:. कोरोना बधितांचा आकडा नियंत्रणात ठेवण्यात जिल्हा प्रशासनास. यश आले होते परंतू काही दिवसा पासून कोरोना बधिताच्या आकड्यात थोड्या प्रमणात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्शवभूमीवर जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी पालघर, बोईसर , डहाणू रेल्वे स्थानकाची पाहणी केली.
जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढूनये यासाठी दळण वळनाचे मुख्य साधन रेल्वे असुन या रेल्वे स्थनकामध्ये तसेच रेल्वे मध्ये प्रवासी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमाचे पालन करत आहेत का ? नागरिक मास्क, सॉनिटायझर चा वापर करत आहेत का ? सोशल डीस्टसिंग चे नियम पाळत आहेत का ? या बाबतची पहणी जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी पालघर, बोईसर , डहाणू रेल्वे स्थानकात केली.
पश्चिम रेल्वे येथून सुटणाऱ्या विशेष रेल्वे विशेषता दिल्ली राजस्थान, गुजरात, आाणि गोवा याकडे जाणाऱ्या डहाणू ,बोईसर, पालघर , रेल्वे स्टेशन वर पोहचणाऱ्या रेल्वे प्रवाशांची कोविडची चाचणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी दिले . गोवा , गुजरात ,राजस्थान दिल्ली येथून येणाऱ्या ट्रेनमधून प्रवांशाच्या तपासणीचीही व्यवस्था बघण्यात आली .
.जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संबधित रेल्वे स्टेशन वर नियूक्त केलेल्या केंद्राची पाहणी करुन सबधितांना सुचना दिल्या . बाहेरुन आलेल्या व्यकतीची कोव्हिड चाचणी करण्यात यावी अशा सुचना यावेळी त्यांनी दिल्या . या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.किरण महाजन, प्रातं अधिकारी, गटविकास अधिकारी, रेल्वे स्टेशन अधिक्षक, रेल्वे स्टेशन मधील कर्मचारी , सुरक्षा कर्मचारी बोईसर ग्रामपंचातीचे पदाधिकारी उपस्थित होते . यावेळी नागरिकांच्या अडचणी जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यानी जाणून घेतल्या.
********************
No comments:
Post a Comment