Thursday, February 25, 2021

एडवण येथे हत्तीरोगावरील ‘विकृती व्यवस्थापन किट’ वाटप



एडवण येथे  हत्तीरोगावरील  ‘विकृती व्यवस्थापन किट’ वाटप

पालघर (प्रतिनिधी)आज दिनांक २५/२/२०२१ रोजी आरोग्य समिती सभेचे औचित्य साधुन  हत्तीरोगासाठी  उपयोगाचे असणारे "विकृती व्यवस्थापन किट" जि.प. समिती अध्यक्ष तथा माननीय सभापती, आरोग्य समिती  निलेश सांबरे यांच्या हस्ते प्रा आ केंद्र एडवण येथे उपस्थित हत्तिरुग्नाना देऊन पालघर जिल्ह्यातील रुग्णांना वाटप करण्यास सुरवात करण्यात आली.
पालघर जिल्ह्यात एकूण ७२७ हत्तीरोग ग्रस्त रुग्ण असून त्यांना पायाची सूज नियंत्रणात ठेवून त्याची स्वच्छ्ता राखण्यासाठी हे किट महत्वाचे असणार आहे. रुग्णांचे पायाची काळजी कशी घ्यावी, साधे सोपे व्यायाम करून सूज नियंत्रणात कशी ठेवावी, किट चा  वापर कसा करावा याचे प्रशिक्षणही यावेळी घेण्यात आले. 
आरोग्य यंत्रणेमार्फत हे प्रशिक्षण नियमित स्वरूपात वेळोवेळी घेण्यासाठी  सभापती यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना सूचना केल्या.सर्व आरोग्य समितीचे सदस्य, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सुर्यवंशी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सागर पाटील, हत्तीरोग अधिकारी कांबळे, इतर जिल्हास्तरीय अधिकारी व सर्व तालुका आरोग्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...