*पालघर रेल्वे स्थानकातील राष्ट्रध्वज गायब,आमदार श्रीनिवास वनगा यांनी व्यक्त केली नाराजी*
पालघर(प्रतिनिधी)
पालघर जिल्हा मुख्यालय व पश्चिम रेल्वे चे महत्वाचे रेल्वे स्टेशन म्हणून पालघर स्थानक सर्वश्रुत आहे. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या व लोकल वाहतूक तसेच जिल्ह्याचे मुख्यालय म्हणून हजारो रेल्वे प्रवासी ये जा करतात.दरम्यान भारतीय रेल्वेतर्फे प्रमुख स्थानकांवर १०० फुटांचे राष्ट्रध्वज लावण्यात आले होते.
पालघर रेल्वे स्थानक हे जिल्ह्यामुख्यालयाचे स्थानक असून येथे सुद्धा राष्ट्रध्वज लावण्यात आला होता.
आॅगस्ट महिन्यांपासून हा राष्ट्र ध्वज तांत्रिक अडचणी सांगुन काढून ठेवण्यात आला होता,राष्ट्रध्वज लावला जावा म्हणून अनेक रेल्वे प्रवाशी संगठना,सामाजिक कार्यकर्ते व पालघरच्या नागरिकांनी वेळोवेळी याबाबत रेल्वे प्रशासनास निवेदने दिली,मात्र नेहमी स्थानिक रेल्वे प्रशासन थातूर मातूर उत्तरे देऊन प्रवासी संघटनेस सहयोग देत नव्हती, आणि प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तरे देऊन बोळवण करीत होते,प्रवाशी संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांनी पालघरचे शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांची भेट घेऊन याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली,
दरम्यान आज २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन असून ही राष्ट्रीय ध्वज लावला गेला नाही याची दखल घेत आमदार श्रीनिवास वनगा यांनी पालघर रेल्वे स्थानकास भेट दिली, व रेल्वे अधिकारी ना याबाबत विचारणा केली,
भारतीय संविधान दिन असून ही रेल्वे कडून राष्ट्रीय ध्वज लावला जात नाही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली,
दरम्यान सोमवार दिनांक रोजी आम्ही राष्ट्रीय ध्वज लावू असे अधिकारी यांनी सांगितले,
यावेळी जर पुन्हा अशी हयगय केल्यास शिवसेना स्टाईल ने आंदोलन करु अशी आमदार वनगा यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितले,
यावेळी शिवसेना शहरप्रमुख भूषण संखे,महिला शहर संघटक व नगरसेविका अनुजा तरे, युवासेनेचे शहर प्रमुख निमेश पाटील, रेल्वे स्थानक समितीचे सदस्य ललित जैन, हिमांशू वर्तक,प्रदीप पाटील,विराग म्हात्रे,निलेश राऊत व रेल्वे स्टेशन सुप्रीडेंटेड जाधव आदी उपस्थित होते,
No comments:
Post a Comment