , आमदार श्रीनिवास वनगा यांचे स्वीय सहाय्यक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. नीलेशजी राऊत , पोलिस मित्र संघटनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष  श्री. सुलक्षण पाटील, कार्याध्यक्ष श्री. राजेश संखे ,  संपर्क प्रमुख श्री. हर्ष सावे , माजी जिल्हा परिषद सदस्या रंजना संखे , पालघर तालुका प्रमुख चिराग पाटील, अमोल पवार, सुवर्णा वाघमारे , सपना प्रभू, सोनू गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.आणि वृद्धाश्रमाचे संचालक श्री.कोटक आवर्जून उपस्थित होते.
           महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटना ही मागील ३४ वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये ३६ जिल्ह्यामधे   पोलिसांच्या न्याय हक्कांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी सातत्याने कार्य करत आहे. पोलिस मित्र संघटना ही नेहमीच समस्या ग्रस्तांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी राहिलेली आहे.असे सामाजिक कार्यकर्ते श्री.निलेश राऊत यांनी याप्रसंगी सांगितले.

जि.प.अध्यक्ष यांनी केली एडवण,चटाळे गावची पाहणी



*जि.प.अध्यक्ष यांनी केली एडवण,चटाळे गावची पाहणी*


पालघर (प्रतिनिधी) दिनांक २९ ऑगस्ट  रोजी चटाळे ग्रामपंचायत  येथे जिल्हा परिषदेच्या  समाज  कल्याण विभागामार्फत बांधण्यात आलेल्या संत रोहिदास संस्कार  केंद्राचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण यांच्या हस्ते करण्यात आले. 
यावेळी गावातील लोकसहभागातून अनेक उपक्रम राबविण्यात आले त्याची पाहणी केली विशेष म्हणजे  गावातील समाजपयोगी नागरिक यांनी एकत्र येऊन लोकसहभागातुन अंदाजे ६० एकर जागेमध्ये  जलसंधारण व पर्यावरण संवर्धन   प्रकल्पमध्ये २८.८० कोटी लिटर पाणी साठवण क्षमता असल्याने या प्रकल्पामुळे  पाण्याची भुजलपातळी वाढली असून नागरिकांना इतर पिण्याचे पाणी तसेच शेती साठी या पाण्याचा उपयोग होत असून गावातील सर्व समाजाच्या नागरिकांनी  एकत्र येऊन निर्माण केलेल्या या नाविन्यपूर्ण प्रकल्पाची पाहणी केली. त्यावेळी  अशा  उपक्रमांचा इतर ग्रामपंचायतीनी आदर्श घेऊन असे प्रकल्प उभरावेत असे मत अध्यक्ष वाढाण यांनी व्यक्त केले. तसेच १९५८ साली स्थापन केलेले  'प्रभात वाचनालय'  पालघर जिल्ह्यातील एक मोठं वाचनायल असून असा लोकोपयोगी उपक्रम राबवल्याबद्दल  वैदेही वाढाण यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले. यावेळी अचानक अध्यक्षांनी एडवण प्राथमिक आरोग्य केंद्र ला भेट दिली. याप्रसंगी  प्रसूती झालेल्या महिलांना देखील अध्यक्ष वाढाण यांनी भेट दिली.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात झाडे झुडुपे वाढल्याने विषारी जनावरांचा वावर वाढून धोका उद्भवू शकतो या हेतूने परिसरात ग्रामपंचायतीमार्फत साफसफाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया ची शिबिरे आयोजित कराव्यात रुग्णसेवा वाढिवर भर देण्यात यावा  अशा सूचना देखील यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही  वाढाण यांनी केल्या.

सदर पाहणीच्या वेळी जिल्हापरिषद सदस्य सरिता सुतार, पंचायत समिती सदस्य  रेखा तरे, माजी उपसभापती पंचायत समिती पालघर  मेघन पाटील, सरपंच रवींद्र पाटील, नचिकेत पाटील , आदी ग्रामस्थ उपस्थित होते .

Sunday, August 29, 2021

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली भिवंडी तालुक्यातील रस्त्यांची पाहणी

*पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली भिवंडी तालुक्यातील रस्त्यांची पाहणी*

ठाणे, दि. २९ (किशोर पाटील): ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भिवंडी तालुक्यातील रस्त्यांची पाहणी केली व रस्त्यांची कामे दर्जेदार करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या.
पालकमंत्री श्री. शिंदे यांनी आज भिवंडी तालुक्यातील अंजुर फाटा-खारबाव ,कामन रस्ता, कशेळी - काल्हेर ते अंजुर फाटा या रस्त्यांच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत  आमदार शांताराम मोरे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. रस्त्यांच्या कामात दर्जा राखला जावा, अशा सूचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

ठाणे जिल्ह्यात सायंकाळी सात वाजेपर्यंत १६ हजार ५७५ नागरिकांचे लसीकरण

*ठाणे जिल्हा लसीकरण अपडेट*

*ठाणे जिल्ह्यात सायंकाळी सात वाजेपर्यंत १६ हजार ५७५ नागरिकांचे लसीकरण*

ठाणे, दि २९ (किशोर पाटील) : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्यात आज १६ हजार ५७५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. सायंकाळी सात वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून अंतिम आकडेवारी मध्ये बदल होऊ शकतो. 

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४६ लाख  ९७ हजार ६३३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी ३४ लाख ४ हजार ५९६ नागरिकांना पहिल्या डोसचे तर १२ लाख ९३ हजार ३७ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात लसीकरणाचे सुमारे ११८ सत्र आयोजित करण्यात आले.

श्री स्वामीनारायण ट्रस्ट कल्याण यांच्यावतीने ४५० गरीब गरजु मुलांनाउपमा व केली वाटप

श्री स्वामीनारायण ट्रस्ट कल्याण यांच्यावतीने ४५० गरीब गरजु मुलांना
उपमा व केली वाटप


कल्याण दि.२९(किशोर पाटील)कल्याण शहरातील श्री स्वामीनारायण ट्रस्ट,रोटी डे ग्रुप व  कच्छ युवक संघ कल्याण यांच्या सौजन्याने श्री स्वामीनारायण ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ.श्री. दिनेश बळवंतराय ठक्कर व सर्व पदाधिकारी यांनी रविवार दि.२९/०८/२०२१ रोजी कल्याण शहरातील विविध विभागात जाऊन तेथील अनाथ,गोरगरीब,गरजु मुलांना उपमा व केली वाटप केली,तसेच ते रोजच ५०० गरीब, गरजु,अनाथ, बालकांना मोफत   कम्युनिटी किचन च्या माध्यमातून जेवण देतात.व आपल्या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात.
या त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक संस्थांनी त्यांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा गौरव केला आहे. म्हणून त्यांच्या या स्त्युत उपक्रमाला दैनिक स्वराज्य तोरण परिवाराकडून मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...असेच सामाजिक,धार्मिक, आध्यात्मिक, कार्य त्यांच्या हातून घडावे याच सदिच्छा....

Saturday, August 28, 2021

कु.प्रसाद शिंपी याचा १५ वा वाढदिवस अनाथाश्रमातील मुलांसोबत साजरा!

कु.प्रसाद शिंपी याचा १५ वा वाढदिवस अनाथाश्रमातील मुलांसोबत साजरा!

कल्याण दि.२८(किशोर पाटील) कल्याण आंबिवली येथे राहणारे आर एस पी कमांडर डॉक्टर मणिलाल रतिलाल शिंपी यांचे सुपुत्र कु.प्रसाद मणिलाल शिंपी यांनी आपला वाढदिवस साजरा करण्या साठी चक्क आपल्या वडिलांना सांगून अनाथ आश्रमातील व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करून आश्रमातील विद्यार्थ्यांना कोणत्या समस्या आहेत त्या जाणून घेऊन जीवनावश्यक वस्तू कोणत्या देता येतील याचा विचार करून माझा वाढदिवस हा त्यांच्या सोबत साजरा करायचा आहे असे सांगितल्यानंतर कमांडर मणिलाल शिंपी यांनी पारस बाल भवन निसर्ग गुरुकुल अनाथ आश्रम टिटवाला म्हस्कल यांच्याशी संपर्क साधून वाढदिवसाचे नियोजन केले. मात्र सदर अनाथाश्रम हे वृद्धाश्रम आहे विद्यार्थ्यांसाठी नसले तरी त्या वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना लागणाऱ्या वस्तू भेट देऊन त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करण्याचा मानस केला.त्यामुळे सदर अनाथाश्रमातील वृद्ध  आजी-आजोबांना जेवण ,फरसान,व कपडे वाटप करून त्यांचे आशीर्वाद घेतले त्यानंतर त्यांनी आपल्या  वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना  व शिक्षकांना  समजगृहा मध्ये एकत्र बोलावून त्यांच्यासोबत स्नेहभोजन करून आपला वाढदिवस  छोटेखानी पद्धतीने साजरा केला हा वाढदिवस स्वतःसाठी नसून इतरांसाठी साजरा केला असे म्हणायला वावगे ठरू नये. जनसेवा हीच ईश्वर सेवा हे आपल्या वडिलांचे ब्रीद वाक्य त्यांनी त्याच्या पंधराव्या वाढदिवसा निमित्ताने सातत्यात उतरविले व आपल्या वडिलांचा वारसा पुढे कसा चालविला जाईल हे त्यांनी सर्वांना प्रेरणादायी आठवण म्हणून
कायम स्मरणात राहील हे  त्याच्या वाढदिवसा निमित्ताने दाखवून दिले. उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे कुमार प्रसाद यांचे वडील कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.विशेष म्हणजे प्रसादने ऑनलाईन शिक्षणासाठी गरजू विद्यार्थ्यांना जुने मोबाईल फोन घेऊन दुरुस्त करून जवळपास ४२ मोबाईल वाटप केले आहेत.तसेच लॉकडाऊन च्या काळात रोजगार बंद असलेल्या गरजूंना रेशन वाटप करण्याचीही सेवा प्रसाद ने केली आहे.हे हे कार्य कौतुकास्पद आहे त्यामुळे त्याचे दैनिक स्वराज्य तोरण परिवाराकडून अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीस आरोग्यदायी शुभेच्छा व शुभ आशीर्वाद ...

