Saturday, July 31, 2021

बोईसर-पालघर पत्रकार संघा तर्फे वृक्षारोपण व विद्यार्थियांना पाठ्य सामग्री वितरण कार्यक्रम संपन्न.

बोईसर-पालघर पत्रकार संघा तर्फे वृक्षारोपण व विद्यार्थियांना पाठ्य सामग्री वितरण कार्यक्रम संपन्न

पालघर(प्रतिनिधि):- पालघर जिळ्यात सामाजिक कार्य करण्यास अग्रसर प्रसिद्ध पत्रकार संगठन "बोईसर-पालघर पत्रकार संघ"(रजि.) तर्फे शुक्रवार 30 जुलै रोजी जिल्हा परिषद शाळा,चिंचणी- नंबर 3 येथे वृक्षारोपण व विद्यार्थियांना पाठ्य सामग्री वितरणाचे कार्यक्रम  आयोजित करण्यात आले। 
   बोईसर पालघर-पत्रकार संघ मागील अनेक वर्षा पासून निरंतर सामाजिक कार्य करत आहे।संघाच्या वतीने केल्या जाणाऱ्या  अश्या प्रकार चे सामाजिक कार्यांना पूढे नेत 30 जुलै रोजी जिला परिषद शाला,चिंचणी, न.3,ता.डहाणू  येथे वृक्षारोपण करण्यात आले तसेच सर्व  विद्यार्थियांना  शालेय साहित्य वाटप केले। कार्यक्रमाची शुरुआत मान्यवरांद्वारे वृक्षारोपण करून करण्यात आले। त्यानंतर  विद्या ची देवी सरस्वती च्या छायाचित्राला माल्यार्पण केले व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन कर कार्यक्रमाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले। विद्यालयाच्या व्यवस्थाना तर्फे कार्यक्रमात उपस्थित मान्यवराना  पुष्पगुच्छ तसेच मास्क देऊन स्वागत करण्यात आले।  त्यानंतर कोरोना वायरस च्या संक्रमणामुले अनेक कोरोना योद्दा व नागरिकाचं झालेल्या दुःखद निधन तसेच महाराष्ट्रात देशाच्या अनेक ठिकाणी झालेल्या  पावसामुळे  आपलेजीव गमावलेल्या लोकांना दोन  मिनिट मौन ठेऊन भावपूर्ण श्रद्धांजलि देण्यात आली। संघाचे सरचिटणीस मोहन म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित भाषण केले व सचिव निलेश नगरकर यांनी पत्रकार संघा  द्वारे केल्या जाणाऱ्या सामाजिक कार्यऱ्यांची विस्तृत माहिती दिली । सदर कार्यक्रमाची अध्यक्षता राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार पाप्त एम.के. जूनियर कॉलेज, चिंचणी चे प्राध्यापक संजय घरत यांनी केली। बोईसर-पालघर पत्रकार संघातर्फे आयोजित ह्या सामाजिक कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांमध्ये पंचायत समिति सदस्य सुनील धोड़ी,  जिल्हा परिषद शाला, चिंचणी  चे केंद्र प्रमुख संदीप म्हात्रे, शाला व्यवस्थापन समितिच्या अध्यक्षा नेहा पागधरे, उपाध्यक्ष नीलेश मंत्री, ग्राम पंचायत सदस्य नितिन धोडी,प्रशांत आक्रे, विद्यालय ची मुख्याध्यापिका अंजना सावे, कोकुयो केम्लिन लिमिटेड (एच.आर. विभाग) च्या अधिकारी माधुरी वर्तक, एम.के.जूनियर कॉलेज,चिंचणी चे प्राध्यापक संजय घरत, बोईसर-पालघर पत्रकार संघाचे अध्यक्ष रामप्रकाश निराला इत्यादीनी  आपले यथोचित विचार व्यक्त केले।
 सदर कार्यक्रमात  पालघर जिल्हा महिला कांग्रेस ची सरचिटणीस जयंती महतो, वेस्टीज मार्केटिंग कंपनी ची डायरेक्टर संगीता शाह, प्रीमियर इंटरमीडिएट प्रा. लि.,तारापुर ची (एच.आर.) सुषमा चौधरी, सामाजिक कार्यकर्ता शेरबानो शेख, सुनीता सकपाल, प्रमोद दवणे, बलवंत राऊत, जीवलाल पंडित, बोईसर-पालघर पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष जयप्रकाश पाटिल, उपाध्यक्ष भूपनारायण शुक्ला, सचिव ओमप्रकाश द्विवेदी, सह सचिव दीपक निराला व अजीत सिंह सहित अनेक मान्यवर संपादक व पत्रकार उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्र संचालन पदवीधर शिक्षिका अश्विनी चुरी व अम्रिता सावे यांनी केले।  विद्यालयच्या मुख्याध्यापिका अंजना सावे यांनी विद्यार्थयांना ऑनलाइन शिक्षणांवर मार्गदर्शन केले । शाळेच्या शिक्षिका मोनाली सावे यांनी उपस्थिततांचे आभार व्यक्त मानले ।ह्या वेळी विद्यालयात वृक्षारोपण तसेच पाठ्य सामग्री वितरण केल्या यामुळे पालकवर्ग पत्रकार संघाची प्रशंसा करत असताना दिसले।

माणुसकीची कास धरू पूरग्रस्त बांधवांना जमेल तितकी मदत करू -मनसेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष -समीर सुभाष मोरे

माणुसकीची कास धरू पूरग्रस्त बांधवांना जमेल तितकी मदत करू -मनसेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष -समीर सुभाष मोरे
पालघर (प्रतिनिधी)कोकण परिसरातील भीषण महापुराने हजारो कुटुंबे उद्‌वस्त झाली आहेत. वीज नाही, पाणी नाही, खायला अन्नही नाही आणि वरुन पडणारा पाऊस कोकण वासियांच्या धैर्याचा, जिद्दीचा आणि संयमशीलतेचा कसोटी पाहत आहे की काय अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शक्य ती मदत करा असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मा. राजसाहेब ठाकरे यांनी केले होते. 

त्यामुळे जे पुरातून सुरक्षितपणे बाहेर आले आहेत, त्यांना जीवनावश्यक वस्तुंची गरज भासत आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून पालघर जिल्हा उपाध्यक्ष समीर मोरे आणि मनसे कार्यकर्ते खेड, चिपळूण पूरग्रस्त भागात दाखल झाले.
यानंतर पक्षाचे पालघर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात पूरग्रस्त बांधवांना गहू, तांदूळ, डाळी, तेल, बिस्कीट, ब्लॅंकेट्स, फिनेल, पिण्याचे पाणी बॉटल, कोलगेट, बॅटरी, मेणबत्ती, मॅचिस, लहान मुलांचे कपडे, घरगुती वापरात येणाऱ्या वस्तू अशा जीवनावश्यक वस्तूंचे पालघर विधानसभेतर्फे वाटप करण्यात आले आहे. पूरग्रस्त भागात तीन दिवस मदत कार्य करून, समीर मोरे आणि त्यांच्या मनसे कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकीचे उत्तम आणि जिवंत उदाहरण घालून दिले आहे. त्यामुळे समीर मोरे आणि त्यांच्या मनसे कार्यकर्त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. 
आम्ही पुन्हा दोन दिवसांनी पूरग्रस्त भागात जाणार आहोत. कारण महाराष्ट्रावरचं हे मोठं संकट आहे. त्याला तोंड देताना शक्य तितकी मदत करा आणि मदतीसाठी आपल्याकडून कुठलीही कुचराई होणार नाही याची काळजी घ्या असे आवाहन समीर मोरे यांच्याकडून करण्यात आले आहे.

Friday, July 30, 2021

उपाध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती यांनी घेतलेली आरोग्यविषयक आढावा बैठक संपन्न.


*उपाध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती यांनी घेतला आरोग्यविषयक आढावा*

पालघर (प्रतिनिधी)नवनिर्वाचित जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती ज्ञानेश्वर सांबरे  यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच आरोग्य समिती सभा आज दि.३०/७/२०२१ रोजी जिल्हा परिषद संकुल सभागृह येथे संपन्न झाली.
 या सभेमध्ये आरोग्य समिती सभापतींनी कोरोना च्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यात प्रशाशनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना,कोरोना लसीकरण,गर्भवती महिलांचे  लसीकरण, प्रत्येक तालुक्यातील कोरोना ची सद्यस्थिती ,दाखल रुग्ण, एकूण मृत्यू, बरे झालेले रुग्ण याबाबत देखील सविस्तर आढावा घेतला.
   यावेळी सांबरे यांनी जिल्ह्यातील प्रत्येक आदिवासी भागातील जनतेला लस मिळाली पाहिजे त्यादृष्टीने प्रशासनाला मार्गदर्शक सूचना दिल्या.
   तालुका  वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तालुक्यातील आरोग्य विषयक परिस्थिती या सभेद्वारे  ज्ञानेश्वर सांबरे यांनी जाणून घेतली.
यावेळी सर्व आरोग्य समिती सदस्य , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दयानंद सूर्यवंशी,  आणि इतर सर्व अधिकारी उपस्थित होते.

मा.ना. रामदासजी आठवले साहेब, सामाजिक न्याय राज्यमंत्री (भारत सरकार) यांच्या आदेशानुसार, रिपाई (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना मदतीचा हात

मा.ना.रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार पालघर जिल्हा रिपाई (आ)तर्फे अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्याना मद्दतीचा साठी खारीचा वाटा.


पालघर (प्रतिनिधी): मा.ना. रामदासजी आठवले साहेब, सामाजिक न्याय राज्यमंत्री (भारत सरकार) यांच्या आदेशानुसार, व मा.श्री. सुरेशदादा बरशिंगे, निरीक्षक पालघर ठाणा यांच्या सूचनेनुसार आज दिनांक ३० जुलै२०२१  रोजी रिपाई (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे बहुतेक जिल्ह्यात अनेक लोकांची शेती , घरे-दारे , फळबागा उध्वस्त झाल्या तसेच अतिवृष्टीमुळे दरडी कोसळुन  व पुरामुळे बरीच लोकं व हजारो जनावरे मृत्युमुखी पडली आहेत बहुतेक जिल्ह्यात अशी भयावह परिस्थिती उद्भवली असताना अत्यावश्यक  साधन सामग्री ( सर्व प्रकारची औषधे, मोजे, बिस्किटे, पीठ-मीठ, चादरी ब्लँकेट, ह्यांडवॉश , कपडे )  रिपाई (आ)च्या वतीने एक मदतीचा हात म्हणुन रायगड जिल्ह्यातील महाड व पोलादपुर या ठिकाणी महावीर कुरिअर व इतर कुरिअर मार्फत पाठविण्यात आले या प्रकारचे निवेदन मा. मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य,मुंबई यांना मा. जिल्हाधिकारी पालघर यांना निवेदन देण्यात आले. साधन सामग्रीची अंदाजे रक्कम १,२५,०००/- ( अक्षरी - एक लाख पंचवीस हजार रुपये मात्र ) ची आहे तसेच अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी यांचे फार मोठे नुकसान झाले आहे अश्या लोकांना तलाठी मार्फत सर्वे करून त्यांची नुकसान भरपाई लवकरात - लवकर देण्यात यावी या मागणीचे सुध्दा निवेदन मा. जिल्हाधिकारी साहेब पालघर यांना देण्यात आले तसेच भविष्यात महाराष्ट्रात कुठेही अश्या प्रकारची परिस्थिती उद्भवली तर रिपाई (आ) पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आयु. सुरेश जाधव व त्यांची संपूर्ण टीम प्रत्येक वेळी मदतीचा हात देऊन खारीचा वाटा उचलेल या समयी मा.सुरेश जाधव (जिल्हाध्यक्ष पालघर), सौ.रोहिणी गायकवाड (महिला अध्यक्षा पा जि) ,  कुंदन मोरे (उपा. पा जि.) , शुभांगी राठोड (समाजसेविका) , सोमनाथ धनगवकर (सचिव) ,  पुष्कराज फुलारा (जिल्हा संघटक) ,  शरद जाधव  (युवा अध्यक्ष पा ता) , राम ठाकूर (शहर संघटक पालघर) ,  मीडिया प्रभारी मंगलसिंग ठाकूर , महावीर कुरिअरचे लक्ष्मण सहनी मा दुर्गा होजियारी चे मालक राजेंद्र जयस्वाल , समिधा   दुमाडा , देवेंद्र तलवार संकेत वरठा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

लाॅकडाउन मुळे अनेक तरुण बेरोजगार युवा सेनेने दिला बेरोजगारांना रोजगार संधी जागेवरच नियुक्ती पत्र.

लाॅकडाउन मुळे अनेक तरुण बेरोजगार  युवा सेनेने दिला बेरोजगारांना रोजगार संधी जागेवरच नियुक्ती पत्र. 


