रस्ता सुरक्षा अभिनय - २०२१
सफाळे -- हिरालाल लोखंडे -
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सफाळे पोलिस स्टेशन व्दारा रस्ता सुरक्षा अभिनय - २०२१ अंतर्गत पारगांव कोस्टल चेक पोस्ट ते इंद्रप्रस्थ चौक सफाळे पुर्व या ठिकाणी नाकाबंदी दरम्यान वाहन चालकांना गुलाबाचे फुल देऊन वाहतुकीचे नियम पाळणे, दुचाकीवरून प्रवासात हेल्मेट वापरणे, गाडी चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, या कडे दुर्लक्ष केल्यानंतर होणार्या संभाव्य नुकसानीचा परिणाम समजून सांगितले, चार चाकी वाहन चालविताना सीटबेल्ट लावावे,
वाहतुकीचे दरम्यान काय काळजी घ्यावी, नियमांचे कसे पालन करावे रस्त्याचे परिस्थिती कडे लक्ष ठेऊन काळजीपूर्वक वाहन चालविणे, मद्यपान करुन वाहन न चालवणे, अशा प्रकारच्या सूचना देऊन मार्गदर्शन करून सदर वाहन चालकावर दंडात्मक कारवाई न करता त्यांना गुलाबाचे फूल देऊन जनजागृती करून मोटर -सायकल, कार, टेम्पो चालकाचे प्रबोधन करण्यात आले.
No comments:
Post a Comment