बहुजन विकास आघाडीत, इतर पक्षीतील सक्रिय कार्यकर्ते यांचे इनकमिंग !
मा. श्री राजेश पाटील आमदार यांच्या उपस्थित शेकडो कार्यकर्ते याचा प्रवेश.
बोईसर ( हिरालाल लोखंडे ) - दिनांक २३ आॅगस्ट २०२१ रोजी बोईसर ता,जि. पालघर येथील धनानी नगर, ड्रिम हाउस, साईलोक नगर, गणेश नगर, अवध नगर या भागातील सुमारे २०० शे च्या वर इतर पक्षीय महिला, तरूण, तरणी यांनी मा. श्री राजेश पाटील आमदार बोईसर विधानसभा, यांच्या मनमिळावूपणा व कार्यकरण्याची तसेच सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन, त्यांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी ते करीत असलेले प्रयत्न पाहता, त्यांच्या कार्यावर प्रेरित होऊन, बहुजन विकास आघाडी मधे राजी खुशीने शेकडो लोक प्रवेश करीत आहेत
बहुजन विकास आघाडीचे मा. श्री हितेंद्र ठाकुर आमदार ( आप्पा ) यांनी स्वकर्तृत्वावर व निवडणुकीत जनतेला दिलेल्या वचनास लक्षात ठेवत. वसई विरार विभागाचा काया पलट करून आपले नेतृत्व सिध्द करीत, लोकांनी ठेवलेल्या विश्वास याची परत फेड, फुल नव्हे फुलाची पाकळी म्हणून, राजकारण कमी समाज सेवेला प्राधान्य देत, आपल्या मतदारसंघात जनते साठी सुधारणा करीत आहे. जनमानसाच्या सानिध्यात राहून जनमानसाच्या सुख सुविधा यांचा विचार करीत आपले कार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे असंख्य तरुण - तरणी - लहान थोर जनसामान्य जनता त्यांची चाहती होत आहे.
मा. आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थित श्री विश्वनाथ पाटील - बहुजन विकास आघाडी उपाध्यक्ष. श्री प्रभाकर पाटिल बहुजन विकास आघाडी पालघर तालुका अध्यक्ष यांच्या सहकार्याने तसेच भावना विचारे पालघर पंचायत समिती सदस्य, अनिल रावते पंचायत समिती सदस्य, श्री अविनाश चुरु जेष्ठ नेते, विनोद भावर पंचायत समिती सदस्य, श्री अमजल आली ( मिंटू भाई ) बहुजन विकास आघाडी अल्पसंख्याक अध्यक्ष, धनश्री रेवंडकर महिला युवा अध्यक्ष, रूपेश पाटील युवा कार्यकर्ते, प्रताप पाटील, भूषण पाटील, संजय बारी, शुभम चौबे, राहुल शर्मा, गणेश काळे, सुधीर माने पदाधिकारी, तसेच आजी माजी ग्रामपंचायत पदाधिकारी, कार्यकर्ते कार्यक्रमात उपस्थित होते.
No comments:
Post a Comment