शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी दि. 13 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2020
पर्यंत मनाई आदेश लागू
पालघर (प्रतिनिधी)दि. 25 :- पालघर जिल्ह्यात कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव आहे. दिनांक 30 नोव्हेंबर 2020 रोजी गुरूनानक जयंती हा सण या कालावधीत साजरे होणार आहेत. तसेच राजकीय पक्ष व संघटना यांचेकडून त्यांचे विविध मागण्यांकरिता मोर्चे, उपोषण, धरणे, आंदोलने व रस्ता रोको करण्याची शक्यता आहे.
पालघर जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक पालघर यांचे कार्यकक्षेत सर्वत्र शांतता व सुव्यवस्था तसेच जनजीवन सुरळीत रहावे म्हणून खालील कृत्यास बंदी करण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी,पालघर डॉ.किरण महाजन, यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून पोलीस अधिक्षक पालघर यांचे कार्यकक्षेतील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक 28 नोव्हेंबर 2020 ते 11 डिसेंबर 2020 या कालीवधीमध्ये खालील बाबींसाठी मनाई आदेश लागु करीत आहे.
1) शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, सोटे, बंदुका, सुरे, लाठ्या अथवा काठ्या अथवा शारिरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे.
2) कोणतीही क्षारक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे.
3) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे.
4) व्यक्तीचे प्रेत किंवा आकृती किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे.
5) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे.
6) ज्यामुळे सभ्यता अगर निती यास धक्का पोहाचेल अशा किंवा सुरशितता धोक्यात येईल अशा प्रकारची भाषणे तत्वे हावभव करणे, सोंग आणणे किंवा चित्रे, चिन्हे, फलक किंवा कोणतीही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किंवा लोकात प्रचार करणे.
सदरचा आदेश प्रेतयात्रांना लागु असणार नाही. तसेच सदरचा आदेश केंद्र व राज्य सरकारच्या नोकरीत असलेल्या व त्यांचे वरीष्ठांचे आदेशानुसार अगर कर्तव्याच्या किंवा अपंगत्त्वामुळे लाठी, काठी बाळगणे आवश्यक आहे अशांना लागु असणार नाही.
************
No comments:
Post a Comment