Friday, January 22, 2021

मध केंद्र योजना (मधमाशी पालन)संस्था व पात्र व्यक्तीकडून अर्ज मागविण्यात येत आहे

मध केंद्र योजना (मधमाशी पालन)संस्था व 
पात्र व्यक्तीकडून अर्ज मागविण्यात येत आहे 
पालघर (प्रतिनिधी)दि २२ :- महाराष्ट्र शासन, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई ३२ यांचा शासन निर्णय क्र. केव्हीबी -२०१७/प्र.क्र. १६/उद्योग-६, दि. १८ जून २०१९ अन्वये महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना ( मधमाशी पालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वीत झालेली आहे. याकरीता पात्र व्यक्ती / संस्थाकडुन खालील दर्शविल्याप्रमाणे अर्ज मागविण्यात येत आहे.
अ) योजनेची वैशिष्टे - मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुतंवणुक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष/छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती.
ब) योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता -
१) वैयक्तिक मधपाळ -
पात्रता - अर्जदार  साक्षर असावा,स्वतःची शेती असल्यास प्राधान्य, वय १८ वर्षापेक्षा जास्त,अर्जदाराने मंडळाचे मान्यता प्राप्त प्रशिक्षण केंद्रात १० दिवसाचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील.
२) केंद्रचालक प्रगतिशिल मधपाळ - व्यकती पात्रता - किमान १० वी पास, वय वर्ष २१ पेक्षा जास्त, अशा व्यक्तिच्या नांवे किमान किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नांवे किमान १ एकर शेत जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन, लाभार्थीकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्यांची क्षमता व सुविधा असावी. 
३) केंद्रचालक संस्था- पात्रता - संस्था नेंदणीकृत असावी, संस्थेच्या नांवे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान १००० चौ. फुट सुरयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्यांची क्षमता असलेली सेवा असावीत.
क) अटी व शर्ती - लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणांपुर्वी मध व्यवसाय सुरू करणेसंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य राहील.मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य
ड) अधिक माहितीसाठी संपर्क
३) जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, लक्ष्मी विष्णु सदन,महर्षि कर्वे रोड,नौपाडा,ठाणे-४०० ६०१ फोन नं.२५३६६०७५ 
४) संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, शासकीय बंगला नं. ५, मु.पो. ता. महाबळेश्वर, जि. सातारा- ४१२८०६, दुरध्वनी ०२१६८ - ३२६०२६४ यांच्याशी सपर्क साधावा असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी  पालघर यांनी  केले आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...