पुर्णा जिल्हा परिषद गटातील कामे लवकरात लवकर मार्गी लावू - कुंदन पाटील

पुर्णा जिल्हा परिषद गटातील कामे लवकरात लवकर मार्गी लावू - कुंदन पाटील


भिवंडी दि.२८(किशोर पाटील)
  पुर्णा जिल्हा परिषद गटातील  पूर्णा गावातील समस्या जाणून घेण्या साठी
ग्रामपंचायत कार्यालय पूर्णा येथे शनिवार दि.२८/०८/२०२१ रोजी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, यांच्याशी गावातील विकास कामासंदर्भात चर्चा करण्यासाठी पुर्णा जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य तथा माजी .बांधकाम व आरोग्य समिती सभापती श्री.कुंदन तुळशीराम पाटील व  माणकोली पंचायत समिती गणातील पंचायत समितीचे माजी.सभापती श्री. विकास अनंत भोईर यांनी एक विशेष बैठक आयोजित केली होती सदर बैठकीला सरपंच ,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी गावातील विकास कामासंदर्भात सुचना केल्या त्या सूचना व समस्या  जाणून घेतल्या.या सर्व समस्या लवकरात लवकर सोडवू असे आश्वासन श्री.कुंदन तुळशीराम पाटील वश्री. विकास अनंत भोईर यांनी  उपस्थित सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थांना दिले. त्यामुळे पूर्णा गावातील समस्या असो किंवा पूर्णा गटातील असो येणाऱ्या काळात त्या सर्व सोडवण्या साठी आम्ही दोघेही आपल्या सोबत आहोत असेही सांगितले..

जनसेवा हीच ईश्वर सेवा - तानाजी जाधव

जनसेवा हीच ईश्वर सेवा - तानाजी जाधव

अकोले( किशोर पाटील)
अन्यायाविरुद्ध लढा देणे हीच आमची ओळख असून कुणावर अन्याय होत असेल तर त्याला न्याय देणे यासाठी टायगर ग्रुप च्या माध्यमातून देशातील चार राज्यांमध्ये या ग्रुपचे काम चालू असून या ग्रुप मध्ये काम करत असताना जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या ठिकाणी या ग्रुपच्या माध्यमातून त्याला न्याय कसा देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो तर या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही भावना मनात ठेवून टायगर ग्रुप ने ज्या ठिकाणी काही प्रसंग घडतात काही मदत लागते ती करण्यासाठी हा समूह नेहमी पुढे आलेला असून यापुढे देखील  हे कार्य एका राज्यापुरते मर्यादित राहिले नसून देशातील चार राज्यांमध्ये हे काम चालू आहे यामध्ये तर अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात असले  तर अनेकांवर  होत असेल त्याठिकाणी न्याय देण्यासाठी काही क्षणातच कोणताही विलंब न करता त्या व्यक्तीला न्याय कसा देता येईल यासाठी आमचा प्रयत्न चालू असतो हा समूह नेहमी सुख दुःखामध्ये एकमेकांच्या कार्यात सहभागी झाला आहे या पुढील काळात देखील असेच कार्य सुरू राहणार आहे मागील महिन्यात कोकणात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने या भागात मदतकार्य झाले पाहिजे ही हाक टायगर ग्रुपच्या वतीने सर्व भागात पाठविण्यात आली व या भागात सुमारे सोळा ट्रक साहित्य कोकण भागात पाठविण्यात आले एवढेच नव्हे तर चिपळूणमध्ये एका कुटुंबात नऊ माणसे दगावली असून त्या परिवारामध्ये एक जणाला मदतीची अत्यंत गरज आहे यासाठी थेट जर्मनीहून मला फोन आला व त्या कुटुंबाला मदत करा टायगर ग्रुप च्या वतीने तातडीने या परिवाराला मदत केली जाईल महाराष्ट्र हा संत महात्म्यांची पावनभूमी असलेला राज्य असून या राज्यात अनेक महापुरुष झाले या जन्मभूमी चा इतिहास जगाला परिचित असून त्या पावनभूमी मध्ये माझा जन्म झाला त्यामुळे या परमेश्वराचे एवढे उपकार मी मानतो की या पावन भूमीमध्ये जन्म घेणारा छत्रपती शिवराया नंतर अनेकांना येथे जन्म मिळाला त्या पावनभूमी मध्ये काम करत असताना सत्याला शेवटी काही वेळानंतर न्याय असतो मात्र काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन जात असताना सर्वांच्या सुखदुःखात आपल्याला सामील कसे होता येईल  कुणावरही अन्याय होणार नाही व अन्य करणार्‍याविरुद्ध आपण शांत राहणार नाही अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा तेवढाच दोषी  असतो त्यामुळे अन्याय  करणाऱा आपल्यावर जेवढा उंच आवाज वाढवतो त्या दृष्टीने आपण त्याला प्रतिस्पर्धी विरोध  निर्माण केला तर नक्कीच पुढील वेळेस तो आपल्यावर अन्याय करणार नाही याची देखील सर्वांनी नोंद घेतली पाहिजे प्रत्येकाने काम करत असताना 80 टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या पलीकडे जाऊन ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करत असाल त्या क्षेत्रामध्ये मिळालेल्या संधीचे सोने करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असले तरी या समाजासाठी आपण कमावलेल्या पैशातून काही हिस्सा समाजकार्यासाठी खर्च केला पाहिजे ही संकल्पना  प्रत्येकाने आपल्या मनात ठेवली पाहिजे...... तुज आहे तुजपाशी तू जागा चुकलासी या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना मनात ठेवून ज्या ज्या ठिकाणी आपल्याला सहकार्य करण्याचे भाग्य मिळेल त्याच्या ठिकाणी आपल्या मदत  केली पाहिजे टायगर ग्रुप कडून 24 तास केव्हा कोणताही नागरिक मदत मागत असेल तर त्याला मदतीसाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी असतो कुणावर अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी जाऊन दोन्ही गोष्टींचा सामना करून त्याला मदत कशी करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो कुणावरही अन्याय करणे हे आम्हाला योग्य वाटत नाही आणि जर कोणी आमच्या नावाचा गैरवापर करून कोणावर अन्याय करत असेल तर त्याला देखील आम्ही सोडणार नाही आमची शिकवण आमची भूमिका आमचा संकल्प हा नेहमी समाजहिताचा राहिला असून समाजासाठी काम करत राहणे हेच आमचे ब्रीद वाक्य असून या माध्यमातून आज पर्यंत चार राज्यांमध्ये  काम करत असताना प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका घेतली आहे आमच्याकडून कोणाला कोणताही अन्याय अत्याचार होणार नाही याची देखील आम्ही काळजी घेतो व भविष्यकाळात देखील संघर्ष चिंगारी या गोष्टी आमच्या मनामध्ये व हृदयात असून या भूमीतील रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज त्याच बरोबर फुले शाहू आंबेडकर यांचा आदर्श आमच्या मनात असल्यामुळे टायगर ग्रुप ने सामाजिक कार्याकडे आपले लक्ष वेधले असून नुकताच आमच्या कार्याचा पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाने टायगर ग्रुप ला 2021 या पुरस्काराने सन्मानित केले त्यामुळे आमच्या कामाची उमेद वाढली असून पुरस्कार मिळवण्यापेक्षा पुरस्कारापेक्षा सर्वसामान्य जनतेचे कामे आमच्या आतुर होत असतांना त्यातून मिळालेला ो आनंद आहे तो आनंद नेहमी आम्हाला आमच्या चेहऱ्यावर आनंद देणारा असतो समोरच्याचे काम झाल्यानंतर त्याच्या चेहर्‍यावरील जे तेज आम्हाला पाहायला मिळते तेथेच आमच्या कार्याची पावती असते या पुढील काळात देखील टायगर ग्रुप हा पातळीवर जावून सामाजिक कार्यात प्रथम क्रमांकावर राहील याला राजकीय जोड कधीही मिळणार नाही राजकीय जोडे बाजूला ठेवून या परिवारामध्ये काम करणारे अनेक तरूण आहे या तरुणांना जी शिकवण आम्ही दिली ती शिकवण या पावन भूमीमध्ये आपण जन्माला आलो हे आपल्या आई-वडिलांचे पुण्य असून त्यांनी आपल्याला जी साधुसंतांनी शिकवण दिली त्या शिकवणीतून आदर्श महाराष्ट्र तसा आदर्श भारत करण्याचा आमचा संकल्प आहे हा संकल्प पुढे नेण्यासाठी तरुण तरुणाई ज्येष्ठ वृद्ध माता भगिनी यांना बरोबर घेऊन आम्ही यापुढे देखील असा समूह तयार करणार आहे या समूहामध्ये येणारा प्रत्येक सदस्य हा आमचा पाईक असून प्रत्येकाच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा आदर्श भविष्यकाळात देखील असाच तेवत ठेवला जाईल टायगर ग्रुप हे नाव सर्वसामान्य जनतेच्या मुखात असून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम या समूहाने केले आहे हा ग्रुप कोणत्याही राजकीय पक्षाच्या बरोबर काम करत नसून सर्वसामान्य जनता हीच आमची कामाची ओळख असून यापुढील काळात देखील प्रत्येक घराघरात गावागावात शहरा शहरात वाडी वस्त्यांवर टायगर ग्रुप हा सामाजिक कार्यात येत्या पाच वर्षात नक्कीच सर्वांना प्रेरणादायी कार्य असा ठसा उमटवेल याच बरोबर या ग्रुपच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य चालू असते हे कार्य करत असताना प्रसिद्धीच्या पाठीमागे न जाता आपण करत असलेले कार्य हेच जनतेच्या हृदयात कसे ठेवता येईल हाच आमचा संकल्प असल्याचे टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष माननीय तानाजी जाधव यांनी बोलताना सांगितले काल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांना साईबाबांची मूर्ती शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला त्यांना नुकताच पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठामार्फत कोरोना काळात व कोकण भागात अतिवृष्टी झाल्याने त्यांनी काही तासातच शोधा ट्रक धान्य व किराणा व विविध साहित्य या भागात देण्याचा जो आदर्श उपक्रम राबविला याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले होते त्याबद्दल त्यांनी आमच्या कार्याला सावित्रीबाई फुले विद्यापीठाने जो सन्मान दिला हा एकट्या तानाजी जाधव यांचा सन्मान असून टायगर ग्रुप मध्ये काम करणाऱ्या सर्व सभासदाचा हा सन्मान आहे हा सन्मान मी या सभासदांना बहाल केला असून भावी काळात देखील माझ्यासारखे हजारो तानाजी प्रत्येकाच्या कुटुंबात जन्माला येऊन त्याच्या आई-वडिलांची सेवा करण्याची कार्य घडवून एवढेच नव्हे तर एकत्र कुटुंब पद्धती ही प्रत्येक ग्रामीण भागात विकासाची मुहूर्तमेढ रोवणारी संस्कृती आहे आपल्या संस्कृतीचा प्रत्येक तरुणाने आपल्या परिवारात आदर्श निर्माण करून द्यावा प्रत्येक टायगर ग्रुपच्या सदस्याला हीच आमची शिकवण आहे जोडणे तेवढे अवघड आहे तेवढे तोडणे हे काही शिक्षणाचे काम आहे त्यामुळे माणसे जोडत जावे जोडता जोडता त्याचा प्रवास किती असो मात्र या प्रवासामध्ये सर्वांना सामावून घेणे हीच काळाची गरज आहे जशी एखादी नदी आपल्या प्रवाहामध्ये सर्व गोष्टींना सामावून घेते त्यापलीकडे जाऊन सर्व नद्या एकाच समुद्राला जाऊन मिळतात गोड असणाऱ्या नद्यांचे पाणी ज्यावेळेस समुद्रात जाते त्यावेळेस त्या समुद्राचे पाणी खारे बनते त्याचप्रमाणे या टायगर ग्रुप मध्ये येणारे सर्व तरुण गोड आहेत या गोड भावनेने सामाजिक कार्याची जाणीव त्यांना करून देऊन अन्यायाविरुद्ध कसे लढता येईल हीच शिकवण आम्ही दिली आणि हीच शिकवण घेऊन चार राज्यांमध्ये या टायगर ग्रुप चे काम चालू आहे भविष्यकाळात देखील सर्वांना या माध्यमातून न्याय कसा देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत परमेश्वर के घर मे देर है लेकिन अंधेर नही त्याप्रमाणे काम करत असताना जो चुकतो तो माणूस जो चुकून सुधारतो तो माणूस जो चुकत नाही तो परमेश्वर याप्रमाणे आपण सर्व एक आहोत भारत माझा देश आहे या देशातील सर्वजण आम्ही बंधू या नात्याने वावरतो काही गोष्टींना काही घटकांकडून चुकीचे वळण देण्याचा प्रयत्न होत असतो हा प्रयत्न कधीही कोणी करू नये हा देश एकसंघ असून या देशातील आदर्श मातेचे उदाहरण अनेकांनी पाहिली आहेत इतर देशांप्रमाणे भारत हा देश निसर्ग सौंदर्य भारतीय संस्कृती इतर जगात तिला जेवढे महत्त्व प्राप्त आहे तेवढे इतर देशाला कोठेही नाही याचे देखील सर्वांनी आकलन करावी आजपासून भारत माझा देश आहे हीच संकल्पना मनी धरून काम करावे हा एक संकल्प टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष माननीय तानाजी जाधव यांनी दिला.

