Sunday, February 21, 2021

राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त, व्यायाम शाळेला आधुनिक साहित्य लोकार्पण !

राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त, व्यायाम शाळेला  आधुनिक साहित्य लोकार्पण !
दातिवरे ( हिरालाल लोखंडे ) दिनांक १९ फेब्रुवारी राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ग्रामपंचायत दातिवरे ता,जि पालघर, येथे व्यायाम शाळा विकास अनुदान योजना सन २०१९ / २०२० अंतर्गत अनुसूचित जाती योजना व्यायाम साहित्य, जिल्हा क्रिडा अधिकारी पालघर याच्या कडुन रूपये ७,०००००/-₹ अक्षरी सात लाख रूपये किंमतीचे आधुनिक व्यायाम साहित्य, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नगर, ग्रामपंचायत दातिवरे ता,जि पालघर यांना मिळाले आहे. सदर हे साहित्य जिल्हा परिषद शाळा आंबेडकर नगर येथील रिक्त असलेल्या दोन रूम मधे ठेवण्यात आललेले असून आधुनिक पध्दतीने व्यायाम करणे, हि काळाची गरज आहे हे ओळखून ग्रामपंचायत दातिवरे सरपंच, ग्रामसेवक व सदस्य यांनी जिल्हा क्रिडा अधिकारी यांच्या सहयोगाने साहित्य मिळवून जिल्हा परिषद मराठीचा शाळा यांच्या रिक्त वर्गांचा उपयोग करून  तरूण मुलांना व्यायामाची सवय निर्माण व्हावी या करीता आधुनिक साहित्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी, शिव प्रतिमेचे पुजन करून मान्यवरांच्या हस्ते साहित्य लोकार्पण केले आहे. 
   मा, श्री भिमसेन गायकवाड साहेब सहा,पो निरीक्षक केळवा सागरी पोलिस स्टेशन ता,जि पालघर यांनी शिव प्रतिमेचे प्रथम पुजन करूण, व्यायाम कक्षचे उद्घाटन केले. श्रीमती ज्योती तामोरे सरपंच दातिवरे, श्रीमती रेखा तरे पालघर पंचायत समिती सदस्य, श्री सुरेश जाधव पालघर जिल्हा रिपाई अध्यक्ष ( आठवले गट ) श्रीमती महानंदा राऊत माजी सरपंच, श्री प्रभाकर ठाकुर माजी उपसभापती पालघर, विनोद मोरे, ज्ञानेश्वर राऊत, प्रशांत ठाकुर, अॅ. किरण गायकवाड, हेमंत ठाकुर आदि मान्यवरांच्या उपस्थित व सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. 
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आंबेडकर नगर मधील राऊत परिवाराची तरूण पिढी, महिला वर्ग तसेच योगेश भोईर, मंगेश वाघ, अनिकेत वर्तक, धर्मेंद्र वैद्य यांनी कार्यक्रमा साठी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन श्री रूपेश राऊत  तंटामुंक्ती कमिटी सचिव यांनी केले

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...