Monday, February 8, 2021

प्रेम प्रकरणातून रक्त पात ! गुन्हा दाखल, आरोपीस अटक.

प्रेम प्रकरणातून रक्त पात !
       गुन्हा दाखल, आरोपीस अटक. 
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) दिनांक ७ फेब्रुवारी २०२१ रोजी सफाळे रेल्वे स्टेशन पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या ठाकुरपाडा - कपासे येथे दुपारच्या वेळी अंदाजे १२ ते ३ च्या दरम्यान आरोपी दिलीप तानाजी ठाकरे वय वर्ष ४० राहणार ठाकुरपाडा ता,जि पालघर यांने आपली पत्नी सौ संगीता दिलीप ठाकरे  वय वर्ष ३६ .व तिचा भाऊजी पांड्या बाळकृष्ण श्रावणे वय वर्ष ३६ राहणार दहिसर तर्फे मनोर ता,जि   पालघर यांची शाररीक क्रिडा रास, चालू असल्याचे प्रत्यक्ष डोळ्यानी पाहिले असता राग अनावर झाल्याने मागचा पुढचा कोणताही विचार न करता, हातात आलेल्या कुऱ्हाडीने मारहाण करून निर्घृणरीत्या दोघाचा खून केला असल्याची फिर्याद आरोपीचा मुलगा मनोज दिलीप ठाकरे वय वर्ष २१ राहणार ठाकुरपाडा यांने दिली 
           सफाळे पोलीस स्टेशन  ता,जि पालघर येथे दिनांक ०७ / ०२ /२०२१ रोजी गुन्हा रजि नं. ०६  / २०२१ भा.द .वि. स. कलम  ३०२  प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून मा, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटना स्थळी भेट दिली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सफाळे पो. स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री संदीप कहाळे सहा. पो. निरीक्षक यांनी आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरू आहे

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...