पालघर ( हिरालाल लोखंडे ) करोना सारख्या संसर्गजन्य रोगामुळे, सरकारला लाॅकडाऊन नावाचे अस्र वापरून, नोकरदार वर्ग, व्यापारी, - कामकरी सर्वसामान्य माणसांनाही घरातच स्थानबंध्द केल्यानंतर सर्विचींच आर्थिक परिस्थिती बिकट झालेली असताना, करोना नियमांचे होत असलेले पालन. या अनुशंगाने अनेक ठिकाणी, लाॅकडाऊनचे नियम शिथील करण्यात येत आहेत. परंतु गमावलेल्या नोकऱ्या नोकरदार यांना परत मिळतील याची कोणताही शाश्वती नाही. त्या अनुशंगाने पालघर युवासेनेने १८ ते ३० वयोगटातील मुलांना, दिनांक ३०जुलै २०२१ रोजी दर्यासारंग मच्छिमार सोसायटी हाॅल पालघर येथे, २०० युवकांन साठी फिल्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह  पोस्ट साठी भरती कार्यक्रम आयोजित करून संपन्न केला. 
     डॉक्टर सौ. उज्ज्वला काळे - पालघर नगराध्यक्ष यांनी युवा शिवसैनिकांच्या कार्यक्रमाला भेट देऊन ,कार्यक्रम आयोजकांचे कौतुक केले. तसेच पालघर मध्ये अनेक औद्योगिक शेत्र /आस्थापने आहेत. अशा ठिकाणीहि युवकांना 
नोकरीची संधी उपल्ब्ध आहे. त्या ठिकाणी मीही आपल्या सोबत प्रयत्न करेल कसे सांगितले. श्री केदार काळे - शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक यांनी मार्गदर्शन पर भाषण करताना सांगितले, शिवसेनेने स्थापनेपासून आज पर्यंत लाखो युवकांना नोकर्‍या मिळवून दिल्या आहेत. युवकांनी फक्त राजकारण न करता चांगले सामाजिक उपक्रम केल्याबद्दल युवा सेनेला धन्यवाद दिले. 
  या मेगा भरती कार्यक्रमात श्री परीक्षित पाटील युवासेना महाराष्ट्र  राज्य सचिव. श्री सिद्धेश घरत लोकसभा समन्वयक, जस्विन घरत जिल्हा युवा अधिकारी पालघर विधानसभा, राकेश पाटील जिल्हा युवा अधिकारी बोईसर विधानसभा, साई सागर पाटील जिल्हा समन्वयक, दीपक मोरे तालुका युवा अधिकारी, राॅकी तांडेल तालुका सचिव,  हेमंत धर्मा मेहेर, सुमित पिंपळे उपजिल्हा युवा अधिकारी, अमय पाटील बोईसर विधानसभा युवा अधिकारी, कृतार्थ पाटील पालघर विधानसभा युवा अधिकारी,  अंकित पाटील उपविधानसभा युवा अधिकारी, निमीश पाटील 
युवा शहर अधिकारी, प्रख्यात शेट्टी शहर चिटणीस, आदित्य संखे शहर  समन्वयक,सतिश शिंदे शहर सहसमन्वयक, प्रतीक पाटील शहर सरचिटणीस, नंदकुमार पिल्ले उपविधान सभा युवा अधिकारी, आदि उपस्थित होते. नोकरी साठी असंख्य उमेदवारांची उपस्थित होती.

Thursday, July 29, 2021

समाजकल्याण समिती सभापती पदी रामू पागी यांची बिनविरोध निवड



*समाजकल्याण समिती सभापती पदी रामू पागी यांची बिनविरोध निवड*

 पालघर (प्रतिनिधी)पालघर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समिती सभापतीची निवडणूक प्रक्रिया  आज दि.२९/०७/२०२१ रोजी  जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन,पालघर  येथे पार पडली असून रामू भादल पागी यांची समाजकल्याण समिती सभापती पदी  बिनविरोध निवड झाली.
 सदर निवडणुकीसाठी  रामू पागी यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. त्यामुळे 
रामु पागी यांची बिनविरोध पदी निवड झाल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप कळंबे यांनी घोषित केले.
यावेळी  जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे सर्व समिती सभापती,सर्व जिल्हा परिषद सदस्य, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा)उपस्थित होते.

Wednesday, July 28, 2021

सुनंदा चॅरिटेबल अँड एज्युकेशन ट्रस्ट तर्फे पूरग्रस्तांना मदतीचा हात.

सुनंदा चॅरिटेबल अँड एज्युकेशन ट्रस्ट तर्फे पूरग्रस्तांना मदतीचा हात.....
पालघर (प्रतिनिधी)२७ जुलै रोजी *न त्वह' कामये राज्य' न स्वर्ग न पुनर्भवम |
कामये  दुःखतप्ताना'  प्राणीनामार्तीनाशनम ||* 
हे ब्रीद घेऊन सुनंदा चॅरिटेबल अँड एज्युकेशन ट्रस्ट एक माणुसकीची भिंत पुरस्कृत अनुसया राजाराम सागवेकर वाचनालय आणि  कै.अनंत दाजी वझे  वाचनालय यांचा रायगड जिल्ह्यातील तळीये गावातील पूरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यासाठी सुनंदा चॅरिटेबल अँड एज्युकेशन ट्रस्ट ची एक टीम रायगड च्या दिशेने रवाना झाली. या कामासाठी ट्रस्टचे अध्यक्ष श्री दिनेश गुडेकर सर, श्री जगदीश किणी सर, श्री. योगराज वझे,  यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच श्री दिलीप तरे उपसरपंच माकणे, समाजसेवक कामनिष राऊत, इंद्रमल जैन, दिनेश गुरद्वान, अनंत पाटील सर, राजन घरत सर, महेंद्र पाटील सर, दत्तात्रेय भोईर, बाबुराव भोईर सर, शैलेश पाटील सर व इतर अनेक दात्यांनी या कामासाठी मदतीचा हात दिला.या सर्वांचे ट्रस्टचे अध्यक्ष गुडेकर सर यांनी आभार मानले. सुनंदा चॅरीटेबल अँड एज्युकेशन ट्रस्टच्या टीमला त्यांच्या कामाचं कौतुक करत सफाळे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पो.निरीक्षक श्री संदीप कहाळे व पीएसआय पंकज पाटील साहेब तसेच अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

पालघर नगरपरिषद द्वारा मोकाट श्वानांनसाठी व्हॅक्सिनेशन व नसबंदी प्रकल्प !

पालघर नगरपरिषद द्वारा मोकाट श्वानांनसाठी व्हॅक्सिनेशन व नसबंदी प्रकल्प  !

       

पालघर ( हिरालाल लोखंडे ) पालघर शहरात मोकाट श्वानांचे ( कुत्र्यांचे ) प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. अनेकदा हे कुत्रे रात्रीच्या वेळी टोळक्याने एकत्र फिरतात. टाळक्यात ते एका वेळी कमीत कमी दहापेक्षा जास्तच असतात. अश्यावेळी एखादी व्यक्ती दुचाकीवरून जात असेलतर, दुचाकी स्वाराच्या मागे लागत असतात. व दुचाकी धारकाचा अपघात होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तर रस्त्याने लहान मुले किंवा मोठी  माणसे जात असताना, अचानकपणे येऊन चावा घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. 
     दिनांक २८ जुलै २०२१ रोजी पालघर नगरपरिषदेने कुत्र्यांनमुळे घडणार्‍या घटनांचा विचार करीत,  मोकाट कुत्र्यांना पकडून, त्यांचे व्हॅक्सिनेशन व नसबंदी करण्यासाठी प्रकल्प पालघर पुर्वेला सुरू केला आहे. पालघर जिल्ह्यातील हा पहीलाच उपक्रम आहे. 
     या कार्यक्रमाला डॉक्टर सौ. उज्ज्वला केदार काळे - नगराध्यक्षा पालघर, श्री. कैलास म्हात्रे - शिवसेना गट नेते, श्री भावानंद संखे - भारतीय जनता पार्टी गट नेते, श्री अमोल पाटील - आरोग्य सभापती, श्री रविंद्र म्हात्रे - बांधकाम सभापती, श्री सुभाष भानुशाली - नियोजन सभापती, श्री राजेंद्र पाटील - नगरसेवक, श्री दिनेश बाबर - नगरसेवक, श्री चंद्रशेखर वडे नगरसेवक, शेरबानो मेनन नगरसेविका, प्रियंका म्हात्रे नगरसेविका, अक्षय संखे नगरसेवक, सदर हा प्रकल्प राबवणारे डॉक्टर श्री जगदीश पाटील, व प्रकल्पासाठी ज्यांनी स्व:ताची जमीन उपलब्ध करून दिली ते पालघर मधील समाजसेवक / स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर श्री राजेंद्र चव्हाण व श्रीमती वैशाली चव्हाण आदी मान्यवरांच्या उपस्थित उपक्रम सुरू करण्यात आला आहे अशी माहिती श्री केदार काळे -  शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक यांच्या कडुन मिळत आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाकाळातील ५ वा रक्तदान सोहळा संपन्न.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाकाळातील  ५ वा रक्तदान सोहळ संपन्न.


  पालघर (प्रतिनिधी)महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते ,महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब व   शिवसेना पालघर संपर्कप्रमुख रवींद्र फाटक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाकाळातील ५ वा रक्तदान सोहळा घेण्यात आला. या रक्तदान सोहळ्यात सुमारे २६७ रक्तदात्यांनी रक्तदान केले तर वर्षभरात घेण्यात आलेल्या ५ रक्तदान शिबिरात आजतागायत 1149 लोकांनी रक्तदान केले आहे. या रक्तदान सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या शिबिराचे उदघाटन दिव्यांगांनी केले व स्वतः रक्तदान  करून मुख्यमंत्रांना शुभेच्छा दिल्या तर एस टी कर्मचारी, रिक्षा चालक यांसह युवा वर्ग ,महिला यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.
  गेल्या दीड वर्षापासून आपण एक शिवसैनिक म्हणून  सर्वच स्तरातील वर्गाकरिता   वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सहकार्य करण्याचा प्रयत्न करीत असून शिवसेनेच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्याचे काम करीत आहे.
      शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे ,पालघर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार श्रीनिवासजी वनगा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेशजी शहा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेहीताई वाढाणं,शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख केतनकाका पाटील, उपजिल्हाप्रमुख जगदीश धोंडी, माजी आमदार विलास तरे, शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक ज्योतीताई मेहेर, एस टी कामगार सेनेचे प्रमोद मेस्त्री, विभागीय सचिव प्रशांत गावडे, डहाणू तालुकाप्रमुख अशोक भोईर, संजय कांबळे, तालुका संघटक नीलम म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य पौर्णिमा धोडी,माजी सभापती मनीषा पिंपळे,पंचायत समिती सदस्य शैलजा कोल्हेकर, सरावली सरपंच लक्ष्मी चांदणे, आलेवाडी सरपंच अर्चना नाईक,पालघर नागररिषदेचे नगरसेवक चंद्रशेखर वडे, माजी जिल्हा परिषद सदस्य जयवंत गरुडा,सामाजिक कार्यकर्ते विश्वास वळवी,सरावली उपसरपंच अशोक साळुंके,नांदगाव उपसरपंच निलेश पाटील, आलेवाडी उपसरपंच जगदीश ठाकूर,उपतालुकाप्रमुख वैभव भोईर, कुंभवली ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष विजय पिंपळे, दीपक संखे, संतोष संखे, ग्रामपंचायत सदस्य काशीनाथ संखे,हेमंत संखे सरावली ग्रामपंचायतीचे सदस्य सुरेश सहानी, विजय राऊत ,  नितीन पागधरे,  रिक्षा युनियन चे अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष सुरेंद्र संखे यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती देऊन रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या.
   यापुढेही माझ्या सामाजिक व राजकीय वाटचालीत आपले प्रेम व शुभेच्छा कायम राहतील ही अपेक्षा बाळगतो व माझ्यासोबत प्रत्येक कार्यात ,प्रसंगात सक्रिय सहभाग घेऊन योगदान देण्याऱ्या सर्व सहकारी व महिला सहकाऱयांचेही आभार कुंदन संखे यांनी मानले.

Tuesday, July 27, 2021

जातपडताळणी प्रमाणपत्राची पडताळणीच्या ऑनलाइन वेबिनारमध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा

*जातपडताळणी प्रमाणपत्राची पडताळणीच्या ऑनलाइन वेबिनारमध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा*

पालघर (प्रतिनिधी)दि. २७ :- जात प्रमाणपत्रांची पडताळणी करून जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करणेची प्रक्रिये सदर्भात राज्य सामाईक प्रवेश परिक्षा कक्षामार्फत व्यवसायीक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहिर झाल्याने सन २०२१-२२ या शैक्षणीक वर्षात जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रक्रियेमध्ये अर्जदारांनी ऑनलाईन अर्जामध्ये परिपूर्ण माहिती भरणे, आवश्यक दस्तऐवज स्कॅन करून अपलोड करणे व तद्नंतर अर्ज ऑनलाईन सबमिट करणे आवश्यक आहे. सदर पूर्तता केल्यावर अर्जाची प्रिंट काढून विहित मार्गाने पुर्वीप्रमाणेच सक्षम प्रधिकाऱ्यांमार्फत या समितीस अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.
महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बाटी), पुणे यांचे निर्देशानुसार सदर प्रक्रियेची सर्वसामान्य नागरीक व अर्जदार यांना माहिती व्हावी या दृष्टीकोनातून दि.३०/०७/२०२१ रोजी दुपारी ०४:०० वाजता वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर वेबिनारची लिंक पुढीलप्रमाणे आहे.
*विषय :- जात प्रमाणपत्राची पडताळणी*
*वेळ :- दिनांक: ३०/०७/२०२१ वेळ दुपारी ०४:०० वाजता*
*Zoom Meeting*
*Meeting ID- ६२३७७१५६५१*
*Password १२३४५६७८९*

सदर वेबिनारमध्ये सहभाग घेण्यास इच्छुक असलेल्या सर्व नागरिकांनी Zoom Application डाऊनलोड करुन त्याद्वारे सदर वेबिनारमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे किशोर बडगुजर, सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पालघर यांनी कळविले आहे.