नाशिक मध्ये शिवसेना-भाजपाला देणार मोठा धक्का

 नाशिक मध्ये शिवसेना-भाजपाला देणार मोठा धक्का

नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सर्व पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. यातच, शिवसेना भाजपला पहिला धक्का देण्याच्या तयारीत दिसत आहे. भाजपचे माजी उपमहापौर प्रथमेश गिते यांनी आज नाशिक दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतलीयामुळे, ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.भाजपमध्ये गळचेपी होत असल्याचा आरोप प्रथमेश गिते यांनी केला आहे. यामुळे ते भाजपत नाराज असून लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची अधिकृत घोषणा झालेली नाही. खरेतर, शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी गेल्या डिसेंबर महिन्यात पुन्हा भाजपत प्रवेश केल्यापासूनच नाशिकमध्ये सेना-भाजप राजकारण पेटल्याचे दिसत आहे. सानप यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुन्हा भाजपत गेले आहेत.
बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपचा झेंडा हाती घेतल्यानंतर, शिवसेनेनेही दंड थोपटले आहेत. यानंतर भाजप नेते सुनील बागुल आणि वसंत गिते यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि आता प्रथमेश गितेही त्याच वाटेवर दिसत आहेत. प्रथमेश गिते हे माजी आमदार वसंत गिते यांचे पुत्र आहे.

Friday, August 27, 2021

बहुजन विकास आघाडीत, इतर पक्षीतील सक्रिय कार्यकर्ते यांचे इनकमिंग !

*बहुजन विकास आघाडीत, इतर पक्षीतील सक्रिय कार्यकर्ते यांचे इनकमिंग !*

*आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश*. 

 बोईसर (प्रतिनिधी)दिनांक २७ आॅगस्ट २०२१ रोजी बोईसर ता,जि. पालघर येथील सरावली,आझाद नगर या भागातील सुमारे १००  च्या वर इतर पक्षीय महिला, तरूण,  यांनी *आमदार  राजेश पाटील*  यांच्या मनमिळावूपणा व कार्यकरण्याची  तसेच सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन, त्यांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी ते करीत असलेले प्रयत्न पाहता, त्यांच्या कार्यावर प्रेरित होऊन, बहुजन विकास आघाडी मध्ये राजी खुशीने शेकडो लोक प्रवेश करीत आहेत 
   *बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा लोकनेते,आमदार हितेंद्रजी ठाकुर*  ( आप्पा ) यांनी  वसई विरार विभागाचा काया पलट करून आपले नेतृत्व सिध्द करीत, लोकांनी ठेवलेल्या विश्वास याची परत फेड, फुल नव्हे फुलाची पाकळी म्हणून, राजकारण कमी समाज सेवेला प्राधान्य देत, आपल्या मतदारसंघात जनते साठी सुधारणा करीत आहे. जनमानसाच्या सानिध्यात राहून जनमानसाच्या सुख सुविधा यांचा विचार करीत आपले कार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे असंख्य तरुण - तरणी - लहान थोर जनसामान्य जनता त्यांची चाहती होत आहे. 
     *आमदार राजेश पाटील* यांच्या उपस्थितीत  *बहुजन विकास आघाडी उपाध्यक्ष. विश्वनाथ घरत* यांच्या सहकार्याने आज बोईसर येथे महिला व तरुणांचा बहुजन विकास आघाडीचे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.  यावेळी  पालघर तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील, पंचायत समिती सदस्य विनोद भावर, वसई कृषी उत्पन्न बाजार समिती चे सदानंद पाटील, उसगाव   चे सरपंच प्रभाकर भोईर,नंदू जाधव,केशव पाटील,मयुर कुडू, अमजल आली ( मिंटू भाई  ) बहुजन विकास आघाडी अल्पसंख्याक अध्यक्ष, अनिल सिंग,अनिल खडारे, संजय बारी, शुभम चौबे, राहुल शर्मा, गणेश काळे, सुधीर माने पदाधिकारी, तसेच आजी माजी ग्रामपंचायत पदाधिकारी, कार्यकर्ते कार्यक्रमात उपस्थित होते.

सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु राहील

सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु 


कल्याण: प्रतिनिधी

ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी सार्वजनिक व साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे निर्देश महावितरणच्या मुख्य कार्यालयाने दिले आहेत. त्यानुसार कल्याण परिमंडल कार्यालयांतर्गत महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुटीच्या दिवशी सुरु राहतील. ही उपलब्ध सुविधा किंवा डिजिटल माध्यमाचा वापर करून चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. धनंजय औंढेकर यांनी केले आहे.


वीजबिल भरणा केंद्रांसोबतच थकीत वीजबिल वसुलीची कारवाई सुट्टीच्या दिवशी सुरु राहणार आहे. अधिकृत वीजबिल भरणा केंद्राशिवाय महावितरणच्या मोबाईल अँप (App) वर वीजबिल भरणा तसेच इतर सर्व सुविधा हाताच्या बोटावर उपलब्ध आहेत. www.mahadiscom.in या संकेतस्थळावर केवळ बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आदींच्या माध्यमातून वीजबिल भरता येते. याशिवाय विविध पेमेंट वॉलेटचा (पेटीएम, गूगल पे) उपयोग करून घरबसल्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा आहे. तसेच वीजबिलावर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करूनही थेट पेमेंट गेटवेवर जाऊन वीजबिल भरणे सुलभ होते. अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करण्याचे आवाहन मुख्य अभियंता श्री. औंढेकर यांनी केले आहे. 

काँग्रेसच्या ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पदी दयानंद चोरघे यांची नियुक्ती

*काँग्रेसच्या ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पदी दयानंद चोरघे यांची नियुक्ती*

ठाणे दि.२७(किशोर पाटील) - अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने प्रदेश कार्यकारिणी व 14 नव्या जिल्हा अध्यक्षांची नियुक्ती जाहीर केली असून ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी भिवंडी येथील डॅशिंग नेते दयानंद मोतीराम चोरघे यांची नियुक्ती करण्यात आल्याने ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश निर्माण झाला आहे.
    काँग्रेसच्या राष्ट्रीय  अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मान्यतेने व प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या शिफारशीने काल राष्ट्रीय महासचिव वेणूगोपाल यांनी महाराष्ट्रातील 14 नवे जिल्हा अध्यक्ष जाहीर केले असून दयानंद चोरघे यांच्यावर ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.दयानंद चोरघे हे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे कट्टर समर्थक असून त्यांनी भाजपच्या प्रदेश सचिव पदाचा त्याग करून काँग्रेसमध्ये घरवापसी केली होती,तेव्हापासून तेच अध्यक्ष होतील अशी चर्चा होती,ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील ब्लॉक अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याच नावाची शिफारस केली होती.दयानंद चोरघे हे ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील एक दमदार व आक्रमक नेतृत्व असून सामाजिक भान जपत त्यांनी डी वाय फाउंडेशन च्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत,कोरोना काळात तर अनेकांना आर्थिक मदत व अन्नधान्य  पुरवून लोकांना आधार दिला,स्वतः कोरोना बाधित होऊनही त्यांनी लोकांना मदत करण्याचे कार्य सुरूच ठेवले होते.
   आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक,सह लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असून मरगळ आलेल्या काँग्रेस पक्षाला संजीवनी देण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे,
   दरम्यान दयानंद चोरघे जिल्हा अध्यक्ष झाल्याने ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकत्यांनी जल्लोष साजरा केला असून दयानंद चोरघे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
      -- प्रतिक्रिया --
*कुणाला विरोध करण्यासाठी मला हे पद दिले नसून काँग्रेस संघटन अधिक मजबूत करण्यासाठी मला अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे,एक बूथ दहा युथ ही संकल्पना घेऊन मी काम करणार असून प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्ह्यातील सर्व ब्लॉक अध्यक्ष प्रमुख नेते यांना सोबत घेऊन मी पक्ष संघटन वाढविण्यासाठी कटिबद्ध आहे*
   - दयानंद चोरघे, नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष

