Monday, September 6, 2021

सरस्वती विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा!

सरस्वती विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा!

वासिंद (किशोर पाटील)- वासिंद मधील सरस्वती विद्यालयात जागतिक  शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
    यानिमित्त विद्या विकास मंडळातर्फे 'सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय' आणि 'शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल' शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करून शिक्षकांप्रती कृतज्ञभाव व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन विठ्ठल भेरे, संचालक मंडळाचे सदस्य, सरस्वती विद्यालयाच्या प्राचार्या मिना कांबळे, शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य प्रशांत जाधव तसेच दोन्ही शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
   यावेळी उपस्थित मान्यवरांनी समाज उभारणीसाठी शिक्षकांचे योगदान व समर्पीत सेवा कार्याचा आढावा घेऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...