Monday, August 23, 2021

आम्ही फक्त निमित्त आहोत माझ्यासमोर बसलेल्या देवदूतान मुळे हे कार्य घडत आहे - डॉ. मणिलाल शिंपी

आम्ही फक्त निमित्त आहोत माझ्यासमोर बसलेल्या देवदूतान मुळे हे कार्य घडत आहे - डॉ. मणिलाल शिंपी

विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी
 व्हावे जेणे करुन त्यांना खेळाच्या माध्यमातून पुढे जाता येईल -  किशोर पाटील
गरजु महिला व विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभी राहीन - जोशीला पगारिया 
गरीब विधवा महिलांना साड्यांचे व विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न!
   नंदुरबार दि.२३(किशोर पाटील) नंदुरबार   जिल्ह्यातील      
के.डी.गावित माध्यमिक विद्यालय,अंबापुर येथे आर.एस. पी.अधिकारी युनिट कल्याण ठाणे, श्री स्वामीनारायण ट्रस्ट कल्याण,समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य,रोटी डे ग्रुप कल्याण, डॉ.किशोर आमोदकर, (परीवर्धे,),डॉ. तुषार सनंसे व अहिर क्षत्रिय शिंपी समाज यांच्या सौजन्याने गावातील विधवा महिलांना साड्यांचे व विद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्यांचे  मोफत वाटप  शनिवार दि.२१/०८/२०२१ रोजी  मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
        सदर कार्यक्रमासाठी कल्याण,भिवंडी, ठाणे,साक्री,नंदुरबार येथून आलेल्या सर्व पाहुण्यांचे विद्यार्थिनींनी औक्षण करून स्वागत केले. मान्यवरांचे हस्ते सरस्वती पूजन व दीप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
                कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामीनारायण ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. श्री.दिनेश बलवंतराय ठक्कर तर प्रमुख पाहुणे मा.डॉ. श्री.मणीलाल शिंपी (आर.एस.पी.कमांडर, कल्याण-ठाणे), मा.श्री. किशोर बळीराम पाटील (संपादक दैनिक स्वराज्य तोरण तथा सरचिटणीस महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग),मा.श्री.बन्सीलाल महाजन (आर एस.पी. अधिकारी),श्री.घनश्याम सोनवणे (आर.एस.पी. अधिकारी ),मा.सौ. जोशीला अमर पगारिया (सामाजिक कार्यकर्त्या साक्री), सौ. भारती किशोर दुसेजा  (साक्री),सुभाष सावळे ( अध्यक्ष नंदुरबार जिल्हा अहिर क्षत्रिय शिंपी समाज), श्री.बळवंत निकुंभ,श्री.देवरे  श्री.आर.आर.पाटील,श्री.शामू चौरे,श्री.भरत महाले, श्री.वासुदेव गायकवाड,श्री.अशोक चौरे ,शिक्षक,व मोठ्या संख्येने महिला व विद्यार्थी उपस्थित होते.
              सर्व मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.व या कार्यक्रमाचे औचित्य साधून कोरोना काळात ज्या महिलांनी विशेष मेहनत घेतली त्या दोन महिलांना हिरकणी पुरस्काराने मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे व गावातील महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. आर एस पी युनिट कल्याण/ ठाणे यांनी आत्तापर्यंत महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यात ४०,००० गरीब गरजु पर्यंत मदत पोचवली आहे.मात्र आम्ही फक्त निमित्त आहोत.ज्यांच्या मुळे ही मदत पोहचली ते खरे देवदूत आपल्या समोर बसले आहेत.त्यामध्ये विशेष उल्लेख करायचा झाला तर श्री स्वामी नारायण ट्रस्ट कल्याणचे अध्यक्ष डॉ.श्री.दिनेश भाई ठक्कर, संपादक श्री किशोर पाटील, डॉ.श्री.सोन्या पाटील,समाजसेवक श्री.रामचंद्र देसले.श्री.श्रीधर पाटील, डॉ.किशोर आमोदकर, (परीवर्धे,),डॉ. तुषार सनंसे
यांचा नामोल्लेख करावा लागेल.आम्ही 
कलापथकाच्या माध्यमातून पथनाट्य सादर करून विद्यार्थी व तरुणांमध्ये जनजागृती करीत आहोत विशेष म्हणजे वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या तरुण वर्गाला व नागरिकांना याबाबतची सविस्तर माहिती आम्ही पथनाट्याद्वारे तसेच गावागावात जाऊन शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून देत असतो. असे यावेळी आर.एस.पी कमांडर डॉक्टर मणिलाल शिंपी यांनी सांगितले.
