सफाळे ( हिरालाल लोखंडे ) देशभरातील विद्यार्थी व शिक्षकांचा गुणवत्ता विकास, नेतृत्व गुण, कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच शैक्षणिक प्रगती साठी, देशपातळीवर काम करणारी शिक्षकांची सर्वात मोठी संस्था " सर फाउंडेशन " या वर्षी २६ जानेवारी - प्रजासत्ताक दिना निमित्ताने आॅनलाईन कलामहोत्सव साजरा करीत आहे.
" सर फाउंडेशन " पालघर जिल्हा यांच्या पुढाकाराने यासाठी विविध उपक्रमाचे फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून पारपाडणार असून यामध्ये शिक्षक व विद्यार्थी यासाठी -- भूमिका अभिनय, मी क्रांतीकारी बोलतोय, देशभक्तीपर गीत गायन, देशभक्तीपर व सांस्कृतिक लोकगीत -- नृत्य सादरीकरण, आदर्श व्यक्तीची मुलाखत, देशभक्तीपर आधारित कविता लेखन, प्रश्न मंजुषा इत्यादी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये जिल्हयातील जास्तीत जास्त शिक्षक - विद्यार्थीनी सहभागी होण्याचे आव्हान या उपक्रमाचे आयोजक " सर फाउंडेशन " चे पालघर जिल्हा समन्वयक श्री विजय वाघमारे श्री आनंद आनेमवाड शिल्पा वनमाळी यांनी केले आहे
No comments:
Post a Comment