सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु
कल्याण: प्रतिनिधी
ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी सार्वजनिक व साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे निर्देश महावितरणच्या मुख्य कार्यालयाने दिले आहेत. त्यानुसार कल्याण परिमंडल कार्यालयांतर्गत महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुटीच्या दिवशी सुरु राहतील. ही उपलब्ध सुविधा किंवा डिजिटल माध्यमाचा वापर करून चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. धनंजय औंढेकर यांनी केले आहे.
वीजबिल भरणा केंद्रांसोबतच थकीत वीजबिल वसुलीची कारवाई सुट्टीच्या दिवशी सुरु राहणार आहे. अधिकृत वीजबिल भरणा केंद्राशिवाय महावितरणच्या मोबाईल अँप (App) वर वीजबिल भरणा तसेच इतर सर्व सुविधा हाताच्या बोटावर उपलब्ध आहेत. www.mahadiscom.in या संकेतस्थळावर केवळ बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आदींच्या माध्यमातून वीजबिल भरता येते. याशिवाय विविध पेमेंट वॉलेटचा (पेटीएम, गूगल पे) उपयोग करून घरबसल्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा आहे. तसेच वीजबिलावर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करूनही थेट पेमेंट गेटवेवर जाऊन वीजबिल भरणे सुलभ होते. अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करण्याचे आवाहन मुख्य अभियंता श्री. औंढेकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment