विकेल ते पिकेल उपक्रमा अंतर्गत फळरोप वाटिका व संत शिरोमणी रयत बाजारअभियानाला सुरुवात
पालघर (प्रतिनिधी)*विकेल ते पिकेल* उपक्राअंतर्गत फळरोप वाटिका पालघर येथे संत शिरोमणी रयत बाजार अभियान अंतर्गत आत्मा योजनेतील शेतकरी गटांना व प्रगत शेतकऱ्याना आज पालघर विधान सभा आमदार मा.श्री श्रीनिवास वानगा , माजी जी. प कृषि सभापती मा.सुशील चुरी , यांचे शुभहस्ते कॅरेट, स्टँडिज, छत्री, वजन काटा, ट्रे असे विक्री युनिट वाटप करण्यात आले. यामुळे शेतकरी स्वतः पिकवलेला ताजे शेतमाल स्वतः प्रत्यक्ष ग्राहकाला विकणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला यापासून चांगलाच फायदा होणार आहे. सदर कार्यक्रमास उपस्थित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पालघर श्री.के. बी तरकसे, उप विभागीय कृषी अधिकारी श्री.दिलीप नेरकर , तालुका कृषी अधिकारी पालघर श्री. तरुण वैती , आत्मा योजना बी टी एम पालघर श्री.मनोज वाकळे, मंडल कृषी अधिकारी पालघर श्री प्रसाद गुंजवटे,मंडळ कृषि अधिकारी मनोर श्री. अनिल नर्गुळवार, साफाळे मंडळ अधिकारी श्री अजय हुले, कृषि पर्यवेक्षक सुधीर गावड.जान्हवी पारधी, जगदीश पाटील, नीलम संखे., किरण संखे., दिपक खोत व कृषी सहाय्यक.रीचा संखे ,नीलम लहांगे, सुमित कुवर,राजेश बाबर, प्रितम गोवारी, रक्षित पाटिल, सूरज घरत, काजळ भाताडे, हेमलताभोईर, तनुजामुकणे, रेखा पाटिल, शेतकरी आशाद बी शेख उपस्थित होते.
No comments:
Post a Comment