महा आवास अभियान च्या प्रभावी अंमलबजावणी साठी विभागीय सम्पर्क अधिकारी यांची क्षेत्रीय भेट
महा आवास अभियान ग्रामीण १०० दिवस महा आवास अभियान च्या प्रभावी अंमलबजावणी करिता विभागीय सम्पर्क अधिकारी संजय घोगळे सहा.लेखाधिकारी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष,ग्रामीण गृहनिर्माण कक्ष यांनी आज पालघर मध्ये क्षेत्रीय भेट दिली. बऱ्हाणपूर, चहाडे,वाडा येथील घरकुलांची पाहणी करून जिल्हयातील सर्व ग्रामीण गृहनिर्माण अभियंते,घरकुलांचे काम पाहणारे विस्तार अधिकारी,व कर्मचारी यांच्या मार्फत प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा माणिक दिवे यांनी जिल्ह्यातील महा आवास अभियानाचा सविस्तर आढावा सादर केला.
जिल्ह्यातील डेमो हाऊस, गवंडी प्रशिक्षण, व इतर योजना यावर लक्ष देऊन सर्वांनी मिळून काम करूया, या स्पर्धेत आपण उतरलो असून पालघर जिल्हा महाआवास अभियानात अव्वल राहील या साठी प्रयत्न करूया असे आवाहन यावेळी प्रकल्प संचालक माणिक दिवे यांनी उपस्थितांना केले.
यावेळी संजय घोगळे यांनी अभियानाबाबत लाभार्थ्यांमध्ये जागरूकता असली पाहिजे,यासाठी बॅनर, होर्डिंग्ज याचा वापर केला पाहिजे,तसच तुमचं घर सुंदर झालं पाहिजे यासाठी लाभार्थ्यांना प्रोत्साहित केले पाहिजे असे मत व्यक्त केले.
सदर बैठकीस सहा. प्रकल्प अधिकारी प्रतिभा भागवत, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जिल्हा प्रभारक, व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment