Monday, February 15, 2021

आई बाबा फाउंडेशन आयोजित माजी नगरसेविका चषक 2021 संपन्न

आई बाबा फाउंडेशन आयोजित माजी नगरसेविका चषक 2021  पालघर (प्रतिनिधी)दिनांक 13 आणि 14 फेब्रुवारी रोजी डुंगीपाडा नाका येथील मैदानावर अंडरम क्रिकेटचे सामने भरवण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी माजी नगरसेविका बिंदिया दिक्षित यांच्या माध्यमातून संजू धोत्रे यांनी आयोजन केले होते उदघाटनाला आई बाबा फाउंडेशनचे आधारस्तंभ श्री. संतोष दीक्षित, अध्यक्षा सौ.बिंदिया दिक्षित,संजू धोत्रे उपस्थित होते,एकूण 24 संघांनी सहभाग नोंदवला, बक्षीस वितरणासाठी सौ. बिंदिया दिक्षित,संजू धोत्रेआणी निलेश भोईर, महेश म्हस्के उपस्थित होते.  प्रथम पारितोषिक आकर्षक ट्रॉफी आणि 8000 रुपये *पास्थल संघाने* जिंकले,द्वितीय पारितोषिक आकर्षक ट्रॉफी आणि 5000 रुपये *वाय बी सी सी* संघ, वेऊर तर तृतीय पारितोषिक , आकर्षक ट्रॉफी व रोख रक्कम 3000 रुपये  *माऊली संघ*  ला रोख मिळाले.
   आई बाबा फाउंडेशन गेल्या 7 वर्षांपासून हे सामने भरवण्याचे कार्य करतात.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...