Monday, February 22, 2021

सन-2021-22नामांकीत इंग्रजीमाध्यमाच्या शाळेत इयत्ता 1 ली व इयत्ता 2 री प्रवेश अर्ज सादर करावे

सन-2021-22नामांकीत इंग्रजीमाध्यमाच्या शाळेत इयत्ता 1 ली व इयत्ता 2 री प्रवेश अर्ज  सादर करावे

           पालघर(प्रतिनिधी) दि 22 :  आदिवासी विकास विभाग अंतर्गत प्रकल्प कार्यालय जव्हार मार्फत इयत्ता 1 ली व 2 री करीता प्रवेश अर्ज प्रकल्प कार्यालय जव्हार येथे दि.  24/02/2021 ते   10/03/2021 या कालावधीत वाटप व भरुन देण्यात यावा. प्रवेश फॉर्म घेतांना प्रकल्प कार्यालय शासकीय आश्रमशाळा शासकीय वसतिगृह येथुन प्राप्त केलेलेच फॉर्म स्वीकारले जातील झेरॉक्स फॉर्म ग्राहय धरण्यात येणार नाही.सदर फार्म विनामुल्य उपलब्ध आहेत. पालकांनी फॉर्म सोबत जन्मनोंदीचा पुरावा जोडावा. सदरचे प्रवेश फॉर्म इ.1 ली व 2 री करीता सुटीचे दिवस वगळुन सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 यावेळेत उपलब्ध होतील. प्रवेशाकरीता फॉर्म सोबत इच्छुक विद्यार्थ्यांच्या पालकांचा रहिवासी दाखला, पालकाचे सक्षमअधिका-याने दिलेला जातीचा दाखला, तहसिलदार यांचा सन-2020-21 चा उत्पनाचा दाखला, दारिद्रय रेषेचा ग्रामसेवकांनी दिलेलादाखला, विद्यार्थ्यांचे सन-2020-21 मध्ये ज्या वर्गात शिकतअसेल त्या वर्गाचा बोनाफाईड दाखला,शाळासोडल्याचा दाखला इयत्ता 1 ली साठी अंगणवाडीचा दाखला, पासपोर्ट साईज दोन फोटो, पालक अपंग असल्यास त्याबाबतचा सक्षम अधिका-याने दिलेले प्रमाणपत्र, विधवा/घटस्फोटित/निराधार/परितक्तयाअसल्यास ग्रामपंचायतीचा ग्रामसेवकाचा दाखला, बँकपासबुकची झेरॉक्स व विद्यार्थ्याचे आधारकार्ड झेरॉक्स इ. कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रति जोडाव्यात मुळकागदपत्रे जोडु नयेत. अपुर्ण व उशिरा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. तसेच विद्यार्थ्यांचे पालक शासकीय अथवा निमशासकीय नोकरीत नसलेबाबतचे  हमीपत्र लिहुन दयावे लागेल, निवड झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा बदलता येणार नाही याबाबतचे हमीपत्र सादर करणे  आवश्यक आहे. इयत्ता 1 ली व 2 री  करीता शहरातील नामांकीत शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार जि. पालघर यांचेकडुन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...