*समाजकल्याण समिती सभापती पदी रामू पागी यांची बिनविरोध निवड*
पालघर (प्रतिनिधी)पालघर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समिती सभापतीची निवडणूक प्रक्रिया आज दि.२९/०७/२०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन,पालघर येथे पार पडली असून रामू भादल पागी यांची समाजकल्याण समिती सभापती पदी बिनविरोध निवड झाली.
सदर निवडणुकीसाठी रामू पागी यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. त्यामुळे
रामु पागी यांची बिनविरोध पदी निवड झाल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप कळंबे यांनी घोषित केले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे सर्व समिती सभापती,सर्व जिल्हा परिषद सदस्य, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा)उपस्थित होते.
No comments:
Post a Comment