Monday, July 26, 2021

पुरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे - कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील

पुरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे
    - कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील

नवी मुंबई,(प्रतिनिधी) दि.26 : रत्नागिरी आणि रायगड जिल्हयातील पुरग्रस्तांना/आपतग्रस्तांना सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती, खाजगी मोठया आस्थापना यांनी जीवनावश्यक वस्तूंसाठी मदत करावी असे आवाहन कोकण विभागाचे महसूल आयुक्त श्री.व्ही.बी.पाटील यांनी केले आहे. 
आज सायंकाळी कोकण भवन येथे आपतग्रस्तांसाठी पोहोचविण्यात येणाऱ्या वस्तू व सेवा-सुविधांबद्दल सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. 
रत्नागिरी आणि रायगड जिल्हयात मोठया प्रमाणावर पुर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्हयात समन्वय अधिकारी नेमण्यात येत आहे. त्यांच्या माध्यमांतून आपतग्रस्तांपर्यंत नियोजनबध्द पद्धतीने मदत पोहोचविली जाईल. या आढावा बैठकीस उपायुक्त (महसूल) मकरंद देशमुख, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, उपायुक्त (करमणूक कर)  सोनाली मुळे,  उपायुक्त (पुरवठा) विवेक गायकवाड,  उपायुक्त (पुनर्वसन) पंकज देवरे, उपसंचालक (माहिती) डॉ.गणेश मुळे आदि उपस्थित होते.

पालघर पूर्व - औद्योगिक वसाहतीत, विद्युत पुरवठा प्रश्न सुटणार ! केदार काळे - शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक

पालघर पूर्व - औद्योगिक वसाहतीत, विद्युत पुरवठा प्रश्न सुटणार !
  केदार काळे - शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक 
पालघर ( हिरालाल लोखंडे ) पालघर हे जिल्हाचे ठिकाण असून पालघर पूर्व विभात औद्योगिक वसाहतीत.  अनेक महिन्यापासून करोना व लाॅक डाउन मुळे उद्योगधंदे धारकांचे आर्थिक नुकसान होत आहे. आता परिस्थिती सुधारणा होत असली तरी पालघर पूर्व भागात अनेक महिन्या पासून अनियमित पणे विद्युत पुरवठा होत आहे. कधी कमी तर कधी जास्त दाबाने विद्युत पुरवठा होत असल्यामुळे उत्पादनावर त्याचा परिणाम होऊन, उत्पादन क्षमता असूनहि, उत्पादक माल तयार करू शकत नाही. अतिरिक्त साधन सामग्री वापरल्याने ( जनरेटर ) उत्पादन खर्चात वाढ होते. मिळत असलेल्या  ऑर्डर  पूर्ण करता येत नाही. परदेशात एक्सपोर्ट होणार्‍या उत्पादनावर त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. 
पालघर पूर्व विभागातील जे. पी. उद्योग नगर, शक्ती उद्योग नगर, दिवाण अॅन्ड सन वेऊर, आॅर्बिट इंडस्ट्रीयल इस्टेट या औद्योगिक वसाहती मध्ये साधारणपणे अंदाजे १२५ लहान मोठे कारखाने आहेत. त्यामध्ये अंदाजे ३५०० कामगार काम करीत असतात. अनियमित वीजपुरवठा यामुळे, उद्योगधंदे धारकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. या संदर्भात दिनांक २५जुलै २०२१ रोजी श्री केदार काळे - शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक यांनी श्रीमती किरण नागावकर मॅडम महावितरणच्या पालघर अधिक्षक  अभियंता. यांच्या सोबत एक बैठक आयोजित करून, त्या वेळी बैठकीत उद्योगजकांनी आपल्या, विद्युत पुरवठा बद्दल समस्या सांगितल्या असताना, मॅडम यांनी कोणत्या फिडरवर कोणती इंडस्ट्री आहे. हे समजून घेऊन, त्या त्या फिडरवर कार्यरत असणारे ज्युनिअर इंजिनीअर यांना बोलवून, इंजिनियर यांना प्रत्यक्ष त्या फिडरवर जाऊन, काय काय समस्या आहेत जाणून घेणायाचे सांगितले. तसेच उद्योगजकांना त्यावेळी तेथे स्वतः हजर राहण्यासाठी सांगितले. 
   महावितरणच्या असणार्‍या समस्यांसाठी उद्योगजकांनी एक व्हाॅट्अप गृप बनवून, त्या भागातील ज्युनिअर इंजिनीअर यांना गृप मधे समाविष्ट करणे. त्यामुळे आपला प्रोब्लेम गृपवर टाकला असताना सोडविण्यासाठी मदत होईल. तसेच उद्योजकांना पालघर कंट्रोल  रूमचा मोबाईल नंबर देऊन, उद्योजक यांनी त्यावर आपला ग्राहक नंबर टाकून आपली तक्रार द्यावी. उद्योगजकांनी आपला ग्राहक नंबर, कारखान्याचे ( कंपनी ) नाव व मोबाईल नंबर यांची लिस्ट बनवून ती सबंधित अधिकारी / कर्मचारी वर्गास द्यावी असे सांगितले. कारखाने धारकांच्या  समस्या साधारण पणे १५ आॅगस्ट २०२१ पर्यत सोडविण्याचा संकेत मिळत आहे. या बैठकीत श्री शैलेश ठाकुर, श्री शांतीलाल जैन, विपुल राणे, मुनाफ बंदुकवाला, रामसेवक महंतो, संजय भाई, दिनेश बॅटरी, पंकज ठाकुर, जतिन गांधी, रामकुमार सिंग, जिन्गेश मोदी तसेच इतर कारखाने धारक / प्रतिनिधी हजर होते. बैठकीत झालेल्या चर्चेमुळे, कारखाने धारकांचे समाधान झाले असून, स्थानिक कामगारांना काम मिळेल. देशाला विदेशी चलन / जी एस टी  मिळेल.तसेच विद्युत पुरवठा बाबत होणार्‍या अडचणी लवकर निवारण न झाल्यास, एखादी अशिच बैठक पुन्हा आयोजित करण्यात येईल असे श्री केदार काळे यांचे सांगणे आहे.

Sunday, July 25, 2021

मा. मुख्यमंत्री,श्री उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्ताने टेंभिखोडावे येथे वृक्ष रोपण कार्यक्रम संपन्न

मा. मुख्यमंत्री,श्री उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्ताने टेंभिखोडावे येथे वृक्ष रोपण कार्यक्रम संपन्न 

सफाळे ( हिरालाल लोखंडे ) महाराष्ट्राचे लाडके - लोकप्रिय मुख्यमंत्री, शिवसेना पक्ष प्रमुख श्री उध्दव ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक २५ जुलै २०२१ रोजी टेंभिखोडावे ता,जि पालघर येथे शिवसेना सफाळे पश्चिम विभागा व्दारा मान्यवर श्री वसंत चव्हाण साहेब, शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या उपस्थित व मान्यवरांच्या हस्ते टेंभिखोडावे जेटी ते टेंभिखोडावे पर्यंत रस्ताच्या बाजूस वृक्ष रोपण करण्यात आले. 
      ग्रामपंचायत जलसार सभागृहात मान्यवर सौ. वैदेही वाढाण पालघर जिल्हा परिषद अध्यक्षा, सौ. भारती कामडी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा, सौ. ज्योती मेहर जिल्हा संघटक, निलिमा म्हात्रे तालुका संघटक  सौ. सरिता सुतार जिल्हा परिषद सदस्य, श्री तुकाराम सुमडा पंचायत समिती सदस्य, रेखा तरे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यांच्या उपस्थित ग्रामस्थ, कार्यकर्ते यांनी आपल्या विभागातील प्रमुख अडचणी, समस्या यावर संवाद साधला असताना, विभागातील पिण्याच्या पाण्याची समस्या, पावसामुळे पडणारे पाणी वाहुन जाण्यासाठी नियोजित योजना. सांडपाणी जाण्यासाठी नियोजनबद्ध गटारे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक सिटी बोर्डचा अनियमित पणे होणारा विज पुरवठा व येणारी भरमसाठ बिले, तसेच ढोकोंबा येथे पाणलोट क्षेत्रात धरण बांधल्याने शेतकरी आणी पिण्याच्या पाण्याची होणारी सोय, यावर नवनिर्वाचित अध्यक्षा वैदेही वाढाण व आलेले पदाधिकारी यांच्याशी विचार विनिमय करण्यात आला असताना, अध्यक्षा यांनी सांगितले, पुढील चर्चेसाठी पालघरला एकत्र येऊन , या विषया सबंधित कार्यालयातील सक्षम अधिकारी यांना बोलवून आपल्या अडचणी सांगुन, योग्य त्या सूचना देऊन त्या सोडविण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. 
   कार्यक्रमाला सुभाष म्हात्रे माजी पंचायत समिती गट नेते, श्री रघुनाथ र पाटील जेष्ठ शिवसेना कार्यकर्ते सरावली कांद्रेभुरे, उपतालुका प्रमुख नागेश वर्तक, विभाग प्रमुख नचिकेत पाटील, तालुका युवा समन्वयक संदिप किणी, उपविधान सभा  पदाधिकारी बिपिन बारी, गणेश भोईर सरपंच जलसार , जगदीश पाटील सरपंच कांद्रेभुरे, विभाग संघटक अजित गावड, उपविभाग प्रमुख प्रकाश गावड, तसेच अनेक आजी माजी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, गावकरी उपस्थित होते. अशी माहिती नचिकेत पाटील यांच्या कडून मिळत आहे.

राज्यावरील आलेल्या पुराचे संकट व कोरोना च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत



राज्यावरील आलेल्या  पुराचे संकट व कोरोना च्या  पार्श्वभूमीवर 
मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत

मुंबई (प्रतिनिधी)दि २५: कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 
       २७ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असला तरी या आपत्तींमुळे तो साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
वाढदिवसानिमित्त कुणीही अभीष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये तसेच फलक, पोस्टर्स लावू नये, सोशल मिडीया व ईमेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
राज्यात अद्याप कोरोनाचे संकट कायम आहे,संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे, त्यामुळे आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळत राहणे गरजेचे आहे, त्यामुळे वाढदिवसाचे कुठलेही जाहीर कार्यक्रम करू नयेत अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
पूर आणि कोरोना परिस्थितीत एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे, त्यामुळे वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपले योगदान देऊन सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पार पडावे असेही मुख्यमंत्री म्हणतात.

महागाव कुकडे येथून चारोटी येथे जाणाऱ्या रोडवर खड्डे की खड्यात रस्ता असा प्रकार झाला आहे. हा प्रश्र्न कधी सुटेल ह्याकडे आत्ता लक्ष लागले आहे.

 महागाव कुकडे येथून चारोटी येथे जाणाऱ्या रोडवर खड्डे की खड्यात रस्ता असा प्रकार झाला आहे.

पालघर (प्रतिनिधी)पालघर जिल्ह्यातील बोईसर मधील महागाव ग्रामपंचायतीच्या कुकडे गावच्या एकमेव मुख्य रस्त्यावर सद्या चालणे ही कठीण झाले आहे.हाच रस्ता बोईसरच्या कुकडे गावातुन डहाणू, चारोटी आणि कासा गाँव ते मुंबई अहमदाबाद महामार्गाला   जोडला जातो . या रस्त्यावर जास्त करून अवजड वाहने ही  (ओव्हरलोड )20 ते 30 टन च्या ट्रक खड़ी, दगड, मुरुम, माती  घेवून नेहमी जात असल्याने हा  रस्ता जास्त खराब झाला आहे. असा की रस्त्यात खड्डे की खाद्यात रस्ता शोयाचा हा प्रश्न निर्माण झाला आहे.आता तरी  प्रशासनाने ह्या रस्ता दुरुस्ती करण्याचे काम केले पाहिजे . हा रास्ता 2014-15 वर्षी झाला होता। त्या नंतर अद्याप या वर दुरुस्ती करण्यात आली नाही.ह्या रस्त्यावर  अनेक  वेळा अपघातही घडत असतात  .परंतु अवजड वाहनांन कडे  (ओवरलोड )  तलाठी, पोलिस किंवा  महसूल विभाग याकडे लक्ष देत नाही . यामुळे ग्रामस्थांमध्ये ज्वलंत रोष आहे. तरी हा रस्ता लवकरात लवकर व्हावा याकडे आत्ता लक्षलागले आहे.

मा. खासदार राजेंद्र गावीत साहेब यांनी सामाजिक बांधीलकी जपत वाढदिवस केला साजरा !

