महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक संजयजी भोकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने आज ठाण्यात आरोग्य शिबिर व अनेक स्त्यूत उपक्रमांचे आयोजन!
ठाणे दि.२५(किशोर पाटील)
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक, राज्य संघटक, महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन्मानीत, श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष,श्री.संजय भोकरे ग्रुप अॉफ इनस्टीट्युटचे संस्थापक मा.श्री. संजयजी भोकरे साहेब यांच्या वाढदिवसाचे अौचित्य साधुन प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे, प्रदेश महासचिव विश्वासराव आरोटे, मुंबई विभाग प्रमुख रणधीर कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष राकेश टोळ्ये, प्रदेश प्रसिध्दीप्रमुख नवनाथ जाधव यांच्या मार्गदर्शना खाली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग, ठाणे शहर जिल्हा व आरोग्यम धनसंपदा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य तपासणी व शस्त्रक्रीया शिबीर व तोंडावर येऊन ठेपलेल्या गणेश उस्तव सणा मुळे कोकण विभाग - ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष नितिन मनोहर शिंदे यांच्या संकल्पनेतुन साकरण्यात आलेल्या आरती संग्रह २०२१ पुस्तक सोहळ्याचे प्रकाशन या प्रसंगी ठाण्यातील शासकीय, राजकीय, सामाजिक आणि पत्रकारीता क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत आज गुरुवार दि.२६ अॉगस्ट २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजे पर्यंत गडकरी रंगायतन तालीम गृह येथे संपन्न होणार आहे. सदर ठिकाणी
आरोग्य तपासणी व शस्त्रक्रीया शिंबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरास येताना नागरीकांनी पिवळे - केशरी रेशनकार्ड, आधारकार्ड तसेच जुन्या ट्रीटमेंटचे सर्व रिपोर्ट घेऊन यावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष तसेच ठाणे शहर जिल्हाध्यक्ष श्री नितीन मनोहर शिंदे यांनी दैनिक स्वराज्य तरुण च्या माध्यमातून समस्त ठाणेकरांना केले आहे. सदर आरोग्य शिबीरात इ.सी.जी., रक्तदाब, मधुमेह, नेत्र तपासणी, अल्पदरात चष्मे वाटप करण्यात येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. त्याच प्रमाणे हाडाचे फ्रॅक्चर शस्त्रक्रीया, मणक्याची शस्त्रक्रीया, बायपास सर्जरी, किडनीचे आजार, दमा, एन्जोप्लास्टी, कॅन्सर शस्त्रक्रीया, मुतखड्याचे अॉपरेशन, पुरुषांची ग्रंथी वाढवणे, डोळ्यातील सफेद पडद्याची शस्त्रक्रीया, रेटीना अॉपरेशन, अल्पदरात मोतीबिंदू अॉपरेशन, अनकंट्रोल डायबिटीस ४०० उपचार, मुत्राशयाचा मार्ग संकुचित होणे शस्त्रक्रीया अशा मोफत आणि अल्प दरात शस्त्रक्रीयांचे आयोजन ही या शिबिरात करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment