Sunday, January 17, 2021

कुणबी नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न*

*कुणबी नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न*
*****************************
*टीडीसीसी बॅंकेचे संचालक निलेश भोईर यांच्या हस्ते संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन*
    वाडा(प्रतिनिधी) वाडा तालुक्यातील ‌अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली व विश्वासपात्र ठरलेल्या कुणबी नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. १७/१/२०२१ रोजी पंचायत समिती प्रशिक्षण हॉलमध्ये पार पडली.
     सभेच्या सुरुवातीलाच गेल्या वर्षभरात मृत पावलेल्या पतसंस्थेच्या संचालकांच्या तसेच सभासदांच्या नातेवाईकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर पतसंस्थेने छापलेल्या *सन २०२१ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सभेसाठी विशेष निमंत्रित असलेले  ठाणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक निलेश भोईर यांच्या हस्ते करण्यात आले.* तसेच *संस्थेच्या सचिव सौ. वर्षाताई गोळे यांची वाडा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व संस्थेचे संचालक प्रफुल्ल मुकूंद पाटील यांची वाडा शहर व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.*
     त्यानंतर अल्पावधीतच संस्थेची यशस्वीरित्या सुरु असलेल्या वाटचालीचा लेखाजोखा संस्थेचे अध्यक्ष युवराज ठाकरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून, सचिव सौ. वर्षा गोळे यांनी आपल्या मनोगतामधून तर व्यवस्थापिका प्रज्ञा डोहाळे यांनी आपल्या अहवाल वाचनातून मांडला.
     संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा आलेख पाहता *संस्थेचे सल्लागार प्रफुल्ल (काका) पाटील यांनी आपल्या मनोगतामधून संस्थेच्या कार्याची प्रशंसा करुन समाधान व्यक्त केले. तर निलेश भोईर यांनीही संस्थेच्या यशस्वी वाटचालीबाबत कौतुक करुन संस्था गेली तीन वर्षे सतत ब ऑडीट वर्ग घेऊन सभासदांना लाभांश वाटपाचा ठराव घेत असल्याबाबत सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन करुन येत्या काळात ठाणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या माध्यमातून संस्थेला, संस्था मोठी होण्यासाठी सर्वतोपरी मदत दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.*
     सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा होऊन ठराव पारित करण्यात आले. यावेळी संस्थेचे सल्लागार डॉ. विवेक पाटील, संस्थेचे अध्यक्ष युवराज ठाकरे, उपाध्यक्ष विठ्ठल गोरे, सचिव वर्षा गोळे, सहसचिव हेमंत सांबरे, संचालक, प्रल्हाद सावंत, सौ. दिक्षिता पाटील, प्रफुल्ल पाटील, अजित ठाकरे, तज्ञ संचालक नाशिकराव पाटील, मोहन सोनावणे, संस्थेचे लेखा परिक्षक एन. बी. पाटील यांच्यासह संस्थेचे सभासद उपस्थित होते.
     सभेचे सूत्रसंचलन संस्थेचे सभासद ॠषिकेश सावंत यांनी केले तर आभार वर्षा गोळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...