मा. खासदार राजेंद्र गावीत साहेब 
  यांनी सामाजिक बांधीलकी जपत वाढदिवस केला साजरा !

पालघर ( हिरालाल लोखंडे ) दिनांक २४ जुलै २०२१ रोजी मा. खासदार श्री राजेंद्र गावीत साहेब पालघर यांनी राज्यातील  करोनाचा वाढता प्रभाव व कोकणातील पूर परिस्थिती पहाता आपला वाढदिवस साजरा न करण्याची विनंती आपल्या चाहत्यांना करून सुध्दा, चाहत्यांनी सार्वजनिक ठिकाणी, साहेबाच्या हस्ते वृक्ष रोपण कार्यक्रम, केला असताना साहेबांनी सृष्टीचे संतुलन निट राहावे म्हणून,प्रत्येकाने एक तरी वृक्ष लावावा. झाडे मोठ्या प्रमाणात नैसर्गिकरीत्या आॅक्सिजन हवेत देत असतात. 
     पालघर येथील वृध्दाश्रमात जाऊन, आश्रमात असलेल्या वृध्दासोबत केक कापून, वाढदिवस साजरा करताना, वृध्दाश्रमातील वृद्धांनी गावीत साहेबांना आरती ओवाळून, गाणी गाउन मोठ्या उत्साहाने साहेबांचा वाढदिवस साजरा केला असताना, साहेबांना त्यांच्या आईची आवर्जून आठवण झाली. ते म्हणाले माझी आई असती तर तिनेही मला असाच आशिर्वाद दिली असता. पण आपणही सर्व मला ज्येष्ठ आहात आई समान आहात, आपला आशीर्वाद मला लाभला हे माझे भाग्य. 
    सामाजिक बांधीलकी म्हणून कमारे येथिल ५० पेक्षा अधिक विधवा, आदिवासी महिला भगिनींना एक महीना पुरेल एवढे अन्नधान्य वाटप केले. कार्यक्रमात त्यांच्या सोबत रोहित गावीत, तसेच श्री  केदार काळे - शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक , इतर मान्यवर यांच्या उपस्थित. डामडौल न करता सामाजिक बांधीलकी जपत, कार्यकर्ते व आपल्या चाहत्यांच्या आग्रहा खातर आपला वाढदिवस सर्वसामान्य सोबत साजरा करून, मी खासदार असलो तरी, मी आपल्यातलाच एक आहे.

Saturday, July 24, 2021

जव्हार येथील पतंगशहा कुटीर रुग्णालय येथे सर्व रोग निदान शिबीर संपन्न

दि.२४/७/२०२१
जि.प.पालघर

*पतंगशहा कुटीर रुग्णालय येथे सर्व रोग निदान शिबीर सम्पन्न

जव्हार  (प्रतिनिधी)आरोग्य विभागामार्फत जव्हार मधील पतंग शहा कुटीर रूग्णालय येथे बालकांसाठी सर्व रोग निदान शिबिर आज दि.२४ जुलै २०२१ रोजी  विभागामार्फत करण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, प्रकल्प संचालक माणिक दिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये एकूण १८७ मुलांची तपासणी करण्यात आली. त्यातून ४२ सॅम(अतितीव्र कुपोषित) तर व ९६ मॅम (तीव्र कुपोषित) मुले व उर्वरित सामान्य मुलांची  तपासण्यात आली . त्यातून दोन मुलांना न्यूमोनिया ची लक्षणे आढळून आल्यास त्यांना रुग्णालयात दाखल केले. सॅम व मॅम  मुलांची बाल रोग तज्ञांकडून तपासणी करण्यात आली. यावेळी प्रकल्प अधिकारी जव्हार आयुषी सिंग, महिला व बाल विकास अधिकारी प्रवीण भावसार,  वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते.

सेवा सोसायटी संस्थेने प्रस्ताव सादर करावे

*सेवा सोसायटी संस्थेने प्रस्ताव सादर करावे* 


पालघर(प्रतिनिधी) दि. 23 :- जिल्हा कौशल्य, विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पालघर जिल्हा या कार्यालयाच्या मार्फत पालघर जिल्हयातील शासकिय कार्यालयामध्ये बहुउद्देशिय काम करण्याकरीता सेवा सोसायटी यांनी प्रस्ताव सादर करावेत  असे आवाहन.जिल्हा कौशल्य, विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र  सहाय्यक संचालक मुकेश संखे  यांनी केले.
      कार्यालयात यापूर्वी व नविन नोंदणीकृत असलेल्या पात्र व इच्छुक सर्व सेवा सोसायट्यांनी संस्थेच्या अहवालासह आपले प्रस्ताव या कार्यालयास सादर करण्याचे आवाहन मुकेश संखे यांनी केले आहे. 
सदरचा प्रस्ताव देताना शासन निर्णय क्र. इएसई-2003/प्र.क्रं. 191/रोस्वरो-1 दि. 01/02/2006 च्या मार्गदर्शनानुसार अटी व शर्तीची पुर्तता करणाऱ्‍या व चालू वित्तीय वर्षातील लेखा परिक्षण केलेल्या सेवा सोसायटीं यांनी प्रस्ताव सादर करावेत. अपूर्ण किंवा अटींची पुर्तता न करणाऱ्या सेवा सोसायट्यांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. सदर काम देणाऱ्या आस्थापनांची व त्यांच्या कामाची माहिती त्यांच्या सेवा व शर्तीसह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पालघर या कार्यालयाच्या सुचना फलकावर लावण्यात येईल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. राज साहेबांनी कोकणात आलेल्या संकटासाठी सर्व मनसेच्या पदाधिकारी यांनी कोकणात लवकरात लवकर मद्दत पोहचवा असे आव्हान केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. राज साहेबांनी कोकणात  आलेल्या संकटा साठी सर्व  मनसेच्या पदाधिकारी यांनी कोकणात लवकरात लवकर मद्दत पोहचवा असे आव्हान केले.
  पालघर (प्रतिनिधी)  जुलै महिन्यात झालेल्या ७२ तासाच्या अतिवृष्टीने  तसेच पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने कोकणात शेतपिकांचे ,जीवित हानी व बेघरहोण्याची परिस्थिती ह्या सर्वांवर आली आहे.ह्या सर्वांना खाण्याचे पिण्याचे देखील खूप हाल होत आहेत .हीच बाब लक्षात घेऊन  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सर्व महाराष्ट्र सैनिकांना कोकणात जय अस्मानी संकट उभा ठाकला आहे त्या सर्वांच्या मदतीसाठी आव्हान केले होते त्या अनुषंगाने पालघर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे खेड येथे पोचले असून पालघर जिल्ह्याच्या वतीने पाण्याचे बॉक्स शनि टायझर मास बिस्किट व इतर उपयोगी वस्तू घेऊन एक गाडी खेड येथे आज रवाना करण्यात आली याप्रसंगी उपजिल्हाध्यक्ष भावेश चुरी समीर मोरे कामगार सेनेचे अनंत दळवी, शिवाजी निंबाळकर विद्यार्थी सेनेचे लोकसभा अध्यक्ष  धीरज गावड, उपतालुक अध्यक्ष चेतन संखे  , जालीम तडवी , विपुल पटेल , विशाल संखे हीमयूर पाटील,नवल मोरे,अमित गावड,साहिल मोरे, व इतर मंडळी उपस्थित होती

Friday, July 23, 2021

सफाळे शिवसंपर्क मोहिम संपन्न दिव्यांग, फळ - भाजी विक्रेते, मच्छी विक्रेत्या महिला, रिक्षाचालक यांना मदतीचा हात.

सफाळे शिवसंपर्क मोहिम संपन्न
 दिव्यांग, फळ - भाजी विक्रेते, मच्छी विक्रेत्या महिला, रिक्षाचालक यांना मदतीचा हात. 
      सफाळे ( हिरालाल लोखंडे ) शिवसेना पक्षप्रमुख , महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, मा. श्री उध्दवजी ठाकरे साहेब यांनी दिलेल्या आदेशानुसार पालघर जिल्ह्यात शिवसंपर्क मोहीम या कार्यक्रमा अंतर्गत अनेक नव्हे तर असंख्य तरूण वर्ग, महिला ,छोटे मोठे व्यवसाय करणारे होतकरू वर्ग, याना योग्य मार्गदर्शन करीत असल्याने शिवसेनेचे शिवसैनिक होण्यासाठी स्वखुशीने शिव संपर्क मेळाव्यात एकत्र येऊन शिवसैनिक होण्याचा अभिमान बाळगत आहे 
पालघर तालुक्यातील सफाळे येथे दिनांक २३ जुलै २०२१ रोजी शिवसेना बोईसर विधानसभा समन्वयक श्री अनुप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्षाचालका यांना कोरोना बचावासाठी सेफ्टी गार्डचे वितरण करीत, सफाळे बाजारात उपजीविके करीता रस्त्यालगत बसुन भाजी विक्रि करणार्‍या महिला, तसेच मच्छि विक्री करणार्‍या महिला यांना ऊन- पाऊस पासून संरक्षणासाठी छत्री वाटप तर वंदे मातरम या संस्थेच्या शेकडो दिव्यांग बंधू आणी भगिनी यांनाही न विसरता दिव्यांगाना त्यांच्या मागणी अनुसार छत्री व वह्या मान्यवर शिवसेना नेते श्री डॉक्टर विश्वास वळवी, शिवसेना नेते श्री कुंदन संखे, श्री संदिप कहाळे सहा. पोलीस निरीक्षक सफाळे पोलीस ठाणे, संतोष घरत  सफाळे विभाग प्रमुख, अजित गावड, हरिश्चंद्र गावड, अरूण पाटील,विकास पाटील, नरेश पाटील आदि सह अनेक आजी माजी शिवसैनिक पदाधिकारी  उपस्थित होते. श्री अनुप पाटील यांनी त्याच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाच्या निमीत्ताने गुरुपौर्णिमाच्या दिवशी दिव्यांग बांधवांना फुल नव्हे फुलाची पाकळी म्हणून १५,००० /- रूपये   सर्वासमोर मदत जाहीर केली

राज्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



*राज्यात अतिवृष्टीमुळे दरडी* *कोसळून झालेल्या दुर्घटनांतील*
*मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत*
*– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*

*जखमींवर शासकीय खर्चाने उपचार*

मुंबई, (प्रतिनिधी)दि. २३ : -  राज्यातील अतिवृष्टीमुळे दऱड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशा शोकसंवेदानाही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी प्रकट केल्या आहेत. 

रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे ( दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू झाले. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल.

Thursday, July 22, 2021

पालघर मधील सावरे - एंबुर गावातील तीन जण वाहून गेले !

पालघर मधील सावरे - एंबुर गावातील तीन जण वाहून गेले !
 
    
   
पालघर (प्रतिनिधी)- पालघर तालुक्यातील मनोर-दुर्वेस जवळील सावरे - एंबुर गावातील दोन तरुण व एक महिला रस्त्यावरील पुरातून मार्ग काढत पायी घराकडे परतत असताना वाहून जाण्याची घटना घडली. यावेळी या दोन बचावले तर परंतु महिला वाहत जाऊन मरण पावली.
    गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली जाऊन नागरी वस्तीमध्येहि पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले.  या अतिवृष्टी पावसामुळे मनोर - दुर्वेस जवळील ऐंबूर येथील वैतरणा नदीला मोठया प्रमाणात पूर आला होता. त्यातच या परिसरातील ओढे-नाले हि तुडुंब भरून वाहत होते. 
     यावेळी सावरे- ऐंबूर (पाटील पाडा) येथील निलेश दुतकर (वय  22), योगेश पाटील (वय 19 ) व दर्शना दुतकर ( वय 50 ) हे रात्री नवच्या सुमारास रस्त्यावरील पुरातून मार्ग काढत आपल्या घराकडे परतत असताना कडव पाड्याजवळ पुराच्या पाण्यात मोठा लाकूड आडवा आल्याने हे तिघेही वाहून गेले. यावेळी सोबत  असलेल्यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. 
      यामध्ये निलेश दुतकर हा दुरवर वाहत जाऊन पोहून निघाला व योगेश पाटील याला ग्रामस्थांनी  सुखरुप बाहेर काढले. परंतू रात्रीची वेळ व अपुऱ्या व्यवस्था अभावी सदर महिला या पुरामधे बुडून मरण पावली. या बचावलेल्या दोन युवकांची प्रकृती स्थिर असली तरीही त्यांनाही मोठ्या प्रमाणात जखमा व दुखापत झाली आहे. अशी माहिती येथील युवा कार्यकर्ते विश्वास दुतकर व गावातील महिला पोलीस पाटील निलम पाटील यांनी दिली.

मक्यावरील नवीन लष्करी आळी (फॉल अर्मीवर्म) व्यवस्थापन

*मक्यावरील नवीन लष्करी आळी (फॉल अर्मीवर्म) व्यवस्थापन*


ठाणे दि.22 (प्रतिनिधी) :- मागील काही वर्षांमध्ये राज्यात मका तसेच काही प्रमाणात ज्वारी, ऊस व कापूस पिकावर नवीन लष्करी अळीचा (फॉल अर्मीवर्म) प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळून आलेला आहे. तसेच चालू हंगामात पेरणी झालेल्या मका पिकावर देखील अल्प प्रमाणात काही ठिकाणी प्रादुर्भाव आढळून येत आहे. फॉल आर्मीवर्म ही कीड बहुभक्षी प्रकारची असून १०० च्या वर वनस्पतींवर उपजिविका करते. या किडीचा प्रसार होण्याचा वेग खूप जास्त असून पतंग अंडी देण्याअगोदर ५०० किमीपर्यंत जाऊ शकतात. एका रात्रीत पतंग १०० कि.मी. प्रवास करु शकतो. वाऱ्याचा वेग अनुकुल असल्यास ३० तासात १६०० किमीपर्यंत गेल्याची नोंद आहे. या किडीचे वर्षभर जीवनचक्र चालू असते व तिच्या जीवनक्रमात सुप्तावस्था नाही. कीड ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे अळीच्या डोक्याच्या पुढच्या बाजूस उलट Y आकाराची खूण असते व शरीराच्या शेवटून दुसर्‍या सेग्मेंट वर चोंकोणी आकारात चार ठिपके दिसून येतात व त्या ठिपक्यावर केसही आढळून येतात. ही कीड झुंडीने आक्रमण करत असल्यामुळे काही दिवसातच पीक फस्त करत करते. त्यामुळे या कीडीचा प्रदुर्भाव दिसून येताच वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. या पार्श्वभुमीवर  मक्यावरील नवीन लष्करी अळी (फॉल अर्मीवर्म) या किडीचा  प्रादुर्भाव आढळून आल्यास शेतकरी बंधुंनी खालील उपाय योजना करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.
बीज प्रक्रिया केलेल्या बियाण्याचा वापर करावा. पिकाची फेरपालट फेरपालट करावी. वारंवार एकाच शेतात मका पीक घेण्याचे टाळावे. मका पिकाभोवती नेपियर गवत या सापळा पिकाची लागवड करावी तसेच, मका पिकात कडधान्य वर्गीय आंतरपिकांची लागवड करावी. किडीच्या नैसर्गिक शत्रूंना आकर्षित करण्यासाठी तसेच त्यांच्या संगोपनासाठी बांधावर झेंडू, कारळा, तीळ, सूर्यफूल, कोथंबीर, बडीशेप इत्यादींची लागवड करावी. पक्षांद्वारे फॉल अर्मीवर्म किडीचे नैसर्गिकरीत्या नियंत्रणाचे दृष्टीने पक्षांना आकर्षित करण्यासाठी प्रति एकरी 10 पक्षी थांबे उभारावेत. पीक पेरणीनंतर लगेच प्रति एकरी 4 कामगंध सापळे उभारुन त्यात अडकलेल्या पतंगांची नियमित पाहणी/सर्वेक्षण करावे. किडीसाठी पर्यायी यजमान पिकांची उपलब्धता होऊ नये म्हणून शेत स्वच्छ आणि तणमुक्त ठेवावे. किडीचे अंडीपुंज व नवजात समुहातील अळ्या वेचव्यात व चिरडून टाकाव्यात. रेती किंवा माती + चुनकळी यांचे 9:1 या प्रमाणातील मिश्रण पिकाच्या पोंग्यात सोडावे. कामगंध सापळ्यात प्रति दिन प्रति सापळा एक पतंग सापडल्यास अथवा सापळा किंवा मुख्य पिकावर किडीचा 5 % प्रादुर्भाव दिसून येताच 5 % निंबोळी अर्क किंवा अझाडीरॅक्टीन 1500 पीपीएम (1लिटर /एकर) 5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून पहिली फवारणी करावी. किडीचे मोठ्या प्रमाणात पतंग पकडण्यासाठी प्रति एकरी 15 कामगंध सापळे लावावेत (यशस्वीतेकरीता सार्वजनिकरीत्या सर्वांनी कामगंध सापळे लावावेत) अंड्यातील परोपजीवी कीटक उदा. टेलेनोमस रिमस 4 हजार अंडी प्रति एकर अथवा ट्रायकोग्रामा प्रिटीओसम 50 हजार अंडी प्रति एकर प्रमाणे एक आठवड्याच्या अंतराने दोन वेळा प्रसारण करावे. (मोठ्या प्रमाणात पतंग पकडण्यासाठी कामगंध सापळे लावल्यास परोपजी किटकांचे प्रसारण करु नये) किडीचा प्रादुर्भाव 5 ते 10 % पर्यंत असल्यास पुढीलपैकी कोणत्याही एका जैविक किटकनाशकाचे द्रावण पिकाच्या पोंग्यात सोडावे. बॅसिलस थुरिनजिनसीस व्ही. कुर्सटकी (400 ग्रॅम प्रति एकर) 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा 1X108  सीएफयू/ग्रॅम इतके बिजाणुचे प्रमाण असलेले मेटाऱ्हायझियम ॲनिसोप्लि अथवा बिव्हेरिया बासीयाना (1 किलो/एकर) 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा एसएफएनपीव्ही (66 मिली/एकर) 3 मिली प्रति लिटर पाणी किंवा कीडरोगजनक सुत्रकृमी (ईपीएन) (4 किलो/एकर) 20ग्रॅम प्रति लिटर पाणी. किडीचा प्रादुर्भाव                 10 %पेक्षा जास्त असल्यास पुढीलपैकी कोणत्याही एका रासायनिक किटकनाशकाचे द्रावण पिकाच्या पोंग्यात सोडावे. क्लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 % एस.सी. (80 मिली/ एकर) 0.4 मिली प्रति लिटर पाणी किंवा थायामेथॉक्झाम 12.6% + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5% झेड.सी. (50 मिली/ एकर) 0.25 मिली प्रति लिटर पाणी किंवा स्पिनेटोरम 11.7% एस.सी. (100 मिली/ एकर) 0.5 मिली प्रति लिटर पाणी किंवा इमामेक्टीन बेंझोएट 5 % एस.जी. (80 ग्रॅम/एकर) 0.4 ग्रॅम प्रति लिटर पाणी.
(चारापिक म्हणून घेण्यात येणाऱ्या मका पिकावर रासायनिक किटकनाशकाची फवारणी शक्यतो टाळावी. जर रासायनिक किटकनाशकाची फवारणी केली तर शेवटचा वापर व चारा पीक काढणी या दरम्यान किमान ३० दिवसांचे अंतर असल्याची खात्री करावी व त्यादृष्टीने किटकनाशकाचा वापर करताना काळजी घ्यावी.) अशे  विकास पाटील, कृषि संचालक, (विस्तार व प्रशिक्षण) कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी कळविले आहे.

हुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन

*हुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन*

ठाणे दि.22 (प्रतिनिधी) :- ऊस हे महाराष्ट्रातील कापूस पिकाच्या खालोखाल प्रमुख नगदी पीक आहे. राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था बहुतांशी ऊस उद्योगावर अवलंबून असून ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल आहे. प्रतिकुल हवामान, कमी पाऊसमान यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. हुमणी ही किड ऊसाची पांढरी मुळे खात असल्याने ऊस उत्पादनात मोठया प्रमाणात घट येण्याची शक्यता असते. 
हुमणी किडीच्या प्रामुख्याने दोन महत्वाच्या प्रजाती महाराष्ट्रामध्ये आढळून येतात. यापैकी होलोस्ट्रॅकिया सिराटा या जातींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने महाराष्टाच्या नांदेड, बुलढाणा, अहमदनगर, धुळे, सांगली, कोल्हापूर इत्यादी जिल्हयात दिसून येतो आणि ल्युकोफोलीस लेपिडोफोरा या प्रजातीचा तीव्र प्रादुर्भाव महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्हयाच्या पश्चीम भागात दिसून येतो. ही कीड ऊसाबरोबरच इतर पिकांनाही नुकसान करत असल्याने हया किडीचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे. 
हुमणीचा नुकसानीचा प्रकार :- हुमणीच्या प्रथम अवस्थेतील अळया सुरुवातीच्या काळात कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर उपजिविका करतात व त्यानंतर ऊसाची तंतुमय मुळे खातात, तर प्रौढ भुंगा बाभूळ, कडुनिंब, बोर इत्यादी झाडावर उपजीविका करतात. या अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने एका रेषेत असतो. या अळयांनी झाडांची मुळे कुरतडल्यामुळे प्रादुर्भावग्रस्त झाडे सहजरीत्या उपटली जातात. तसेच जोराचे वादळ आल्यास ही झाडे कोलमडून पडतात. हुमणीमुळे ऊसाच्या उगवणीत 40 टक्के नुकसान होऊ शकते.
आर्थिक नुकसानीची पातळी :- हुमणीची एक अळी प्रति चौरस मीटर क्षेत्रावर आढळल्यास तसेच झाडांवर सरासरी 20 किंवा त्यापेक्षा जास्त भुंगेरे  आढळल्यास किड व्यवस्थापनाचे उपाय योजावेत.
हुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन :- खोडव्यामध्ये पाचट न जाळता ते सरीमध्येच कुजविण्यासाठी शेतकऱ्यांना उद्युक्त करावे. पाचटामुळे हुमणीचा प्रादुर्भाव होत नाही याकरीता प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात यावे. पावसाच्या पहिल्या सरी बरोबरच भुंगेरे जमिनीतून बाहेर येण्यास सुरुवात होते. संध्याकाळी भुंगेरे झाडावर दिसून येतात हा काळ त्यांच्या मिलनाचा असतो या काळातच बाभूळ, बोर व कडुनिंबाची झाडे हलवल्यास झाडाच्या पानावरील भुंगेरे जमिनीवर पडतात, हे पडलेले भुंगेरे गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकल्याने अर्ध्या तासात ते मरतात. भुंगेरे मेल्याने एक पिढी नष्ट होते त्यामुळे त्यांचा जीवनक्रम खंडित होऊन पुढील नुकसान टळते. हा उपाय शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या करावा. त्यामुळे अंडी घालण्यापूर्वीच भुंगेऱ्यांचा नायनाट होईल. अति प्रादुर्भावग्रस्त शेतात हुमणीस कमी बळी पडणारे म्हणजे हळद व केळी, पपई व द्विदल वर्गीयमध्ये हरभरा, उडीद, मूग, चवळी, ढैंचा आणि ताग ही पिके घेऊन पिकांची फेरपालट करावी. आंतरमशागतीच्या वेळेस अळ्या गोळा करुन लोखंडी हुकच्या सहाय्याने किंवा खुरप्याने माराव्यात. भुंगे गोळा करण्यासाठी प्रकाश सापळ्यांचा एक हेक्टर क्षेत्रात एक प्रकाश सापळा या प्रमाणे वापर करावा. या सापळ्यातील भुंगे गोळा करून नष्ट करावेत. पिकास पाणी देताना ते जास्त काळ साचून राहील याकडे लक्ष द्यावे जेणेकरून, साचलेल्या पाण्यामध्ये आळ्या गुदमरून मारतील. हुमणीग्रस्त शेतातील सुकलेली पिकांची रोपे उपटावीत व मुळा शेजारील अळ्यांचा रॉकेल मिश्रित पाण्यात नाश करावा.
जैविक उपाय :- हुमणी किड अनेक पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे, त्यामुळे शेतात पक्षी थांबे लावावेत. हुमणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तिच्या नैसर्गिक शत्रूंचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. बगळा, चिमणी, कावळा, घार इ.पक्षी व मांजर, कुत्रा, रानडुक्कर, मुंगूस, उंदीर इ. प्राणी हुमणीच्या अळ्या आवडीने खातात. जिवाणू (बॅसीलस पॉपीली) व सुत्रकृमी (हेटरोऱ्हॅब्डेटीस) हे होलोट्रोकिया हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत. हुमणच्या अळीला रोगग्रस्त करणाऱ्या सुत्रकृमी चा वापर करावा. यासाठी 50 मिलि. ई.पी.एन. कल्चर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारावे किंवा 2.5 लिटर कल्चर प्रति हेक्टर याप्रमाणे ठिबक/ प्रवाही सिंचनातून द्यावे. दोन किलो बिव्हेरिया बॅसियाना व मेटारायझियम ॲनीसोप्ली ही परोपजीवी जैवीक बुरशी २० किलो/हेक्टरी या प्रमाणात चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून पीक लागवडी अगोदर जमिनीत मिसळावी म्हणजे प्रथम अवस्थेतील अळ्यांचा बुरशीमुळे नाश होईल. अथवा शेणखतातून पिकाच्या बुंध्यापाशी टाकावे व पिकास हलके पाणी द्यावे.  एरंडी वासाकडे हुमणीचे भुंगेरे आकषिर्त होतात, एरंडी अमिश सापळ्यांच्या वापराने हुमणीचे भुंगेरे त्याकडे आकषिर्त होऊन त्यातील पाण्यात पडून मरतात. असे सापळे कमी खर्चात तयार होतात व प्रौढ भुंगेऱ्यांचे अंडी घालण्यापूवीर्च व्यवस्थापन होते.
रासायनिक उपाय :- जमीन तयार करताना अथवा शेणखतामधून फोरेट (10 टक्के दाणेदार) या औषधाचा 25 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात वापर करावा. हुमणीच्या नियोजन नियंत्रणासाठी पहारीच्या सहाय्याने बुंध्यालगत किंवा दोन बुंध्यांच्यामध्ये छोटासा खड्डा घ्यावा. याकामी ऊस पिकात खत घालण्याची जी पहार आहे तिचा खास वापर करावा. फवारणी पंपाचे नोझल काढून बुंध्यालगत 40 मिली क्लोरोपायरीफॉस 10 लिटर पाण्यात मिसळून या द्रावणाची बुंध्यालगत तयार केलेला खड्ड्यात आळवणी करावी.
ऊस व इतर पिकांतील हुमणी नियंत्रण :- ऊस व इतर पिकांतील हुमणी नियंत्रणाकरीता खालील प्रमाणे रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा. किटकनाशक हे पिकाच्या बुंध्याभोवती जमिनीत मिसळून द्यावे व त्यानंतर पिकास हलके पाणी द्यावे. 
पीक किटकनाशके मात्रा
भुईमूग कार्बोफयुरॉन ३ टक्के दाणेदार ३३ कि. ग्रॅ. / हेक्टर
घेवडा कार्बोफयुरॉन ३ टक्के दाणेदार २३.३ कि. ग्रॅ. / हेक्टर
बाजरी, ज्वारी, ऊस, भुईमूग फोरेट १० टक्के दाणेदार २५ कि. ग्रॅ. / हेक्टर
ऊस फिप्रोनील ०.३ टक्के दाणेदार ३३ किलो हेक्टर
ऊस फिप्रोनील ४० टक्के + इमिडाक्लोप्रीड ४० टक्के डब्ल्यु.जी. प्रती हेक्टर ५०० ग्रॅम १२५० लिटर पाण्यात मिसळून तोटी काढलेल्या पंपाने ऊस लागवडीच्या ओळीत सोडावे.
अशे  विकास पाटील, कृषि संचालक, (विस्तार व प्रशिक्षण) कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी कळविले आहे.




