*जि.प.अध्यक्ष यांनी केली एडवण,चटाळे गावची पाहणी*
पालघर (प्रतिनिधी) दिनांक २९ ऑगस्ट रोजी चटाळे ग्रामपंचायत येथे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत बांधण्यात आलेल्या संत रोहिदास संस्कार केंद्राचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गावातील लोकसहभागातून अनेक उपक्रम राबविण्यात आले त्याची पाहणी केली विशेष म्हणजे गावातील समाजपयोगी नागरिक यांनी एकत्र येऊन लोकसहभागातुन अंदाजे ६० एकर जागेमध्ये जलसंधारण व पर्यावरण संवर्धन प्रकल्पमध्ये २८.८० कोटी लिटर पाणी साठवण क्षमता असल्याने या प्रकल्पामुळे पाण्याची भुजलपातळी वाढली असून नागरिकांना इतर पिण्याचे पाणी तसेच शेती साठी या पाण्याचा उपयोग होत असून गावातील सर्व समाजाच्या नागरिकांनी एकत्र येऊन निर्माण केलेल्या या नाविन्यपूर्ण प्रकल्पाची पाहणी केली. त्यावेळी अशा उपक्रमांचा इतर ग्रामपंचायतीनी आदर्श घेऊन असे प्रकल्प उभरावेत असे मत अध्यक्ष वाढाण यांनी व्यक्त केले. तसेच १९५८ साली स्थापन केलेले 'प्रभात वाचनालय' पालघर जिल्ह्यातील एक मोठं वाचनायल असून असा लोकोपयोगी उपक्रम राबवल्याबद्दल वैदेही वाढाण यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले. यावेळी अचानक अध्यक्षांनी एडवण प्राथमिक आरोग्य केंद्र ला भेट दिली. याप्रसंगी प्रसूती झालेल्या महिलांना देखील अध्यक्ष वाढाण यांनी भेट दिली.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात झाडे झुडुपे वाढल्याने विषारी जनावरांचा वावर वाढून धोका उद्भवू शकतो या हेतूने परिसरात ग्रामपंचायतीमार्फत साफसफाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया ची शिबिरे आयोजित कराव्यात रुग्णसेवा वाढिवर भर देण्यात यावा अशा सूचना देखील यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण यांनी केल्या.
सदर पाहणीच्या वेळी जिल्हापरिषद सदस्य सरिता सुतार, पंचायत समिती सदस्य रेखा तरे, माजी उपसभापती पंचायत समिती पालघर मेघन पाटील, सरपंच रवींद्र पाटील, नचिकेत पाटील , आदी ग्रामस्थ उपस्थित होते .
No comments:
Post a Comment