पालघर (प्रतिनिधी)पालघर जिल्ह्यातील बोईसर मधील महागाव ग्रामपंचायतीच्या कुकडे गावच्या एकमेव मुख्य रस्त्यावर सद्या चालणे ही कठीण झाले आहे.हाच रस्ता बोईसरच्या कुकडे गावातुन डहाणू, चारोटी आणि कासा गाँव ते मुंबई अहमदाबाद महामार्गाला जोडला जातो . या रस्त्यावर जास्त करून अवजड वाहने ही (ओव्हरलोड )20 ते 30 टन च्या ट्रक खड़ी, दगड, मुरुम, माती घेवून नेहमी जात असल्याने हा रस्ता जास्त खराब झाला आहे. असा की रस्त्यात खड्डे की खाद्यात रस्ता शोयाचा हा प्रश्न निर्माण झाला आहे.आता तरी प्रशासनाने ह्या रस्ता दुरुस्ती करण्याचे काम केले पाहिजे . हा रास्ता 2014-15 वर्षी झाला होता। त्या नंतर अद्याप या वर दुरुस्ती करण्यात आली नाही.ह्या रस्त्यावर अनेक वेळा अपघातही घडत असतात .परंतु अवजड वाहनांन कडे (ओवरलोड ) तलाठी, पोलिस किंवा महसूल विभाग याकडे लक्ष देत नाही . यामुळे ग्रामस्थांमध्ये ज्वलंत रोष आहे. तरी हा रस्ता लवकरात लवकर व्हावा याकडे आत्ता लक्षलागले आहे.
प्रशासन कडून कारवाही अपेक्षित
ReplyDelete