पालघर (प्रतिनिधी):- पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष भारती भरत कामडी यांच्या हस्ते जिल्हा परिषद मुख्यालय, पालघर येथे ध्वजारोहण करून ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, निलेश भागवान सांबरे, महिला व बाल कल्याण समिती सभापती, अनुष्का ठाकरे, जिल्हा पोलीस अधीक्षक, दत्तात्रय शिंदे, अति मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक माणिक दिवे, तसेच जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तत्पुर्वी उपाध्यक्ष,जिल्हा परिषद पालघर निलेश भगवान सांबरे यांच्या हस्ते मा. अध्यक्ष,जिल्हा परिषद पालघर यांच्या कार्यालयाच्या प्रांगणात, ध्वजारोहण कार्यक्रम संप्पन्न झाला.
No comments:
Post a Comment