*धान पिकावरील तुडतुड्यांचे एकात्मिक व्यवस्थापन

*धान पिकावरील तुडतुड्यांचे एकात्मिक व्यवस्थापन* 

ठाणे दि.22 (प्रतिनिधी) :- भातावर तपकिरी तुडतुडे, हिरवे तुडतुडे आणि पांढरे तुडतुडे असे तीन प्रकारचे तुडतुडे बागायती पाणथळ क्षेत्रामध्ये आढळून येतात. त्यापैकी तपकिरी तुडतुडे सर्वात जास्त हानीकारक आहेत. ही कीड पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात न होणाऱ्या, घन लागवड केलेल्या आणि नत्र खताची मात्रा वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात दिलेल्या शेतात प्रामुख्याने आढळून येते. त्याबरोबर, 280 से. ते 300 से. तापमान, 85 टक्के पेक्षा जास्त आर्द्रता आणि कमी पाऊस या किडीचा प्रादुर्भाव वाढण्यास पोषक ठरतो. तुडतुडे व त्यांची पिल्ले सतत खोडातील अन्नरस शोषून घेतात त्यामुळे रोपांची पाने पिवळी पडतात. उपद्रव मोठ्या प्रमाणावर असेल तर रोपे वाळतात व जळल्यासारखी दिसतात.  शेतात ठिकठिकाणी तुडतुड्यांमुळे करपून गेलेले गोलाकार भाताच्या पिकाचे खळे दिसतात यालाच "हॉपर बर्न" असे म्हणतात. अशा रोपांना लोंब्या येत नाहीत आणि आल्याच तर दाणे न भरता पोचट राहतात.  
 तरी शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे. सर्वेक्षणासाठी प्रत्येक बांधीतील वेगवेगळ्या ठिकाणावरील दहा चुडांची निरीक्षणे  घ्यावीत  व धानाच्या बुंध्यावरील तुडतुड्यांची संख्या मोजून सरासरी प्रति चूड किती तुडतुडे आहेत ते मोजून घ्यावेत. 10 तुडतुडे प्रती चूड रोवणी ते फुटवे अवस्थेपर्यंत. 10 तुडतुडे प्रती चूड फुटवे ते दुधाळ अवस्थेपर्यंत आढळल्यास नियंत्रणाचे उपाय योजावेत.
एकात्मिक कीड व्यवस्थापन : तुडतुडयांचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी लावणी दाट करू नये. दोन ओळीतील अंतर             20 सें.मी. आणि दोन चुडातील अंतर 15 सें.मी. ठेवावे तसेच रोपांची पट्टा पध्दतीने लागण करावी. नेहमी प्रादुर्भाव होणाऱ्या शेतात नत्र खताची मात्रा वाजवी प्रमाणात द्यावी. शेतातील पाण्याचा निचरा नियमित करावा, पाणी बदलावे. टेहळणीसाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. प्रत्येक चुडात 10 तुडतुडे या आर्थिक नुकसान पातळीच्या आधारे किटकनाशकाची फवारणी करावी. यासाठी हेक्टरी 500 लिटर पाण्यात इमिडाक्लोरोप्रीड 17.8 टक्के 125 मि.ली. किंवा थायामिथॉक्झाम 25 टक्के डब्ल्युजी 100 ग्रॅम किंवा क्लोथियानिडीन 50 टक्के 25 ग्रॅम किंवा बुप्रोफेजीन 20 टक्के + फिप्रोनील 3 टक्के एससी 500 मि.ली. मिसळून फवारावे किंवा इथोफेनप्राक्स 10 टक्के 500मि.ली. किंवा फेनोबुकार्ब (बी.पी.एम.सी.) 50 टक्के 600 मि.ली. या प्रमाणात फवारणी करावी. फवारणी करताना कीटकनाशक फुटव्याच्या बुंध्यावर पडेल याची दक्षता घ्यावी. आठवडयानंतर परत प्रादुर्भाव आढळल्यास दोन ते तीन फवारण्या कराव्यात, कीटकनाशके बदलून वापरावीत. अशे विकास पाटील, कृषि संचालक, (विस्तार व प्रशिक्षण), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे कळविले आहे.

Wednesday, July 21, 2021

संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच (आशा)अंगणवाडी सेविकांनी पतसंस्था मर्यादित चे फित कापून व दिप प्रज्वलित करून उद्घाटन केले . मा.श्री दादासाहेब भुसे पालकमंत्री,सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री एकनाथ शिंदे,

संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच (आशा)अंगणवाडी सेविकांनी पतसंस्था मर्यादित चे फित कापून  व  दिप प्रज्वलित करून उद्घाटन केले . मा.श्री दादासाहेब भुसे पालकमंत्री,सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री एकनाथ  शिंदे,
पालघर (प्रतिनिधी) पालघर येथील पाचबट्टी जवळ धनानी कॉमप्लेक्स  मधील २ मजल्यावर महीला नागरी पतसंस्था कार्यालय स्थापन करण्यात आले .ह्या कार्यालयाचे उद्घाटन मा.पालकमंत्री श्री दादासाहेब भुसे व मा.सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री एकनाथ शिंदे . मा.खासदार श्री राजन विचारे, मा.आमदार श्री रवींद्र फाटक , मा. डॉ.श्री विश्वास वळवी या सर्वांच्या उपस्थित पालघर अंगणवाडी सेविका , आशावर्कर्स मदतनीस व पतसंस्थेच्या  संस्थापिका अध्यक्षा सौ श्वेता संजय देसले ह्या संस्थेचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या संस्थेच्या  संचालिका  माऊली पूजा पाटील,संचालिका माऊली विजया म्हात्रे,संचालिका माऊली सविता (सावी) , माऊली रुचिता पाटील, तसेच अंगणवाडी सेविका , आशावर्कर्स ,मदतनीस व पत संस्थेतील ईतर महिला .माऊली संचालिका ज्योती पाटील,माऊली कल्पना  आघाव,माऊली मेघा पाटील,माऊली मिताली राऊत,माऊली पल्लवी संखे,माऊली निता पाटील,तसेच ईतर महिला व सर्व सभासद वर्ग उपस्थित होते.ह्या सर्वांच्या सोबत उद्घाटन सोहळा दिमागात संपन्न झाला.

खासदार मा. राजेंद्र गावित यांनी वाढत्या महागाई विरोधात संसदीय अधिवेशनात विचारले प्रश्न !

खासदार मा. राजेंद्र गावित यांनी   
        वाढत्या महागाई विरोधात  संसदीय अधिवेशनात विचारले प्रश्न !
पालघर ( हिरालाल लोखंडे )
लोकसभेच्या चालु असलेल्या संसदीय अधिवेशनात मा.खासदार श्री राजेंद्र गावीत यांनी अतारांकित प्रश्न क्रमांक १२८ अन्वये सन्मानिय वित्त मंत्री यांच्या समोर वाढत्या महागाई बद्दल प्रश्न उपस्थित करून, वाढती महागाई कमी करण्यासाठी सरकारकडुन कोणत्या प्रकारच्या ठोस व सकारात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. त्या बद्दल तपशील देणे. तसेच मागील वर्षी सरकार कडुन घेतलेले वित्तीय निर्णय, ज्या मुळे सध्याच्या काळात झालेली आर्थिक मंदी, वाढती बेरोजगारी आणि घसरता जी पी डी ( GPD ) संदर्भात प्रश्न उपस्थित केले असताना मा. श्री पंकज चौधरी - वित्त राज्यमंत्री यांनी यांनी दिलेले लेखी स्वरूपात दिलेले उत्तर पहा

Tuesday, July 20, 2021

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप रब्बी हंगाम सन 2021 साठी दिनांक 23 जुलै 2021, पर्यंत मुदतवाढ

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन 2021 साठी 
दिनांक 23 जुलै 2021, पर्यंत मुदतवाढ

पालघर (प्रतिनिधी)दि. 20 :- शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2021 व रब्बी हंगाम 2020-21 पासून तीन वर्षासाठी जिल्हयात राबविण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्याअंतर्गत जिल्हयातील भात, नागली व उडीद या पिकांचा समावेश आहे. खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रक्कम भातासाठी हेक्टरी रक्कम रुपये 45,500/-, नाचणीसाठी हेक्टरी रक्कम रुपये 20,000/- आणि उडदासाठी हेक्टरी रक्कम रुपये 20,000/- इतकी आहे असून-शेतकऱ्यांनी 2 टक्के विमा हप्ता म्हणजेच भातासाठी 910/- रुपये प्रति हेक्टर, नाचणीसाठी 2 टक्के 400/-रुपये प्रति हेक्टर व उडीद करीता 400/- रक्कम प्रति हेक्टर आहे. सदर योजना कर्जदार व बिगरकर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असून खरीप 2021 मध्ये योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 15 जूलै 2021 होती. तथापि केंद्र शासनाचे दिनांक 15 जूलै 2021 च्या पत्रान्वये योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची मुदत वाढवून ती दि. 23 जुलै 2021 अशी केली आहे. मागील वर्षी प्रधानमंत्री पिक विमा योजनमध्ये पालघर जिल्हयातील एकूण 18835 कर्जदार व 16054 बिगरकर्जदार असे एकूण 34889 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. चालू वर्षी आतापर्यंत जिल्हयातील एकूण 14001 कर्जदार व 6168 बिगरकर्जदार असे एकूण 20169 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.
• खरीप हंगामातील जोखीमीच्या बाबी –
1. हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थीतीमुळे पिकांची पेरणी हिंवा लावणी झाल्यामुळे  होणारे नुकसान
2. पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थीतीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी झाल्यामुळे होणारे नुकसान
3. पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इ. बाबीमुळे उत्पन्नात होणारी घट.
       तरी शेतकऱ्यांनी पीक विमा मिळणेस्तव प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. त्याकरीता तात्काळ नजीकच्या तालुका कृषि अधिकारी, कार्यालयाशी तसेच बँक व आपले सरकार केंद्र (CSC) संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर श्री. काशिनाथ तरकसे यांनी केले आहे. 
  चालू वर्षी पालघर जिल्हयासाठी एचडीएफसी कंपनीची निवड करण्यात आली आहे. कंपनीमार्फत तालुका स्तरावर प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली आहे. त्याची बसण्याची व्यवस्था तालुका कृषि अधिकारी कार्यालयात केली आहे. त्यांचे नाव व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.
1) पालघर जिल्हा कार्यालय, श्री. भारत जोगी, 7875219444
2) पालघर, श्री. स्वप्नील सुतार, 8767388475
3) वसई, श्री. संदीप धंहाडा, 9011879023
4) डहाणू, श्री. जयेश धापसी, 9764940628
5) तलासरी, श्रीम. पुजा धामोडा, 8080473853
6) वाडा, श्री. महेश धापसी, 7066093579
7) विक्रमगड, श्री. विशाल गिंभल, 9370971339
8) जव्हार, श्री. सचिन तुंगार, 9561743370
9) मोखाडा, श्री. उल्हास पाटेकर, 9273706707  
तरी शेतकऱ्यांना या योजनेबाबत काही अडचण आल्यास वरील प्रतिनिधींशी संपर्क साधावा.

