कै. काळु पवार यांच्या कुटूंबाला उदरनिर्वाहासाठी दोन एकर जागा स्वखर्चाने घेऊन देणार.
मा. श्री राजेंद्र गावीत साहेब खासदार पालघर
पालघर ( हिरालाल लोखंडे ) मौजे, आसे तालुका मोखाडा जिल्हा पालघर. येथील आत्महत्याग्रस्त - वेठबिगारी , आदिवासी शेतमजूर कै. काळु दत्तू पवार वय वर्ष ४८ यांच्या कुटुंबीयांची, मा श्री राजेंद्र गावित साहेब खासदार यांनी, दिनांक २४ आॅगस्ट २०२१ रोजी सात्वनपर भेट घेतली. १५ आॅगस्ट देशाचा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम साजरा होत असताना, दुसरी कडे वेठबिगारीच्या पाशात अडकलेल्या, कातकरी शेतमजूर याला, अवघ्या ५००/- रूपयाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करावी लागते. अशी ही घटना, दुर्दैवी असल्याचे गावित साहेबांनी सांगितले. या पिडीत कुटूंबाला गावित साहेब यांनी, २५०००/- रूपये ( अक्षरी पंचवीस हजार रूपये ) रोख रक्कम मदत स्वरूपात देऊन, अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू दिल्या. या कुटूंबाला कायम स्वरूपी रोजगारासाठी स्वखर्चाने दोन एकर जागा घेऊन देण्याचे मा. गावित साहेबांनी यांनी आश्वासन दिले आहे. तसेच या कुटूंबाला घरकुल योजनेची प्रक्रिया लवकरात लवकर पुर्ण करून, तातडीने घरकुल द्यावे. याच्या कुटूंबातील मुलांना आदिवासी आश्रम शाळेत दाखल करून घ्यावे. आदिवासी विभागाकडून मिळणाऱ्या सर्व मदतीच्या तातडीने तरतुदी कराव्या. तसेच आदिवासी योजनांचा यांना लाभ मिळाला पाहिजे. अश्या सुचना तेथे उपस्थित असलेल्या मा. विभागीय अधिकारी ( Prant ) साहेब यांना गावित साहेब यांना दिल्या आहे. या प्रसंगी मोखाडा येथील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
कै. काळु पवार यांनी त्याचा मुलगा कै. दत्तू पवार यांच्या अपघाती निधनानंतर, अंत्यविधी साठी रामदास कोरडे यांच्या कडुन ५००/- रूपये घेतलेले. त्यांची परत फेड म्हणून त्याच्या शेतात काम करीत होता. दिनांक १३ आॅगस्ट २०२१ रोजी काळु पवार याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या बद्दल मोखाडा पोलीस ठाणे, ता. मोखाडा जिल्हा पालघर येथे अपघाती मृत्यू रजि, क्रमांक २९ / २०२१ ने नोंदणी करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस अधिकारी पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस अधिकारी मोखाडा पोलीस ठाणे करीत आहे.
No comments:
Post a Comment