Thursday, August 26, 2021

पालघर विभागीय एस टी आगरातून, गौरी गणपती साठी कोकणात जाणार्‍याना बसेसची कमतरता पडता कामा नये. श्री केदार काळे शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक

पालघर विभागीय एस टी आगरातून, गौरी गणपती साठी कोकणात जाणार्‍याना बसेसची कमतरता पडता कामा नये. 
श्री  केदार काळे शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक 

पालघर ( हिरालाल  लोखंडे ) गौरी गणपतीच्या सणासुदीला पालघर विभागीय आगरातून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आदी  ठिकाणी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना ( नोकरदार वर्ग ) जास्तीत जास्त बसेस पालघर विभागीय आगरातून सोडण्यात याव्या. व प्रवासी यांना सुविधा मिळाव्यात. या साठी श्री केदार काळे शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक यांनी श्री राजेश जगताप  ( गांधी नगर पालघर पूर्व येथील ) एस टी महामंडळाचे विभागीय नियंत्रक, यांची २६ आॅगस्ट २०२१ रोजी भेट घेऊन श्रीचे आगमन १० सप्टेंबर रोजी जरी होत तरी कोकणात जाणार्‍या साठी त्या अगोदर सोडाव्या व कोकणात जाणार्‍यान साठी बसेसची कमतरता भासू देऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडे केली आहे. 
  वरील विनंती अनुसार ४ सप्टेंबर  शनिवार पासून वसई, अर्नाळा, नालासोपारा येथून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या आगरातून साध्या - रातराणी - शिवशाही अशा बसेसची सोय करण्यात आलेली आहे. कोकणात जाण्यासाठी २४७ बसेस व परतीसाठी ४३ बसेसची सोय करण्यात आल्याची  माहिती श्री केदार काळे यांच्या कडून मिळत आहे. तसेच पालघर, बोईसर, सफाळे, डहाणू या आगरातून कोकणात जाणाऱ्या प्रवासी यांच्या मागणी अनुसार ( बस मधे  उपलब्ध असलेल्या जागा - सीट पुर्णपणे भरत असल्यास ) या ठिकाणाहून  सुध्दा बसेस सोडण्याची तयारी श्री राजेश जगताप विभागीय नियंत्रक पालघर यांनी केदार काळे यांच्याशी बोलताना सांगितले असल्याचे समजत आहे. 
  बसेसने प्रवास करणाऱ्यांना आॅफ लाईन म्हणजे प्रत्यक्ष बस सुटणाऱ्या आगरात ( डेपोत ) जाऊन तिकीट आरक्षण ( रिझर्वेशन ) करता येईल. तसेच आॅनलाईन आरक्षणासाठी MSRTC अॅप व्दारे ही आरक्षण करता येणार आहे.

आयामा रिक्रिएशन सेंटरला हवा गुणवत्ता केंद्राचे भूमिपूजन

आयामा रिक्रिएशन सेंटरला हवा गुणवत्ता केंद्राचे भूमिपूजन

नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.

सिडको - आयामा रिक्रिएशन सेंटरला हवा गुणवत्ता सनियंत्रन केंद्राचे भूमिपूजन गुरूवारी आयामाचे अध्यक्ष वरून तलवार, एमपीसीबीचे प्रादेशिक अधिकारी अमर दुरगुले, आयामा विश्वस्त समितीचे चेअरमन धनंजय बेळे, आयमचे सरचिटणीस ललित बुब यांच्या हस्ते कुदळ मारून व नारळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र प्रादेशिक नियंत्रण मंडळाचे नाशिक विभागाचे प्रादेशिक अधिकारी अमर दुरगुले यांनी आयामा पदाधिकारी व उद्योजकांना हवा गुणवत्ता सनियंत्रन केंद्राबाबत माहिती दिली. वाढत्या शहरीकरणामुळे हवेचा स्तर दिवसेंदिवस खालावत असून त्याचे हे परीक्षण यंत्राच्या साहाय्याने २४ तास होणार आहे . नाशिकमध्ये ४ केंद्र होणार असून त्यापैकी आयामाचे एक असणार आहे. या प्रोजेकट चे काम इंनवीआ इंडिया प्रा ली. या कम्पनीतर्फे करण्यात येणार असल्याचे त्यांनी संगितले. यावेळी शांतीलाल नागरे (वैज्ञानिक अधिकारी), औचरमन (क्षेत्रीय अधिकारी), आयामांचे अविनाश मराठे, राजेंद्र कोठावदे, विरल ठक्कर, विजय जोशी, प्रकाश ब्राह्मणकर, विराज गडकरी, वैभव चावक, विलास लिधुरे उपस्थित होते .
चौकट
या हवा गुणवत्ता सनियंत्रनमुळे खालील घटक मोजण्याचे कार्य केले जाणार आहे. पीएम १०, पापीएम २.५, सिओ, एनओ, एनओ २, यनएच ३, ओझोन, वीओसी तसेच तापमान, आद्रता, सोलर रेडिएशन, हवेचा वेग, हवेची दिशा हा सर्व डेटा उपलब्ध होणार आहे. यामुळे हवेची गुणवत्ता सुधारता येणार आहे. हा हवेचा डेटा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे दिल्ली येथे त्यांच्या सर्व्हरवर पाठविण्यात येईल.हा डेटा आपल्याला वेब्साइटवर वर बघता येईल . यामुळे नागरिकांना व पर्यावरण प्रेमींना मोठा दिलासा मिळणार आहे

कोरोना च्या या वातावरणात महाआरोग्य शिबिर घेऊनअजून कोरोना संपला नाही हे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने दाखवून दिले - राजेश नार्वेकर

कोरोना च्या या वातावरणात महाआरोग्य शिबिर घेऊनअजून कोरोना संपला नाही हे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने दाखवून दिले -  राजेश नार्वेकर

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजयजी भोकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने  ठाण्यात महा आरोग्य मोफत शिबिर मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न.

ठाणे दि.२६(किशोर पाटील)
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक , श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष ,श्री संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे संस्थापक माननीय श्री संजयजी भोकरे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. वसंतराव मुंडे, प्रदेश सरचिटणीस श्री. विश्वासराव आरोटे, वृत्तवाहीनी प्रमुख श्री रणधीर कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष श्री.राकेश टोळे, प्रदेश  प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाने पत्रकार संघाचे कोकण विभाग व ठाणे शहर अध्यक्ष श्री. नितीन मनोहर शिंदे यांच्या संकल्पनेतून कोरोना काळात आपली भुमिका बजावणारे ठाणे शहरातील पत्रकार व नागरिकांसाठी आरोग्य धनसंपदा फाउंडेशन ,तेरना स्पेशालिटी हाँस्पीटल अँड रिसर्च सेंटर, नेरूळ व ईशा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन गडकरी रंगायतन तालीम हाँल येथे गुरुवार दिनांक २६/०८/२०२१ रोजी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.  या कार्यक्रमाला ठाण्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री .राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त ठा.म.पा. श्री.संदीप माळवी, आमदार श्री.संजय केळकर, आमदार श्री.निरंजन डावखरे, संपादक जनादेश श्री.कैलाश म्हापदी, एम.सी.एच.आय.क्रेडाई -अध्यक्ष श्री. जितेंद्र मेहता, निर्माते दिग्दर्शक श्री. प्रविण तुरडे, सरचिटणीस महाराष्ट्र काँग्रेस कमिटी श्री.मनोज शिंदे,अध्यक्ष इटंक काँग्रेस ठाणे श्री.सचिन शिंदे नगरसेविका ठा.म.पा. प्रतिभा मढवी, जिल्हा माहीती अधिकारी ठाणे श्री. अजय जाधव, उपशहर अध्यक्ष मनसे ओवळा माजिवडा मंजुळा डाकी उपस्थित होते. त्यांचबरोबर पत्रकार संघाचे पदाधिकारी  कोकण विभागीय सचिव तथा दैनिक स्वराज्य तोरण चे संपादकश्री. किशोर बळीराम पाटील, पालघर जिल्हाअध्यक्ष श्री.विकास पाटील,ठाणे शहर सचिव श्री.मिलिंद दाभोळकर, सल्लागार श्री. प्रमोद घोलप, उपाध्यक्ष श्री. संजय भोईर, कार्याध्यक्ष श्री.अतुल तिवारी, संघटक श्री.मनोज कदम, संपर्क प्रमुख श्री. सतीश कुमार भावे,सहसचिव श्री.अमित जाधव, कल्याण संपर्क प्रमुख मिनल पवार, सहसंपर्क प्रमुख - प्रशांत मोटे, कार्यकारणी सदस्य श्री.अश्विन कांबळे,कार्यालयीन व्यवस्थापक श्री.अभिषेक चव्हाण, सह वुत्तवाहीनी प्रमुख संतोष पडवळ, प्रसिध्दी प्रमुख - देवेंद्र शिंदे, सुबोध कांबळे, अमित गुजर व इतर सदस्य - संजय ताबंडे, प्रसाद जावडे, राहूल लाड, राजेंद्र गोसावी, ख्वाजा शेख, सुभाष जैन,देवेंद्र वाईरकर, कार्यक्रम व्य़वस्थापक व न्यूज मराठी व तरूण आव्हान प्रतिनिधी पत्रकार मनस्वी चौधरी,पत्रकार पल्लवी होनखंडे, पत्रकार मनीष तळदेवकर, पत्रकार मनाली मोरे,पत्रकार वंशिका चाचे, समाधान अवताडे, अश्विनी भालेराव उपस्थित होते.
सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक श्री संजय जी भोकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्याच बरोबर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग ,ठाणे शहर,आरोग्य धनसंपदा फाउंडेशन ,तेरना स्पेशालिटी हाँस्पीटल अँड रिसर्च सेंटर, नेरूळ व ईशा नेत्रालय यांच्या वतीने आयोजित केलेल्या महा आरोग्य शिबिराला शुभेच्छा देतो. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे व हा स्तंभ देखील चांगले स्तुत्य उपक्रम राबवत आहे.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे व त्यांचे सर्व पदाधिकारी यांनी कोरोना काळात आपली भुमिका बजावणारे ठाणे शहरातील पत्रकार व नागरिकांसाठी मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करून कोरोना च्या या वातावरणात अजून कोरोना संपला नाही हे पत्रकार संघाने दाखवून दिले आहे असे ठाणे जिल्हाधिकारी श्री. राजेश नार्वेकर यांनी प्रत्यक्ष महाआरोग्य शिबिरा च्या ठिकाणी मार्गदर्शन करताना सांगितले. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून आरती संग्रह पुस्तकाचे प्रकाशन देखील जिल्हाधिकारी व आदी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमात  ठाण्यातील शासकीय, राजकीय ,सामाजिक , क्षेत्रातील मान्यवर,ज्येष्ट नागरिक, व पत्रकार  असे मिळून २००ते २५० नागरिकांनी या मोफत शिबिरांचा लाभ घेतला .नागरिकांनी आरोग्य तपासणी करून त्यांना असलेल्या आरोग्य विषयक शंकाचे निरसन तेरना हास्पीटलचे  डाँ.जितेंद्र पाटील यांनी सुस्पष्ट भाषेत करून योग्य सल्ला दिला.हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागाचे पदाधिकारी व ठाणे शहराचे पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली.