सार्वजनिक खाजगी व भागीदारी तत्वावर सधन कुकुट विकास गट स्थापन करणे (PPP) या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावे

सार्वजनिक खाजगी व भागीदारी तत्वावर सधन कुकुट विकास गट स्थापन करणे (PPP) 
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावे

पालघर (प्रतिनिधी)दि. 20 :- पालघर जिल्ह्यामध्ये  सार्वजनिक खाजगी व भागीदारी तत्वावर सधन कुकुट विकास गट स्थापन करणे (PPP) या योजने करिता वसई, डहाणू व तलासरी या तालुक्यातील लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर योजने अंतर्गत एकूण प्रकल्प खर्च रक्कम रु.10,27,500/- एवढी असून सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासनाचे 50% अनुदान म्हणजेच रु.5,13,750/- देय असून उर्वरित 50 % रक्कम, लाभार्थी स्वतःचा हिस्सा किंवा वित्तीय संस्थेकडून घेऊन उभा करू शकतो.
   योजनेचे निकष :-
• अर्जदाराची वयोमर्यादा 18 ते 60 वर्ष असावी.
• लाभार्थ्याकडे 2500 चौ फुट स्वतः च्या मालकीची जागा तसेच 1000 चौ फुट चे 2 शेड, खाद्य,अंडी साठवणूक व अंडी उबवणूक यंत्र यासाठी स्वतंत्र खोली असणे आवश्यक आहे.
• शेड च्या ठिकाणी दळण वळणाची, पाण्याची व विद्युतीकरणाची सुविधा असणे आवश्यक आहे.
• एकूण प्रकल्प खर्च रक्कम रु. 10,27,500/- अंतर्गत लाभार्थ्यास 50 % अनुदानात खालील बाबीचा समावेश करण्यात आला आहे.
• प्रती 1000 चौ. फुटाच्या 2 पक्शिगृहाचे बांधकाम,स्टोअर रूम,पाण्याची टाकी, विद्युतीकरण.
• खाद्य व पाण्याची भांडी, ब्रूडर, इतर उपकरणे व लसीकरण 
• लघु अंडी उबवणूक यंत्र 
• 1000 एकदिवशीय मिश्र नर +मादी पिले प्रती पक्षी रु. 60/-
• 20 आठवड्यावरील अंड्यावरील 500 पक्षी नर + मादी प्रती पक्षी रु. 150/-
• उबवनुकीची अंडी 400 प्रती अंडी रु. 10 /-
• 1000 एकदिवशीय पिल्लांसाठी 20 आठवडे कालावधी पर्यंत पक्षी खाद्य पुरवठा 
• एग नेस्ट 
• पक्षी खाद्य ग्राईनडर           
लाभार्थ्यांनी त्यांचे अर्ज पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती यांच्याकडे सादर करावयाचे आहेत. प्राप्त झालेले सर्व अर्ज जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद यांचे मार्फत लाभार्थी निवडीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, पालघर यांच्याकडे सादर करण्यात येतील. त्यानंतरच लाभार्थींची निवड करण्यात येईल. सदर योजनेसाठी जास्तीत जास्त संख्येने वरील तीन तालुक्यातून अर्ज करण्यात यावेत असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पालघर डॉ. प्रशांत ध. कांबळे यांनी केले आहे.

सन 2011 ते दि. 31 मार्च 2021 या कालावधीत नोंदणी केलेल्या कामगारांना रु.1500 मिळणार

सन 2011 ते दि. 31 मार्च 2021 या कालावधीत नोंदणी 
केलेल्या कामगारांना रु.1500 मिळणार

पालघर (प्रतिनिधी)दि. 20 :- कोरोना प्रादुर्भाव काळात घरेलु कामगाराना आर्थिक मदतीसाठी महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याण मंडळाने रु. 1500/- देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार सन 2011 ते दि. 31 मार्च 2021 या कालावधीत नोंदणी केलेल्या कामगारांना रु.1500/- दयावयाचे आहेत. बँक खाते आधारकार्ड इत्यादी माहिती उपलब्ध असलेल्या कामगाराच्या खात्यात रक्कम टाकण्यात आलेली आहे. ज्या कामगारांनी सन 2011 ते दि.31 मार्च 2021 या कालावधीत नोंदणी केलेली असेल त्यांनी बँक खात्याचे पासबुक, आधारकार्डची छायांकित प्रत तसेच आवश्यक असणारी वैयक्तिक माहिती http://public.mlwb.in/public या संकेतस्थळावर सादर करावी. अथवा "कामगार उप आयुक्त, पालघर, एम.आय.डी.सी. कर्मचारी वसाहत, तारापूर-बोईसर रोड, हॉटेल सरोवर समोर, बोईसर (पश्चिम), ता. व जि. पालघर- 401504" या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कि.वि. दहिफळकर, कामगार उप आयुक्त, पालघर यांनी केले आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बोईसर येथे जाऊन केली पुलाच्या गर्डर व बीमची केली पाहणी

*कोपरी पुलाच्या मधल्या दोन मार्गिकांचं काम येत्या ९ महिन्यात पूर्ण करणार*

 
*नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बोईसर येथे जाऊन केली पुलाच्या गर्डर व बीमची केली पाहणी*

*पुलाचे गर्डर आणि बीम तातडीने ठाण्याला हलवण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना*
 
पालघर(प्रतिनिधी) दि 20 : : ठाण्यातील पूर्व द्रुतगती मार्गावरील कोपरी येथील रेल्वे ओव्हरब्रिजच्या मधल्या दोन मार्गिकांचे काम येत्या नऊ महिन्यांत पूर्ण करण्याची ग्वाही एमएमआरडीए आणि रेल्वेने दिल्यानंतर या पुलासाठी लागणारे गर्डर आणि बीम तातडीने ठाण्याला हलवण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. बोईसर येथे सुरू असलेल्या या कामाची पाहणी मंगळवारी श्री. शिंदे यांनी केली.
पूर्व द्रुतगती मार्गावरील कोपरी येथील रेल्वे ओव्हरब्रिजचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूकडील दोन मार्गिकांचे काम पूर्ण झाले असून अप्रोच रोडचे काम येत्या काही दिवसांत पूर्ण होताच या दोन मार्गिकांचा वापर सुरू केला जाणार आहे. मात्र, मधल्या दोन मार्गिकांचे काम नक्की कसे हाती घ्यावे, याबाबत थोडी संदिग्धता होती. या मार्गावर असलेला वाहतुकीचा भार पाहता या दोन मार्गिकांचे काम दोन टप्प्यात पूर्ण करावे किंवा कसे याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, एमएमआरडीए आणि रेल्वेने नऊ महिन्यांत काम पूर्ण करण्याची ग्वाही दिल्यानंतर या दोन्ही मार्गिकांचे काम एकत्र हाती घेण्यावर शिकामोर्तब करण्यात आले आहे. 
श्री. शिंदे यांनी मंगळवारी बोईसर येथील साई प्रोजेक्स्ट्स कंपनीच्या वर्क शॉपला भेट देऊन गर्डरच्या कामाची पाहणी केली. या पुलासाठी वापरण्यात येणारे भक्कम गर्डर आणि देशात पहिल्यांदाच वापरण्यात येणाऱ्या पूर्ण स्टीलच्या बीमच्या कामाची पाहणी त्यांनी केली. हे सर्व काम पूर्ण झाल्यामुळे हे साहित्य तातडीने ठाण्याला हलवण्याचे निर्देश त्यांनी दिले. पहिल्या दोन मार्गिका सुरू होताच मधल्या दोन मार्गिकांचे काम हाती घेण्यात येईल, असेही श्री. शिंदे म्हणाले. 
ठाण्याच्या वाहतुकीच्या दृष्टीने हा पूल लवकरात लवकर पूर्ण होऊन सुरू होणे गरजेचे असल्याने पहिल्या दोन मार्गिका सुरू झाल्यावर लगेचच उर्वरित दोन मार्गिकांचे कामही हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे थोडी गैरसोय झाली तरीही येत्या नऊ महिन्यांत पूर्ण ब्रिज तयार करून वापरता येणे शक्य होणार आहे. त्यामुळेच या दोन्ही मार्गिकांचे काम एकत्रच सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले. 
याप्रसंगी ठाण्याचे खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र फाटक आणि एमएमआरडीए व मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

01 ऑगस्ट 2021 रोजी वसई न्यायायलयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन

01 ऑगस्ट 2021 रोजी वसई न्यायायलयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन

पालघर (प्रतिनिधी)दि. 20 :- वसई न्यायालयात दिनांक 01 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये दिवाणी स्वरुपाची, तडजोडीस पात्र फौजदारी स्वरुपाची, वैवाहिक स्वरुपाची, 138 एन. आय. अॅक्ट चेक संबधीची अन्वये दाखल झालेली प्रकरणे, बैंक वसूली प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, विज व पाणी विषयक देयक प्रकरणे महसूली प्रकरणे तसचे दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहे. तरी सर्व पक्षकारांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी सदरील संधीचा फायदा घ्यावा व आपली जास्तीत जास्त प्रकरणे लोकन्यायालयात ठेवण्यासाठी ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयात अर्ज करावा.
तसेच जे पक्षकार लोकन्यायालयात हजर राहू शकत नाहीत त्यांनी ऑनलाईन पध्दतीचा वापर करणेकरीता तालुका विधी सेवा समिती, वसई यांचेकडे संपर्क करावा.
सर्व पक्षकारानी प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने सोडविण्याकरीता व आपले दुरावलेले संबंध पूर्नस्थापीत करणेसाठी राष्ट्रीय लोकअदालतीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन सुधीर एम. देशपांडे, जिल्हा न्यायाधीश–1 तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती वसई यांनी केले आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या परिसराची पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केली पाहणी

*अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या परिसराची पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केली पाहणी* 

*अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासन सहकार्य करेल*

      *--पालकमंत्री दादाजी भुसे* 
 पालघर (प्रतिनिधी)दि 20 : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात तसेच पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे ह्या पावसामध्ये अनेक भागातील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी जिल्हा प्रशासन सहकार्य करणार असे कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले
 नंदाडे (सफाळे)  येथे  अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घराची पाहणी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यांनी केली यावेळी  परिसरातील नागरिकांशी  चर्चा करताना पालकमंत्री श्री भुसे बोलत होते.

       या अतिवृष्टीमुळे बऱ्याच  नागरिकांच्या घरामध्ये   पाणी शिरल्याने   नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे यावर उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.    धोकादायक परिसरातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे  निर्देश प्रशासनाला  देण्यात आले आहेत असे पालकमंत्री यांनी सांगितले  .     पालकमंत्री  दादाजी भुसे यांनी नुकसानग्रस्त भागाची पहाणी करून स्थानिक नागरिकांची विचारपूस करून त्यांच्या अडचणी सोडविण्याबाबत निर्देश यावेळी दिले. 
 यावेळी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ तसेच वरिष्ठ अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

पत्रकार आशाद बी शेख ह्यांची लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघात कोकण विभागीय संघटक व सम्पर्क प्रमुख पदवार नियुक्ति



*पत्रकार आशाद बी शेख ह्यांची लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघात कोकण विभागीय संघटक व सम्पर्क प्रमुख पदवार नियुक्ति* 

*विदर्भ -कोकणातील ४ विभागीय* *पदाधिकारी नियुक्त* 
==============================
अकोला(प्रतिनिधी) ः लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या अखिल भारतीय संघटनेमध्ये विभागीय स्तरावर 4 नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
मा.श्री आशाद बी शेख यांची संघटक तथा संपर्क प्रमुख कोकण विभाग, मा. श्री.सिध्देश्वरजी देशमुख, मा.श्री.किशोरजी मुटे तर मा.डॉ.श्री.शंकरराव सांगळे या तिन्ही मान्यवरांची संघटक तथा संपर्क प्रमुख विदर्भ विभाग या पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
यातील श्री.आशाद शेख हे पालघर येथे जगत भारतीचे संपादक असून न्युज चॅनेलचे जिल्हा प्रतिनिधी आहेत. ते इंडीयन लँग्वेज न्युजपेपर्स या देशातील विविध वृत्तपत्रांच्या संपादक, प्रकाशकांच्या दिल्लीच्या ईलना या संघटनेचे सुध्दा केंन्द्रीय कार्यकारिणी सदस्य आहेत.
अकोला येथील श्री.सिध्देश्वर देशमुख हे सिध्देश्वर एक्सप्रेसचे संपादक व एका कर्मचारी संघटनेचे राज्य पदाधिकारी नेते राहिलेले आहेत. तसेच  वर्धा येथील श्री.किशोर मुटे हे पत्रकार, ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारधारेचे साधक असून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रीय आहेत. तर कापशी, जि.अकोला येथील डॉ.श्री. शंकरराव सांगळे हे साप्ताहिक, मासिकाचे संपादक, भारतमाता मंदिराचे संस्थापक व निकोप समाज निर्मितीच्या विचार परिवर्तन चळवळीतील आक्रमक नेते आहेत.
आगामी काळात देशातील इतर राज्यांमध्ये संघटनेला मजबुत करण्याचे प्रयत्न सुरू होणार आहेत. तत्पुर्वी महाराष्ट्रातील संघटनकार्यात चैतन्य निर्माण  करून संघटनेला सशक्त करण्यासाठी अनेक महत्वाच्या नियुक्त्या करण्याचे काम संघटनेने सुरू केलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अकोला जिल्हाध्यक्षपदावर पत्रकार श्री. विवेक मेतकर यांच्या नियुक्तीनंतर ह्या प्रादेशिक नियुक्त्या संस्थापक-अध्यक्ष संजय एम. देशमुख यांनी जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात पत्रकार आणि सामाजिक प्रश्नांकरीता लढा देण्यास सिद्ध झालेल्या या संघटनेत जास्तीत जास्त पत्रकारांनी सभासदत्व स्विकारुन सहभागी व्हावे. सामाजिक नेत्यांनीही आपल्या संपर्कातील पत्रकारांना याकरीता प्रोत्साहीत करावे, असे आवाहन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष संजय एम. देशमुख यांनी केले आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची बिनविरोध निवड



*जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची बिनविरोध निवड*


     पालघर (प्रतिनिधी)जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची आज निवडणूक पार पडली  असून वैदेही वाढाण यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर उर्फ शिवा सांबरे यांची निवड झाली आहे.
  आज  दि.२०/७/२०२१ रोजी नियोजन भवन  जिल्हाधिकारी कार्यालय येथे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणुक घेण्यात आली. अध्यक्ष पदासाठी 
सुरेखा थेतले आणि वैदेही वाढाण यांनी  तर उपाध्यक्ष पदासाठी ज्ञानेश्वर सांबरे आणि  महेंद्र भोणे यांनी  नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. परंतु सुरेखा थेतले व महेंद्र भोणे यांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड झाली.
 मा.जिल्हा परिषद अध्यक्ष   भारती कामडी यांनी ७ जुलै २०२० रोजी  अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ९ जुलै २०२१ पासून समाजकल्याण सभापती विष्णू कडव  अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळत होते.

