सफाळे ( हिरालाल लोखंडे )
३१ जानेवारी रोजी ग्रामपंचायत विराथन ख्रुर्द तालुका जिल्हा पालघर, यांच्या नव्या बांधलेल्या ग्रामपंचायत इमारतीचा व नव्यानेच तयार करण्यात आलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या वास्तुचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
ग्रामपंचायत नवीन इमारत बांधकामासाठी जिल्हा परिषद पालघर, " जनसुविधा " योजनेअंतर्गत प्रशासकीय निधी /- ₹ अक्षरी बारा लाख रूपये मंजूर करण्यात आलेला असता, नवीन इमारतीचे बांधकाम अंदाजे रक्कम ( Estimate cost Rs.) रूपये १५,५०००० /- अक्षरी पंधरा लाख पन्नास हजार रूपये लोन काढून ( विश्वासनीय सूत्रा कडुन मिळालेली माहिती) इमारतीचे बांधकाम पुर्ण करण्यात आले आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या जागेवर मातीची टेकडी होती, परंतु रेल्वे प्रशासनाने भरावासाठी मातीचा उपयोग केल्यानंतर ( महसूल विभाग परवानगीने )त्या सपाट झालेल्या जागेचा उपयोग करून, नवतरूणांना खेळण्यासाठी क्रीडांगण बनविण्यात आले असता मान्यवरांच्या हस्ते त्याचेही उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री वसंत चव्हाण शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख, सौ भारती कामडी पालघर जिल्हा परिषद अध्यक्षा, सौ रंजना म्हसकर ( घोलप ) पालघर पंचायत समिती सभापती, डॉ विश्वास वळवी शिवसेना नेत, श्री दामोदर पि पाटील माजी बांधकाम सभापती, श्री अनुप पाटील जिल्हा समन्वयक, श्री चंद्रशेखर जगताप गटविकास अधिकारी, श्री जयेश पाटील तालुका प्रमुख, रामदास पाटील उपतालुका प्रमुख, सौ राजश्री स किणी सरपंच विराथन ख्रुर्द, नचिकेत पाटील विभाग प्रमुख, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी मोठ्या संखेने कार्यक्रमाला उपस्थित होते.
No comments:
Post a Comment