Tuesday, February 9, 2021

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० पाच दिवसीय वेबिनार संपन्न



राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०  पाच दिवसीय वेबिनार  संपन्न

    पालघर (प्रतिनिधी)राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शिक्षण व्यवस्थेतील सर्व अधिकारी, कर्मचारी , मुख्याध्यापक , शिक्षक यांना समजावे व शिक्षण प्रेमी ,पालक , विद्यार्थी यांच्या पर्यंत पोहचावे या साठी महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था ( मिपा ) औरंगाबाद यांच्या मार्गदर्शक सुचनानुसार  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था , पालघर व शिक्षण विभाग प्राथ / माध्य जि .प .पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने दि .२२ ते २८ जानेवारी २०२१ या कालावधीत पाच दिवसीय वेबिनार डायट पालघर या फेसबुक पेज च्या लाईव्ह माध्यमातून संपन्न झाले . 

सिद्धाराम सालीमठ सर, ( मुख्य कार्यकारी अधिकारी , जि .प .पालघर  यांच्या मार्गदर्शनाने हे वेबिनार पार पडले.
या वेबिनार मध्ये मानसी भोसले यांनी संपूर्ण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील पायाभूत माहीती सविस्तर पणे मांडली. धोरणाची आखणी कशी केली, धोरण केंव्हा पासुन आखण्यास सुरुवात झाली,  हे धोरण तयार करण्याची का गरज पडली याबाबत सखोल अशी सोप्या भाषेत माहीती दिली .  दिनेश चौधरी यांनी शालेय नेतृत्व आणि सातत्यपूर्ण विकास या विषयावर -शिक्षकांचे सक्षमीकरण, शालेय नेतृत्व व व्यवस्थापन प्रशिक्षणाची माहीती ,नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सेवाजेष्ठता व वेतनवाढ या बद्दल माहीती दिली . वैशाली काकडे यांनी आधुनिक काळातील शालेय नेतृत्व याविषयावर सजगतेने स्पष्टीकरण केले . राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये शिक्षकाचे नेतृत्व कसे असावे त्याचे ध्येय काय उद्देश काय याची सविस्तर उकल केली . राजेश बनकर  यांनी शालेय समूह व शालेय संकुल संकल्पना स्पष्ट केली. शालेय संकुल म्हणजे काय , त्याची रचना व स्वरुप, शालेय संकुल व्यवस्थापन समिती , समितीचा आराखडा याविषयी सखोल माहीती दिली .संदीप वाकचौरे यांनी  नव्या शैक्षणिक धोरणाची आव्हाने याविषयावर प्रकाश टाकताना या सत्राला उपस्थितांना विचार प्रक्रिया करण्यास भाग पाडले .वेबिनारच्या समारोप कार्यक्रमात अध्यक्षीय मार्गदर्शन  करताना डॉ.नेहा बेलसरे संचालक , महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था ( मिपा ) औरंगाबाद यांनी येत्या काळात भारताचा भावी नागरीक  ज्ञानपूर्ण , सर्वगुणसंपन्न होण्यासाठी नेतृत्व संकल्पना अधिक रूजणे गरजेचे आहे असे मत मांडले यावर अधिक  मार्गदर्शन करताना येत्या काळात विदयार्थी इंडीपेंडट थिंकर हा दृष्टीकोन विकसीत होणे गरजेचे आहे . शालेय नेतृत्व ही संकल्पना स्पष्ट  करताना शिक्षक , शाळा यांची महत्वपूर्ण अशी भूमिका विशद करून राष्ट्रीय  शैक्षणिक धोरण- 2020 याबद्दल उत्तम मार्गदर्शन केले . 

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पालघर चे प्राचार्या ,विषय सहाय्यक व समुपदेशक यांनी वेबिनार ची मालिका यशस्वीरित्या पूर्ण केली या बद्दल विशेष अभिनंदन केले . शालेय नेतृत्व या साठी मिपा औरंगाबाद च्या वतीने अयोजीत करण्यात येणारी प्रशिक्षणे व त्याचा फायदा मुख्याध्यापक व शिक्षक यांना कसा होणार आहे याची माहीती दिली .
     दिनकर टेमकर  संचालक , राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद  लता सानप प्राचार्या , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ,पालघर तथा शिक्षणाधिकारी प्राथ . जि .प .पालघर , संगीता भागवत शिक्षणाधिकारी माध्य . जि .प .पालघर  यांचे पूर्ण  मार्गदर्शन या वेबिनार ला लाभले .  वेबिनारचे आयोजन तानाजी डावरे  जिल्हा नोडल अधिकारी  , डायट पालघर  यांनी केले . 
जिल्हास्तरीय या वेबिनारचा लाभ जिल्हयातील सर्व गटशिक्षणाधिकारी ,विस्तार अधिकारी , केंद्रप्रमुख , साधन व्यक्ती ,आयडी स्टाफ , मुख्याध्यापक ,शिक्षक यांनी लाभ घेतला . एकूण ११२३४ अधिकारी व कर्मचारी यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे प्रत्यक्ष सहभाग घेतला तर १८००० अधिकारी व कर्मचारी यांनी या वेबिनारच्या फेसबुक  व्हिडीओ द्वारे लाभ घेतला .

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...