Wednesday, August 25, 2021

अनु.जमाती विधानमंडळ समिती चा नाशिक जिल्हा दौरा संपन्न

*अनु.जमाती विधानमंडळ समिती चा नाशिक जिल्हा दौरा संपन्न*

पालघर (,प्रतिनिधी)
पालघर विधानसभा मतदारसंघाचे आमदार.मा.श्री.श्रीनिवास वणगा साहेब हे अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या तीन दिवसीय नाशिक जिल्हा दौऱ्यावर असताना नाशिक जिल्ह्यातील अनुसूचित जमातीचे अधिकारी/कर्मचारी यांची भरती,बढती,आरक्षण,अनुशेष व जात पडताळणी विषयक प्रलंबित प्रकरणे व राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांबरोबर समिती प्रमुख मा.श्री.दौलतजी दरोडा साहेब व समितीचे सदस्य सन्माननीय आमदार सर्वश्री. श्रीनिवास वणगा, अनिल पाटील, शिरीष चौधरी,तुषार राठोड,राजेश पडवी,राजकुमार पटेल,किरण सरनाईक,बाळासाहेब पाटील यांनी आढावा बैठक  घेऊन नाशिक जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या भागातील पाहणी दौरा केला व अनुसूचित जमातीच्या लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम या समितीच्या माध्यमातून करण्यात आले, आज तीन दिवसीय दौरा समाप्त झाला...

विधवांच्या पुनर्वसनासाठी उपसमिती स्थापन करावी-उपसभापती विधान परिषद नीलम गोऱ्हे,

*जिल्ह्यातून ९५% आणि २४ गावातून कोरोना हद्दपार झाल्याचे समाधान- उपसभापती विधानपरिषद नीलम गोऱ्हे*
*विधवांच्या पुनर्वसनासाठी उपसमिती स्थापन करावी-उपसभापती विधान परिषद नीलम गोऱ्हे,*

पालघर(प्रतिनिधी) दि. २५: पालघर जिल्ह्यातून कोरोना पूर्ण पणे नष्ट झाला नसला तरी जिल्ह्यातुन ९५% आणि २४ गावांतून कोरोना १००% हद्दपार झाला असल्याबद्दल समाधान वाटते, असे मत विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.  कोरोना मुक्त झालेल्या ग्रामपंचायतीचे अनुभव ऐकण्यासाठी  तसेच कामगार विभाग, परिवहन विभाग, आदिवासी विभाग, रोजगार हमी योजना, प्रादेशिक परिवहन विभाग आदि विभागांनी जनतेसाठी थेट मदत जाहीर केली होती ती कितपत पोहोचली आहे, त्यात काही त्रुटी आहेत का याच्या बद्दलचा आढावा घेण्यासाठी नीलम गोऱ्हे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे आढावा सभा आयोजित केली होती त्यावेळी त्या बोलत होत्या. कोरोना मुक्त झालेल्या २४  ग्रामपंचायतीच्या  सरपंचांकडून त्यांनी आपल्या गावाबद्दलच्या यशोगाथा जाणून घेतल्या.कोरोना काळात काय उपाययोजना केल्या,   कशाप्रकारे जनजागृती केली, अडचणींवर कशा प्रकारे मात केली,लसीकरण किती प्रमाणात झाले आहे इ बद्दल सविस्तर माहिती घेतली.
 तसेच महिला व बाल विकास विभागा मार्फत स्थापन करण्यात आलेल्या  टास्क फोर्स मधून कोरोना काळात वैधव्य आलेल्या महिलांसाठी उपसमिती स्थापन करावी , तसेच विधवा महिलांचे मालमत्ता विषयक अधिकार अबाधित राहावे कोरोना च्या दुष्परिणाम यामुळे बालविवाह बालमजुरी यांसारख्या समस्या उद्भवू नयेत यासाठी दक्षता समिती स्थापन करावी ज्यात कुठल्याही पक्षाच्या महिलांचा समावेश असल्यास हरकत नाही अशा प्रकारच्या सूचना यावेळेस उपसभापती विधान परिषद नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.
   यावेळी गोऱ्हे यांनी ९विभागांचा आढावा घेतला.  आरोग्य विभागाकडून कोव्हीड 
बद्दलचा आज ची पालघर  जिल्ह्यातील स्थिती काय आहे याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.
रोजगार हमी योजनेचे कामात गेल्या वर्षभरात जिल्ह्यात ६० कोटी ५० लाख रुपये मजुरी देण्यात आल्याची माहिती तसेच कामगारांची थकीत वेतन राहिले होते ते आस्थापना विभागाकडून १८ कोटी रुपये मिळाले आहेत. विविध घटकांना एकूण २७ कोटी रुपये राज्य सरकारकडून लाभधारकांना डी बी टी च्या माध्यमातून थेट मदत करण्यात आली आहे १४ हजार ५२३ रिक्षाचालकांना एक कोटी ११ लाख रुपयांची डी बी टी च्या माध्यमातून मदत केली आहे.  त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील महिलांना सातत्याने कृषीविषयक मदत कशी देता येईल याचा आराखडा तयार करण्याचेही यावेळी सांगण्यात आले. 

 यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा वैदही वाढाण, माविमच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, खासदार राजेंद्र गावित,  आमदार रवींद्र फाटक, नगराध्यक्ष उज्वला काळे, जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ, मुख्य अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिद्धराम सालिमठ, पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, किरण महाजन आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक संजयजी भोकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने आज ठाण्यात आरोग्य शिबिर व अनेक स्त्यूत उपक्रमांचे आयोजन!

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक संजयजी भोकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने आज ठाण्यात आरोग्य शिबिर व अनेक स्त्यूत उपक्रमांचे आयोजन!


ठाणे दि.२५(किशोर पाटील)
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक, राज्य संघटक, महाराष्ट्र  शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन्मानीत, श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष,श्री.संजय भोकरे ग्रुप अॉफ इनस्टीट्युटचे संस्थापक मा.श्री. संजयजी भोकरे साहेब यांच्या वाढदिवसाचे अौचित्य साधुन प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे, प्रदेश महासचिव विश्वासराव आरोटे, मुंबई विभाग प्रमुख रणधीर कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष राकेश टोळ्ये, प्रदेश प्रसिध्दीप्रमुख नवनाथ जाधव यांच्या मार्गदर्शना खाली  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग, ठाणे शहर जिल्हा व आरोग्यम धनसंपदा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य तपासणी व शस्त्रक्रीया शिबीर व तोंडावर येऊन ठेपलेल्या गणेश उस्तव सणा मुळे कोकण विभाग - ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष नितिन मनोहर शिंदे यांच्या संकल्पनेतुन साकरण्यात  आलेल्या आरती संग्रह २०२१ पुस्तक सोहळ्याचे प्रकाशन या प्रसंगी ठाण्यातील शासकीय, राजकीय, सामाजिक आणि पत्रकारीता क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत आज गुरुवार दि.२६ अॉगस्ट २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजे पर्यंत  गडकरी रंगायतन तालीम गृह येथे संपन्न होणार आहे. सदर ठिकाणी 
आरोग्य तपासणी व शस्त्रक्रीया शिंबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरास येताना नागरीकांनी पिवळे - केशरी रेशनकार्ड, आधारकार्ड तसेच जुन्या ट्रीटमेंटचे सर्व रिपोर्ट घेऊन यावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष तसेच ठाणे शहर जिल्हाध्यक्ष श्री नितीन मनोहर शिंदे यांनी दैनिक स्वराज्य तरुण च्या माध्यमातून समस्त ठाणेकरांना केले आहे. सदर आरोग्य शिबीरात इ.सी.जी., रक्तदाब, मधुमेह, नेत्र तपासणी, अल्पदरात चष्मे वाटप  करण्यात येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. त्याच प्रमाणे हाडाचे फ्रॅक्चर शस्त्रक्रीया, मणक्याची शस्त्रक्रीया, बायपास सर्जरी, किडनीचे आजार, दमा, एन्जोप्लास्टी, कॅन्सर शस्त्रक्रीया, मुतखड्याचे अॉपरेशन, पुरुषांची ग्रंथी वाढवणे, डोळ्यातील सफेद पडद्याची  शस्त्रक्रीया, रेटीना अॉपरेशन, अल्पदरात मोतीबिंदू अॉपरेशन, अनकंट्रोल डायबिटीस ४०० उपचार, मुत्राशयाचा मार्ग संकुचित होणे शस्त्रक्रीया अशा मोफत आणि अल्प दरात शस्त्रक्रीयांचे  आयोजन  ही या शिबिरात करण्यात आले आहे.

