सफाळे - विश्रामपुर - चहाडे बससेवा पूर्ववत सुरू होणार.
श्री हेमंत जाधव साहेब आगर व्यवस्थापक सफाळे
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) दिनांक २३ आॅगस्ट २०२१ रोजी पर्यंत महाराष्ट्र परिवहन आगर सफाळे ता,जि पालघर येथून सफाळे - खडकोली - विश्रामपुर - चहाडे या मार्गावर चालणारी बस सेवा कोवीड १९ च्या प्रभावामुळे व संसर्गजन्य रोगाची तिव्रता रोखण्यासाठी, सदर बससेवा बंद करण्यात आलेली. परंतु आता कोवीड १९ चा प्रभाव कमी होत आला असून, अनेक ठिकाणी उद्योगधंदे - बाजार पेठा - लोकल रेल्वे सेवा सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने सफाळे आगरातून सुटणारी सफाळे - तांदुळवाडी, लालठाणे, विश्रामपुर ,खडकोली ,चहाडे हि बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात यावी या करीता २३ आॅगस्ट रोजी नोकरी, धंदा, शिक्षण, शेती व्यवसाईक करणारे शेतकरी यांना सफाळे बाजारपेठेत, नोकरी धारक, विद्यार्थी, व्यवसाय करणारे, रेल्वेने प्रवास करणारे. यांना जाण्यासाठी सफाळे ते चहाडे या दरम्यान जाण्या येण्यासाठी बस सेवा पूर्ववत व्हावी या साठी समस्त गावकर्यांच्या वतीने श्री रमेश चावरा सरपंच तांदुळवाडी ता,जि पालघर, श्री सदानंद लाबड सरपंच लालठाणे ता,जि पालघर, श्री राकेश पाटील उपसरपंच लालठाणे यांच्या सोबत सौ. हेमांगी पाटील, कु. निकीता खेत्री ,यज्ञेश ठाकुर, जितेंद्र सोगले शरद पाटील, वेदांत पाटील, आकाश ठाकुर, चिंतामण पाटील, कोंडू खेतरे, अशोक ठाकुर आदि. सफाळे आगर व्यवस्थापक यांना देण्यासाठी गेलेले. परंतु आगर
व्यवस्थापक श्री हेमंत जाधव साहेब, श्री सनी जोशी सफाळे एस टी स्टॉड इंनचार्ज यांची काही कारणास्तव भेट होऊ शकली नाही. तरीही श्री हिंदुले लिपिक व एस टी डेपोतील कार्यरत कर्मचारी श्री सुनिल चव्हाण यांनी निवेदन देण्यासाठी आलेल्या मान्यवर यांचे निवेदन स्वीकारून, भ्रमण ध्वनिवरून हेमंत जाधव साहेब यांच्याशी संपर्क साधुन. निवेदनाची माहिती देऊन साहेबांनी सांगितले, त्या प्रमाणे गावकरी व निवेदन देणार्या मान्यवराना, लवकरच सफाळे, तांदुळवाडी, लालठाणे, विश्रामपुर, खडकोली मार्गे चहाडे पर्यत जाणारी व त्याच मार्गाने परत येणार्या बस सेवा लवकरच सुरू करण्यात येतील असे सांगितले. श्री सनी जोशी सफाळे एस टी स्टॅड इंचार्जर यांच्याशी दुरध्वनी वरून संपर्क साधला असताना, त्यांनीहि सफाळे चहाडे बस सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी सकारात्मक होकार दिला आहे. त्यामुळे तांदुळवाडी ते चहाडे मार्गावरून प्रवास करणे प्रवासी यांना आनंद होत आहे
No comments:
Post a Comment