*बहुजन विकास आघाडीत, इतर पक्षीतील सक्रिय कार्यकर्ते यांचे इनकमिंग !*
*आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश*.
बोईसर (प्रतिनिधी)दिनांक २७ आॅगस्ट २०२१ रोजी बोईसर ता,जि. पालघर येथील सरावली,आझाद नगर या भागातील सुमारे १०० च्या वर इतर पक्षीय महिला, तरूण, यांनी *आमदार राजेश पाटील* यांच्या मनमिळावूपणा व कार्यकरण्याची तसेच सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन, त्यांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी ते करीत असलेले प्रयत्न पाहता, त्यांच्या कार्यावर प्रेरित होऊन, बहुजन विकास आघाडी मध्ये राजी खुशीने शेकडो लोक प्रवेश करीत आहेत
*बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा लोकनेते,आमदार हितेंद्रजी ठाकुर* ( आप्पा ) यांनी वसई विरार विभागाचा काया पलट करून आपले नेतृत्व सिध्द करीत, लोकांनी ठेवलेल्या विश्वास याची परत फेड, फुल नव्हे फुलाची पाकळी म्हणून, राजकारण कमी समाज सेवेला प्राधान्य देत, आपल्या मतदारसंघात जनते साठी सुधारणा करीत आहे. जनमानसाच्या सानिध्यात राहून जनमानसाच्या सुख सुविधा यांचा विचार करीत आपले कार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे असंख्य तरुण - तरणी - लहान थोर जनसामान्य जनता त्यांची चाहती होत आहे.
*आमदार राजेश पाटील* यांच्या उपस्थितीत *बहुजन विकास आघाडी उपाध्यक्ष. विश्वनाथ घरत* यांच्या सहकार्याने आज बोईसर येथे महिला व तरुणांचा बहुजन विकास आघाडीचे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पालघर तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील, पंचायत समिती सदस्य विनोद भावर, वसई कृषी उत्पन्न बाजार समिती चे सदानंद पाटील, उसगाव चे सरपंच प्रभाकर भोईर,नंदू जाधव,केशव पाटील,मयुर कुडू, अमजल आली ( मिंटू भाई ) बहुजन विकास आघाडी अल्पसंख्याक अध्यक्ष, अनिल सिंग,अनिल खडारे, संजय बारी, शुभम चौबे, राहुल शर्मा, गणेश काळे, सुधीर माने पदाधिकारी, तसेच आजी माजी ग्रामपंचायत पदाधिकारी, कार्यकर्ते कार्यक्रमात उपस्थित होते.
No comments:
Post a Comment