 कोरोना काळात महाराष्ट्रातील शाळा व महाविद्यालये गेल्या दीड वर्षांपासून बंद आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण हे ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे मात्र याला अपवाद म्हणजे गरीब गरजू आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण झाले नाही. हातावर काम करून पोट भरणाऱ्या माझ्या आदिवासी बांधवांची मुले शिक्षणापासून वंचित राहिली यामुळे शिक्षण हे शाळेतच दिले जावे जेणेकरून विद्यार्थी हा आपली प्रगती आपल्या स्वताच्या जबाबदारी ने करू शकेल. याठिकाणी प्रास्ताविक करताना विद्यालयाच्या विश्वस्तांनी सांगितले की आमचे विद्यालय हे विनाअनुदानित तत्त्वावर सुरू आहे, तरीदेखील आमचे सर्व शिक्षक आमच्या विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे शिक्षण देत आहेत. तसेच आमच्या विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धेत राज्यस्तरापर्यंत शाळेचे नाव लौकिक केले आहे. त्यामुळे मी सर्व शिक्षक वर्गाचे अभिनंदन करतो धन्यवाद मानतो तसेच या विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धा घेऊन त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात संधी मिळावी जेणेकरून या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची संधी मिळेल असे यावेळी संपादक  किशोर पाटील यांनी सांगितले.
मला या ठिकाणी डॉक्टर मणिलाल शिल्पी सरांनी बोलावल्यामुळे आली आहे. यांच्या मार्गदर्शना खाली मला अजून सामाजिक कार्य करण्याची संधी मिळेल मला गेल्या २० वर्षात सामाजिक कार्यामुळे ४८ पुरस्कार मिळाले आहेत.मला जिथे संधी मिळेल तिथे पोहचण्याचा प्रयत्न करते.आज मला या ठिकाणी आमंत्रित केल्यामुळे माझ्यासोबत मी रक्षाबंधन च्या पूर्वसंध्येला राख्या  घेऊन आली आहे व आज आदिवासी लहान  विद्यार्थ्यांना  मला राखी बांधण्याची संधी मिळाली त्यामुळे मी आपणा सर्वांचे खूप खूप आभारी आहे येथील उपस्थित गरीब गरजू महिला विधवा महिला तसेच  विद्यार्थी यांना कोणतीही अडचण किंव्हा गरज भासल्यास मी त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभी राहीन असे यावेळी सामाजिक कार्यकर्त्या जोशीला पगारिया यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला १०० साड्या धर्म सेवक डॉ.श्री.सोन्या काशिनाथ पाटील संस्थापक अध्यक्ष समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात आल्या. तसेच १०० साड्या श्री.गोपाळ मेतकर ( पुणे ), झकारिया एज्युकेशन चे लाकडावाला यांनी दिल्या.तर विद्यार्थ्यासाठी १००० वह्या  डॉ.किशोर आमोदकर, (परीवर्धे,),डॉ. तुषार सनंसे यांनी दिल्या.या सर्व साड्या नवापूर व शहादा, तालुक्यातील परिवर्धे, व पुनर्वसन, आदिवासी गरीब गरजू, महिला,विधवा महिलाना देण्यात आल्या तसेच  विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  योगेश शिंपी यांनी केले.तसेच  सूत्रसंचालन श्री.सिध्दांत खाडे यांनी केले तर  आभार प्रदर्शन श्री.निलेश पाटील यांनी केले.
        हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.सुनील दाभाडे,दिपक पाटील,सागर शर्मा,वामन महाले,राजेंद्र चौरे,श्रीमती.मंदा वसावे, जिजाबाई कापूरे,रेश्मा गावित यांनी विशेष मेहनत घेतली.आर एस पी अधिकारी युनिट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाचे आणि सामाजिक कार्याचे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागातून विशेष अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...