वळ गावचे उद्योगपती तथा समाजसेवक भानुदास भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत लसीकरण मोठ्या उस्तहात संपन्न!

वळ गावचे उद्योगपती तथा समाजसेवक भानुदास भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत लसीकरण मोठ्या उस्तहात संपन्न!

 लसीकरणाला मोठा प्रतिसाद ३५० चा  आकडा पार.....
भिवंडी दि.२५(किशोर पाटील) भिवंडी तालुक्यातील मौजे वळ गावातील शेतकरी कुटुंबातील आदरणीय व्यक्तीमत्व स्व.भगवान शेठ भोईर  व  स्व.मधुकर शेठ भोईर यांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा घेऊन विकासक म्हणून उद्योजक क्षेत्रात उंच भरारी घेत आपल्या कर्तृत्वाचा ठसा तालुक्यात नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात उमटविला आहे.त्यामुळे श्री भानुदास मधुकर भोईर यांनी आपला वाढदिवस हा मोठा गाजावाजा न करता समाज सेवेसाठी सदैव एक पाऊल पुढे या उद्देशाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आपल्या गावातील नागरिकांसाठी मोफत लसीकरण मोहिमेचे आयोजन करून सर्व ग्रामस्थांना दोन दिवस अगोदर शेलू माता ४०+ क्रिकेट संघ वळगाव यांच्या सौजन्याने आवाहन केले .की आपण जर लसीकरण केले नसेल तर मोफत लसीकरण मोहीम आपणासाठी स्व.भगवान शेठ भोईर ,स्व.मधुकर शेठ भोईर  मंगळ कार्यालय वळ येथे बुधवार दि.२५/०८/२०२१ रोजी  आयोजित केली आहे ती यशस्वी करण्यासाठी सहभागी व्हा.मात्र  ३०० डोस उपलब्ध आहेत अशी माहिती देऊन देखील प्रंचंड प्रतिसादामुळे ३५० नागरिकांनी सहभागी होऊन लसीकरण केले. त्यामुळे भानुदास मधुकर भोईर यांचा वाढदिवस हा एका यशस्वी उपक्रमाने साजरा झाला असे म्हणायला वावगे ठरू नये.
मलाही वाटले नव्हते की या लसीकरण मोहिमेला एवढा मोठा प्रतिसाद मिळेल. माझा वाढदिवस एक निमित्त ठरला कारण लसीकरणाला आरोग्य केंद्रांवर मोठमोठ्या रांगा लागलेल्या असल्यामुळे बरेच जण लस न घेता घरी परत येत होते.तर काहींचा नंबर लागून सुद्धा लस संपली असे सांगितले जात होते. म्हणूनच आज ज्यांनी ज्यांनी लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन लस घेतली त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो असे श्री भानुदास भोईर यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना सांगितले.
 विद्यमान सरपंच राम भोईर  व शेलू माता ४०+ क्रिकेट संघ वळगाव यांच्या पुढाकाराने हा वाढदिवस सोहळा उत्साहात संपन्न झाला.यावेळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक श्री वरून सदाशिव पाटील,दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक श्री किशोर बळीराम पाटील,वळ ग्रामपंचायतीचे 
 सरपंच श्री. राम भोईर, उपसरपंच सौ. दीपिका राजेश भोईर,ग्रामपंचायत सदस्य मिथुन प्रभाकर पाटील,अमित रामदास भोईर,रामनाथ रामचंद्र पाटील,  सौ.राजूबाई बाळकृष्ण नाईक, सौ.वनिता अनिल पाटील,सौ.प्रेषिता भागीरथ पाटील, सौ.योगिता नरेंद्र पाटील, कोपर गावचे माजी सरपंच श्री.जगदीश पाटील,वळ ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच ,उपसरपंच ,सदस्य,गावातील ग्रामस्थ,व ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

गावातील जन्माला आलेल्या मुलींसाठी तुळशी रत्न कन्या योजने अंतर्गत फिक्स डिपाँझिटचे महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते वाटप

गावातील जन्माला आलेल्या मुलींसाठी तुळशी रत्न कन्या योजने अंतर्गत फिक्स डिपाँझिटचे महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते वाटप

 
भिवंडी दि.२५ ( किशोर पाटील )
शिवसेना संपर्क प्रमुख भिवंडी तालुका कुंदन तुळशीराम पाटील यांनी  तालुक्यातील दापोडे गावात जन्माला आलेल्या मुलींसाठी अनोखा उपक्रम सुरू केला आहे.जन्मास आलेल्या नवजात मुलीस कुंदन पाटील यांनी आपल्या दिवंगत वडील तुळशिराम पाटील यांच्या नावे दापोडे गाव मर्यादीत सुरु केलेली तुलसी कन्या रत्न योजना जाहीर केली असुन या योजनेअंतर्गत त्या मुलीच्या नावे २१ हजार रुपये त्या मुलीच्या नावे बैंकेत फिक्स डिपॉजीट केले जातात व मुलगी 18 वर्षांची झाली की 1 लाख 10 हजार रुपये मिळतील आशा अनोखा उपक्रम कुंदन पाटील यांनी आपल्या गावात सुरू केला आहे.
यावर्षी देखील दापोडे गावात तीन मुलींचा जन्म झालाय या तिन्ही मुलींना कुंदन पाटील यांच्या तुळशी कन्या रत्न योजना अंतर्गत 21 हजार रुपयांची फिक्स डिपॉझिट मुंबई महानगरपालिका महापौर दालनात  महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते या तिन्ही नवजात मुलींचे फिक्स डिपॉझिट करण्यात आले आहे.कुंदन पाटील यांनी सुरू केलेल्या या योजनेचा लाभ या मुलींना मिळणार आहे तसेच पाटील यांच्या मते जर आमदार खासदार समाजसेवक कार्यकर्ते,नगरसेवक यांनी जर आपल्या गावात अशा प्रकारची  योजना राबवली तर याचा बऱ्यापैकी लाभ मुलींना मिळू शकतो अशी प्रतिक्रिया कुंदन पाटील यांनी दिली आहे.यावेळी आमदार रईस शेख,अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू,शिवसेना उपतालुका प्रमुख चक्रधारी पाटील,तालुका सचिव दीपक पाटील, सचिव राजेंद्र काबाडी,सचिव जय भगत, जि.प.गट सचिव संदीप पाटील, शेखर मामा फर्मान,शाखा प्रमुख अनंता भामरे,पत्रकार राजेंद्र पाटील उपस्थित होते.महापौर किशोरी पेडणेकर यावेळी म्हणाल्या की, ठाणे जिल्हा परिषद सदस्य कुंदन पाटील यांनी आतापर्यंत अकरा मुलींना या योजनेअंतर्गत पुरस्कृत केले असून समाजाचे काही देणे लागतो या उदात्त हेतूने त्यांनी चांगला उपक्रम राबविला असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले. त्यासोबतच गरीब कुटुंबातील मुलींना एक चांगला आधार या योजनेद्वारा मिळणार असल्याचे महापौरांनी सांगितले.भावी पाटील,कायरा पाटील, दिव्यांशी पाटील या तीन मुलींच्या पालकांनी हे सदर प्रमाणपत्र महापौरांचे हस्ते स्वीकारले.

तरुण उद्योजकांनी पुढे आले पाहिजे:सामाजिक कार्यकर्ते श्री.निलेश राऊत यांचे प्रतिपादन

*तरुण उद्योजकांनी पुढे आले पाहिजे:सामाजिक कार्यकर्ते श्री.निलेश राऊत यांचे प्रतिपादन*

पालघर(प्रतिनिधी)
देशाच्या आणि राज्यांच्या जडण घडणीत तरुणांना वाव असून नवीन तरुण उद्योजकानी,व्यावसायिकानी पुढे यायला हवे असे मत सामाजिक कार्यकर्ते आणि आमदार श्री.श्रीनिवास वनगा यांचे स्वीय सहाययक श्री.निलेश राऊत यांनी व्यक्त केले.
पालघर येथील तरुणांनी एकत्र येत 'अकाउंट अन्नट्स टॅक्स कंसंलटिंग' कार्यालय सुरू केलं त्याचा उदघाटन सामाजिक कार्यकर्ते श्री.निलेश राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
कु.गौरव शुक्ला, कु.सुभाष शेट्टी आणि श्री.लोकेश शेखावत या तरुणांनी एकत्रित आयकर,जीएसटी व इतर शासकीय,व्यावसायिक कर विषयक कार्यप्रणाली तसेच विविध शासकीय कर्ज प्रकरणे आदी बाबत मार्गदर्शन व कामे कार्यालयाची सुरुवात पालघर माहीम रोड येथील ओशन पेरल या कार्यालयातुन करण्यात येणार आहेत.
दरम्यान तरुणांनी असे एकत्र येऊन आपल्या रोजगार निर्मितीस चालना दिली पाहिजेत,आणि स्वयं रोजगार निर्मिती सोबत इतर नवतरुणांना सुद्धा मदद केली पाहिजेत असे यावेळी श्री.निलेश राऊत यांनी या प्रसंगी सांगितले.शासनाच्या विविध योजनांची माहिती व कर्ज प्रकरणे प्रक्रिया याबाबत सर्व सामान्य नागरिकांना या कार्यालयातुन लाभ मिळू शकेल.
याप्रसंगी श्री.उचित पाटील,श्री.शेखर पाटेकर , श्री.हरीश वझे आदी सह अनेक जण उपस्थित होते.

Tuesday, August 24, 2021

कै. काळु पवार यांच्या कुटूंबाला उदरनिर्वाहासाठी दोन एकर जागा स्वखर्चाने घेऊन देणार.

कै. काळु पवार यांच्या कुटूंबाला उदरनिर्वाहासाठी दोन एकर जागा  स्वखर्चाने घेऊन देणार. 
मा. श्री राजेंद्र गावीत साहेब खासदार पालघर 

पालघर ( हिरालाल लोखंडे ) मौजे, आसे तालुका मोखाडा जिल्हा पालघर. येथील आत्महत्याग्रस्त - वेठबिगारी , आदिवासी शेतमजूर कै. काळु दत्तू पवार वय वर्ष ४८ यांच्या कुटुंबीयांची, मा श्री राजेंद्र गावित साहेब खासदार यांनी, दिनांक २४ आॅगस्ट २०२१ रोजी सात्वनपर भेट घेतली. १५ आॅगस्ट देशाचा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम साजरा होत असताना, दुसरी कडे वेठबिगारीच्या पाशात अडकलेल्या, कातकरी शेतमजूर याला, अवघ्या ५००/- रूपयाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करावी लागते. अशी ही घटना, दुर्दैवी असल्याचे गावित साहेबांनी  सांगितले. या पिडीत कुटूंबाला गावित साहेब यांनी, २५०००/- रूपये ( अक्षरी पंचवीस हजार रूपये ) रोख रक्कम मदत स्वरूपात देऊन, अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू दिल्या. या कुटूंबाला कायम स्वरूपी रोजगारासाठी स्वखर्चाने दोन एकर जागा घेऊन देण्याचे मा. गावित साहेबांनी यांनी आश्वासन दिले आहे. तसेच या कुटूंबाला घरकुल योजनेची प्रक्रिया लवकरात लवकर पुर्ण करून, तातडीने घरकुल द्यावे. याच्या कुटूंबातील मुलांना आदिवासी आश्रम शाळेत दाखल करून घ्यावे. आदिवासी विभागाकडून मिळणाऱ्या सर्व मदतीच्या तातडीने तरतुदी कराव्या. तसेच आदिवासी योजनांचा यांना लाभ मिळाला पाहिजे. अश्या सुचना तेथे उपस्थित असलेल्या मा. विभागीय अधिकारी ( Prant ) साहेब यांना गावित साहेब यांना दिल्या आहे. या प्रसंगी मोखाडा येथील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 
     कै. काळु पवार यांनी त्याचा मुलगा कै. दत्तू पवार यांच्या अपघाती निधनानंतर, अंत्यविधी साठी रामदास कोरडे यांच्या कडुन ५००/- रूपये घेतलेले. त्यांची परत फेड म्हणून त्याच्या शेतात काम करीत होता. दिनांक १३ आॅगस्ट २०२१ रोजी काळु पवार याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या बद्दल मोखाडा पोलीस ठाणे, ता. मोखाडा जिल्हा पालघर येथे अपघाती मृत्यू रजि, क्रमांक २९ / २०२१ ने नोंदणी करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस अधिकारी पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस अधिकारी मोखाडा पोलीस ठाणे करीत आहे.

राणें विरोधात शिवसेनेचा आंदोलन

राणें विरोधात शिवसेनेचा आंदोलन

नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला. त्यानंतर शिवसैनिकांनी शालीमार येथील शिवसेना कार्यालयासमोर राणे विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.त्यामुळे शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेना कार्यालयावरही दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना शिवसैनिकांनी पळून लावल्याचे शिवसेनेच्या पदाधिका-यांनी सांगितले. या ठिकाणी भाजप व शिवसेना कार्यकर्ते आमने -सामने आले.

Monday, August 23, 2021

श्रमजीवीचा संघटनेचा तहसीलदार कार्यालयावर आक्रोश मोर्चा ; महिलांसह शेकडो नागरिक सहभागी

श्रमजीवीचा संघटनेचा तहसीलदार कार्यालयावर आक्रोश मोर्चा ; महिलांसह शेकडो नागरिक सहभागी

भिवंडी (किशोर पाटील)– श्रमजीवी संघटनेच्यावतीने आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज दुपारी भिवंडी तहसीलदार कार्यालयावर आक्रोश मोर्च्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी संघटनेच्या माध्यमातून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. पोलिसांकडुन वाहतूकीचे नियोजन न झाल्याने भिवंडी ठाणे महामार्गावर  वाहतूक कोंडी झाली होती.
भिवंडी शहरातील  एस.टी.स्टँड येथून सुरू श्रमजीवी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय कोलेकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या मोर्चात हिरामण गुळवी, सागर देसक,मोतीराम नामखुडा, महेंद्र निरगुडा ,आशा भोईर यांसह शेकडोच्या संख्येने स्त्री पुरुष सहभागी झाले होते . आदिवासी बांधव ढोर नाय माणूस हाय माणूस हाय, जमीन आमच्या हक्काची नाय कुणाच्या बापाची अशा गगनभेदी घोषणांनी श्रमजीवी कार्यकर्त्यांनी परिसर दुमदुमून टाकला होता.आदिम व आदिवासी व इतरांना घरकुलांचा लाभ मिळावा ,आदिवासींच्या घराखालील जागा त्यांच्या नावे करावी , रोजगार हमी कायद्या प्रमाणे मागेल त्याला काम मिळावे ,आदिवासी युवकां साठी कौशल्य प्रशिक्षण आयोजित करून त्यांना कौशल्यावर आधारीत रोजगार द्यावा ,आदिम कातकरी समाजाला तात्काळ शिधावाटप पत्रिका द्याव्यात ,शिधावाटप धारकांना पुरेसे धान्य उपलब्ध करून द्यावी ,गावठाण विस्तार करावा,प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशा वैद्यकीय सुविधा व कर्मचारी उपलब्ध करून घ्याव्यात अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार अधिक पाटील यांना देण्यात आले. या मोर्चा मुळे शहरातील कल्याण नाका ते वंजारपट्टी नाका दरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.

बहुजन विकास आघाडीत, इतर पक्षीतील सक्रिय कार्यकर्ते यांचे इनकमिंग !मा. श्री राजेश पाटील आमदार यांच्या उपस्थित शेकडो कार्यकर्ते याचा प्रवेश.

बहुजन विकास आघाडीत, इतर पक्षीतील सक्रिय कार्यकर्ते यांचे इनकमिंग !
मा. श्री राजेश पाटील आमदार यांच्या उपस्थित शेकडो कार्यकर्ते याचा प्रवेश. 

बोईसर ( हिरालाल लोखंडे ) - दिनांक २३ आॅगस्ट २०२१ रोजी बोईसर ता,जि. पालघर येथील धनानी नगर, ड्रिम हाउस, साईलोक नगर, गणेश नगर, अवध नगर या भागातील सुमारे २०० शे च्या वर इतर पक्षीय महिला, तरूण, तरणी यांनी मा. श्री राजेश पाटील आमदार बोईसर विधानसभा, यांच्या मनमिळावूपणा व कार्यकरण्याची  तसेच सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन, त्यांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी ते करीत असलेले प्रयत्न पाहता, त्यांच्या कार्यावर प्रेरित होऊन, बहुजन विकास आघाडी मधे राजी खुशीने शेकडो लोक प्रवेश करीत आहेत 
   बहुजन विकास आघाडीचे मा. श्री हितेंद्र ठाकुर आमदार ( आप्पा ) यांनी स्वकर्तृत्वावर व निवडणुकीत जनतेला दिलेल्या वचनास लक्षात ठेवत. वसई विरार विभागाचा काया पलट करून आपले नेतृत्व सिध्द करीत, लोकांनी ठेवलेल्या विश्वास याची परत फेड, फुल नव्हे फुलाची पाकळी म्हणून, राजकारण कमी समाज सेवेला प्राधान्य देत, आपल्या मतदारसंघात जनते साठी सुधारणा करीत आहे. जनमानसाच्या सानिध्यात राहून जनमानसाच्या सुख सुविधा यांचा विचार करीत आपले कार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे असंख्य तरुण - तरणी - लहान थोर जनसामान्य जनता त्यांची चाहती होत आहे. 
    मा. आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थित श्री विश्वनाथ पाटील - बहुजन विकास आघाडी उपाध्यक्ष. श्री प्रभाकर पाटिल बहुजन विकास आघाडी पालघर तालुका अध्यक्ष यांच्या सहकार्याने  तसेच भावना विचारे पालघर पंचायत समिती सदस्य, अनिल रावते पंचायत समिती सदस्य, श्री अविनाश चुरु जेष्ठ नेते, विनोद भावर पंचायत समिती सदस्य, श्री अमजल आली ( मिंटू भाई  ) बहुजन विकास आघाडी अल्पसंख्याक अध्यक्ष, धनश्री रेवंडकर महिला युवा अध्यक्ष, रूपेश पाटील युवा कार्यकर्ते, प्रताप पाटील, भूषण पाटील, संजय बारी, शुभम चौबे, राहुल शर्मा, गणेश काळे, सुधीर माने पदाधिकारी, तसेच आजी माजी ग्रामपंचायत पदाधिकारी, कार्यकर्ते कार्यक्रमात उपस्थित होते.

सफाळे - विश्रामपुर - चहाडे बससेवा पूर्ववत सुरू होणार. श्री हेमंत जाधव साहेब आगर व्यवस्थापक सफाळे

सफाळे - विश्रामपुर - चहाडे बससेवा पूर्ववत सुरू होणार. 
श्री हेमंत जाधव साहेब आगर व्यवस्थापक सफाळे 

