11 वा राष्ट्रीय मतदार दिवस पालघर येथे साजरा होणार
पालघर (प्रतिनिधी)दि.22 :- भारत निवडणूक आयोगामार्फत 11 वा राष्ट्रीय मतदार दिवस, दिनांक 25 जानेवारी, 2021 रोजी साजरा करणेंत येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालघर जिल्हयामध्ये जिल्हा स्तरावर, मतदार नोंदणी अधिकारी स्तरावर व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले आहे. पालघर जिल्हा पातळीवरील राष्ट्रीय मतदार दिवसाचा कार्यक्रम तहसिल कार्यालय सभागृह हॉल, पालघर ता.जि.पालघर येथे दिनांक 25 जानेवारी, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजतां आयोजित करणेत आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष.डॉ. माणिक गुरसळ (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, पालघर हे आहेत. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून. सिध्दाराम सालीमठ (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर, दत्तात्रय शिंदे (भा.पो.से.), पोलीस अधिक्षक पालघर व. दिलीप गुट्टे, अपर जिल्हाधिकारी, पालघर हे उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय मतदार दिवसाच्या कार्यक्रमामध्ये नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांचे फोटो ओळखपत्राचे वाटप व या मतदारांचा सत्कार करणेंत येणार आहे. तसेच दिव्यांग मतदार, सैनिक मतदार, महिला मतदार यांना फोटो ओळखपत्राचे वाटप व सत्कार करणेत येणार आहे. मा. भारत निवडणूक आयोगाकडून 'सभी मतदाता बने: सशक्त, सतर्क, सुरक्षित एवं जागरूक " (Making our Voters Empowered, Vigilant, Safe and Informed) असे अकराव्या राष्ट्रीय मतदार दिवसाचे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगामार्फत मतदार जनजागृती होणेच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय मतदार दिवसाचा कार्यकम आयोजित करणेत येत आहे. असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदिप कळंबे यांनी कळविले आहे.
**********
No comments:
Post a Comment