नागरीकांनी कोवीड-१९ नियमांचे पालन करावे आणि कोवीड-१९ चा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करावे
पालघर (प्रतिनिधी)दि. 21 :- कोवीड-१९ विषाणूचा संसर्ग आणि वाढत्या रुग्णांची संख्या विचाराता घेता जिल्ह्यात सर्व उपविभागीय दंडाधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक व मुख्याधिकारी यांच्यामार्फत सार्वजनिक ठीकाणी भेटी देऊन कोवीड-१९ नियमांचा भंग करण्यात येणाऱ्या ठिकाणावरती कारवाया करण्याचे निर्देश डॉ. माणिक गुरसळ, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पालघर यांनी दिलेले आहेत.
त्यानुसार जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांत ६६ सार्वजनिक ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ३ सार्वजनिक ठिकाणी र.रु. ६६००/- इतक्या रक्कमेचा दंड करण्यात आला आहे. तसेच सदर ठिकाणी विनामास्क असणाऱ्या १८९ लोकांवरती दंडात्मक कारवाया करुन र.रु. ३६१५०/- इतक्या रक्कमेचा दंड वसुल करण्यात आला आहे.
तरी नागरीकांनी कोवीड-१९ नियमांचे पालन करावे आणि कोवीड-१९ चा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आव्हान मा.जिल्हाधिकारी महोदयांनी केले आहे.
Like
ReplyDelete