Monday, September 6, 2021

सायकलिस्ट ग्रुप च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप !

सायकलिस्ट ग्रुप च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप !
वासिंद (किशोर पाटील)- वासिंद सायकलिस्ट ग्रुप च्या वतीने आपल्या गुरुजनांप्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी सदस्यांनी जिल्हा परिषद शाळा सावरोली  (पिवळी)  येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.
    तसेच सर्व विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्यातील गुरूंचे स्थान आणि महत्व पटवून दिले. या कृतीतून सदर सायकलिस्ट सदस्यांनी वाडीतील उपस्थित सर्व पालकांना विद्यार्थी शिक्षणाचे महत्त्व सांगितले तसेच कोविड काळात लसीकरणाचे महत्व सांगून लसीकरण साठी आवाहन केले. 
   यावेळी सचिन ढमणे, सचिन भोईर, आशिष भोईर, तुषार शेलार, श्याम जाधव, प्रशांत रोठे, स्वप्नील ढमणे आदिजण उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...