ग्रामपंचायतीचे थकीत विजबिले असली तरी वीजपुरवठा खंडित करू नये. केदार काळे -- शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक

ग्रामपंचायतीचे थकीत विजबिले असली तरी वीजपुरवठा खंडित करू नये. 
केदार काळे --  शिवसेना पालघर लोकसभा सहसमन्वयक 
पालघर ( हिरालाल लोखंडे ) पालघर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीनी महावितरण कंपनीनीचे रोड लाईट बिले न भरल्याने वीजपुरवठा करण्या बद्दल लेखी नोटीस दिलेली आहे .
 किंवा तात्पुरता वीजपुरवठा खंडित केला आहे. या बद्दल श्री केदार काळे यांनी १९ जुलै २०२१ रोजी महावितरण महाराष्ट्रात राज्य विद्युत वितरण मर्यादित पालघर .येथील श्रीमती किरण नागावकर अधीक्षक अभियंता पालघर, श्री प्रताप मचिये कार्यकारी अभियंता पालघर. यांची भेट घेऊन पावसाळ्यात ग्रामपंचायत रोड लाईट व गाव पाणीपुरवठा योजनेचा विज जोडणी खंडित करण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे लाॅक डाऊन मुळे ग्रामपंचायतींची पाणी पट्टी, घर पट्टी वसुल  होत नाही. ग्रामपंचायतीना अधिक उत्पादनाची साधने नाहीत. १५ व्या वित्त आयोगाचे पैसे थकीत विजबिल भरण्यासाठी मिळाले नाहीत. अश्या अनेक प्रकारच्या अडचणी सरपंच, लोकप्रतिनिधींनी यांनी महावितरणचे अधिकारी यांच्या समोर मांडल्यानंतर, महावितरणचे अधिकारी, यांनी 
 २६ किंवा २७ जुलै २०२१ पर्यंत थकीत बिलाच्या ३० %  टक्के रक्कम भरावी. व उरलेली रक्कम कधी देणार असा पर्याय सुचविला असतांना, ग्रामपंचायत सरपंच यांचे सांगणे आहे. ३० % टक्के रक्कम भरणे शक्य नाही. आमच्या अडचणी समजून घ्या. यावर महावितरणाचे अधिकारी यांचे सांगणे आहे, आपण ( सरपंच ) लवकरात लवकर बिलाची किती रक्कम भरणार, ते कळविणे. आम्ही वरिष्ठ अधिकारी यांच्या कडे आपले प्रपोजल ( म्हणणे ) मांडतो. व  विज जोडणी खंडित न करण्यासाठी , स्थगिती देण्याचा प्रयत्न करतो. तरीही आपण एप्रिल २०२० ते आज पर्यंत ची रोडलाईट बिले, व गाव पाणीपुरवठा योजनेची बिले भरावी. किंवा त्यातील काही रक्कम भरणा करावी, म्हणजे विद्युत पुरवठा खंडित होणार नाही. तसेच एप्रिल २०२० पूर्वीची विजबिले १५ व्या वित्त आयोगाच्या आराखड्यात टाकून मंजूर करून घ्यावी. यावर श्री केदार काळे यांचे सांगणे आहे, करोना प्रार्दुरभाव असल्याने ग्रामसभा घेण्यासाठी अडचणी आहेत. १५ व्या वित्त आयोगाच्या आराखड्यात वीजबिल समाविष्ट करणे शक्य होऊ शकेल ते सांगता येत नाही. महावितरण कंपनी, ग्रामपंचायतीना दरमहा वीजबिले देत नव्हती. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतीची विजबिले थकीत आहे. तरी आपण थकीत वीज बिलावर लावलेले व्याज तरी कमी करण्यात यावे. शासनाने  व महावितरण कंपनीने ग्रामपंचायतीना समजले व परवडेल अशी योजना करावी. 
      या बैठकीला सौ. गीता पाटील सरपंच खारेकुरण, सौ. स्वाती पाटील सरपंच विळंगी, सौ. चेतना वैद्य सरपंच भादवे मधुकर नगर, सौ. नयना किणी सरपंच तिघरे आंबोडे, सौ. वृषाली गावड सरपंच आगरवाडी, सौ. करणा तरे सरपंच एडवण, सौ. श्रध्दा बारी सरपंच दांडा खटाळी, हेमंत पाटील, योगिता किणी, कल्पना पाटील, प्रविण पाटील तसेच अनेक ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, सदस्य उपस्थित होते.

Monday, July 19, 2021

कोकण विभागीय आयुक्त व्हि.बी.पाटील यांनी सिडको ने बांधलेल्या पालघर येथील नवीन प्रशासकीय इमारतीची केली पाहणी

कोकण विभागीय आयुक्त व्हि.बी.पाटील यांनी  सिडको ने बांधलेल्या 
पालघर येथील नवीन प्रशासकीय   इमारतीची केली पाहणी

 पालघर दि.19 :- पालघर जिल्हयाच्या  नविन प्रशासकीय  इमारतीची पाहणी  कोकण विभागीय आयुत  व्हि.बी.पाटील  यानी  केली  या पाहणीमध्ये त्यांनी  जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हापरिषद ,पोलिस  अधिक्षक  प्रशासकीय इमारतीची  पाहणी ,विविध विभागाची पाहणी केली    त्यांनतर  सिडकोच्या अधिकाऱ्या समेवत आढावा बैठक घेतली.

श्री पाटील यांनी जिल्हा ग्रामीण रुग्णालयास भागास भेट दिली   सदर  इमारतीची पाहणी केली. कोविड उपचार  केंद्रला भेट देऊन तेथील आरोग्य अधिकारी  व कर्मचारी यांच्या कोविड नियंत्रणा  बाबत चर्चा केली.  जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेल्या  ऑक्सिजन प्लांट (पीएलसी) ची पाहणी  केली.
  जिल्हाधिकारी याच्या समवेत  जिल्हाधिकारी  कार्यालयात  आढावा बैठक घेऊन  सदर आढावा  बैठकीत कोव्हीड, लाटेबाबत नियोजन, भुसंपादन प्रकल्प याबाबत या आढावा घेण्यात आला. कोव्हीडच्या तिसऱ्या संभावित लाटेसंदर्भात सर्वानी  दक्षता घ्यावी  असे निर्देश कोकण विभागीय आयुक्त श्री.पाटील यांनी अधिकारी वर्गांना दिले . 
या  आढावा  बैठीत  जिल्हाधिकारी  डॉ.माणिक गुरसळ ,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दाराम सालिमठ, जिल्हा पोलिस अधिक्षक  दतात्रेय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी  डॉ. किरण महाजन,  उपस्थितीत होते.

विकेल ते पिकेल उपक्रमा अंतर्गत फळरोप वाटिका व संत शिरोमणी रयत बाजारअभियानाला सुरुवात

विकेल ते पिकेल उपक्रमा अंतर्गत फळरोप वाटिका व संत शिरोमणी रयत बाजारअभियानाला सुरुवात

 पालघर (प्रतिनिधी)*विकेल ते पिकेल* उपक्राअंतर्गत फळरोप वाटिका पालघर येथे संत शिरोमणी रयत बाजार अभियान अंतर्गत आत्मा योजनेतील शेतकरी गटांना व प्रगत शेतकऱ्याना आज पालघर विधान सभा आमदार मा.श्री श्रीनिवास वानगा , माजी जी. प कृषि सभापती मा.सुशील चुरी , यांचे शुभहस्ते कॅरेट, स्टँडिज, छत्री, वजन काटा, ट्रे असे विक्री युनिट वाटप करण्यात आले. यामुळे शेतकरी स्वतः पिकवलेला ताजे शेतमाल   स्वतः प्रत्यक्ष  ग्राहकाला विकणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला यापासून चांगलाच फायदा होणार आहे. सदर कार्यक्रमास उपस्थित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पालघर श्री.के. बी तरकसे, उप विभागीय कृषी अधिकारी श्री.दिलीप नेरकर , तालुका कृषी अधिकारी पालघर श्री. तरुण वैती , आत्मा योजना बी टी एम पालघर श्री.मनोज वाकळे, मंडल कृषी अधिकारी पालघर श्री प्रसाद गुंजवटे,मंडळ कृषि अधिकारी मनोर श्री. अनिल नर्गुळवार, साफाळे मंडळ अधिकारी श्री अजय हुले, कृषि पर्यवेक्षक सुधीर गावड.जान्हवी पारधी, जगदीश पाटील, नीलम संखे., किरण संखे., दिपक खोत व कृषी सहाय्यक.रीचा संखे ,नीलम लहांगे, सुमित कुवर,राजेश बाबर, प्रितम गोवारी, रक्षित पाटिल, सूरज घरत, काजळ भाताडे, हेमलताभोईर, तनुजामुकणे, रेखा पाटिल,  शेतकरी आशाद बी शेख  उपस्थित होते.

पं. स. व जि. प. विकास आराखडा तयार करण्यासाठी एकदिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन



*पं. स. व  जि. प. विकास आराखडा तयार करण्यासाठी एकदिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन*

 पालघर (प्रतिनिधी)जिल्हा परिषद पालघर राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान सण २०२१-२२   पंचायत समिती व जिल्हा परिषद विकास आराखडा( BPDP/DPDP) तयार करण्यासाठी जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे ग्राम पंचायत विभागा मार्फत उद्घाटन  करण्यात आले.  उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत) तुषार माळी यांनी उदघाटन झाल्याचे जाहीर केले. यावेळी गटविकास अधिकारी डहाणू,पालघर वसई उपस्थित होते. तांत्रिक छाननी समिती च्या  प्रशिक्षणाने या कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली.  पंचायत समिती सभागृह आणि जिल्हा परिषद संकुल अशा दोन ठिकाणी विभागून कार्यशाळा आयोजित करण्यात आली.सदर प्रशिक्षणात जिल्हा परिषद विकास आराखडा तयार करण्याबाबत जिल्हा विकास आराखड्याची प्रक्रिया, जिल्हा नियोजन समिती व क्षेत्रीय कार्य गटाची स्थापना तसेच प्रशिक्षण, जिल्हा विकास आराखड्यासाठी वातावरण निर्मिती, ग्रामपंचायत विकास आराखडा व तालुका विकास आराखडा यांचे एकत्रीकरण करून विकासाच्या गरजा व प्राधान्यक्रम ठरविणे, विकासात्मक दृष्टिकोन कृती कार्यक्रम, जिल्हा परिषद स्तरावर नियोजनासाठी उत्पन्नाच्या बाबीं, योजना, अंमलबजावणी, देखरेख प्रणाली, अनुभवाधारित बदल करणे व जिल्हा विकास आराखडा मध्ये बद्दल व इतर अनेक विषयांवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
 तसेच पंचायत समिती विकास  आराखडा तयार करण्याची प्रक्रिया, पंचायत समिती सदस्य नियोजन समिती आणि क्षेत्रीय कार्यकारी गटाची स्थापना तसेच प्रशिक्षण, पंचायत समिती विकास आराखडा तयार करण्यासाठी वातावरण निर्मिती, ग्रामपंचायत विकास आराखडा याचे एकत्रीकरण करणे, आणि विकासात्मक गरजांचे प्राधान्यक्रम निश्चित करणे, परिस्थिती विश्लेषण आणि विकास स्थिती बाबतचा अहवाल, इ. विषयावर कार्यशाळेमध्ये सविस्तर माहिती दिली जाईल. यशदा मध्ये प्रशिक्षण घेतलेले प्रवीण प्रशिक्षक नागेश्वर संखे नरेश बरफ यांच्यामार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.