सफाळे ( हिरालाल लोखंडे ) दिनांक २३ आॅगस्ट २०२१ रोजी पर्यंत महाराष्ट्र परिवहन आगर सफाळे ता,जि पालघर येथून सफाळे - खडकोली - विश्रामपुर - चहाडे या मार्गावर चालणारी बस सेवा कोवीड १९ च्या प्रभावामुळे व संसर्गजन्य रोगाची तिव्रता रोखण्यासाठी, सदर बससेवा बंद करण्यात आलेली. परंतु आता कोवीड १९ चा प्रभाव कमी होत आला असून, अनेक ठिकाणी उद्योगधंदे - बाजार पेठा - लोकल रेल्वे सेवा सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने सफाळे आगरातून सुटणारी सफाळे - तांदुळवाडी, लालठाणे, विश्रामपुर ,खडकोली ,चहाडे हि बस सेवा पूर्ववत  सुरू करण्यात यावी या करीता २३ आॅगस्ट रोजी  नोकरी, धंदा, शिक्षण, शेती व्यवसाईक करणारे शेतकरी यांना सफाळे बाजारपेठेत, नोकरी धारक, विद्यार्थी, व्यवसाय करणारे, रेल्वेने प्रवास करणारे. यांना जाण्यासाठी सफाळे ते चहाडे या दरम्यान जाण्या येण्यासाठी बस सेवा पूर्ववत व्हावी या साठी समस्त गावकर्‍यांच्या वतीने श्री रमेश चावरा सरपंच तांदुळवाडी ता,जि पालघर, श्री सदानंद लाबड सरपंच लालठाणे ता,जि पालघर, श्री राकेश पाटील उपसरपंच लालठाणे यांच्या सोबत सौ. हेमांगी पाटील, कु. निकीता खेत्री ,यज्ञेश ठाकुर, जितेंद्र सोगले शरद पाटील, वेदांत पाटील, आकाश ठाकुर, चिंतामण पाटील, कोंडू खेतरे, अशोक ठाकुर आदि. सफाळे आगर व्यवस्थापक यांना देण्यासाठी गेलेले. परंतु आगर 
व्यवस्थापक श्री हेमंत जाधव साहेब, श्री सनी जोशी सफाळे एस टी स्टॉड इंनचार्ज यांची काही कारणास्तव भेट होऊ शकली नाही. तरीही श्री हिंदुले लिपिक व एस टी डेपोतील कार्यरत कर्मचारी श्री सुनिल चव्हाण यांनी निवेदन देण्यासाठी आलेल्या मान्यवर यांचे निवेदन स्वीकारून, भ्रमण ध्वनिवरून हेमंत जाधव साहेब यांच्याशी संपर्क साधुन. निवेदनाची माहिती देऊन साहेबांनी सांगितले, त्या प्रमाणे गावकरी व निवेदन देणार्‍या मान्यवराना, लवकरच सफाळे, तांदुळवाडी, लालठाणे, विश्रामपुर, खडकोली मार्गे चहाडे पर्यत जाणारी व त्याच मार्गाने परत येणार्‍या बस सेवा लवकरच सुरू करण्यात येतील असे सांगितले. श्री सनी जोशी सफाळे एस टी स्टॅड इंचार्जर यांच्याशी दुरध्वनी वरून संपर्क साधला असताना, त्यांनीहि सफाळे चहाडे बस सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी सकारात्मक होकार दिला आहे. त्यामुळे तांदुळवाडी ते चहाडे मार्गावरून प्रवास करणे प्रवासी यांना आनंद होत आहे

आम्ही फक्त निमित्त आहोत माझ्यासमोर बसलेल्या देवदूतान मुळे हे कार्य घडत आहे - डॉ. मणिलाल शिंपी

आम्ही फक्त निमित्त आहोत माझ्यासमोर बसलेल्या देवदूतान मुळे हे कार्य घडत आहे - डॉ. मणिलाल शिंपी

विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी
 व्हावे जेणे करुन त्यांना खेळाच्या माध्यमातून पुढे जाता येईल -  किशोर पाटील
गरजु महिला व विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभी राहीन - जोशीला पगारिया 
गरीब विधवा महिलांना साड्यांचे व विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न!
   नंदुरबार दि.२३(किशोर पाटील) नंदुरबार   जिल्ह्यातील      
के.डी.गावित माध्यमिक विद्यालय,अंबापुर येथे आर.एस. पी.अधिकारी युनिट कल्याण ठाणे, श्री स्वामीनारायण ट्रस्ट कल्याण,समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य,रोटी डे ग्रुप कल्याण, डॉ.किशोर आमोदकर, (परीवर्धे,),डॉ. तुषार सनंसे व अहिर क्षत्रिय शिंपी समाज यांच्या सौजन्याने गावातील विधवा महिलांना साड्यांचे व विद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्यांचे  मोफत वाटप  शनिवार दि.२१/०८/२०२१ रोजी  मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
        सदर कार्यक्रमासाठी कल्याण,भिवंडी, ठाणे,साक्री,नंदुरबार येथून आलेल्या सर्व पाहुण्यांचे विद्यार्थिनींनी औक्षण करून स्वागत केले. मान्यवरांचे हस्ते सरस्वती पूजन व दीप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
                कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामीनारायण ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. श्री.दिनेश बलवंतराय ठक्कर तर प्रमुख पाहुणे मा.डॉ. श्री.मणीलाल शिंपी (आर.एस.पी.कमांडर, कल्याण-ठाणे), मा.श्री. किशोर बळीराम पाटील (संपादक दैनिक स्वराज्य तोरण तथा सरचिटणीस महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग),मा.श्री.बन्सीलाल महाजन (आर एस.पी. अधिकारी),श्री.घनश्याम सोनवणे (आर.एस.पी. अधिकारी ),मा.सौ. जोशीला अमर पगारिया (सामाजिक कार्यकर्त्या साक्री), सौ. भारती किशोर दुसेजा  (साक्री),सुभाष सावळे ( अध्यक्ष नंदुरबार जिल्हा अहिर क्षत्रिय शिंपी समाज), श्री.बळवंत निकुंभ,श्री.देवरे  श्री.आर.आर.पाटील,श्री.शामू चौरे,श्री.भरत महाले, श्री.वासुदेव गायकवाड,श्री.अशोक चौरे ,शिक्षक,व मोठ्या संख्येने महिला व विद्यार्थी उपस्थित होते.
              सर्व मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.व या कार्यक्रमाचे औचित्य साधून कोरोना काळात ज्या महिलांनी विशेष मेहनत घेतली त्या दोन महिलांना हिरकणी पुरस्काराने मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे व गावातील महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. आर एस पी युनिट कल्याण/ ठाणे यांनी आत्तापर्यंत महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यात ४०,००० गरीब गरजु पर्यंत मदत पोचवली आहे.मात्र आम्ही फक्त निमित्त आहोत.ज्यांच्या मुळे ही मदत पोहचली ते खरे देवदूत आपल्या समोर बसले आहेत.त्यामध्ये विशेष उल्लेख करायचा झाला तर श्री स्वामी नारायण ट्रस्ट कल्याणचे अध्यक्ष डॉ.श्री.दिनेश भाई ठक्कर, संपादक श्री किशोर पाटील, डॉ.श्री.सोन्या पाटील,समाजसेवक श्री.रामचंद्र देसले.श्री.श्रीधर पाटील, डॉ.किशोर आमोदकर, (परीवर्धे,),डॉ. तुषार सनंसे
यांचा नामोल्लेख करावा लागेल.आम्ही 
कलापथकाच्या माध्यमातून पथनाट्य सादर करून विद्यार्थी व तरुणांमध्ये जनजागृती करीत आहोत विशेष म्हणजे वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या तरुण वर्गाला व नागरिकांना याबाबतची सविस्तर माहिती आम्ही पथनाट्याद्वारे तसेच गावागावात जाऊन शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून देत असतो. असे यावेळी आर.एस.पी कमांडर डॉक्टर मणिलाल शिंपी यांनी सांगितले.
 कोरोना काळात महाराष्ट्रातील शाळा व महाविद्यालये गेल्या दीड वर्षांपासून बंद आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण हे ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे मात्र याला अपवाद म्हणजे गरीब गरजू आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण झाले नाही. हातावर काम करून पोट भरणाऱ्या माझ्या आदिवासी बांधवांची मुले शिक्षणापासून वंचित राहिली यामुळे शिक्षण हे शाळेतच दिले जावे जेणेकरून विद्यार्थी हा आपली प्रगती आपल्या स्वताच्या जबाबदारी ने करू शकेल. याठिकाणी प्रास्ताविक करताना विद्यालयाच्या विश्वस्तांनी सांगितले की आमचे विद्यालय हे विनाअनुदानित तत्त्वावर सुरू आहे, तरीदेखील आमचे सर्व शिक्षक आमच्या विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे शिक्षण देत आहेत. तसेच आमच्या विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धेत राज्यस्तरापर्यंत शाळेचे नाव लौकिक केले आहे. त्यामुळे मी सर्व शिक्षक वर्गाचे अभिनंदन करतो धन्यवाद मानतो तसेच या विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धा घेऊन त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात संधी मिळावी जेणेकरून या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची संधी मिळेल असे यावेळी संपादक  किशोर पाटील यांनी सांगितले.
मला या ठिकाणी डॉक्टर मणिलाल शिल्पी सरांनी बोलावल्यामुळे आली आहे. यांच्या मार्गदर्शना खाली मला अजून सामाजिक कार्य करण्याची संधी मिळेल मला गेल्या २० वर्षात सामाजिक कार्यामुळे ४८ पुरस्कार मिळाले आहेत.मला जिथे संधी मिळेल तिथे पोहचण्याचा प्रयत्न करते.आज मला या ठिकाणी आमंत्रित केल्यामुळे माझ्यासोबत मी रक्षाबंधन च्या पूर्वसंध्येला राख्या  घेऊन आली आहे व आज आदिवासी लहान  विद्यार्थ्यांना  मला राखी बांधण्याची संधी मिळाली त्यामुळे मी आपणा सर्वांचे खूप खूप आभारी आहे येथील उपस्थित गरीब गरजू महिला विधवा महिला तसेच  विद्यार्थी यांना कोणतीही अडचण किंव्हा गरज भासल्यास मी त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभी राहीन असे यावेळी सामाजिक कार्यकर्त्या जोशीला पगारिया यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला १०० साड्या धर्म सेवक डॉ.श्री.सोन्या काशिनाथ पाटील संस्थापक अध्यक्ष समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात आल्या. तसेच १०० साड्या श्री.गोपाळ मेतकर ( पुणे ), झकारिया एज्युकेशन चे लाकडावाला यांनी दिल्या.तर विद्यार्थ्यासाठी १००० वह्या  डॉ.किशोर आमोदकर, (परीवर्धे,),डॉ. तुषार सनंसे यांनी दिल्या.या सर्व साड्या नवापूर व शहादा, तालुक्यातील परिवर्धे, व पुनर्वसन, आदिवासी गरीब गरजू, महिला,विधवा महिलाना देण्यात आल्या तसेच  विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  योगेश शिंपी यांनी केले.तसेच  सूत्रसंचालन श्री.सिध्दांत खाडे यांनी केले तर  आभार प्रदर्शन श्री.निलेश पाटील यांनी केले.
        हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.सुनील दाभाडे,दिपक पाटील,सागर शर्मा,वामन महाले,राजेंद्र चौरे,श्रीमती.मंदा वसावे, जिजाबाई कापूरे,रेश्मा गावित यांनी विशेष मेहनत घेतली.आर एस पी अधिकारी युनिट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाचे आणि सामाजिक कार्याचे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागातून विशेष अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...