सफाळे पोलिस स्टेशन हद्दीत,
दारूच्या नशेत मित्राने केला मित्राचा खून.
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) सदर घटनेतील आरोपी व मयत हे दोन्ही मित्र असून, दोघेही एकत्र दारू पित व उठत बसत एक मेकांच्या घरी ऐत जात असत. मयत धिरज रामप्रसाद गोंड वय वर्षे २४ . आरोपी अंकुश उर्फ मिथुन लहू वरठा वय वर्षे २०. दोन्ही राहणार सरूचा पाडा, रोडखड सफाळे पुर्व पोस्ट उंबरपाडा ता,जि पालघर. दिनांक ४ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री सुमारे ८-३० च्या दरम्यान मयत स्वतःच्या घरात झोपलेला असताना आरोप यांने, आपापसातील बोलचालीचा राग मनात ठेऊन, दारूच्या नशेत व रागाच्या भरात धीरज गोंड यांच्या घरात जाऊन कुऱ्हाड व लोखंडी सळईने मारहाण, करून जिवे ठार मारून पळून गेला.
मयताची पत्नी नीलम धिरज गोंड वय वर्षे २४ हिने फिर्याद दिली असून सफाळे पोलीस ठाणे ता,जि पालघर येथे गुन्हा नोंद क्रमांक ५५ / २०२१ ,भारतीय दंड विधान संविधान कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनास्थळी सफाळे पोलीस ठाणे येथील प्रभारी पोलिस अधिकारी आणी कर्मचारी यांनी भेट देऊन, गुन्ह्यातील आरोपी हा गुन्हा करून पळून गेला असताना, योग्य रित्या तपास करीत आरोपीला डहाणू येथे जाऊन दिनांक ५ सप्टेंबर रोजी ताब्यात घेऊन, आरोपीस मा. पालघर न्यायालयात हजर केले असून वरिष्ठ पोलिस अधिकारी पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री कहाळे साहेब व सफाळे पोलिस ठाणे येथील कर्मचारी करीत आहे .
No comments:
Post a Comment