Saturday, July 24, 2021

सेवा सोसायटी संस्थेने प्रस्ताव सादर करावे

*सेवा सोसायटी संस्थेने प्रस्ताव सादर करावे* 


पालघर(प्रतिनिधी) दि. 23 :- जिल्हा कौशल्य, विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पालघर जिल्हा या कार्यालयाच्या मार्फत पालघर जिल्हयातील शासकिय कार्यालयामध्ये बहुउद्देशिय काम करण्याकरीता सेवा सोसायटी यांनी प्रस्ताव सादर करावेत  असे आवाहन.जिल्हा कौशल्य, विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र  सहाय्यक संचालक मुकेश संखे  यांनी केले.
      कार्यालयात यापूर्वी व नविन नोंदणीकृत असलेल्या पात्र व इच्छुक सर्व सेवा सोसायट्यांनी संस्थेच्या अहवालासह आपले प्रस्ताव या कार्यालयास सादर करण्याचे आवाहन मुकेश संखे यांनी केले आहे. 
सदरचा प्रस्ताव देताना शासन निर्णय क्र. इएसई-2003/प्र.क्रं. 191/रोस्वरो-1 दि. 01/02/2006 च्या मार्गदर्शनानुसार अटी व शर्तीची पुर्तता करणाऱ्‍या व चालू वित्तीय वर्षातील लेखा परिक्षण केलेल्या सेवा सोसायटीं यांनी प्रस्ताव सादर करावेत. अपूर्ण किंवा अटींची पुर्तता न करणाऱ्या सेवा सोसायट्यांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. सदर काम देणाऱ्या आस्थापनांची व त्यांच्या कामाची माहिती त्यांच्या सेवा व शर्तीसह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पालघर या कार्यालयाच्या सुचना फलकावर लावण्यात येईल

No comments:

Post a Comment