Friday, January 22, 2021

शिक्षक सेना पालघर तालुकाप्रमुखपदी निलेश भोईर यांची निवड

शिक्षक सेना पालघर तालुकाप्रमुखपदी निलेश  भोईर यांची निवड

पालघर (प्रतिनिधी)पालघर शहरातील आर्यन हायस्कुल शाळेत कार्यरत शिक्षक निलेश यशवंत भोईर यांची  शिक्षक सेना पालघर तालुकाप्रमुख पदी निवड झाल्याने तालुक्यातील शिक्षक वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, व निलेश भोईर यांना शुभेच्छांचे वर्षाव देखील सुरू झाले आहे. निलेश भोईर आर्यन एज्युकेशन सोसायटीचे उच्च माध्यमिक शाळेत मागील 10 वर्षांपासून आपली सेवा देत आहेत. त्याच बरोबर समाज सेवेत ही त्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. शाळे बरोबर परिसरातील गोर-गरीब विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहणारे निलेश भोईर ने कोरोना काळात असंख्य गोर-गरीब विद्यार्थ्यांना तसेच त्यांचे कुटुंबियांना आर्थिक मदत तसेच मोफत अन्न  वाटप देखील केले आहेत. राष्ट्रीय ग्राहक संरक्षण फाउंडेशनच्या वतीने ही ते नेहमी समाजकार्य करताना दिसून येतात. त्याच बरोबर शिक्षकांचे अडी-अडचणीतहि ते नेहमी धावून येतात,गेल्या 8 वर्षांपासून 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त *सावित्रीच्या लेकी* या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा ते सन्मान करतात तसेच 8 मार्च रोजी जागतिक महिला दिवस सुद्धा मोठया प्रमाणात साजरे करतात म्हणूनच त्यांचे शिक्षक, विद्यार्थी तसेच समाजासाठी केलेल्या या सेवांसाठी पोचपावती म्हणून त्यांची पालघर तालुका शिक्षक सेना प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे नियुक्ती पत्र महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना(कोकण विभाग) चे अध्यक्ष ज्ञानेश्वर  म्हात्रे यांच्या हस्ते निलेश यशवंत भोईर यांना पालघर येथील चाफेकर कॉलेज मध्ये आयोजित कार्यक्रमात देण्यात आले..

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...